Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18        
      
    नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या  खेळूया  मराठी बिग बॉस २!!!!  
 
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा
 
 
शिवानीचा ड्रेसिंग सेन्स
शिवानीचा ड्रेसिंग सेन्स अतिभयंकर आहे, त्यामुळे हिना खानशी तिची सतत तुलना होतेय ती बन्द झाली पाहिजे, हिना इज स्टायलिंग अँड फॅशन आयकॉन.

एक तर या सगळ्या मुली ग्लॅमर इंडस्ट्रीतल्या असून कोणी फार वर्काउट करताना दिसत नाही, अॅथेलॅटिक बॉडी टाइप बायका पुरुष कोणीच नाही एक शिव सोडून, स्मिता जर या सिझनला असती तर तिची आणि शिवची जोडी चांगली जमली असती
शिवानी एकदमच गुटगुटीत बालिका आहे, जे ड्रेस घालते ते टेलरने वाढत्या अंगाचे बनवा इन्स्टर्क्शन्स फॉलो करून बनवलेत !
पुढच्या वर्षी मीच करावं म्हणतेय कोणाला तरी स्टायलिंग स्पॉन्सर, यापेक्षा नक्कीच बरं करेन
मला आता वाटत आहे की खरा गेम
मला आता वाटत आहे की खरा गेम हा वीणा ,बिचुकले,आणि बाप्पा खेळत आहेत.
बाकीच्यांना कळतच नाही आहे की काय करायच.
आउसारखे नॉमिनेशनला घाबरत आहेत.अरे काय घाबरता?ते तर होणारच प्रत्येक आठवड्याला.
बाप्पाने टास्क चांगले केले पाहिजेत,बिचकुलेंचा प्रश्नच नाही,वीणाने शांत डोक ठेवून गेम खेळावा,उगाच त्या रुपाली आणि परागच्या नादाला लागू नये.चँनेल थोडीफार मदत करेलच.पण छान खेळली तर तीही मदत लागणार नाही.अर्थात चँनेलने ठरवल असेल तर नाही पोचून देणार शेवटपर्यंत.
ती नेहा काय रडत होती बिचुकल्यांसमोर
शिवानी काय सुधारायला तयार नाही,पण ममांची क्रुपा आहे असे दिसत आहे त्यामुळे जाईल शेवटपर्यंत.
पण सगळ्यात बावळट केळकर वाटत आहे.
I'm sure so called star
I'm sure so called star players are here with minimum guarantee contract , so they do not worry about nominations.
Resham in last seaosn came with min guarantee and eliminated after her contract.
Dipika kakar suddenly started playing aggresive after her 10 weeks guarantee period got over, We can expect the same this seaosn of marathi BB.
दीपांजली........पूर्णपणे सहमत
दीपांजली........पूर्णपणे सहमत.एव्हिक्शन चँनेलने ठरवले असणार.
यु शुड प्ले अॅग्रेसिव्ह इन
यु शुड प्ले अॅग्रेसिव्ह इन गॅरेंटी पिरियड, अँड वन्स एक्स्पायर्ड प्ले सेफ ना? उलट करण्याचं लॉजिक काय असतं?
हाईंड साईट रेशम तसंच करत असावी असं डीजेची पोस्ट वाचुन आता वाटलं.
कुकरला इगो झालाय,.. आई गं,
कुकरला इगो झालाय,.. आई गं, हसुन मेले! बिचुकले बेष्ट!
नेहा आणि शिवानी जाम इरिटेट
नेहा आणि शिवानी जाम इरिटेट करतात. नेहाला मैथिलीने वोट दिलेलं पण ती तिला nominate करणार. फार कोणी केलंही नाही voting तिला. बिचुकले कशाला मस्का लावत होते शिवानीला. केलं तर केलं nominate, बाहेर वाचवतील ना प्रेक्षक, ती किती भाव खात होती.
