Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बिचुकले नेहाला बरोब्बर टोलवत
बिचुकले नेहाला बरोब्बर टोलवत होता. >>हो ते फार फनी होतं
नेहाला जाम रडकुंडीला आणलं त्याने. ते आणि त्याचे ते वीणा - बाप्पाच्या भांडणात मधेच बसुन ऑम्लेट खात बसणे
काल पण फुल्ल पैसा वसूल.
हो हो. आपल्यावरुन भांडण करत
हो हो. आपल्यावरुन भांडण करत आहेत आणि हा मस्त मनाचा तोल न ढळता ऑम्लेट खातोय. वर बाप्पा त्याला सांगतोय तुम्हाला कोणी काही बोलत नाहीये!
नेहा आजिबातच आवडत नाहीये.
नेहा आजिबातच आवडत नाहीये.
मला फारसा राडा न घालणारेच आवडताहेत ह्यावेळेस.
बाप्पा, सुरेखाबाई, किशोरी, शिव, बिचुकले
>> सुरेखाताईंच्या निरागस
>> सुरेखाताईंच्या निरागस कमेन्ट्स चं पण जाम हसायला येतं. एकदम तुझं थोबाड फोडीन, तुला आडवा करीन वगैरे! >> हो! बेस्ट टायमिंग असतं.
>> सुरेखाताईंच्या निरागस
>> सुरेखाताईंच्या निरागस कमेन्ट्स चं पण जाम हसायला येतं. एकदम तुझं थोबाड फोडीन, तुला आडवा करीन वगैरे! >>
खरंय, त्या त्यांच्या कंमेंट्स मुळे अगदीच इनोसंट वाटतात. 
सोशल मिडिया वर AB ची हवा आहे,
सोशल मिडिया वर AB ची हवा आहे, पण ती म्हणजे गेल्या आठवड्यात मिळालेल्या वागणूकी बद्दल ची सहानभूति आहे.. AB म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार असं प्रकरण आहे..मी यांव करीन आणि त्यांव करीन..अक्खा महाराष्ट्र पाठीशी आहे ..हे तर एकदम निवडणूकी मधले वाक्य...त्याला साधे टास्क कळत नाहित.. आजच्या चोर पुलिस टास्क मध्ये पण नुसता हाताची घडी घालून फिरत होता.. शिवानी ला बोर करत असतो तेव्हा ती मनात त्याला खूप शिव्या घालत असणार पण गेल्या आठवड्यात मिळालेल्या क्लु मूळे ती गप्प बसते..
शिवानी अजिबातच नाही आवडत आहे.
शिवानी अजिबातच नाही आवडत आहे.. आज तीच पराग सोबत झालेली झटापट..काय डोळे करते..नाक फुगवते..भयंकर रागीट मुलगी आहे ती..जरा सुद्धा इमेज सांभाळून वागत नाही..
बिचुकले काम का नाही काही करत,
बिचुकले काम का नाही काही करत, शिवने दिलंच नाही का त्यांना काम.
शिवानी कायम दादागिरी मोडमधे. पराग उगाच बिचुकलेला बोलला. अर्थात मनात आहे ते बोलला, त्याला माहीती आहे आवडतो लोकांना बिचुकले तरीही. अर्थात त्या नेहा शिवानी मात्र आता बिचुकलेच्या मागेपुढे करतात, तसं पराग करत नाही.
अ बि ना पराग कॅमेऱ्यासमोर बोलला तेव्हा लक्षात आलं नाही का काही. शिवानीने सांगितलं तेव्हा समजलं का. अ बि म्हटलेलं सोपं बिचुकलेपेक्षा.
मैथिलीला केलं nominate तेव्हा काही नाही नेहाला आणि परागने नेहाला केलं तेव्हा वाईट वाटलं.
परागने पंगा घेतलाय अ बि शी. शिवानीशी घेतला तो योग्य होता.
शिवला आधी काही नीट समजेनाच, तो शिवानीला बोलत राहिला पण तीही उद्धट आहे. नीट समजाऊन सांगू शकली असती, शिव चलाख नाहीये पटकन कळत नाही.
मला नेहा, शिवानी अजूनही आवडत नाहीयेत.
वैशालीने बाप काढला वीणाचा, मागच्यावर्षी सईने स्मिताचा काढलेला. परागपण पोचलेला परवा अ के च्या बाबांपर्यंत. घरच्यांना का मध्ये आणतात हे.
