Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिवानीचा भारी पोपट झाला
शिवानीचा भारी पोपट झाला जेव्हा तीच कोणीच एकल नाही की गेम सोडुयात >> हो ना....आणि माधव त्यावर तिला सांगत होता...सोडायचा कशाला ? जिंकवुन देउ आपण त्याना Lol . नेहा पण हेल्पलेस झालेली दिसली शिवानी च्या वागण्यामुळे. नेहा ने लवकरात लवकर शिवानी ला सोडुन पराग न टीम ला जॉईन करावं असं मला वाटतय.
..किंवा, सरळ नेहा न शिव ने एकत्र यावे दोघं मस्त स्ट्राँग आहेत.
मला नाही वाटत शिवानीला किंवा
मला नाही वाटत शिवानीला किंवा वीणाला शिक्षा मिळेल , त्या बाहेरच्या जेल रुम मधे टाकतील दोघींना फार तर.
आय थिंक शिवानी गोंधळलेली वगैरे नाहीये, सगळं ठरवून अगदी मुद्दामच करतेय एग्झॅक्टली लाइक सुरभि राणा !
काहीतरी भयंकर केऑस करून अटेन्शन घेणे/फुटेज घेणे, ज्यामुळे फक्तं तिचीच चर्चा होत राहील, अफ्टरॉल केऑस इज अ लॅडर
इन शॉर्ट तिला सुरभि राणा + हिना खान बनायचय, विनर नाही !
कदाचित बिगबॉसने तिला व्हिलन /गुंडी इमेज मेन्टेन करायलाच पाठवलं असेल , जसे हिन्दी बिबॉ १२ मधे सुरभिला पाठवलं होतं !
बाहेर आल्यावर हिनाला जसा कोमोलिकाचा आयकॉनिक रोल मिळाला तसा तिला एखादा जबरदस्तं निगेटिव रोल प्ले करायचाय आणि त्यासाठी १०० दिवस ऑडीशन्स देतेय !
जाउद्या, आजही शिव द बेस्ट, एन्टरटेन्म्नेट + टास्क किंग, शिव ऑलरेडी विनिंग हार्ट्स + आधीपासूनच त्याला रोडिजमुळे भरपूर सपोर्ट आहे.
बाहेर आल्यावर हिनाला जसा
बाहेर आल्यावर हिनाला जसा कोमोलिकाचा आयकॉनिक रोल मिळाला तसा तिला एखादा जबरदस्तं निगेटिव रोल प्ले
हे मात्र खर आहे.असू शकत.कारण असे लोक विनर नाही होत.
दोघींनी कलर्सवर काम केल आहे ,त्यामुळे बाहेर आल्यावर मालिकेत एखादा तगडा रोल अथवा वायकॉमच्या एखाद्या पिक्चरमध्ये भूमिका.काहीतरी कॉन्ट्रक्ट असेल.
पण शिवानीला कदाचित अस करत आहे त्या अर्थी मराठी इंडस्ट्रीच एवढ सोयरसुतक नसाव कारण हिंदी टेलिव्हिजनवर तिला लीड रोल्स मिळत आहेत.त्यामुळे बाहेर आल्यावर हिंदी टेलिविजन आहेच.
नुकत्याच इंन्स्टावरून
नुकत्याच इंन्स्टावरून कळलेल्या माहितीनुसार शिवानी आणि नेहा जेलमध्ये जाणार आहेत.प्रत्येक टीमला आपला सदस्य निवडायला सांगितलि होता,वीणा आणि शिवानीची निवड केली.
सुरवातीला तिथेपण म्हणे शिवानी ने सुरुवातीला जायला नकार दिला.पण गेली नंतर.
म्हणजे एक नक्की की अजून निदान 2 आठवडेतरी या घरात राहणार.
खरतर बिबॉसलाच टाकायला पाहिजे जेल मध्ये.त्याननाच हँडल करता येत नाही आहे.
अरे पण मग आता टास्क मध्ये कंटेन्ट कोण देणार?