नेहा तर nominate व्हायला नको म्हणून गेम खेळत होती, शिव बरोबर बोलला तिला आणि बिग बॉसने पण पचका केला तिचा.
मला पराग रुपालीच्या मागे मागे करतो हे बोअर होतंय, आदरवाईज आवडतोय.
यु शुड प्ले अॅग्रेसिव्ह इन
यु शुड प्ले अॅग्रेसिव्ह इन गॅरेंटी पिरियड, अँड वन्स एक्स्पायर्ड प्ले सेफ ना? उलट करण्याचं लॉजिक काय असतं?
हाईंड साईट रेशम तसंच करत असावी असं डीजेची पोस्ट वाचुन आता वाटलं.
<<<
हो, तसेही प्लेयर्स असतात जसे हिन्दी बिबॉमधे ती जंगली सुरभि राणा, लिटरली उच्छाद मांडला, अॅटॅक आल्यागत वागली, शिव्या दिल्या, मारामार्या केल्या , जिथे परवानगी नाही त्या एरीआमधे (बाथरुममधे) सिगारेटी फुंकल्या आणि खोटं बोलली तिच्या मिनिमम गॅरँटीमधे कारण मुळात तिला वाइल्डकार्ड एंट्रीच बिबॉने थंड घरात जंगलराज आणायला दिली होती.
तिच्या गॅरँटी पिरियडमधे सलमान फारसा ओरडलाही नाही तिला, नंतर एकदाच भरपूर अपमान केला मग मुकाट गप्प होत गेली.
पण याउलट मागच्या सिझनला रेशम टास्कची काही पर्वा न करता लोळत पडायची, तिला कधीही नॉमिनेशनची चिन्ता नसायची.
बरेच लोक इमेज जपतात गॅरेंटी पिरियडमधे आणि गुडीगुडी रहातात, किशोरीताई सुध्दा नंतर नक्की रंग बदलणार असं मला वाटतय
हिन्दी मधे दिपिका कक्कर तर १० आठ्वडे फक्त श्रीसन्तची बहिण बनून “भाई भाई‘ करत मागेमागे फिरली त्याच्या, काहीही केलं नाही, टास्कही नाही करायची फारशी कारण काय तर म्हणे ती अॅक्ट्रेस आहे, लोक अॅग्रेसिव होतात टास्क्स मधे, चेहर्याला लागेल, टॅन होईल अशी अनेक कारणे देत ती किचनमधे बसायची.
दहा आठवड्यानंतर अचानकच जाग आल्या सारखी जोरदार स्टँड घ्यायला लागली, व्होकल झाली, श्रीसन्तचाही विरोध केला आणि जिंकली शो.
विनर फिक्स करता येत नाही म्हणतात, एन्डेमॉलशाइन या बिगबॉसच्या ओरिओज्स्नल इंटरनॅशनल कंपनीकडून व्होटींग तपासलं जातं, ऑडीट केलं जातं म्हणे पण बिबॉ नॉमिनेशन्स नक्कीच मॅनिप्युलेट करु शकतात, इन फॅक्ट बिबॉ खेळतात अख्खा सिझन त्यांच्या रिमोटने आणि हाउसमेट्सना खेळवून घेतात हवं तसं :).
मराठीत ओपन्ली याबद्दल बोलत नाहीत पण हिन्दीमधे श्रीसन्त आणि बरेच लोक बिंधास्त बोलायचे मिनिमम गॅरेण्टीबद्दल, दीपिका ११व्या अठवड्यात अॅग्रेसिव होणार हे रोमिल अँड कंपनी आधीच गेस मारत होते.
यु शुड प्ले अॅग्रेसिव्ह इन
यु शुड प्ले अॅग्रेसिव्ह इन गॅरेंटी पिरियड >> त्याला क्रॉस चेक क्लॉज पण नक्कीच असणार. मूर्खासारखं अॅग्रेसिव्हली खेळलात तर गॅरेंटी नल अँड व्हॉईड होत असणार. नाही तर महाडेंजर राडा घालून ही गॅरेंटीसाठी माणसाला आत ठेवायला लागलं तर लोकं बोंबा मारतील.
