Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02
प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
इथे चिलटं ( कोकणात केंबरं
इथे चिलटं ( कोकणात केंबरं म्हणतात) कशी घालवायची यावर कुणी कुठे उपाय लिहिलाय का? असेल तर लिंक प्लीज.
चिलटं घालवण्याचा एकच मार्ग
चिलटं घालवण्याचा एकच मार्ग
चिलटं बसतात अश्या गोष्टी(कापलेली फळं, भाज्या, सालं, बोरं, कापलेले कांदे, लिंबू) बंदिस्त किंवा झाकूनच ठेवणे.
अगं पण फारच झाली आहेत.
अगं पण फारच झाली आहेत. कंपोस्टवरही भरपूर आहेत. हे तू वर लिहिलेलं करते, पण ऑलरेडी असलेली चिलटं कुठेतरी ( आणि कुठेही) बसलेली असतात थव्याने. रात्री झोपत असावीत कारण आज सकाळी उठल्यावर स्वैपाकघरात गेले तर फारशी नव्हती. मी हुश्श केलं तर कसलं काय, थोड्या वेळाने उठली
ॲपल सायडर विनेगर आणि साबणाचं
ॲपल सायडर विनेगर आणि साबणाचं पाणी (लिक्विड सोप वाॅटर) एका वाटीत ठेवा. चिलटं त्यात आकर्षित होतात.
इथेच वर कोणीतरी प्लास्टिक
इथेच वर कोणीतरी प्लास्टिक पिशवीत पाणी आणि नाणे वाली टीप काम करते असं लिहिलंय ना?सोपा आहे प्रयोग, करून पाहा आणि सांग चालला का.
अॅपल सायडर व्हिनेगर आणि
अॅपल सायडर व्हिनेगर आणि लिक्विड सोपचा उपाय काम करतोय. आणि ते उंच बाटलीतच ठेवायला हवं. सरफेस एरिया जास्त मिळेल म्हणून मी आधी वाटीत ठेवलं, पण एकही चिलट त्यात पडलं नाही. बाटलीत ठेवल्यावर मात्र उपयोग होतो आहे.
आज पहाटे 5 ला खोलीत मोठी पाल
आज पहाटे 5 ला खोलीत मोठी पाल आली.एका हातात झाडू घेऊन तिच्यावर हिट मारलं.जरा जास्तच मारलं.ते पंख्यामुळे बरंच नाकात गेलं.थोडी खोकला, श्वास आणि उलटी सदृश परिस्थिती झाली.ती कुत्री आरामात गॅलरी च्या दाराच्या फटीतून गॅलरीत निघून गेली.आता तेथे फडकं लावलं आहे.
अमेझॉन वर पाल किलर सर्च केला.तर सगळ्यांच्या रिव्ह्यू मध्ये परिणामकारक नाही असंच होतं.तरी एक इन्फ्रारेड रिपेलांट आणणार आहे.
पालीची फूड चेन तोडायला पेस्ट कंट्रोल नुकताच केलाय.आता बाकी काही दिसत नाही पण पाली अधून मधून दिसतात आणि वाट लागते.
मला आता खूप राग येतोय.पाली घरात नसाव्या यासाठी जे लागेल ते मी करेन.
(कृपया पाली हारमलेस असतात, काही करत नाहीत, डास खातात सांगू नये.इतक्या चांगल्या असतात तर त्या ज्यांना आवडतात त्यांच्या घरी राहायला हवं त्यांनी.माझ्या घरी का येतात?)☺️☺️
कशावरून सकाळीच आली? काल
कशावरून सकाळीच आली? काल रात्री येऊन घरभर सर्व्हे केला असणार की इथे आसरा घेतला तर फूड काय मिळेल आणि लपायला जागा किती आहे? मग लास्ट पॉईंट की आपल्यला पाहून घरातले लोक कसे रिऍक्ट करतात म्हणून तुला पहायला पहाटे तुझ्या बेडरूममध्ये आली असणार
बाकी तुझ्या शेवटच्या मुद्द्याशी सहमत, ज्यांना पाल निरुपद्रवी आणि पर्यावरणाचा महत्वाचा भाग वाटते त्यांनी खुशाल आपल्या घरात पाळाव्यात, अगदी विविध आकार आणि रंगाच्या पाळून झु करून टाकावं :yuck:
पाल मायबोली वाचायला आली नसेल
:गंमत मोड ऑन:
किसकी सरकार
पाल मायबोली वाचायला आली नसेल कशावरून !
