मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म मांनी शिवानीला झाप झाप झापायला हवं होतं. रुपालीला मस्त झापले, तसंच. जाम गोड वागले तिच्याशी. किती खालच्या सुरात चुका सांगत होते.

शिव कॅप्टन झाला, ते बरं झालं. रुपालीने नेहाला मत दिलं नाही, ते थोडं खटकलं कारण तिने तिला वाचवलं होतं.

रुपालीचा डिव्होर्स 2000 मध्ये नाही, बहुतेक 2013 ला झाला, असं सांगितलं तिने, एक दोन वर्षे मागे पुढे असेल कदाचित.

अभिजीतने मागे सांगितलेलं डान्स शो मध्ये वगैरे, तेव्हा या क्षेत्रात यायला त्याच्या बाबांचा विरोध होता, म्हणून तो घराबाहेर पडला होता, असं सांगितलं होतं, तेव्हा उमेश कामतने मदत केलेली त्याला, मग त्याने स्वतः ला ह्या क्षेत्रात सिद्ध केल्यावर बाबांचा विरोध मावळला, बाबा डान्स शो मध्येही एकदा आलेले, त्याचा अभिमान वाटतो असंही म्हणाले होते.

डीजे तू म्हणालीस तेच वाटलं मला, परागने एकट्या वीणात ग्लॅमर आहे आपल्या grp मध्ये म्हटल्यावर शिवानीचा इगो प्रचंड दुखावला असणार.

म मांनी तिला खडसवायला हवं होतं, अति आगाऊ, अति शहाणी, अति हवा डोक्यात गेलेली आहे ती.

पराग जाणार फायनलपर्यंत, मस्त स्ट्रेट फॉरवर्ड आहे तो, त्या शिवानीचा पचका केला त्याने, पाय काय घालते पायात, पाणी काय मारते.

किशोरी, सुरेखाताई, पराग, वीणा, शिव आवडले सध्या.

नेहा शिवानी एकत्र आहेतच माधव त्यांना सामील होइल असे वाटत नाहि. माधववर जास्तच चिडला महेश. आणी शिवानीला काहि बोलला नाहि. आज तरी बोलतो का पाहुन थुंकण्यावरुन

अभिजित च्या वडिलांचं काय आहे?पराग असं का म्हटला त्याला?>>परवाच्या एपिसोड मध्ये थोड बोलणं झालं की अभिजित सांगत होता की त्याचे बाबा अजुनही जुन्या चाळीत राहतात ..त्यांना तो नेहेमी सान्गतो आपल्या सोबत रहायला.. अभिजित सांगत होता की आता 2 घर आहेत तर एकात त्याना रहायला सांगितल तरी ते जून घर सोडत नाहित..हेच एक दुख आहे असं काही बाही...हे सगळं अप्पा बाप्पा च प्रकरण झाल्या नंतर झाल डाइनिंग टेबल वर

आज मांजरेकर छा गये, एकदम ऑडियन्स के दिल कि बात बोलले, ट्विटर आणि इतर सगळ्या सोशल मिडीयाच्या फिडबॅक्सचा अभ्यास करून आले होते.
सगळ्या लाउड बायकांना सुनावलं , माधवला त्याच्याच टोनमधे सुनावलं,नेहाला गॅस बचाओ साठी कच्च्या भाज्या खा म्हणाले आणि येड्या अभिजितची टिंगल केली , थोडक्यात सगळ्या नावडत्यांना तडाखे बस्स्ले , शिवाय मागे बोलायचं नाही वरून ज्यांनी ड्रामा केला त्यांचीही टिंगल केली !
शिवानीला त्यामानाने सौम्य सुनावलं कारण ती गप्पच झाली तर टिआरपी कसे मिळेल !
मेन म्हणजे पराग-बिचुकले-किशोरी-वीणा खरोखर चांगला गेम खेळलेल्यांना शाबासकी दिली, माझ्या दृष्टीनेही हेच टॉप ४ असायला हवेत !
आय होप आजच्या एपिसोडनंतर सगळ्यांना बिचुकल्यांच्या पॉप्युलॅरीटीची आयडीआ आली असेल, आज वीकेन्डच्या डावलाही धम्माल केली बिचुकलेनी, मांजरेकरांनाही हसु आवरत नव्हतं, मधेच सलमानला रमझानच्या शुभेच्छा Rofl
मजा आली आजच्या एपिसोडला.