मला गेम काय खेळतायेत ते कळतच नाहीये.
सोशल मिडिया बराच अ बि च्या बाजूने आणि नेहा शिवानीच्या विरुद्ध वाटतोय.
आजच्या एपिसोड च्या शेवटी माधव
आजच्या एपिसोड च्या शेवटी माधव (चोर) बेड्या सोडून पळाला तर किशोरी(पुलिस टीम) बिचुकले ला(चोर) म्हणते ,"अहो बिचुकले ,पकडा त्याला.." AB आणि किशोरी आत चाललेल्या भंडाणाने आधिच confused झाले होते.. एकंदर या सिजन मध्ये टास्क खेळण्यासाठी शातिर दिमागवाले खूप कमी लोक आहेत..
शिवला आधी काही नीट समजेनाच,
शिवला आधी काही नीट समजेनाच, तो शिवानीला बोलत राहिला पण तीही उद्धट आहे. नीट समजाऊन सांगू शकली असती, शिव चलाख नाहीये पटकन कळत नाही.>> तेव्हा शिव एकदम भारी बोलला शिवानी ला.."अगं पागल मुली"
त्याच्या टोन मध्ये ते भारी वाटलं..
एकंदर या सिजन मध्ये टास्क
एकंदर या सिजन मध्ये टास्क खेळण्यासाठी शातिर दिमागवाले खूप कमी लोक आहेत.. >>> हो असं वाटतंय. नेहा जाते मेघा सई सारखं करायला, जमत नाही.
तेव्हा शिव एकदम भारी बोलला शिवानी ला.."अगं पागल मुली" Lol Lol त्याच्या टोन मध्ये ते भारी वाटलं.. >>> हो
मैथिली आधिच नोमिनेट झालेली.
मैथिली आधिच नोमिनेट झालेली..त्यात तिला सन्चालक बनवून टास्क पण perform करायला दिला नाही .या आठवडयात तिचा नंबर फिक्स्ड्..हा शो तिला कळलाच नाही..
सुरेखाताई आणि बिचुकले अगदी
सुरेखाताई आणि बिचुकले अगदी १ली २रीच्या मुलांप्रमाणे इंटेलेक्चुअल गप्पा मारतात.
बिचुकलेंनी मुलांची नावं भारी
बिचुकलेंनी मुलांची नावं भारी शोधली आहेत बाकी! अहम् आणि अस्मि ! बायकोचे नाव पण वेगळेच, "अलंकृता" ठेवलेय.
मराठी सेलेब्रिटी म्हणजे घरगुती कॅटेगरी असतात एकदम 
बायदवे काल कुकर मधून वरण उतू गेलं त्यानंतर रुपालीने ते जमिनीवर सांडू न देता ज्या सफाईने ओटा पुसून साफ केला ते पाहिल्यावर " कामाची सवय आहे हो मुलीला" असं वाटून गेलं
इजंट इट बेसिक अक्कल/ कॉमन
इजंट इट बेसिक अक्कल १०१?
ऑन सेकंड थॉट .. नाही... आळस इज बेसिक इंस्टिंक्ट. असं झाल्यावर काहीही न चिडता ते प्राक्तनात असल्यासारखं कर्मविकापात पुसणे इज टोटली म.म. पणा.
कसला बंडल कुकर आणून दिलाय असं वाटलं. आणि हे ही दोघे एकदा उतू गेल्यावर आणि पुसल्यावर गॅस बंद करुन टाकायचा तर परत डिझास्टर व्ह्यायची वाट बघत बसलेत. ते ही झाल्यावर अजिबात राग नाही, आनंदाने पुसताहेत. ती ही बिचुकल्यांना काहीही काम न सांगता सगळं स्वत: करत्येय! म हा न! मी तीन वर्षाच्या पोराला ही कामाला लावतो.
एकाने स्वयंपाक केला तर झालेल्या डिझास्टर कडे पूर्ण दुर्लक्ष करून आवरण्याचं काम दुसर्याचं आहे! इज १०१!
किती बीचिंग करताय सगळे।
किती बीचिंग करताय सगळे।
माझे वोट शिवानी ला।
https://youtu.be/pFhj2VRbsoo
https://youtu.be/pFhj2VRbsoo
साताऱ्याचे लोकं सुद्धा ए बी ची खिल्ली उडवत आहेत...