असेल काहीतरी क्लॉज, म्हणून तर
असेल काहीतरी क्लॉज, म्हणून तर सेलिब्रिटी काँटेस्ट्न्ट्ना बुस्ट करायला, योग्य डिरेक्शन द्यायला सतत मांजरेकर इशारे देतो, बाहेरून येणारे पाहुणेही निरोप देतात फक्त ठराविक काँटेस्ट्न्ट्सना.
प्रत्येकाचे रेटकार्डही ठरलेले असते, ज्याच्यावर जास्तं पैसा लावलाय त्याला तितक्या लेव्हलचं परफॉर्म करता येत नसेल तर वरंवार तुझ्याकडून खूप अपेक्षा आहे , आता तरी गेम मधे ये अर्थाची आठवण करून दिली जाते.
कॉमनर्स, कमी मानधन वाल्यांना जास्तं लाडाऊन ठेवतात असही म्हणतात कारण कमी इनव्हेस्टमेन्ट असते चॅनलची त्यांच्यावर, नुकसान कमी!
सेलेब स्टेटस नुसार गॅरंटीड
अमितव, शिवानीच्या ड्रेस वरुन केलेली कामेंट नाहि आवडली.
सेलेब स्टेटस नुसार गॅरंटीड स्टे वगैरे काहि नसतं/नसावं (स्टेटस नुसार पैसे मात्र कमी/जास्त मिळतात), अन्यथा नेहा पेंडसे इतक्या लवकर बाहेर पडली नसती. बिबॉचं फॉर्मॅटंच "लेवल प्लेइंग फिल्ड" देण्याकरता बांधील असल्याने तिथे कोणाला असा हेडस्टार्ट किंवा अॅडवांटेज देण्याची शक्यता वाटत नाहि...
ते कोण एक वायाकॉमच्या सीइओ बरोबर उठबस करणारे आहेत; ते या बाबतीत काहि प्रकाश टाकु शकतील...
गॅरेंटी पिरियड देत असतील कारण
गॅरेंटी पिरियड देत असतील कारण कलाकार बाहेर काही प्रोजेक्टला नकार देऊन/ थांबवून आत येतात. आतूनही कधी बाहेर जाणार माहित नाही आणि बाहेरही काही काम नाही अशा परिस्थितीत ते स्वत:ला ठेवणार नाहीत असे वाटते. मराठीबाबत खात्री नाही कारण आरती/आऊ फारच रडत होत्या बाहेर जाण्यावरून.
सुशांत शेलारने एका
सुशांत शेलारने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितल होत की मांजरेकरही पूर्ण शो बघत नाहीत.त्यांनी काही फुटेज दाखवल जात आणि त्यावरच ते बोलतात.
मागच्या वर्षी रेशम आणि इव्हन आऊसुध्दा काहीही न करता जवळजवळ शेवटपर्यंत होत्या.
मला वैशालीबद्दलही असच वाटत आहे ,एक दोन आठवड्यांनतर एकतर नॉमिनेट होऊन बाहेर जाईल किंवा आजारीपणाच कारण देऊन बाहेर जाईल जस सुशांत बाहेर गेला होता.
त्या कीर्तनकाराचा तर पत्ताच नाही.
फरक इतकाच आहे की मागच्यावर्षीचा शो सुरुवातीपासून स्क्रिप्टेड वाटत नव्हता ,पण या वेळचि पहिल्या दिवसापासून वाटत आहे.
कालही दिगंबरचा पत्ता नव्हता,मैथिली सुध्दि शेवटी आली.
