मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय boar करत होती शिवानी नाईकला.. बिचारा विषय बदलण्याचा प्रयत्न करत होता तरी हीच आपलं चालूच... बाकी बाप्पाने मस्त सुनावले शिवानीला... तू म्हणजे हाताबाहेर जाणारी केस झाली आहेस असं म्हणाला तो.. Lol आवडेश एकदम..

मला पराग कान्हेरे आज जाम आवडला !
मस्तं क्लिअर स्पष्ट मुद्दे मांडतो आणि डंब लाउड बायकांच्या स्टुपिड टॉक्स्ना शान्तपणे रिअ‍ॅक्ट करून त्यांना अजुनच चिडवतो, that’s how intellectual people play games !
शिवानीची आता डॉली बिन्द्रा झाली आहे, ओरडते काय, रडते काय, हस्स्ते काय, बिचुकलेशी पुन्हा बोलायला जाते काय, पूर्णच येडी, एकदम गॉन केस !
या सिझनच्या आउंनी अर्थात सुरेखाबाईंनी तलवारी काढायला सुरवात केली आहे.
बिचुकले जाम हसवतो राव, एंटरटेन करतो पण त्याला गेम खरच समजतच नाहीये किंवा मुद्दाम करतोय, काही असो मज्जा येते तो बोलायला लागला कि !
अभिजित केळकर टाळ्या मारत मुलींमधेच गॉसिपत अस्स्तो , परागने एक पर्सनल रिमार्क टाकला असला तरी त्याचा आधीचा मुद्दा बरोबर होता, बाप्पा आणि अभिजित स्टँड घेत नाहीत बद्दल.
शिवानी तर त्याच्या प्रोफेशन वर गेली , पाणी काय फेकते, चप्पल फेकते , जे काही चाल्लय तिला मुद्दामच सांगितलय का बिबॉने व्हँपचा रोल करायला कि अशीच येडी आहे काय माहित !

शिवानी तर त्याच्या प्रोफेशन वर गेली , पाणी काय फेकते, चप्पल फेकते>>>
त्याच्यावर परागची reaction तुफानी होती.
पाणी फेकल्यावर म्हणे साबण पण लाव

दीपांजली >>+1111... पराग बद्दलच लिहायला आले होते... मस्त आहे... त्या भवानीला हा खरंच भारी पडू शकतो... माधव ला पण बिचकुले कळलेत.. तो त्यांना समजून घेतो... बाकीच्या पोरी नुसत्या आरडा ओरडा करतात.. आता सुपू पण सामिल झाल्यात त्यांना...5 दिवस झाले आणि फक्त 1ch टास्क.. तोही मुळूमुळू .. हे काही पटलं नाही...

ती शिवानी पाणी किती वाया घालवते. ब्रश करतना अखा वेळ नळ चालुच . मला तिथे जाउन नळ बंद करावासा वाट्त होता.

आणि पाणी वाचवा अस त्याच्या बाथरुम वर लिहिलय सुद्धा . मला वाटलं होतं कि पराग करेल नळ बंद.

पराग मला आधीपासूनच जाम आवडत होता, आणि आता प्रचंड आवडला. विनाकारण कंपूबाजी करून गुडी गुडी राहण्यापेक्षा जबरदस्त फायर केलं त्याने. इंफॅक्ट थोडयावेळ सगळ्या लेडीज गोंधळल्या होत्या, याला कसं हँडल करावं... बिचुकले सॉफ्ट टार्गेट होता, हा नाही. आणि शिवानीला दिलेली रियाक्षण तर मस्तच... साबणही लाव... वा!!! आणि हा अभिजीत केळकरच्या तोंडावर बोलून गेला कि तू तुझ्या बापाचा झाला नाहीस, आणि सगळं झाल्यावर, आता परागला आपलं बोलणं ऐकू जाणार नाही, या बेताने तो पोरींजवळ म्हणतो, हाही बायकोचा झाला नाही, वा...
सगळ्यात जास्त डोक्यात जातोय तो अभीजीत केळकर. या माणसाचे स्वतःच कंपू शिवाय काही मतच नाहीये, आणि स्ट्रॉंग तर नाहीच आहे, पण आव इतका जबरदस्त असतो की मी किती स्वतंत्र विचारांचा, किती स्ट्रॉंग किती लेडीजचा आदर करणारा वगैरे.

या माणसाचे स्वतःच कंपू शिवाय काही मतच नाहीये,
>>> कंपूशिवाय कामही मिळत नाही त्याला. आता ममां पराग ची शाळा घेतील खूप पण त्या केळकरची घेणार नाहीत

मला पराग कान्हेरे आज जाम आवडला !
मस्तं क्लिअर स्पष्ट मुद्दे मांडतो आणि डंब लाउड बायकांच्या स्टुपिड टॉक्स्ना शान्तपणे रिअ‍ॅक्ट करून त्यांना अजुनच चिडवतो, that’s how intellectual people play games !>> +11

मी काल थोडाच वेळ बघितलं, आता साडेचारला बघेन.