पाल वान्ट्स टू नो.... अब की बार
:गंमत मोड ऑफ:
---------
खरे पाहता घरातील पाल किंवा परिसरातील कावळे काय किंवा वारंवार एखाद्या वस्तीत दिसणारे घुबड काय.... सगळी निसर्ग साखळी आहे आणि मुख्य म्हणजे मानवी चूक / निसर्ग द्रोह आहे.
किचनमध्ये कॉकरोच संख्या मुबलक
किचनमध्ये कॉकरोच किंवा तत्सम बारीक कीटक संख्या मुबलक असेल तेव्हा ती कन्ट्रोल करायला पाल येते
उकिर्ड्यावर फार कचरा साचुन राहत असेल तर जैविक कचरा साफ़ करायला कावळे आणि ठराविक एरियामध्ये उंदीर घुशी ह्यांच्या प्रादुर्भाव वाढला असेल तर रात्रीच्या घुबड वारीचे प्रमाणसुद्धा वाढलेले आढळते.
त्यामुळे उपाय करायचे तर प्रश्नाच्या मुळाशी जावून करणे हेच नेहमी श्रेयस्कर !
@mi_anu , गॅलरीच्या दाराला
@mi_anu , गॅलरीच्या दाराला जाळी बसविणे शक्य आहे का ?
मला कोणी झुरळावर जालीम उपाय सांगा. पुर्वी इथे दिलेले करून झालेत. किचनची स्वच्छता ठेवली आहे. पण ट्रॉलीमध्ये लपून बसतात , अंडी घालतात. आम्च्या ट्रॉलीज रिमुव्हेबल नाहीत. त्या बदलून रिमुव्हेबल करणे हाच ऑप्शन उरलाय
अनु, माझे वडील वय 86, पाल
अनु, माझे वडील वय 86, पाल दिसली की तिच्यावर फडकं टाकून तिला फडक्यात धरून बाहेर सोडून देतात. परवा अशीच एक पाल आली म्हणून मी त्यांना बोलावलं पण त्यांच्या वयोमानामुळे पालीचा अन् त्यांचा रिस्पाॅन्स टाईम मॅच झाला नाही आणि पाल पळून गेली. हल्ली मी, एक डोळा मिटून आणि एका डोळ्यावर हात ठेवून "त्यांना" पाल पकडताना बघण्याइतकी धाडसी झाले आहे. आता हळूहळू शिकूनच घेणार आहे टेक्निक.
Harbal.paste control akrave
Harbal.paste control akrave dar saha mahinyani
म्यानु, जास्त हीट मारल्याने
म्यानु, जास्त हीट मारल्याने पालीची कुत्री झाली हे ऐकलं नव्हतं कधी.
केला होता ना हर्बल पेस्ट
सर्वांना आधाराबद्दल धन्यवाद. आपल्या आशीर्वादाने गॅलरीत शी करणारी मांजर गेली.
केला होता ना हर्बल पेस्ट कंट्रोल 1 महिन्यांपूर्वी.बाकी झुरळ वगैरे दिसत नाही.पण पाली आता दिसायला लागल्या.(डास चावत नाहीत याची श्रेय पालीला द्यावे का सिझन ला?अर्थात तरीही घरात पाल नॉट वर्थ.)
दारं खिडक्या सगळं बदलायला झालंय.जुनं घर आहे.एशियन पेंट च्या जाहिरातीत बिफोर वाला असतं तसं.
आता प्रोव्हायडर बदलून बघावा.
ते पाल येऊ नये म्हणून काहीतरी
ते पाल येऊ नये म्हणून काहीतरी लिहायचं असत ना भिंतीवर .. ते लिहून बघ .. मग ती कुत्री यायची नाही ..
शक्य असेल तर हिरांची केरसुणी (आम्ही त्याला खराटा किंवा भुतारा म्हणतो .. नारळाच्या झावळ्यांचे हीर काढून केलेली असते )त्याचा फटका जोरदार बसतो ,त्याने मार .
