Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497
तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुसरे बिचुकले काहि मराठी
दुसरे बिचुकले काहि मराठी इंडस्ट्रीत करियर बनवायला आलेला नाहि. तो फक्त स्वतःची ओल़ह पसरवयला आलेला आहे असे वाटते. त्यामुळे त्याला यांच्या ओळखिचा फायदा होउल .....
तीच तर खरी गंमत आहे ना.बिचुकल्यांनी अभिनेति बनण्याची ईच्छा बोलून दाखवली होती.
चँनेलने ठरवल तर बिचुकल्यांसाठी तेही क्षेत्र आओपन होउ शकते.
बाकी कलाकारांबद्दल,तर ते स्टग्लर्रस इहेत यात वाद नाही,पण त्यांनाही पुढे मिळालेल्या प्रसिध्दीचा फियदा होऊ शकतो.
याच एक उदिहरण तर त्या घरातच आहे.वैशाली.
कुणास ठाऊक याचा कुणाला फायदा होईल आणि कुणाला नाही,ते येणारा काळच ठरवेल
पण एक नक्की ,या सगळ्यांना किही दिवसात अणार प्रसिध्दी मिळाली.
एरवी या लोकांबद्दल थोडतरी लिहिल वा चर्चा झाली असती का.
हीच तर या शोची गंमत आहे.
किशोरी शहाणे एकदम डीसेन्टली
किशोरी शहाणे एकदम डीसेन्टली समजावत होती अ बि ला तर तिच्यावर का भडकला हा, मग अ के बडबडला अ बि ला ते योग्य होतं. किशोरी ग्रेसफुल आहे एकदम.
बाकीच्या कित्ती आरडा ओरडा करतात. त्याला खूप महत्व देतायेत. तो पण जाम उकसवणारा आहे.
आज शिवचा रिमार्क ऐकला का? तो
आज शिवचा रिमार्क ऐकला का? तो म्हंटला डिस्कशनमधे कि बिचुकले सारखा माणुस इथे आपल्याला कसाही वाटत असला तरी ऑडियन्सला आवडत असणार !
शेवटी शिवने रोडीज सारखे रिअॅलिटी शो केलेत !
परागनेही थोडीफार बिचुकलेची बाजु घेतली.
मला शिव, पराग, बिचुकले, वैशाली असा गृप जमला तर बरं वाटेल.
आज काय तो रुपालीचा ड्रामा, हाइट ऑफ फेक फेमिनिझम !
बिचुकलेने जर असे रुपालीच्या बेडवर चढून थोबाडाजवळ जाऊन बोट दाखवत आरडाओरडा केला असता तर ?
नेहाही किती कर्कश्श , आवाज बसलाय तरी मोंजुलिका बनून उगीच चढली बिचुकलेवर.
अतिशय लो लेव्हलच्या बायका आहेत, बिचुकलेनी हरासमेन्ट चा आरोप ठोकला पाहिजे.
बाकी काही न बोललेलच बरं एपिसोडबद्दल !
हो डीजे शिवचं बरोबर आहे, पण
हो डीजे शिवचं बरोबर आहे, पण आतमधे डोक्यात हवा शिरलेल्यांना समजेल तर ना.
रुपाली, नेहा, शिवानी डोक्यात जातायेत, कित्ती तो तमाशा. किशोरी, सुरेखाताई नीट शब्दात सांगतात त्याला.
का कळत नाही,पण मला हा सिझन
का कळत नाही,पण मला हा सिझन सुरूवातीपासूनच स्क्रिप्टेड वाटत आहे.म्हणजे सुरूवातच भांडणाने करून द्यायची,टीआरपी मिळवायचा आणि मग खरे टास्क्स सुरू करायचे जिथे यांची खरी कसोटी लागेल.आणि मग ठरवल्याप्रमाणे एकेकाला बाहेर काढायच.
फक्त पाठी मागे बोलू नये . जे
फक्त पाठी मागे बोलू नये . जे काही बोलायचं ते तोंडावर बोलावं असं वाटतंय त्यांना >>> काहिहि ! सर्वच जण पाठीमागे बोलत असतात. रुपालीने एवढा आरडाओरडा केला पाठीमागे बोलु नका म्हणुन आणी नंतर वीणा बरोबर नेहा, शिवानी च्या पाठीमागेच बोलत होती.