शिवानी काल स्वतःच्या परीस्थितीचं गाणं आळवत होती ते बघितलं. सोळाव्या वर्षी गाडी, घर वगैरे घेतलं ते हींदीत काम करुन का. काय म्हणाली ते नीट समजलं नाही.

मला तर वाटले या लाउड मुलींना समज वगैरे मिळाली की काय बिबॉकडून? अचानक बिचुकलेशी माणसासारखे वागत होत्या. शिवानी चे फार नाटकी वाटले पण. सुरेखाताई क्यूट वाटल्या काल. बिचुकले ला समजावत होत्या आणि नंतर म्हणतात 'आता ठरलंय ना आपलं? आता आवाज करू नको हां नाहीतर नरडं दाबेन तुझं ' Lol
इंटरेस्टिंग एपिसोड होता एकूण. काल अभ्यास करून आलेले सगळे प्लेयर्स अचानकच आपापली पुढची कार्डे खेळायला लागले Happy दिग्या अचानक कोकण कार्ड खेळला, शिवानी स्ट्रग्ल, पूर्वीची गरिबी वगैरे, वैशाली शेतमजुरी, अभिजीत वडिलांचे काहीतरी कॉन्फ्लिक्ट!! फार च ऑब्व्हियस वाटलं ते!
शिवानी औकातीवर आली नंतर लगेच. पाणी उडवणे, पायात पाय ?? आउट ऑफ कन्ट्रोल आहे ती. तेच त्याने केले असते तर ???? काहीही .
पराग ने सॉलिड गेम चालू केला आहे आता. बाया खरंच सटपटल्या होत्या आधी, नंतर कुचाळक्या रुट घेतला मग त्यांनी.
सगळे रुपाली आणि पराग ला चिडवत होते आणि तेही थोडेफार फ्लर्ट करत होते. कार्ड पे कार्ड , मजाय एकूण !

मस्तं क्लिअर स्पष्ट मुद्दे मांडतो आणि डंब लाउड बायकांच्या स्टुपिड टॉक्स्ना शान्तपणे रिअ‍ॅक्ट करून त्यांना अजुनच चिडवतो, that’s how intellectual people play games ! >>>>>>>>> ++++++++१११११११११ पण त्याने अभिजितविषयी पर्सनल जायला नको होत. अर्थात बिबॉमध्ये हेच चालत म्हणा. सगळयान्चे आई- बाप बाहेर काढले जातात.

शिवानी काय समजते स्वतःला? भाण्डण पराग आणि अभिजित मध्ये चालू होत तर ही आली मध्येच आवाज चढवायला.

आता तर काय पराग आणि रुपाली शिपिन्ग करण चालू आहे घरात. दोघान्ना चिडवतायत एकमेकान्वरुन. पण रुपाली त्याच्याशी बोलतच नाही ते परागने ' मला या तिघी मुली आवडत नाही' म्हटल्यापासून.

विणाला मध्येच काय झाल? कागद फाडत होती ते?

बिचुकले जाम हसवतो राव, एंटरटेन करतो पण त्याला गेम खरच समजतच नाहीये किंवा मुद्दाम करतोय, काही असो मज्जा येते तो बोलायला लागला कि ! >>>>>>>>>> अगदी अगदी. शेवटी शिवानीलाही कबूल कराव लागल की तो चान्गला माणूस आहे. अर्थात परागच्या विरोधात बोलत होती ती.

रुपाली मॅरीड आहे ना ? >>>>>>>> नाही. तिच २००० ला ब्रेकअप का घटस्फोट झाला होता हे तिने परागला सान्गितल.

"ही आहे तरी कोण. अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालीय. या सगळ्या चॅनल च्या जिवावर उड्या मारणार्‍या मुली... ... " इ.इ. >>>>>>> धन्स मैत्रेयी.

त्या नंतर हिची (रुपालीची) ओळख काढा.... बिगबॉस - हे वाक्य होतं. >>>>>>> हे मात्र ऐकल होत.

तिच २००० ला ब्रेकअप का घटस्फोट झाला होता हे तिने परागला सान्गितल>>>ओके...मी लास्ट दोन एपिसोडपासून पाहतोय

पण त्याने अभिजितविषयी पर्सनल जायला नको होत. अर्थात बिबॉमध्ये हेच चालत म्हणा. सगळयान्चे आई- बाप बाहेर काढले जातात.>>, पण तो अभिजीतच्या वडिलांविषयी वाईट बोललाच नाही तो... उलट अभिजीतलाच म्हणाला, जो स्वतःच्या बापाचा होऊ शकला नाही तो इतरांसाठी काय stand घेणार..

पण तो अभिजीतच्या वडिलांविषयी वाईट बोललाच नाही तो... उलट अभिजीतलाच म्हणाला, जो स्वतःच्या बापाचा होऊ शकला नाही तो इतरांसाठी काय stand घेणार.. >>>>>> हम्म. पण तरीही ती कमेण्ट खटकलीच मला. बाकी ते अभिजितच स्टॅण्ड न घेण बोलला ते पटल.