लांबून पहायला आपल्याला मजा येत असली तरी घरातील (त्याच्या टीम मधले आणि विरोधी टीम चे पण) सर्वजण खूप वैतागले असतील त्याच्या सहवासाने!!.. खूप खूप पकवत असणार नक्की!!
... काहीच लोकप्रिय वगैरे नसावा.. खखोदेजा!!!
एकंदर या सिजन मध्ये टास्क
एकंदर या सिजन मध्ये टास्क खेळण्यासाठी शातिर दिमागवाले खूप कमी लोक आहेत.. >>> हो असं वाटतंय. नेहा जाते मेघा सई सारखं करायला, जमत नाही. >>> मला वाटतंय आत्तापर्यंत नेहानेच खेळात चमक दाखवली आहे. पण मला एक नाही समजलं - नेहाला आधीच वस्तू बेड खाली लपवून ठेवण्याचं कसं कळलं? मी एपिसोड मध्ये काही मिस केलंय का? गेम बद्दल आधी काही कल्पना दिली होती का?
wake up song चोरीचा मामला
wake up song चोरीचा मामला लावलं.
तिची ट्यूब लगेच पेटली आणि तिने शिवानीलाही अलर्ट केलं येऊन
मला तरी बिचुकले,शिवानी ,नेहा
मला तरी बिचुकले,शिवानी ,नेहा प्रचंड इरिटेट होतात. नेहा आधी आवडलेली, पण ती सुद्धा बिचुकले सारखं इलॉजिकल बोलायला लागलीये. रुपालीला नॉमिनेट करत आहेत म्हटल्यावर परागने पळत जाऊन नेहाला केलं नॉमिनेट. सुरेखाताईंची आऊ होणार बहुतेक. कोणी येऊन गुंडाळून जातंय. ती नेहा म्हाणालीपण किशोरी तिथे असताना त्यांना काही विकू नका.
सध्या वीणा , पराग , थोडीफार रुपाली आवडत आहे. शिव मला कन्फयुज्ड वाटत नाही, तो पण बरा आहे . उगाच भांडणात पडत नाही.
मैथिलीला काढणार, ती संचालक असूनसुध्दा तिला कोणी बोलू देत नव्हते.
सुषमा ताईच्या लिंकवरून इथे
सुषमा ताईच्या लिंकवरून इथे उडी घेतली ,चुकवू नये असे काही
https://www.youtube.com/watch?v=ysnkNwhjJfo
wake up song चोरीचा मामला
wake up song चोरीचा मामला लावलं.
तिची ट्यूब लगेच पेटली आणि तिने शिवानीलाही अलर्ट केलं येऊन >>> ओह्ह.. मस्तच की! छान डोकं चालवलं. बाकीचे सगळे नाचत बसले. आणि ही गाणं decode करून मोकळी झाली.
नेहा आधी आवडलेली, पण ती सुद्धा बिचुकले सारखं इलॉजिकल बोलायला लागलीये >>> मला पण लास्ट वीक च्या शेवटी आवडेनाशी झाली होती. पण वीकएंड च्या डाव नंतर परत एकदा मी तिची फॅन झाले. आणि आत्ता खेळलेला गेम छानच! आपलं vote नेहालाच!
खरं तर पराग आणि नेहा मध्ये confusion होत होतं. पण परागचं आत्ताचं वागणं अजिबातच नाही आवडते. तो फारच arrogantly वागतोय. आणि गेम पण खेळत नाही नीट.
एकंदरीत हा सिझन बोअर वाटत आहे
एकंदरीत हा सिझन बोअर वाटत आहे.टास्क पण फार काही खास नाहीत.
पोपटाचा पिंजरा हा टास्क किती छान करता आला असता.
प्रत्येकाच्या हातात एक पक्षी द्यायचा.नाव सांंगायची नाहीत.बझर वाजला की जो पहिला कुठल्याही पिंजर्यासमोर आधी जाईल,त्याने तो पिंजरा उघडायचा,त्यातल्या चिठ्ठीत ज्याच नाव ,तो झाला नॉमिनेट.
पण बिगबॉसने वाट लावली टास्कची.