पाठीमागे बोलू नका ? बिबॉ मधे
पाठीमागे बोलू नका ? बिबॉ मधे असे म्हणणे इज अ जोक!!
त्या बायांना फूटेज हवंय, बिचुकलेला कॉर्नर करायचेय पण भांडायला पॉइन्ट च सापडत नाहीत कारण तो काही निगेटिव बोलत पण नाही! मग हे आपले स्ट्रॉमॅन अर्ग्युमेन्ट काढले आहे. एकमेकाविरुद्ध स्कीमिंग प्लॉटिंग करणे हा गेम तर सगळेच खेळतात. बिचुकले ला व्यवस्थित कळतेय त्याला कोण का टार्गेट करत आहेत. काल रुपालीने आणि नेहाने जो हॉरिबल प्रकार केला त्यानंतर कोणालाही संताप आला असता. तरी हा शांत ऐकत होता आणि वर नंतर विठ्ठलाचे भजन गायला
धन्य आहे _/\_ !! मला त्याची ती नॉमिनेशन ची काय आयडिया होती ते काही कळले नाही मात्र
जरा कन्फ्युज्ड असावा तो.
सुरेखा ताई मात्र खरंच मिसफिट वाटत आहेत या पूर्ण सेटप मधे.
असा काय आहे तो! काल रुपालीने भांडण करून फूटेज खाऊन ते प्रकरण दि एन्ड झाल्यावर तो उगीच बिचुकले वर हळुच ओरडत होता ते पाहून लहान मुलं आधीच मेलेल्या किड्याला नाहीतर सापाला उगीच " काय ले मालू का तुला" म्हणून काठीने मारायला जातात तसे वाटले! यालाच हाकला आधी. या आठवाड्यत एलिमिनेशन नाही असे दिसतंय बाकी.
एकूण असेही वाटते की सध्या तो लोकप्रिय दिसतो आहे, पण जरी त्याच्या डोक्यात काही व्हॅलिड स्ट्रॅटेजीज असल्या तरी त्याला टास्क्स करताना घरात सपोर्ट अभावी नंतर प्रॉब्लेम्स होणार. ३-४ लोकांनी तरी तुमच्या बाजूला असावे लागते पुढपर्यन्त जायला. शून्य सपोर्ट असताना पुढे अवघड जाऊ शकते.
सध्या सर्व यंग क्राउड डोक्यात जात आहे. वीणा त्यातल्यात त्यात बरी. दिगंबर आणि बाप्पा उगीच या मुलींना खूष करायला बघत आहेत काहीतरी बोलून. वैशाली फेक, कन्फ्युज्ड. पराग मात्र या सगळ्यात निगेटिव न होता स्टँड आउट होत आहे . शिव ने काल एकदा फायनली एक स्मार्ट वाक्य टाकले, बिचुकलेच्या गेम बद्दल. किशोरी शहाणी वाटतेय अजून
परत एकदा - तो केळकर
फक्त पाठी मागे बोलू नये . जे
फक्त पाठी मागे बोलू नये . जे काही बोलायचं ते तोंडावर बोलावं असं वाटतंय त्यांना >>> काहिहि >> काहीही नाही असच ती बोलतेय ना ?. तिला असं वाटण चुकीचच आहेच कारण बिग बॉस मध्ये प्लांनिंग प्लॉटिंग करायलाच आलेत लोक आणि काड्या करायला सुद्धा . तरी तेच करणाऱ्या शिवानी चा मात्र लोकांना राग येतोय आणि बिचकुलेला सपोर्ट .