एंटरटेनिंग झाला कालचा वीकेन्ड चा डाव. बिचुकले ने धमाल आणली. सफरचंदाची शपथ, रमझानच्या शुभेच्छा Lol दोन तीन वेळा कपडे बदलायला गेले आणि शिव ने त्यांना उचलून आणलं तेही फनी वाटलं जाम. तरी तेवढ्यात त्यांनी नेहावर त्यांचा राग का आहे ते बोलून घेतलेच.
ममां रुपालीला बरेच बोलले .तिनेही हो मी केल, हो सर मी टार्गेट केले, मी मागे बोलले हो सर असं सगळंच फक्त मान्य करत होती . त्याचा काही अर्थच कळला नाही मला. म्हणजे जाणुन बुजून करायचे होते आणि मग वीएकेन्ड ला फक्त ते मान्य करायचे, नो रीग्रेट्स ? तो बिचुकले काही बोलत नाही म्हणून त्यांच्यावर आवाज काढला. का तर म्हणे नुस्ता आवाज दाखवायला तेही शिवानी नेहा आणि माधव ला? त्यांना काही पत्ता पण नव्हता त्याचा. माधव वर जोरात आवाज काढला ममांनी. शिवानी ला मात्र अगदीच लाइटली झापले असे वाटले. ती ही अगदी तोंडाचा चंबू करून लाडात बोलत होती. थोडक्यात बहुतेक सगळे खिलाडी लोक आहेत Happy ममांनी बोलणे म्हणजे देखिल अटेन्शन आणि टिआरपी असे ट्रीट करून शांत पणे ऐकत होते ! बायदवे मैथिलीला काल एका शब्दाचेही अटेन्शन मिळाले नाही. ती कुठेही दिसत पण नाहीये. जाणार लवकरच असेच राहिले तर.

परवाच्या एपिसोड मध्ये थोड बोलणं झालं की अभिजित सांगत होता की त्याचे बाबा अजुनही जुन्या चाळीत राहतात ..त्यांना तो नेहेमी सान्गतो आपल्या सोबत रहायला.. अभिजित सांगत होता की आता 2 घर आहेत तर एकात त्याना रहायला सांगितल तरी ते जून घर सोडत नाहित..हेच एक दुख आहे असं काही बाही...हे सगळं अप्पा बाप्पा च प्रकरण झाल्या नंतर झाल डाइनिंग टेबल वर >>> धन्यवाद तुरु

ह्यावेळी मांजरेकर सलमान ची कॉपी करतोय, बहुतेक सलमान खान चे सगळे एपी बघून आलेत, पण सलमान सलमान आहे, ह्यांना नाही शोभत ते

सलमानला मी फक्तं मागच्या सिझनमधे पाहिलं आणि तिथे तरी तो कंप्लिट्ली लॉस्ट होता, अजिबात वचक नाही, प्रेझेन्स ऑफ माइंड नाही , शो मधे इंटरेस्ट नाही कि कोणाची शाळा घेणे प्रकार नाहीच, अगदीच दम नसलेला डंब फ्लॉप होस्ट वाटला मला!
मांजरेकरला मागच्या सिझनला कधीकधी शिव्या घातल्या तरी सलमान सिझन १२ पुढे ते खूप म्हणजे खूपच चांगले वाटले दोन्ही सिझनमधे, वे बेटर दॅन सलमान !

सलमान बद्दल डीजेला +१११ . मी ही गेल्याच वेळी पहिल्यांदा पाहिला आणि अगदीच बेकार वाटला लास्ट सीझन ला. काही इंटरेस्ट नसल्यासारखा. शो मधे काय चाललंय काही खबर नसल्यासारखा. आधी खूप ऐकलं होतं त्याच्याबद्दल त्यामुळे फारच डिसपॉइंटिंग वाटला होता.
ममां फार बेटर वाटतायत.
आज काय शेवटी कुणीच एलिमिनेट नाही का?

आ़ज नाहीये एलिमिनेशन कारण वोटींगलाइन्स बन्दच होत्या.
ती मैथिली, दिगंबर यांचे नंबर लागु देत इतरां आधी, वैशालीही फार फुटेज घेत नाहीये त्यामुळे तीही लवकर जाऊ शकते.