किंवा मग रोज तिला हाकलून दे असं ७-८ दिवस केल्यावर नाही येणार मग ती .. असा निदान माझा अनुभव
पाल दिसली की तिच्यावर फडकं टाकून तिला फडक्यात धरून बाहेर सोडून देतात>> बापरे ! धन्य आहेत !! _/\_
मला भीती नाही वाटत पालीची .. पण तरी फडक्यात पकडू नाही शकणार बहुतेक ..
मी व्हॅक्युम क्लिनर ची झाडू
मी व्हॅक्युम क्लिनर ची झाडू अटॅचमेन्ट काढून नळी तयार ठेवली होती.पण एका हातात झाडू दुसऱ्या हातात हिट घेतल्यावर तिसरा हात नव्हता व्हॅक्युम क्लिनर साठी. ☺️☺️
म्हणजे ? व्हॅक्युम क्लीनर
म्हणजे ? व्हॅक्युम क्लीनर च्या आत ओढून घेणार होतीस का ? ! नको करुस तसं व्याप होईल नुसता नंतर
आपण कितीही चिडलो तरी आपण ही
आपण कितीही चिडलो तरी आपण ही त्याच निसर्गाचा भाग आहोत आणि त्याच निसर्गावर अवलंबून आहोत (आवडो वा न आवडो, पटो वा न पटो वस्तुस्थिती)
सध्या आपण अशा जगात आ होत की डे टू डे केमिकलस ने कितीही भयानक रोग झाले तरी चालतील पण चकचकाट दिसला पाहिजे.
उदा. फिनेल ने जंतू मरतात , वास छान येतो असे का हींचे म्हणणे असते. १ पिढी मागे फिनेल न व्हते. मी गेले ५ वर्ष घरात फिनेल वापरलेले नाही, आम्ही इतर वापरणार्या शेजार्यांपेक्षा जा स्त आजारी पडत नाही हे खात्रीपूर्वक सांगू श कते.
फिनाईल चा लाईफ सायकल अॅनॅलिसस करून बघा. इन्ग्रेडियन्स आणि त्याच्या वापराने होणारे रोग बघा (अगदी गोमुत्र असलेले एका बाबाचे फिनाईल पण) - ते आपल्याला चालतात तर नुसत्या पाण्याने घर स्वच्छ करून थोडेफार जंतू का चालत नाहीत?
आपल्या पोटात, त्वचेवर किती बॅक्टेरिया असतात (उपयुक्त आणि त्रासदायक दोन्ही) ह्यावर डॉक्टरांशी चर्चा करून बघा.
(सेम गोष्ट इतर हाऊसहोल्ड केमिकल्स लाही लागू)
हे हिट वरून लिहले.
पर्यावरण ही काही बाहेरची ए न्टिटी नाही, आपण ज्यावर अवलंबून आहोत अशी गोष्ट आहे.
पालीबद्दल बोलायचं तर मला वैयक्तिक रित्या भयानक भीती आणि किळस वाटायची.. बियाँड व्हॉट आय कॅन डिस्क्राईब!
कार्यकारणभावावर विचार करून /मेडिटेट करून पाल आणि आपण एका घरात जगू शकतो ह्या स्टेज ला मी स्वतःला आणू शकलेय.
पाल का येते? फूड सोर्स आहे. (शहरात मुख्यत्वे झुरळं?) -> झुरळं का आली? आपल्या घरात त्यांच्या फूड सोर्स आहे आणि त्यांना निवारा आहे.
त्यांच्या फूड सोर्स काय आहे? पडलेले अन्न , उघडे राहिलेले अन्न , घरात येणारे पाईप्स (सिंकचे पाणी नेणारा वगैरे).
हे बायो इन्डिकेटर्स आहेत. जर तुम्ही यावर काम केलेत, तर झुरळे रहाणार नाहीत.
टॉ क्सिन फ्री लिविंगच्या सेशन मधे, त्यांनी छान सां गितलेले, जर घरात कुठलेच किडे, मुंग्या, इतर लिविंग ओर्गॅनिझम्स नसतील तर ते घर लि वेबल आहे का हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. ते जातात बिकॉज देअर इज टू मच टॉक्सिसिटी. पण मग तुमचं काय? तुमचं आणि त्यांचं शरीर सिमिलर घटकांपासू न बनलेलं आहे ना? (ऑफ्कॉर्स विथ सम डिफरन्स)
विचार करा. पटलच पाहिजे असे नाही.. पण एक व्यु पॉईंट मांडला.