बाकी हिंदी मध्ये पण मेघा धाडे याच कारणावरून त्या दीपक वर चिडलेली ना ? काड्या करणारा . इकडच्या गोष्टी तिकडे सांगणारा म्हणून? प्लस तिला मराठी ची विनर म्हणून तिला तो मान पण देत नव्हता उलट तिची खिल्ली उडवत होता म्हणून मराठीची विनर त्याच्यावर सॉल्लिड चिडली . शिव्या दिल्या . थुंकली
लहान मुलं आधीच मेलेल्या
लहान मुलं आधीच मेलेल्या किड्याला नाहीतर सापाला उगीच " काय ले मालू का तुला" म्हणून काठीने मारायला जातात तसे वाटले >>> हा हा हा .. +१
KVR group जाणून बुजून बनवला
KVR group ओढून ताणून बनवला अस वाटतय... बिचुकले अगदीच साधा माणूस आहे अस वाटतंय... रुपालीने चिडून तुम्ही bigg boss नाही अस म्हटलं.. तेव्हा 'मी कुठे bigg boss आहे yaar?' अस म्हटले तेव्हा मला जाम हसायला आलं.. शिवाय पराग बोलला की तुम्ही बाहेरच्या लोकांसाठी खेळा तेव्हाही विचारलं बाहेरचे कोण?संदेश पत्रात लिहिलेलं सुध्धा त्यांना कळलं नाही... कदाचित अजून अशा कितीतरी गोष्टी घडत असतील.. या सगळ्यामुळे इतर लोक वैतागत असतील... बाकी माणूस छान वाटतात AB... साधे आहेत...actually saglya प्रकाराला कंटाळले आहेत म्हणून सारखे बाहेर जायची भाषा करतात.. शिवानी पण म्हणत होती तसं..
टिव्हीवर बिबॉ काय कमी होता,
टिव्हीवर बिबॉ काय कमी होता, सो ह्या धाग्यावर सुरु झालाय!
हे राडे जर फायनलपर्यन्त असेच चालू राहिले तर कानाचे बारा वाजतील आपल्या.
बाकी ती विणा बरोबर बोलली शिवानीला खिचडी प्रकरणात.
परागने विणासाठी सॉरी नोट ठेवली होती, त्याच पुढे काय झाल हे दाखवलच नाही.
आज शिवचा रिमार्क ऐकला का? तो म्हंटला डिस्कशनमधे कि बिचुकले सारखा माणुस इथे आपल्याला कसाही वाटत असला तरी ऑडियन्सला आवडत असणार ! >>>>>>>>> नशीब, फायनली हा पोरगा काहीतरी बोलला तरी.
काल रुपालीने आणि नेहाने जो हॉरिबल प्रकार केला त्यानंतर कोणालाही संताप आला असता. तरी हा शांत ऐकत होता आणि वर नंतर विठ्ठलाचे भजन गायला Lol धन्य आहे >>>>>>>>>> अगदी अगदी
बादवे, तो रुपालीला उद्देशून माईकवरती काय बोलला ते मात्र ऐकू गेल नाही.
परागला आपण आवडत नाही हे ऐकून शिवानीच रडण कैच्याकै होत. उगाच कशाहीवर रडायच? स्टुपिड!
बिचुकलेच मी त्यान्ना बाप्पा म्हणणार नाही, आप्पा म्हणणार सुद्दा अतिच होत.
बिचुकलेचा अॅप्रोच जरा चुकतोय पण त्यामानाने आत सगळे गॅन्ग अप मात्र जास्तच करतायत, एक बोलला की आले सगळे धावुन! >>>>>>>>> ++++++++१११११११ टारगेट करतायत त्याला सगळे.
तो रुपालीला उद्देशून माईकवरती
तो रुपालीला उद्देशून माईकवरती काय बोलला ते मात्र ऐकू गेल नाही. >>> मी ऐकलं
"ही आहे तरी कोण. अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालीय. या सगळ्या चॅनल च्या जिवावर उड्या मारणार्या मुली... ... " इ.इ.
>>या सगळ्या चॅनल च्या जिवावर
>>या सगळ्या चॅनल च्या जिवावर उड्या मारणार्या मुली... ... " इ.इ.<<
त्या नंतर हिची (रुपालीची) ओळख काढा.... बिगबॉस - हे वाक्य होतं. ते बिगबॉस पॉज नंतर आल्याने गैरसमज पसरण्याची शक्यता आहे.
मला तरी बिचकुले अगदि नाइव वाटतात. राष्ट्रपती पदाकरता अर्ज, लोकसभेची निवडणुक इ. अंगी काहिहि पात्रता नसताना लढवणं हे सारासार बुद्धिने चालणारा माणुस करु शकत नाहि. त्यांना डावपेच लढवायचे आहेत पण त्याला लागणार्या अंगभुत कौशल्याचा अभाव असल्याने ते हास्यास्पद होत आहेत. वीणा/नेहा यांच्या बाबतीतला बिगबॉसचा संदेश त्यांना जेन्युनली बाउंसर गेला होता. त्यांचा दुसरा इश्यु कल्चरचा आहे असं वाटतं. ग्रामीण भागांत तसं बोलण्या/वागण्याची सवय अस्ल्याने शहरी मुली आपल्याशी अशा का वागतात, हा कल्चर शॉक त्यांना बसलेला आहे...