सलमान १२व्या सिजनमध्ये ओके होता, पण त्याचे जुने सिजन्स ज्यांनी बघितलेत त्यांना माहीत आहे की सलमान बेस्ट होस्ट आहे बिबॉ साठी, मांजरेकरांचा हा दुसरा सिजन आहे, अन तेही मला सलमान पासून प्रभावित असल्यासारखे वाटले , आज तर नक्कीच

खरेतर तुलना करणे चुकीचे, पण बिबॉ =सलमान असेच वाटत असल्याने नकळत होऊन जाते

मैथिली,वैशाली,दिगंबर हे नक्की आहेत का खेळात.>> वैशालीने किमान एफोर्ट तरी घेतले होते सतत कॅमेरा समोर दिसायचे, पण बाकीचे दोघे त्यातल्या त्यात मैथिली तर बिलकुल दिसली नाही रादर मांजरेकरांनी देखील तिची दखल घेतली नाही

हो, ऐकल होतं खूप सलमान बद्दल म्हणूनच इतक्या आपेक्षीनी मागचा सिझन पाहिला पण ना सलमान आवडला ना हिन्दी बिबॉ सिझन १२.

मलातरी १२ वा सिजन अन सलमान दोन्ही ओके वाटले, सलमान नेहमीसारखा नव्हता हेही खरे, शेवटी सगळे expiry date घेऊन येतात, फक्त सलमान ह्यावेळी म्हणजे जर १३ वा सिजनमध्ये असेल तर पूर्वी सारखा असावा ही अपेक्षा

तरी ममंनी शिवानीला झुकत मापच दिल.पण बाप्पाबद्दल 'हा धूर्त आहे"अस ममां का म्हणाले.मला तर त्या लावणीशिवाय बाप्पा तसे कुठे दिसलेच नाहीत.काय धूर्तपणा करत आहेत ते?

परवाच्या एपिसोड मध्ये थोड बोलणं झालं की अभिजित सांगत होता की त्याचे बाबा अजुनही जुन्या चाळीत राहतात ..त्यांना तो नेहेमी सान्गतो आपल्या सोबत रहायला.. अभिजित सांगत होता की आता 2 घर आहेत तर एकात त्याना रहायला सांगितल तरी ते जून घर सोडत नाहित..हेच एक दुख आहे असं काही बाही...हे सगळं अप्पा बाप्पा च प्रकरण झाल्या नंतर झाल डाइनिंग टेबल वर >>> अच्छा हे नव्हतं मी ऐकलं. थोडं इकडे तिकडे गेलं की मिस्ड. थँक्स तुरु.

म मां मागच्यावेळेपेक्षा बारीक वाटतायेत खूप आणि थकलेले. पण चांगलं करतायेत. शिवला स्मितासारखं कन्फुज्ड समजतायेत. डीजे म्हणाली तसं शिव ह्या सीझनची स्मिता.

तो ताई, दादा मस्त म्हणतो Lol

हो, ऐकल होतं खूप सलमान बद्दल म्हणूनच इतक्या आपेक्षीनी मागचा सिझन पाहिला पण ना सलमान आवडला ना हिन्दी बिबॉ सिझन १२. >>> मम. मी मेघा आली तेव्हाच काही एपिसोडस बघितले. बोअर होत होतं.

तरी ममंनी शिवानीला झुकत मापच दिल. >>> अगदी अगदी.

त्या शिवचा आवाज आणी बॉडी काही मॅचच होत नाही, एखाद्या लहान मुलासारखा बोलतो तो, बालिशपणा डोकावत असतो, रुपाली आणी शिवानीने भरपुरच राडा केला होता पण ममा एकट्या रुपालीलाच झापल, शिवानी (रेशमसारखी) लाडकी दिसतेय ममासाठी, शिवानीला एकदम सौम्य शब्दात दटावल, वीणा इनचार्च होतेय हेही त्याना फार झेपल नाही.
दिगबरला जरातरी फुटेज मीळाल पण वैशाली -मैथिलि अगदिच दुर्लक्षित!( ते त्यानी काहीही न केल्यानेच असेल, मैथिली तर फारशी दिसली पण नाही पहिल्या विकमधे)
स्टार परफॉर्मर बरोबर निवडले ममानी!
सलमान वाला मागचा सिझन फारसा पाहिला नाही पण जे एक-दोन भाग पाहिले त्यावरुन सलमानने अगदिच पाट्या टाकल्यात, पुर्वी तो एक्दम फुलऑन एनरिजेटेक असायचा
(आज विणा बोलत असताना ममानी जे काय बसणे, झोपणे केले ते सगळ कॉपी कॅट सलमान.)