सॉरी ,नेहा नाही ,वीणा
सॉरी ,नेहा नाही ,वीणा
म्हणजे एक नक्की की अजून निदान
म्हणजे एक नक्की की अजून निदान 2 आठवडेतरी या घरात राहणार.
खरतर बिबॉसलाच टाकायला पाहिजे जेल मध्ये.त्याननाच हँडल करता येत नाही आहे.
अरे पण मग आता टास्क मध्ये कंटेन्ट कोण देणार?
<<
UP
कंटेन्ट कोण देणार म्हणजे ??
तुमचा थोडा गोंधळ होतोय का ? जेल म्हणजे त्या अंगणात एक जेलरुम आहेना तिथे पाठव्तात त्यांना, म्हणजे उलट अजुन जास्तं टी आर पी !
हिन्दी बिबॉ मधे सतत श्रीसन्तला टाकायचे, तोही आधी नाही म्हणायचा मग जायचा.
बेसिकली दर आठ्वाड्याला काही सदस्यांना जावं लागत जेलमधे, तेही फार तर २-३ दिवस , ज्यांनी नियम तोडले, दंगा केला त्यांची निवड करतात घरवाले.
त्या जेलच्या भिन्तीवर चित्रं वगैरे काढतात, त्यात जर २ दुश्मन एकत्रं बन्द असले तर अजुन दंगा !
जेल वेगळं आणि सिक्रेटरुम्/कालकोठरी वेगळी, सिक्रेटरुममधे जातात ते फक्तं प्रेक्षकांना समजतं पण हौअसमेट्सना नाही, त्यांना वाटतं कॉन्टेस्ट्न्ट एलिमिनेट झाला.
सिक्रेटरुममधे कोणी़ जातं तेंव्हाही कन्टेन्ट देतच असतात कॉन्टेस्ट्न्ट्स, तिथेही कॅमेरा असतो.
अच्छा.हे नव्हत माहित.हिंदी
अच्छा.हे नव्हत माहित.हिंदी बिबॉ बघत नाही आणि मराठीत गेल्या वर्षी नव्हत.पण त्या दोघी टास्क नाही ना करु शकत ? म्हणून म्हटल,टाकमध्ये कोण कंटेंट देणार
आस्तादची मुलाखत पहा , मस्तं
आस्तादची मुलाखत पहा , मस्तं विश्लेश्ण केलय या सिझनच्या स्पर्धकांचं, वैशालीने त्याच्यासारखीच परवा टास्क मधे गद्दारी केली त्याबद्दलही बोललाय
https://youtu.be/xBcQAoApEEo
अच्छा.हे नव्हत माहित.हिंदी
अच्छा.हे नव्हत माहित.हिंदी बिबॉ बघत नाही आणि मराठीत गेल्या वर्षी नव्हत.पण त्या दोघी टास्क नाही ना करु शकत ? म्हणून म्हटल,टाकमध्ये कोण कंटेंट देणार
<<
मेन टास्क तर झालं कि आता, वीकेन्डच्या वारला जेलमधून बाहेरही येतील या दोघी.
श्रीसान्त सतत जेलमधे असायचा पण सर्वात जास्तं कन्टेन्ट्/फुटेज त्यानीच घेतल.
श्रीसंत शेवटपर्यंत राहिला का
श्रीसंत शेवटपर्यंत राहिला का ?
बिग बॉस सिझन १२ = सबकुछ
बिग बॉस सिझन १२ = सबकुछ श्रीसन्त होता , जिंकलाच होता ऑलमोस्ट , ऐनवेळी चॅनलनी फेस ऑफ कलर्स दीपिकाला जिंकवलं आणि श्री रनरअप झाला.
मला काल एक गोष्ट नाही कळली ,
मला काल एक गोष्ट नाही कळली , शेवटी नेहा सगळे कपडे २००० ला द्या असा सौदा करत होती पराग सोबत तर मागून केळकर ने ३ बोटं दाखवली तर ३००० झाली व्हॅल्यू .. पण नेहा आणि केळकर एकाच टीम मध्ये आहेत ना ? कारण केळकर गद्दारी नव्हता करत ..!? दुकानदाराने कमीतकमी पैसे द्यायला हवे ना .. आणि शेवटी तो माधव आला आणि सौदा साडे ५हजार चा केला .. मला ते काही कळलं नाही असं का केलं ?