टीआरपी,टीआरपी,काय ते या शोला
टीआरपी,टीआरपी,काय ते या शोला खरच मिळत का?कारण बार्कच्या मराठी शोच्या टीआरपी मध्ये तर पाचही मालिका झीमच्याच असतात.
झीमनेसुध्दा अगदी 27मे पासूनच भावोचजींच्या झिंगाटला नारळ देऊन बरोबर चार दिवस चला हवा येऊद्या चालू केल आहे.
इतक बिगबॉस चालत का.की मागच्यावेळी झीमला तसा अनुभव आला असेल?
मला बिचकुले बोअर होतो, एकतर
मला बिचकुले बोअर होतो, एकतर तो इसम तोंडातल्या तोंडात काय बोलतो तेच कळत नाही. त्याचा आवाज, उच्चार नीट पोचत नाहीत. त्यामुळे एकही एपिसोड पूर्ण बघितला नाही.
तेच लोकांना इरिटेट करणे, मुद्दाम पकवणे वगैरे.
बाकीचा वेळ मुली बिचकुलेवर ओरडत बसतात. दुसरं काहीच घडत नाही.
बिचुकले मला माबोवरच्या एका डुआयडीची प्रकर्षाने आठवण करुन देतो
नाईक, जोशी, पुणेकर , केळकर याना जिंकायची इच्छा दिसत नाही. जातील तितके दिवस काढून per day payment घ्यायचं इतकंच लक्ष्य दिसतं.
आता लवकर वाईल्ड कार्ड पाठवतील कदाचित.
उगीच बिचुकले वर हळुच ओरडत
उगीच बिचुकले वर हळुच ओरडत होता ते पाहून लहान मुलं आधीच मेलेल्या किड्याला नाहीतर सापाला उगीच " काय ले मालू का तुला" म्हणून काठीने मारायला जातात तसे वाटले! यालाच हाकला आधी. या आठवाड्यत एलिमिनेशन नाही असे दिसतंय बाकी.
<
हाहाहा , ग्रेट माइंड्स !
अगदी हेच म्हंटले मी मेलेल्या सापाला मारण्यात पुढे गर्दी गेल्यावर, टिपिकल तुपकट व्हाइट कॉलर लुजर !
बिचुकले , शिवानी , रुपाली यांचं श्री - सुरभि - दीपक सारखं होईल बहुदा या सिझनला.
जे भरपूर फुटेज घेतात, चॅनलला टिआरपी देतात त्य्वंचा फायदा करून मग तिसर्याचाच लाभ करून देणार चॅनल , क्लिन इमेज पर्सन, जसे मागच्या वेळी फेस ऑफ कलर्स दीपिका जिंकली काहीही न करता यावेळी आहेच फेस ऑफ कलर्स वीणा !
मला पराग, शिव, किशोरी आवडतील पुढे गेलेले ! बिचुकलेला दीपक सारखी मनी बॅग ऑफर !
काहीही नाही असच ती बोलतेय ना
काहीही नाही असच ती बोलतेय ना ?. तिला असं वाटण चुकीचच आहेच कारण बिग बॉस मध्ये प्लांनिंग प्लॉटिंग करायलाच आलेत लोक आणि काड्या करायला सुद्धा . तरी तेच करणाऱ्या शिवानी चा मात्र लोकांना राग येतोय आणि बिचकुलेला सपोर्ट .
बाकी हिंदी मध्ये पण मेघा धाडे याच कारणावरून त्या दीपक वर चिडलेली ना ? काड्या करणारा . इकडच्या गोष्टी तिकडे सांगणारा म्हणून? प्लस तिला मराठी ची विनर म्हणून तिला तो मान पण देत नव्हता उलट तिची खिल्ली उडवत होता म्हणून मराठीची विनर त्याच्यावर सॉल्लिड चिडली . शिव्या दिल्या . थुंकली
<<
मेघा दीपकचं हे भांडण मुळात थू है तुम्हारे विनर टायटल पे , इज शि अ विनर नंतर सुरु झालं, म्हणून ती म्हंटली रिस्पेक्ट नाही वगैरे.