चोरपोलिस टाक मला गेल्या वेळीही आवडला नव्हता.काही अर्थच नाही त्याच्यात.नेहा,मला किती कळत या मोडमध्ये आहे.
शिवानी आता आज किशोरीला बोलणार.परागशी वागली ते तर चुकीचच होत.ती कधीकधी खरच सायकोसारखी वागते.
पण मला अस वाटत,की तिच्या अशा वागण्यामागचा खरा सूत्रधार चँनेल असेल,तर मात्र बिचारीला स्वत:चा गेम खेळता येत नाही हे खर.
वीणाने परवा बाप्पा आणि काल वैशाली यांना मैदानात उतरवून आपली जबाबदारी पार पाडली,म्हणजे अजून काही आठवड्यांच एक्टेंशन नक्की.
पण वीणा रहावी,तिचा स्टँड बरोबर असतो,पण आवाज चढला की इरिटेट होत.
सुरेखाताईंना मात्र गेम कळत नाही आहे.
दिगंबर कालही फार नव्हता,वीणाने त्याची जबाबदारी घेतली नाही वाटत.
बाकी बिचुकलेनी जर टास्क नीट केले नाहीत तर कितीही एंटरटेन्ट करत असले तरी शेवटी लोट कंटाळणारच. बहुधा चँनेल त्याचीच वाट बघत असाव.ते झाल की काढतीलही.
ती ही बिचुकल्यांना काहीही काम
ती ही बिचुकल्यांना काहीही काम न सांगता सगळं स्वत: करत्येय!>> एकतर ती आधिच इरिटेट झाली होती..कोणिही होईल..एकदा ओटा पुसला आणि परत कूकर मधून पाणी सगळीकडे उडाल.. आणि त्यात तो बिचुकले बाबा..त्याची वेड्या सारखी बडबड..सगळ्यानिच धसका घेतला आहे त्याचा म्हणुन त्याला काही बोलत नाही...नाहितर या गोष्टी चा किती इश्यू केला असता की मदत करायची सोडून नुसते सल्ले /बडबड करत बसले..पराग काल बोललाच 10 पैसा च काम करत नाहित बिचुकले.. माझ मत पराग लाच.. तो जरा सेन्सीबल वाटतो आहे..
सुषमा ताए नक्की कोणता बिग
सुषमा ताए नक्की कोणता बिग बौस पहात आहेत ? ट्विटर वर फुल बिचुकले छा गया है! . पराग ने चुकिच्या माणसाबरोबर पंगा घेतला आहेत त्यात सातारा उगाच घेउन आला. पराग आणी वीणा आता डोक्यात जायला लागले आहेत. पराग ने पहिल्या आठ वड्यात जे कमावले ते काल घालवले. फुल शिव्या पडताहेत त्या दोघांना सोशल मिडियावर !
wake up song पासून पाहिला
wake up song पासून पाहिला कालचा भाग.
कुणीतरी अपडेट्स द्या ना.
वीणा आणि वैशालीचं वाजणार हे sneak peek मध्ये पाहिलं होतं कशावरून वाजलं म्हणे?
नॉमीनेशन मध्ये काय झालं?
मलाहि शिवानी खुप आवडतेय..
मलाहि शिवानी खुप आवडतेय.. रागावर थोडा ताबा ठेवायला हवा तिने छान खेळु शकेल.
@टयुलिप >>>>लिंक पाहिली
@टयुलिप >>>>लिंक पाहिली
.... त्याचा असाच फंडा आहे.. त्याला वाटते की काहीतरी विचित्र वागले तरच आपण लोकप्रिय होतो...
... वरील विडियोचे सत्य हे आहे की त्याने मकरंद अनासपुरे च्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील असाच प्रसंग प्रत्यक्षात करून दाखवला..
तो कितीही चांगला असू दे किंवा वागू दे समोरचा माणूस इरिटेट झालाच पाहिजे..
या जोरावरच तो ही स्पर्धा जिंकू शकतो
वैतागलेले बाकीचे स्पर्धक ट्रॉफी घे पण आमची सुटका कर असे म्हणुन माघार देखील घेतील..
फुल शिव्या पडताहेत त्या
फुल शिव्या पडताहेत त्या दोघांना सोशल मिडियावर !
म्हणजे यांना नक्कीच ठेवणार.शिवानीही राहणार
अजून पराग रुपालीची प्रेमकथा रंगायची आहे.