ट्विटर सोर्स च्या माहितीनुसार नॉमिनेट झालेले सदस्य
पराग,माधव,वीणा,मैथिली,शिवानी,नेहा
बिचुकले खतरनाक आहे. तो
बिचुकले खतरनाक आहे. तो व्यवस्थित गुंडाळत आहे आणी बीकि लोक गुंडाळून घेत आहेत. तो कंटेंट देतो आणी बाकि सर्व तो विषय फक्त फौलो करतात. हा सीझन बिचुकले भोवती फिरतो आहे आणी चैनेल ने आणी घरातील बाकि लोकांनी त्याला फुटेज मिळु नये म्हणुन कितीहि प्रयत्न केले तरी तो सेंटर ला येतोच आहे. मध्येच तो शालजोडीतले जे मारतो त्याला तोड नाहि.
वीणाने स्वतःला सावरायला हवे. गेले दोन एपिसोड थोडे अती केले तीने.
किशोरि केवळ चैनेल च्या क्रुपेने शेवटपर्यत पोहोचेल. पहिली एलिमिनेशन मैथिली असणार हे आता फारच ओब्वियस करुन टाकले आहे कलर्स ने.
वीणाची जुई गडकरी झाली आहे,
वीणाची जुई गडकरी झाली आहे, मला तरी ती मुळीच आवडत नाही, अनॉयिंग आहे.
नेहाचा तर आवाज ऐकवत नाही आणि डेस्परेट नेचर बघून हसु येतं.
मला अजुनही पराग आणि बिचुकलेच आवडतायेत , फक्तं ती पराग-रुपाली फेक लव्हस्टोरी नाही आवडते !
बिचुकलेचे कुकर डॉयलॉग भारी होते आणि नेहाला म्हणे तू मला हॅलो म्हंटली नाहीस म्हणून मी तुला नॉमिनेट करणार
यावेळी मैथिलीच जाईल पण माधव गेला तरी चालेल.
Btw माधव हा अस्तादचा जिगरीदोस्त असल्यानी परवा चक्क अस्तादने त्याच्या ऑफिशिअल फेसबुकवर निषेध केला होता मांजरेकरांनी माधवला ओरडल्याचा आणि शिवानीला न ओरडल्याचा !
रेशम ममांची नक्किच फेवरेट
रेशम ममांची नक्किच फेवरेट होती आणी ते तीला प्रोटेक्त करत होते. शिवानी ला ओरडुन नका असे कलर्स ने सांगीतले असावे असे वाटते टीआर्पी रहाण्यासाठी.
कालच्या episode मध्ये सगळे
कालच्या episode मध्ये सगळे अचानक groups बद्दल बोलायला लागले... अन् वेगवेगळे groups असूनही related ch बोलत होते... Scripted ch वाटले ..
बिचुकले रॉक्स...काय पण डायलॉग
बिचुकले रॉक्स...काय पण डायलॉग........ 
  
 


कुकर ला ईगो झालाय....तु मला हॅलो म्हणाली नाहीस.....किशोरी vs बिचुकले खेळले तर कसं दिसेल..पुर्ण महाराष्ट्र बघतोय
भारी माणुस आहे खरच
पराग, वीणा, किशोरी, शिव, बिचुकले, सुरेखा पुढे गेलेले आवडतील.
पराग रुपाली चं बाँडींग आवडतय....राजेश-रेशम सारखे डायरेक्ट प्रेम प्रकरण सुरु नाही केलं अजुन....
कुकर ला ईगो झालाय.. >>>
कुकर ला ईगो झालाय.. >>> व्यवस्थित रुपालीला चिमटे काढत होते आणी ती स्वतःचा राग आवरायचा प्रयत्न करत होती !
काल त्या वीणा आणि बाप्पा चे
काल त्या वीणा आणि बाप्पा चे भांडण सुरु, का तर बिचुकलेच्या पँट वरून. आणि बिचुकले ला त्याची हवा पण नाही. तो मस्त आपला त्यांच्या समोर बसून ऑम्लेट खात होता मधेच मान वर करून लुक दिला तर बाप्पा पण त्याला "तुम्हाला नाही हो कुणी काही म्हणत आहे"
  मधेच मान वर करून लुक दिला तर बाप्पा पण त्याला "तुम्हाला नाही हो कुणी काही म्हणत आहे"  
मला सुरेखाताईंच्या निरागस कमेन्ट्स चं पण जाम हसायला येतं. एकदम तुझं थोबाड फोडीन, तुला आडवा करीन वगैरे!