अर्थात एक्स्ट्रिम लेव्हलला गेल्यावर काढलच चॅनलने.
बाकी शिवानी जे करतेय ते प्लॅनिंह प्लॉटींग वगैरे वाटत नाही ऑडीयन्सला, त्याला बुलिंग म्हणतात.
रुपालीने केलं त्याला टेक्निकली सेक्शुअल हरास्स्मेन्टही म्हणता येईल.
बिचुकले उलट अपशब्द नाही वालरत.
जो बिचुकले एंट्रीत कोणालाच आवडला नव्हता , तो या लो लेव्हल व्हॉयलेन्ट बायकांमुळे सोशल मिडीया किंग झालाय , ट्विटर वर अॅक्चुअली.
काल अनेकांनी जितेन्द्र जोशीला टॅग केलय, तो म्हंटला होताना आमच्या इंडस्ट्रीच्या मुली अशाच रस्त्यावर पडल्या नाहीयेत, त्या रिस्पेक्टेड आहेत, त्यांना ट्रोल करु नका.
हे वाक्यं जितुचे जितुला रिटर्न केलय पब्लिकने रुपाली शिवानी नेहा ची कामगिरी दाखवून
(No subject)
त्या बिचुकल्यांची गाणी पण
त्या बिचुकल्यांची गाणी पण आहेत म्हणे... म्हणजे त्यांचे अल्बम्स आहेत. अजून तरी बघितले नाहीत मी. भन्नाटच दिसतोय माणूस . ट्विटरवर मजबूत पाठिंबा मिळालाय त्याला , पण माझा ना त्याला ना पोरींना सपोर्ट . दोन्ही बाजू चुकीच्या आहेत.
हे वाक्यं जितुचे जितुला
हे वाक्यं जितुचे जितुला रिटर्न केलय पब्लिकने रुपाली शिवानी नेहा ची कामगिरी दाखवून >>> बेस्ट
शिवानी थुंकली का परागच्या
शिवानी थुंकली का परागच्या अंगावर ? तीने त्याला पाडायचा प्रयत्न केला आणी पाणी उडवले पण नंतर बहुतेक थुंकली ती
परागने आज केळकर वर comment
परागने आज केळकर वर comment उगाच केली.
बाकी attitude मस्त आहे त्याचा उरलेल्या जोकर्ससाठी.
हो.शिवानी थुंकली.कारण म्हणे
हो.शिवानी थुंकली.कारण म्हणे अस केल्यावर बिगबॉस तिला बाहेर काढतील.तिला म्हणे या मूर्ख लोकांसोबत राहायच नाही.
हिला काय बिगबॉसचा फॉर्मँट माहित नाही आवडत.
आज परागही नाही आवडला.आस्तादची आठवण झाली.त्याला वैशालीच्या टीममध्ये राहायच नाही बहुतेक.
आज बिचकुलेपण कँप्टनउमेदवारीच्या वेळी अति करत होते.मेजॉरिटी नेहाला होती.मग कशाला ताणायच?
ट्विटरच्या माहितीवरून कँप्टन शिव झाला आहे.
शिवानी थुंकली.कारण म्हणे अस
शिवानी थुंकली.कारण म्हणे अस केल्यावर बिगबॉस तिला बाहेर काढतील. >> एवढ्या लवकर हा ड्रामा?!
ती बिबॉ च्या त्या सिक्रेट रूम (एकांतवास) ड्रामा साठी पर्फेक्ट कँडीडेट वाटत आहे मला.
पाठीमागे बोलू नका ? बिबॉ मधे
पाठीमागे बोलू नका ? बिबॉ मधे असे म्हणणे इज अ जोक!! Happy त्या बायांना फूटेज हवंय, बिचुकलेला कॉर्नर करायचेय पण भांडायला पॉइन्ट च सापडत नाहीत कारण तो काही निगेटिव बोलत पण नाही!>>>+१
बिचुकले रॉक्स! त्याचा सगळ्यात मोठा व बिबॉमधे त्याच्या फायद्यात जाणारा पॉईन्ट म्हणजे त्याचा स्वभाव, एकदम जेन्युईन आहे तो...जसा बाहेर तसाच घरात! आणि त्यामुळे घरातल्यांना वात आणून भंजाळून सोडतोय तो...या सगळ्यातून त्याचा झालाच तर फायदाच आहे नक्कीच..coz he has nothing to lose. अगदी शेवटपर्यंत राहील की नाही माहीत नाही पण सध्या तरी सगळ्यात एंटरटेन तोच करतोय....सो २-३ आठवडे तरी टिकेल.