वीणा आणि शिवानी खरंच डोक्यात जायला लागलेत ..शिवानी जास्तच .. गेम सोडूया हे ठरवणारी हि कोण ? आणि हिच्या सांगण्यावर बाकीचे इंडिविझूअल गेम का सोडतील ? जास्तीत जास्त प्रयत्न करायचे का सोडून द्यायचा गेम ? आणि एका टीम चे २६ हजार पॉईंट्स आणि दुसऱ्यांचे फक्त ३००० झाले ना ? केवढी तफावत ?! एवढे काय चोरले टीम बी ने? फक्त कपडे परफ्युम डियो च ना ?
या वीकएंड ला वीणा आणि शिवानी ला सक्त ताकीद द्यायला हवीये. शेवटी किशोरी ने मेकअप बॉक्स चोरीला गेल्याचा खोटं नाटक केलेलं हे कळलंच सगळ्यांना ते बरंच झालं .. बाप्पा म्हणाले तसं ..कंटाळा कसा येत नाही राडा घालायचा ..
किचन मध्ये सुपू आणि बाकी गाण्यातून पराग ची खेचत होते तेव्हा मजा आली .. बाकी त्यांचं प्रेमाचं नाटक कंटाळवाणं होतंय मला तरी ..
शिव बिचारा पराग ला निरागसपणे विचारत होता .. तुमचं झालं का फायनल ?विचारलं का तिला असं काहीतरी ..
सध्या तरी माझे फेवरीट नेहा शिव आणि पराग थोडासा आणि वीणा थोडीशी
काल शिवानीचं वागणं जरा जास्तच
काल शिवानीचं वागणं जरा जास्तच वाईट होतं. पराग आणि नेहाने टास्क छान खेळला. इतर अनेक गोष्टी आजूबाजूला घडत असतानाही टास्कवर फुल्ल concentrate करून नेहाने बाजी मारली. ती दिवसेंदिवस जास्त matured वागतीये. त्यामुळे जास्तच आवडायला लागलीये. पहिल्या आठवड्यानंतर तिनी तिच्यामध्ये जो काही बदल केला आहे तो फारच सुखद वाटतोय. same warning शिवानीला सुद्धा मिळाली होती. पण तिनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्यासारखं वाटतंय. नेहा रॉक्स!
शिवानीकडे खिलाडूवृत्ती अजिबात
शिवानीकडे खिलाडूवृत्ती अजिबात नाही, गेम पण नीट खेळत नाही. बाकी बरेच जण जीव तोडून खेळत होते. नेहा चांगली खेळली. पराग आणि शिवने मजा आणली. शिवानीला समजलं समोरची टीम जिंकणार, नखरे सुरु झाले तिचे, गेम सोडूया पण तिच्याच टीमने तिचा पचका केला.
नेहाने खरं तर शिवानीबरोबर जास्त राहू नये, ती जरा सुधारलेली वाटतेय पण शिवानीमुळे गोत्यात येईल.
सध्याच्या परफॉर्मन्सनुसार
सध्याच्या परफॉर्मन्सनुसार माझा सपोर्ट पण शिव आणि त्यानंतर नेहाला. आता अभिजीत केळकर आणि माधव हेही चांगले खेळत आहेत! बिचुकले येडा माणूस आहे. कधी कधी करमणूक करतायत अजूनही पण कुणीही येऊन त्यांना खेळवतंय नाहीतर चावी मारतंय. त्यांचंही ते शिवानी च्या मागे मागे करणे इरिटेट होतंय. पराग ओव्हर थिम्न्किंग करुन भलत्याच स्ट्रॅटेजीज लावतोय की काय असं वाटतंय. त्यापेक्षा टास्क खेळ म्हणावे फुल फोर्स ने.