वीक्ष्य ह्यांचा प्रतिसाद
वीक्ष्य ह्यांचा प्रतिसाद आत्ता वाचला..
अंजली कूल म्हणतात तो मंत्र
अंजली कूल म्हणतात तो मंत्र
'कांची नरेश राजा 'असा आहे.
खरं आहे.त्या हर्बल पेस्ट
खरं आहे.त्या हर्बल पेस्ट कंट्रोल ने गेल्या तर मलाही हिट वापरायचं नाहीये.
पण पाल अंधारात समोर येऊन हार्ट ऍटॅक येणे, अंगावर पडणे वगैरे प्रकारापेक्षा तिने मरणे किंवा बाहेर जाणे जास्त बरे.
बाकी सिंक इ.फूड चेन तोडायचे प्रयत्न चालू आहेत.
अंड्याची टरफलं ठेवली की पाली
अंड्याची टरफलं ठेवली की पाली येत नाहीत असं माबोवरच कुठे तरी वाचलं होतं. त्यांना वाटतं की अंड्याची टरफलं आहेत म्हणजे इथे पक्षी आहेत आणि पाली पक्ष्यांना घाबरतात बहुतेक.
)
( हा उपाय मी केलेला नाही कारण मी पालींना घाबरत नाही
पाल, मगर, साप अशा सरपटणाऱ्या
पाल, मगर, साप अशा सरपटणाऱ्या प्राण्यांचे अंड हे आवडते अन्न असते. त्यामुळे पाल अंड्याला घाबरण्यापेक्षा त्याकडे आकर्षित होत असावी. लहानपणी मी अंड्याला नेत्रप्रभाच्या बाटलीचे बूच चिकटवून आणि त्याला काळा-पिवळा वॉटरकलर देऊन पेंगूइन बनवला होता आणि शोकेसवर ठेवला होता. दुसऱ्या दिवशी त्याचा रंग पालीने चाटून पुसून साफ केला होता.
हर्बल पेस्ट कंट्रोल ने पाली
हर्बल पेस्ट कंट्रोल ने पाली काही दिवस गायब होतात, आमच्याकडे आहेत 1-2 पाली, पण आम्ही त्यांना ओळख देत नाही
मग त्यांना तो अपमान वाटतो आणि त्या कुठेतरी गायब होतात, काही दिवसांनी पून्हा दिसतात आणि हे चक्र चालू राहते
आमच्याकडे आहेत 1-2 पाली, >>
आमच्याकडे आहेत 1-2 पाली, >>>> बाप रे, हे माहीत असताना मी त्या घरात राहूच शकले नसते. क्वचित कधी टेरेसमधल्या बागेमुळे पाल घरात आलीच तर माझ्या डोळ्यासमोर तिची दुssssssर हकालपट्टी किंवा मृत्यू हे दोनच पर्याय असतात. मी पालीच्या आजूबाजूला राहूच शकत नाही.
गावाकडे दगड, मातीचं कौलारू घर
गावाकडे दगड, मातीचं कौलारू घर आहे . घरात मध्यभागी अंगण असते, अंगण संपल्यावर बैठक आणि मग बाहेरच अंगण, तर मधल्या अंगणात खूप पाली ,मुंगळे ,बेडूक दिसतात, माती असल्यामुळे.. त्यामुळे पुण्यात १-२ पाली। सहन करू शकते
पालीने पेंग्विन चाटून साफ
पालीने पेंग्विन चाटून साफ करणे हे अशक्य हहपुवा आहे ☺️☺️
@मी अनु
@मी अनु
पालीवर हिट मारल्याने ती कुत्री बनली हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. आता मी तरी पालीवर हिट मारणार नाही. मागच्या वेळी मांजराची कुत्री बनली यावेळी पालीची कुत्री बनली. इजा झाला बिजा झाला आता तिजा कोण??
:दिवे घ्या:
पालीने पेंग्विन चाटून साफ
पालीने पेंग्विन चाटून साफ करणे हे अशक्य हहपुवा आहे>> हो खरंच हहपुवा
त्यात पुन्हा "गोल्डफिश" ने "पेंगुईन" बनवला ,आणि त्याचा रंग "पालीने" चाटून खाल्ला ... भुईचर जलचर उभयचर सगळे प्राणी आले यात ..
गोल्डफिश
घ्याच !! माळच घ्या दिव्यांची
Pages