कालच्य भागात ममांच लक्ष फक्त शिवानी,नेहा,बिचुकले,शिव यांंच्याकडेच होत.वैशाली,मैथिली,दिगंबर,सुरेखाताई, बाप्पा यांना फार महत्व दिल गेलच नाही.अगदी सिक्रेट रूममध्ये पण ठराविक लोकांनाच जाऊन दिल,ते प्रपोजल,नागिन डान्स हे सगळ याच लोकांबरोबर होत.
वीणाला अचानक कळल की अरे आपण स्टार परफॉर्मर असून आपल्याला भाव मिळत नाही,मग तिनेही ममांसमोरच आवाज लावला आणि इरिटेट केल.फक्त बिचुकलेला डबल स्टँडर्डबद्दल छान सांगितल,पण माधवला छोटा प्पी काय,मी पराग बोलला तेव्हा नव्हते(खर माहित नाही)काय काय चालल होत.ममांनी पण ते फुटेज ती सांगत होती तर का नाही दाखवल,तिला आवाज चढवून गप्प का नाही केल.
मैथिली,वैशालीला बोलत का नाही केल.शिव़ानीशी एवढ मधाळ भाषेत का बोलत होते.कळल नाही.मध्येच झोपले काय.
आजतर वीणा आणि बाप्पामध्ये जुंपणार आहे.म्हणजे बाप्पाला रिंगणात उतरवण्याची जबाबदारी चँनेलने वीणावर टाकली आहे.
बघू आता दिगंबर आणि मैथिलीला कोण उतरवत रिंगणात.

कालचा एपिसोड जितका रॉकिंग तितका आज बकवास !
चुगली बॉक्स काय, त्या ऑडियन्स मधल्या बाईने दिलेल्या फालतु शिक्षा काय !
इथे हिन्दी बिबॉ सारखे सुलतानी आखाडा / गुन्हेगार ऑफ द विक का नाही ठेवत ?
या बायकांच्या व्हर्बल कॅट फाइट्स ऐवजी त्यांना सुल्तानी अखाड्यात बघायला मजा येईल, शिव सारख्या पोरांचही रुप दिसेल त्या निमित्तानी !

हो रविवारचा एपि. बोर होता. चुगली बॉक्स ची आयडिया मुळात चांगली आहे पण त्या चुगल्या अगदीच मिळमिळीत होत्या. पुढे वापरायची असेल तर जरा अजून स्पायसी अन खर्‍या चुगल्या हव्यात. शिव ते प्रपोजल, सिग्नल इ. अत्यन्त बोर करत होता, त्याला इतका स्क्रीन टाइम का दिला उगाच. वीणा चे ते चहा चे कप वगैरे रॅन्ट पण कंटाळवाणे. किती ते फूटेज त्यांना. मैथिली आणि वैशालीला शून्य अटेन्शन.

मैथिली जाईल लवकर...शिव पण बोरींग. बाप्पा,केळकर, दिंगबर यांना गेम कळलाच नाहिये.
किशोरि ताईंना ग्रेस सोडून डिप्लोमसी न करता खेळताना बघायला आवडेल.

होना शिव खरच डंब आहे आणि त्याचे फॅन्स मात्र सोशल मिडीयावर मांजरेकरवर चिडलेत त्याला हा टॅग दिल्या बद्दल, काहीतरी विचित्रच भलतच बोलत असतो.
त्यानी टास्क चांगले केले तरच आवडेल तो, सध्याची त्याची पर्सनॅलिटी नाही आवडते मला.