वैशाली अत्यन्त निगेटिव जातेय. काही ओरिजिनॅलिटी नाही, जेन्युइन स्टँड नाही, उलट जे जास्त निगेटिव अटेन्शन घेतायत त्यांच्याच मागे जातेय फूटेज साठी. पथेटिक वाटतंय ते. बाप्पा पण शिवानीला खूष करण्याच्या प्रयत्नात असतात सतत.
काल सुरेखाताईंनी गाणं तयार केलेलं भारी होतं
काल गेमची सुरुवात किशोरी आणि
काल गेमची सुरुवात किशोरी आणि कम्पनीने चान्गली केली. कपड्यावरुन कपडे काढण चालू होत
शिव आता स्ट्रीप डान्स सुरु करेल की काय अस वाटत होत.
कालच्या प्रकरणात चूक शिवानीची होती. तिच्या टिमनेच तिचा पचका केला त्याचा राग तिने वीणावर काढला. विणाने तिला प्रतिकार केला त्यात तिची काय चूक?
नेहा आणि अभिजित बिचकुले तर पोलीस होते ना, मग त्यान्नी कशाला कपडयात वस्तु लपवल्या?
घरात आणखी एक लवस्टोरी सुरु होतेय वाटत- शिव आणि वीणाची.
काल सुरेखाताईंनी गाणं तयार केलेलं भारी होतं >>>>>>>>>> +++++++++११११११११११
सध्याच्या परफॉर्मन्सनुसार माझा सपोर्ट पण शिव आणि त्यानंतर नेहाला. >>>>>>>>> अगदी अगदी
हो पण वीणाने एकही फटका न मारता, मला bb कडे तक्रार करायची आहे म्हणायला हवं होतं, शिवानीने त्याचा गैरफायदा घेतला आणि bb आणि मांजरेकर फेवर करतात तिला, खरंच सायको असल्यासारखी खेळतेय. >>>>>>>>>> सहमत
कालच्या प्रकरणात चूक शिवानीची
कालच्या प्रकरणात चूक शिवानीची होती. तिच्या टिमनेच तिचा पचका केला त्याचा राग तिने वीणाने काढला. विणाने तिला प्रतिकार केला त्यात तिची काय चूक? >>> हो पण वीणाने एकही फटका न मारता, मला bb कडे तक्रार करायची आहे म्हणायला हवं होतं, शिवानीने त्याचा गैरफायदा घेतला आणि bb आणि मांजरेकर फेवर करतात तिला, खरंच सायको असल्यासारखी खेळतेय.
म मां आणि bb फेवर करत
म मां आणि bb फेवर करत असल्याने शिवानी फायनलला नक्की जाणार आणि आपल्याला ताप देत राहणार डोक्याला. हिंदी मी बघत नाही असल्या लोकांमुळे, आता मराठीत पण तेच.
मुळात चँनेललाच हे सगळ हव आहे
मुळात चँनेललाच हे सगळ हव आहे.वूटवर अनसीन मध्ये कितीतरी असे क्षण आहेत की जे खरच छान आहेत,का नाही दाखवत ते?कारण चनेललाच मारामारी,भांडण हवी आहेत.कालचा वीणा आणि शिवानीचा मारामारीचा भाग सहजपणे टाळता आला असता किंवा काढूनही टाकता आला असता,कारण पहिल्यांदा फक्त तिने वीणाला खेचल होत,तेव्हा मारामारी झालीच नाही,ती नंतर परत आली,टिट फॉर टँट ,आणि तो प्रकार घडला,पहिल्याच वेळी बिबॉ ला थांबवता आल असत,पण नाही,त्यांनच ते हव आहे.
शिवानी चुकीचच वागत आहे,पण तिलाही कुठेतरी आपली इमेज बदनाम होत आहे,हे नक्कीच कळत असणार,पण हे असच तिने चालू ठेवल आहे याचा अर्थ ,एकतर मला विनर करा किंवा मी मागते तेवढे पैसे द्या.अस डील झाल असेल.