ती वैशाली बिचुकलेना म्हणते
ती वैशाली बिचुकलेना म्हणते तुम्ही कॅमेराकडे बघून का रडता ? माझ्या कडे बघून रडा ना
आणि बिचुकले अचानक त्या केळकर सारखं खोट खॊट उमाळे येऊन रडायला लागतात . एकदम नाटकी . त्यातून ते नेहमीच कँमेराकडे बघून बोलत असतात आणि काय तोंडातल्या तोंडात बोलतात ते अजिबातच समजत नाही
शिवानी ने आता श्रीशांत ची स्ट्रॅटेजी सुरु केलेय मला इथे राहायचा नाहीये . बिग बॉस मला घराबाहेर काढा म्हणून ती बिग बोस ला सांगतेय. राहायचं तिला शेवटपर्यंत . नाटक सगळी . म्हणजे स्ट्रॅटेजी
आणि बिचुकले अचानक त्या केळकर
आणि बिचुकले अचानक त्या केळकर सारखं खोट खॊट उमाळे येऊन रडायला लागतात . एकदम नाटकी . त्यातून ते नेहमीच कँमेराकडे बघून बोलत असतात >>
आधी शिव बोलला की तुम्ही तिकडे कैमरा कडे बघुन रडू नका...एकदम फ़िसकन हसूच आलं मला पण आणि बिचुकले ला पण
AB खोट खोट रडत होता..मी एवढं समाज कारण करतो तरी लोक मला का निवडून देत नाहित.. हे सगळं होताना केळकर ला सांत्वन करताना फार हसू येत होत...
आज चा भाग म्हणजे आपली दर्दभरी
आज चा भाग म्हणजे आपली दर्दभरी कहानि सुनो असाच होता..आधी बळच शिवानी नाईक ला आपण कसे मोठे झालो..खायचे वांदे न ऑल सांगत बसली..जे नाईक ला अजिबात interest नव्हता..किंवा तिला फुटेज मिळेल म्हणुन तिला आवरत घेत होता..पण ती काही करुन नॉन स्टॉप आपली कहाणि सांगत सुटली..मग केळकर बाबा..आणि वैशाली ताई नी फुटेज घेतला...एपिसोड संपता संपता नागिण बनी अक्काबाई..अस वाटल जेव्हा शिवानी AB ला येउन म्हणाली की तुम्ही खूप चांगले आहात..पराग केळकर ला त्याच्या बाबां वरून बोलला मला नाही आवडल.. त्यात पण AB ने शाल जोडीत दिलीच तिला..गोड आवाजात म्हणाला की तू पण मला किती काय काय नाही नाही ते बोललीस..मग आवाज बंद....खिचडी प्रकरणा वरुन बाप्पाने पण तिची शाळा घेतली तर त्याला कुजकाच आहेस तू अस म्हणाली..खरं तर शिवानी बाईंची तंतरली आहे..आता तिचा ड्रामा कोणालाच नको आहे.तर तिने मला जाऊ दया ना घरी चा गजर चालू केलाय..
बिचुकलेच शेवटच शिवानीला वाक्य
बिचुकलेच शेवटच शिवानीला वाक्य:"एक चांगला माणूस आयुष्यात काहीही होऊ शकतो, पण त्याच्यात Attitude नसावा.. तरी पण..
माझ्यात attitude आहे.. आणी,
माझ्यापेक्षा तुझ्यात जास्त Attitude आहे, म्हणून माझ्या नावाची बोंबाबोंब केलीस तू ..
आता आपण याला नाव देऊ.. सगळीकडे बोंबाबोंब ""

टाळ्या...
बीचुकले भारी खेळतोय. अभिजीत
बीचुकले भारी खेळतोय. अभिजीत सोबतचा रडण्याचा सीन सोडला तर बाकी स्ट्रटेजी वर्क झालेली वाटली त्याची आज.बाकी तो scene काहीही होता.काय तर म्हणे का निवडून देत नाहीत ही लोकं मला.पण माझं मत सध्या तरी बीचुकलेलाच...
Pages