शुक्रवार पासून बघायला लागलो! (थँक्स टू मै)
मैथिली जावकर, किशोरी शहाणे, सुरेखा ताई आणि तो बाप्पा (त्याला बाप्पा का म्हणतात?) आणि थोडाफार दिगंबर नाईक माहित होते. बाकी कोणाचं तोंडही बघितलेलं न्हवतं.
गेल्यावेळच्या तुलनेत अगदीच मूर्ख लोकं भरल्येत असं फीलिंग आलं सुरुवातीला आणि बिचुकले दिसले! हाय हाय! काय माणूस आहे राव!
प्रचंड फनी बोलतो आणि असंबद्ध बोलला/ गळक्या नळासारखं स त त काहीच्या बाही बोलला तरी जाम म्हणजे जाम आवडला हा बिचुकले. स्वतःला जरा बेरकी समजतो पण मनाने एकदम साधा. काय करायचं आहे हे समजलं नाही आणि भलतंच काही केलं आणि लोकांनी टोकुन सांगितलं तरी स्वतःच खळखळून हसतो आणि एकदम सामोपचारात आल्यासारखा वाटतो पण शेवटी आपल्याला हवं तेच करतो. Biggrin सफरचंदाची शपथ, उपास आहे.. पण चिकन खाल्लं... मध्येच कपडे बदलले! जाम मजा आणली!

वीणा पण आवडली. मांजरेकरांना रँट्स सांगत असली तरी जेन्युअनली चिडलेली पण लाडिक प्रेमाने चिडलेली ती ही बिचुकले वर... आणि तो आ वासून ऐकतोय आणि आपल्याला बोलायला मिळत नाहीये तर हसून आपला हात वर करतोय ते मस्त वाटलं बघायला.

बाकी शिवानी, नेहा आणि ती रुपाली (हिला बघुन जुई गडकरी आठवली... क ट क ट क ट क ट सदैव कटकट... आणि ममां काय विचारत आहेत हे न झेपुन आपलीच रटाळ बडबड चालू.. ) अगदीच फाटक्या तोंडाच्या आणि मंद डोक्याच्या आहेत. शिवानी थुंकते काय, पाणी काय उडवते, पायात पाय घालून पाडते काय! .. आणि तो काय ड्रेस घातलेला! अजिबातच शोभत न्हवता! मांड्या दिसताहेत.. त्या बघण्यासारख्या नाहीत... आणि लांब मोजे दिसताहेत.. आणि त्यावर कॅनव्हासचे शूज घातलेत! कपाळावर चंद्रकोर.. आणि गळ्यात माळ! गबाळेपणाची कमाल!

पराग कान्हेरे आधी नावडतोय वाटलं पण पाणी एपिसोड आणि एकूणच अ‍ॅटिट्युड आवडेल असं नंतर वाटत गेलं.
केळकर बावळ्या आहे. ह्याला ही आधी बघितलेला. आता एकदमच म्हातारा दिसतोय, आणि धुंदीत वाटतोय. पण मांजरेकरांचा आवडता वाटला.
माधवला बघून एकदम आस्ताद काळेची आठवण आली. नुसताच आवाज आणि अरेरावी. आतुन माणूस म्हणून अगदीच पोकळ.
मैथिलीला मी बघितलेल्या तीनही एपिसोड मध्ये मिळून एक वाक्य होतं बहुतेक. ते ही राजकारण्यांनी केर काढू नये टाईप. अगदीच मिळमिळीत. ही जाईल आधी.
किशोरी शहाणे ही अजिबातच छाप पाडली नाही. तुम्ही सगळे ग्रेसफुल म्हणताय म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीला काही केलं असेल. मी बघितलं त्यात तिनेही काहीच स्टँड घेतला नाही.
सुरेखाताई काही फार बोलल्या नाहीत तरी रहाव्या चार पाच आठवडे.
शिव ठाकरे जेन्युईन वाटला... लाईकेबल बनेल पुढे जाऊन असं वाटलं.
वैशाली आणि बाप्पा ही फार कुठे दिसलेच नाहीत की मांजरेकरांनी त्यांना फार फुटेज दिलं.
सध्यातरी बिचकुले, वीणा, पराग आणि मे बी शिव रहावे असं वाटलं.

गुड! वेलकम अमित Happy रुपालीचा टँट्रम एपि. बघितलास का तू ? नसल्यास बघ. Happy बुधवार की गुरुवारी असावा.
हो वीणा त्यातल्या त्यात बरी वाटली दिवा गँग मधे. काल लॉजिकल बोलली. बाकी नेहा, शिवानी एंटायटल्ड वागत आहेत. चॅनल ने पण त्यांना फेवर करायचे ठरवलेले दिसते. हो शिवानीचे कपडे कुणी स्पॉन्सर केलेत राव. भयंकर आहेत ते फ्युजन टाइप फ्रॉक्स.

Pages