उषा नाडकर्णीने बरेच वेळा सांगितल आहे की हिंदी मध्ये मला चक्क बोलवत होते की आऊ ,आप आईये,टीआरपी बढेगा.
म्हणजे हे सगळ रामायण त्या टीआरपी नामक कीड्यापाशी येत.
जरी शिवानी बाहेर गेली तरी तिची जागा घ्यायला दुसर कुणीतरी येईल.
जस मालिका रटाळ झाली की आपण बघण बंद करतो तसच हा ही शो आवडेनासा झाला की बघण सोडून द्यायच आणि वोट द्यायच नाही,एवढच आपण करू शकतो कारण इतर रिअँलिटी शोजप्रमाणे याचाही विनर ठरलेला असेल.
शिवानी चे वागणे ऑर्गॅनिक वाटत
शिवानी चे वागणे ऑर्गॅनिक वाटत नाही मला. सगळे काही कॅल्क्युलेटेड वाटते. सगळे अॅक्टिंग. ते तिचे ती करतेय की चॅनल सोबत पार्टनरशिप मधे करतेय ते नाही माहित. पण कुणी सेलेब्रिटी असे उगीच विचित्र वागणार नाही. इतके बिबॉ सीझन्स होऊन गेलेत. तिला माहित असेलच तिच्या वागण्याची काय रिअॅक्शन येत असेल ते. तरीही ती ते करतेय याला काही तरी कारण असेलच ना.
हो, परागचा ट्रॅक भरकटलाय ,
हो, परागचा ट्रॅक भरकटलाय , बिचुकलेचाही !
रुपाली एलिमिनेट झाल्याशिवाय पराग ट्रॅकवर नाही येणार .
आपुनका फेवरेट शिव!
या सीझनमध्ये अजून एक observe
या सीझनमध्ये अजून एक observe केलेली गोष्ट म्हणजे कोणालाच बिग बॉस बद्दल रिस्पेक्ट आहे असं वाटत नाही...पहिल्या सीझनमध्ये सगळ्यांना बिग बॉस बद्दल रिस्पेक्ट होता आणि बरेच जणांना जिंकण्याची इच्छा पण आहे असं वाटत होतं ..या सीझनमध्ये ते सगळं मिसिंग आहे... कालच्याच episode मध्ये बिग बॉस ने सगळ्यांना task थांबवून living area मध्ये बसायला सांगितलं तेव्हा सगळे कलकलाट करायला लागले तर बिग बॉस ने तुमचं झालं की सांगा असं म्हटलं तर बाप्पा आणि एक दोघं अजून कोणीतरी झालं झालं असं म्हणत होते फारच विचित्र वाटले ..
कालचा एपिसोड सुरवातीला मस्त
कालचा एपिसोड सुरवातीला मस्त एंटरटेनिंग होता... सगळे छान खेळत होते.. पण शिवानीने मध्येच येऊन राडा घातला आणि सगळच कळलंच फिसकटलं..
आजचा भाग म्हणजे मानबा
आजचा भाग म्हणजे मानबा सिरियलच्या अभिजित गुरुची स्क्रिप्ट होती.हास्यास्पद होता.माझ्यामते फिलर एपिसोड होता.
अरे बिबॉ ने शिक्षा सुनावली ना,मग आता काय निर्दोष ठरवण्यासाठी कोर्ट रुमचा ड्रामा.बिनडोकपणाचा कळस होता.जे ममांनी करायला हव ते घरातले लोक का करत आहेत.मग उद्या ममा काय करणार....भजन.
वैशाली माडे ,विद्याधर जोशी यासारख्या लोकांनी बाहेर पडाव.
जोशी चांगले कलाकार आहेत,त्यांनी इथे वेळ वाया घालवू नये.तसच वैशालीने सुध्दा बाहेर पडाव
या वेळच्या बिबॉ मध्ये तेवढा दम नाही.
आज पुन्हा एकदा चँनेलने सिध्द केल की त्यांना शिवानी हवी आहे.