पण रुपाली त्याच्याशी बोलतच नाही ते परागने ' मला या तिघी मुली आवडत नाही' म्हटल्यापासून. >>> रुपाली त्या "न आवडणार्‍या ३ बायकांपैकी" नाहीये! ती त्याच्यावर रागवली कारण तिने जेव्हा बिचुकलेच्या बाबतीत तो तमाशा केला तेव्हा परागने तिला टोकले. तीच सांगत होती ते. विणाला बहुतेक.

काहीही ही म्हणा पण आमच्या सातारचा अभि बिचुकले हा येडा बनून पेढा खाणार अस तरी दिसतय..

काहीही ही म्हणा पण आमच्या सातारचा अभि बिचुकले हा येडा बनून पेढा खाणार अस तरी दिसतय..>>ohh तुम्ही सातार्याचे का? मग तुम्हाला थोडीफार आयडिया असेलच ना बीचुकले नेमके कसे आहेत ते?

शिवानी काल अभिजित आणि पराग भांडणात मधेच भुंकली कारण कॅप्टनशिपसाठी वीणाला वोट देत पराग म्हंटला कि त्या गृपच्या दावेदार किशोरीताई होणार आणि त्यांना टक्कर द्यायला आपल्यात एकट्या वीणाला तेवढं ग्लॅमर आहे , ते ऐकून जेलस झाली असेल शिवानी Proud

सर्व स्पर्धकांपैकी कोणालाच आधीचे फैन फोलोंइग नव्हते. किशोरी आणी सुरेखा पुणेकर या माहिती होत्या पण फार काहि त्याम्चेहि फैन फोलोंइग नसणार ( हिंदी शी कंपेअर करता - उदा श्रीशांत , शिल्पा शिंदे वगैरेंचे आधीपासुनच फैन फोलोंइग होते) त्यामुळे शोमध्ये कोण कसे वागत आहे हे पाहुनच फैन बनायला सुरवात झाली आहे. सध्या तरी सोशल मिडिया वर बिचुकलेंच्या जवळ पास हि कोणी नाहि. परागला गेम काय चालला आहे ह्याची उत्तम जाण असावी . त्याने ३ मुलिं विरोधात बोलुन ( मुख्य म्हणजे शिवानी विरोधात) आपला फैन फोलोंइग बनवायला कालपासुन सुरवात केली आहे. ज्यांना बिचुकले गावठी वाटतो आहे ( म्हणुन सपोर्ट कराची इछा नाहि) त्यांना कोणाला सपोर्ट करायचे हा जो प्रश्न होता तो परागने सध्या तरी सोडवला आहे . किशोरी शहाणेने हा चान्स सोडला असे मला वाटते , पण त्यांच्या पैकी कोणालाच प्रेक्षक काय विचार करत आहेत हि जाणीव नाहिये (पराग आणी बिचुकले सोडले तर). शिवने ओपन अप व्हायला हवे. कालपासुन जरा झाला आहे. मग मजा येइल.

शिवानी काल अभिजित आणि पराग भांडणात मधेच भुंकली कारण कॅप्टनशिपसाठी वीणाला वोट देत पराग म्हंटला कि त्या गृपच्या दावेदार किशोरीताई होणार आणि त्यांना टक्कर द्यायला आपल्यात एकट्या वीणाला तेवढं ग्लॅमर आहे , ते ऐकून जेलस झाली असेल शिवानी >>म्हणून पण आवडला पराग... कारण भवानीला टक्कर द्यायला योग्य माणूस उभा झालाय Lol आणि त्यामुळे so called स्वतः la strong म्हणवणारी भवानी बिचारी झालिये... जरा ताळ्यावर येऊन बोलत होती bichukle सोबत

बिचुकले आणि परागमधे फरक हा आहे कि पराग जास्तं हुशार आहे, स्मार्ट प्लेयर आहे, गेम जास्त माहितेय, या मुलींना तिथल्या तिथे उत्तर देऊन उडवायला समर्थ आहे.
बिचुकले बिचारे साधे आहेत, सॉफ्ट टार्गेट आहेत, ताडकन उत्तर द्यायला , मुद्दे मांडायला घाबरतात , अनेकदा त्यांना टास्क समजलं नाहीये असं वाटतं, गेम मधे पुढे जायला त्यांना थोडं डोकं वापरावं लागेल. (अर्थात ऑडीयन्सला ते आहेत तसेच आवडलेत सगळ्यांओएक्षा वेगळे असल्याने.)

हा एवढं मात्र खरं आहे की अभि बिचुकलेला टास्क समजत नाहीत ...पण भोळा आणि साधा सरळ माणूस आहे...

Updates द्या ना plz

तिला फार ओरडलेच नाहीत. रूपालीला झापलं तसं तिला पण झापयला पाहिजे होतं.
परागला स्टार परफॉर्मर म्हणाले तेव्हा शिवानीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. She is next Sai Lokur. Too much arrogance and jealousy.
नेहा, शिवानी आणि माधव एकत्र येतील.

Pages