मैथिली ला गेम काही कळलेला नाही असे वाटले. कृतज्ञता वगैरे काय?! जाणार आता तीच. सब गेम सेट है ! चॅनल ने ठरवले होते कोणाच्या हातात कुणाचा पक्षी असणार. मुद्दाम शिवानीच्या हातात बिचुकलेचा, वीणाच्या हातात माधव चा वगैरे.
मैथिली जाईल यावेळी.
मैथिली जाईल यावेळी.
एका week end च्या डावाने
एका week end च्या डावाने सगळ्यांचे डोळे उघडले.. आज सगळे बीचुकलेच्या मागे मागे होते... नेहा तर task येण्याआधीच अगदी डोळ्यात पाणी आणून त्यांना विनवणी करत होती.. बिचुकले व्यक्ति म्हणून खरच great आहेत... त्यांच्याशी सगळे किती वाईट वागले.. ते मात्र कोणाचाही अपमान न करता ऐकून घेत होते.., नेहा बिचुकले बोलत असताना पराग तिथे आला तर नेहा त्याला प्लीज थोडा वेळ बाहेर जा असे म्हणाली पण ते मात्र तिला म्हणाले आपण बाहेर जाऊ... Decision घेताना ही privately न बोलता समोरासमोर बोलू म्हणाले.. ते आवडलं... मुख्य म्हणजे बिचकुलेंच्या साध्या बोलण्याचाही वेगळा अर्थ काढणारे लोक त्यांच्या बोलण्याला दाद देत होते.. वीणा जगताप खास contestant आहे.. सगळ्यांना भारी पडणार ही मुलगी.. फक्त तिचा confidence over नको व्हायला... खरोखर अतिशय clear विचार आहेत तिचे...
बाकी बाप्पाने सुपुबद्दल जे
बाकी बाप्पाने सुपुबद्दल जे विधान केले ते बरेच दिवसांपासून माझ्या मनात होते, सुरेखा पुणेकर लावणीच्या वेशापेक्षा साध्या साध्या कपड्यांमध्ये जास्त छान दिसतात..
महेश मांजरेकर शिवला confused
महेश मांजरेकर शिवला confused म्हणतात तेव्हा खरच स्मिताची आठवण येते.. पण स्मिता खरोखरच बरेचदा confused असायची.. शिव तसा नाही वाटत.. तो ममा ला मस्त back answer करत होता... स्मिता बिचारी सगळं ऐकून घ्यायची... शिव ऐकून घेणारा नाहिये..
शिवने काल नेहाच्या वागण्यावर
शिवने काल नेहाच्या वागण्यावर योग्य स्टँड घेतलेला, नेहा किती आगाऊपणा करत होती. बिग बॉससमोर काहीही चाललं नाही.
वीणाने आता सतत बोलणं मात्र कमी करायला हवं, विकेंड डावात बोलली ते बरोबर वाटलं. पण आता थोडं अति होतंय असं वाटतं. अजुनही ती आवडतेय मला आणि नेहा, शिवानी डोक्यात जातायेत.
वैशाली आणि वीणा यांच्यात
वैशाली आणि वीणा यांच्यात जोरदार जुंपणार आहे.
अमितव, शिवानीच्या ड्रेस वरुन
अमितव, शिवानीच्या ड्रेस वरुन केलेली कामेंट नाहि आवडली. >>>>>>>>>>> +++++++++११११११११
किशोरी, सुरेखाताई, बाप्पा, विणा, मैथिली मैदानात उतरले आहेत फायनली. पण मैथिला जाईल यावेळी.