अरे,तुमच्या आदेशाच तिने पालन केल नाही तर तिला शिक्षा द्या ना,बाकीच्या लोकांना का?
नवा कॅप्टन निवडला नाही का?
नवा कॅप्टन निवडला नाही का?
नवा कॅप्टन निवडला नाही का?...
नवा कॅप्टन निवडला नाही का?.....नाही.फालतुगिरी चालू होती.
बिचुकले शिवानीच्याच बाजूने
बिचुकले शिवानीच्याच बाजूने निकाल देणार कारण ते शिवानीच्या पाठी पडलेत. बिग बॉस ला पण शिवानी शेवटपर्यंत पाहिजेच आहे म्हणून बिचुकलेना जज केलाय . बिग बॉस ने अडगळीच्या खोलीची शिक्षा सुनावल्यानंतर कशाला हा कोर्टाचा फार्स ?
कारण बिग बॉस ला शिवानीला निर्दोष साबित करायच आहे .
सगळं बिग बॉस च ठरवणार मग लोकांकडून फुकट मत कशाला मागतात ?
प्रचंड फालतुपणा. कोर्टरुम
प्रचंड फालतुपणा. कोर्टरुम ड्रामा कशाला, बसुद्याना दोघींना दोन दिवस अडगळीच्या खोलीत. शिवानी काय इतरांवर उपकार केल्यासारखी गेली आतमधे. दोघींना पुढच्या आठवड्यात noaminate करायचं होतं bb ने. वीणा आत्ता वाचली तरी परत nominate असं. वीणाने पायावर मारलं पण ती खूप खेचत होती तेव्हा.
ह्या दोघीही चॅनेलला, bb ला हव्या आहेत म्हणून इतकी सूट देतायेत. शिवानीला खरंच वरदहस्त असल्यासारखी वागतेय, वीणाने किमान आज bb चं ऐकलं तरी. काल दोघींनी ऐकलं नाही आणि sorry म्हटलंही नाही.
इतकं सगळं करण्यापेक्षा एवी दाखवा की काय झालं आणि कसं झालं.
बिचुकले शिवानीच्या बाजूने न्याय देणार असं वाटतंय मला, ती स्वतः आणि वैशाली strongly defend करतायेत केस. तसंही ते शिवानीच्या बाजूने असतात.
विकेंड डाव जवळ आला म्हणून शिवानीने परागची माफी मागण्याचे नाटक केलं आणि ते परागच्या बरोबर लक्षात आलं, तो सॉलिड आहे पण रुपाली रुपाली करत बोअर करतोय.
बाकी मैथिलीचा प्रभाव अजिबात पडत नाही पण शिवानी सर्वांवर उपकार केल्यासारखी आत चाललेली तेव्हा ती जे बोलली ते योग्य वाटलं मला.
म मां उद्या शिवानीला काही
म मां उद्या शिवानीला काही बोलणार नाही, सगळे तिच्या बाजूने आहेत. आतमध्ये गेलीस तर घरच्यांना काय वाटेल हा मिजासखोरपणा कशाला, तू शिव्या देतेस, सतत हात उगारतेस तेव्हा घरच्यांना कित्ती अभिमान वाटत असेल नाही तुझा.
शिवानीच्या जागी दुसरं कोणी असतं तर bbने अवमान झाला स्वतःचा म्हणून बाहेर काढलं असतंच.
शिवानी येनकेन प्रकारेन
शिवानी येनकेन प्रकारेन सगळ्याना आपल्या भोवती घुमवत ठेवते, काय ती नाटक? सगळे घरातले काय डोक्यावर पडलेत काय? चुक या बयेची शिक्षा सगळ्या घराला? बीबॉच लॉजिक अगदी केड्या लॉजिक होत आज्,कोर्ट रुम ड्रामा कशाला वर अजुन तिच महत्व वाढवायला, बीबॉच उघड उघड फेवर करत असतिल सिझन बघण्यात मजाच नाही.... आक्खा एपिसोड पुढे पळावत पाहिला, कोर्ट रुम्म्ड्रामा स्किपच... फालतु पणा.
Pages