ज्याला जास्त शिव्या ते रहाणार.
आजच्या भागात किशोरी शहाणे रडणार आहेत.
म्हणजे आज किशोरी vs शिवानी
उद्या वेगळ कोणीतरी.
ती मैथिली बिचारी शांत आहे तर नॉमिनेटच झाली आणि तिला बिचारीला बिगबॉसने टास्क पण करु दिला नाही.संचालक बनवल.
अरे काय आजचा एपिसोड बघून
अरे काय आजचा एपिसोड बघून हहपुवा , चोर पोलिस, दुकानदार सगळ्यांचीच तरांबळ उडाली






, सगळेच कनफ्युज्ड , कोणी काय करायचं वरून घोळ नुसता
शिव आणि अभिजित केळकरचं तर काय कॉमेडी चाल्लं होतं , पोलिस चोराला अरेस्ट करायचं कि नाही वरून एकमेकांशी तात्विक वाद घालत झटापटी नुसती ! केळ्या शिवला म्हणत होता, चोरी कशी करायची मी काय पोलिसांकडून शिकु का आता, आणि शिव सुध्दा रंगे हाथ पकडलयना करत बसला होता
शिव सात्त्विक संतापानी पागल पागल करतो तेंव्हाही जाम हसु येतं, मला शिवचा अॅक्सेन्ट फार म्हणजे फार आवडतोय, आज भरपूर बोलत होता , मजा आली, त्याचा आवाजही टीनेज पोरा सारखा !
मधेच एक पोलिसीणच पोलिसगिरी सोडून चोरी करायला लागली, माधवला म्हणे तुझ्या सिगारेट्स जप्त करते, तोही सात्त्विक संतापाने अगं तू पोलिस आहेसना मग चोरी कशी करु शकतेस वाद घालत होता
आय कान्ट बिलिव्ह आयॅम डिफेंडींग नेहा- शिवानी , पण त्यातल्या त्यात त्यांना टास्क समजला होता, शिवानीने बिचुकलेला परागचा फोटो टाकायला कन्व्हिन्स केले, वैशालीला ऑलमोस्ट कन्व्हिनस केले होते रुपालीचा फोटो टाकायला, परागला उचकवलं, निदान काहीतरी गेम खेळली.
नेहा सुध्दा पक्षी टास्कमधे लपवाछापवी वगैरे काहीतरी डोकं चालवत होती, चोरीही प्रो चोरासारख्या करत होती
परागने आज शिवानीचा निषेध म्हणून खेळलाच नाही , त्याला खेळताना बघायला आवडलं असतं पण त्याचा स्टँड त्याच्या जागी एकदम योग्य होता , अजुनही मला परागच सर्वात खतरनाक प्लेयर वाटतो !
बाकीच्यांचा गोंधळात गोंधळ पाहून खरच हहपुवा,
आज वैशालीने भांडताना एकदम सगळ्या मर्यादा ओलांडल्या पण ती भांडताना जास्तं रिअल दिसत होती,उलट ती फार पॉलिश्ड, चुकीचं इंग्लिश बोलायला लागली कि फेक दिसते
वादाचं कारण अगदीच फुटकळ होतं, वैशालीला आणि वीणाला दोघींना रागवायचं कारण नव्हतं पण त्या सो कॉल्ड संस्कारी वीणाला कुणीतरी सुनावलेलं बघून मज्जा आली मला!
बिचुकले बाकी एन्टरटेन्मेन्ट साठी आहेत, टास्क साठी कनिंग बनत नाहीत ते , कि मुद्दाम असच वागणे त्यांची स्ट्रॅटजीच आहे माहित नाही !
आज माधव त्याला म्हणे तू़ परागच्या उचकवण्यावर उचकु नकोस, तू काय त्याच्या हातातलं खेळणं आहेस का? तर बिचुकले भलतच काही समजला , म्हणे हो हो मी गेम खेळायला आलोय ! माधवने कपाळावर हात मारला
आज बिचुकले परागशी भांडताना एका हतात धुतलेली अंडरवेअर नाचवत होते, मला त्यांच्या त्या रागवण्याचही हसु आलं , नंतर वैशाली म्हंटली,’ अहो बिचुकले तुमची चड्डी डायनिंग टेबल पाशीच राहिली
उद्या आता शिवानी किशोरी राडा !
Pages