रुपाली आणि परागने ठरवलय अफेअर करायच. शिवानीला कळलय ते. ते दोघे बोलताना शिवानी मुद्दामहून बेडरुम मध्ये शिरत होती.
कुकर ला ईगो झालाय....तु मला हॅलो म्हणाली नाहीस...
मला का माहीत, पण शिव आणि नेहाची जोडी चान्गली वाटते.
Weekend ला वीणा काय सुटली
Weekend ला वीणा काय सुटली होती
ममांनी शिवानी ला favour केलेलं अजिबात नाही आवडलं.
मला weekend च्या डाव मध्ये नेहाने घेतलेले सगळे स्टँड आवडले. एकदम वेगळीच matured नेहा दिसली weekend ला. अर्थात कालच्या episode मध्ये ती परत बदलली. पण ममांची comment तिने मनावर घेतलेली दिसतीये.
पराग आणी वीणा आता फार
पराग आणी वीणा आता फार इरिटेटिंग होत आहेत. मांजरेकरांनी त्याना मध्ये काय बसवले, त्यांना आपण जिंकणार असेच वाटायला लागले आहे.
पराग आणी रुपाली ची कोणतीहि केमिस्ट्री नसलेली लव्हस्टोरी हि फारच बोअर करत आहेत. ओढुन ताणुन काहितरी चालु आहे दोघांचे.
आज शिवने प्रुव्ह केले की या वेळेसचा स्मिता तोच आहे.
तो बाप्पा फनी वे मध्ये पँट
तो बाप्पा फनी वे मध्ये पँट खाली कर म्हणाला.. ते ही वीणा म्हणत्येय म्हणून कर म्हणाला त्यात इतका आकांडतांडव करण्यासारखं काय होतं? ऑफेंड झाली असेल तर काही तरी स्मार्ट अॅन्सर करता यायला हवं होतं. राग आणि मोठ्ठ्या आवाजात बोलून मजा नाही येत फक्त इरिटेट व्हायला होतं. तुम्ही किती बरोबर आहात यात मला काहीही इंटरेस्ट नाही. बघुन ऐकुन मजा आली पाहिजे. बस्स!
पराग म्हणूनच आवडला, कोणी पाणी उडवलं, थुंकलं, पाडायचा प्रयत्न केला की राग येईलच. पण त्याने वेळ घेऊन फुल टॉस मिळाल्यावर स्टेडिअमच्या बाहेर टोलावला डायरेक्ट! त्याच्यासाठी त्याला रोमान्स माफ!
बिचुकले नेहाला बरोब्बर टोलवत होता. तू मला हाय नाही म्हणालीस! अरे काय सही कारण काढलंय! ते ही एकदम जेन्युईन कन्विंसिंगली सांगितलं याने. ते खोटं नक्कीच नसावं. त्याला नक्कीच लागलेलं असणार! राग मनात ठेवून असा मौकेपेचौका काढला की मजा येते!
अरे आणि डायरेक्ट तोंडावर बोला काय? इथे डायरेक्ट तोंडावर बोलून नंतर गुण्यागोविंदाने रहाणारी माणसं नको आहेत आम्हाला! बेरकी, वरुन गोड आतून महा खव्वट्टं पण बोलायला तोंडात एकदम मिठ्ठास! ... म्हणजे परत बिचुकले!
नेहा तोंड रगडते हुए गिडगिडाते हुए देखकर मजा आया! पण त्यात ती आवडुन ही गेली! घरात रहायला फालतू इगो मनात न ठेवता जे करायला हवं ते केलं तिने. मैथिली जाईल +१ ती सिरियस पर्सन आहे. व्यक्ती म्हणून मला आवडली, पण अनफिट टू एंटरटेन!
शिवानीच्या कपड्याची कमेंट नाही आवडली नोटेड! पण पूर्ण एपिसोडभर जे दिसत होतं, वारंवार डोळ्याला त्रास देत होतं त्यावर बोललेलो. असो.
Pages