डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?

Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02

प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्‍या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आमच्या गावी खमंग भजी बनवून त्यात उंदीर मारायचे औषध टाकून ठेवले जात असे घराच्या कोपर्‍यात व वळचणीला. अगदी चारपाचच छोटी भजी बनवायची. हा उपाय घरात कुत्री, मांजरं व छोटी बालकं असतील तर मुळीच करू नये. >> अमेरिकेत बर्‍याच ठिकाणी असे उपाय करु नये असे सांगितले जाते. विषारी खाणे खाऊन मेलेले उंदीर, घुशी वगैरे खाल्ल्यामुळे हॉक्स व इतर पक्ष्यांना विषबाधा होउ शकते. पिंजरा किंवा स्टिकी पेपर ट्रॅप वापरावा असे सांगितले जाते.

त्या नालायक कुत्री साठी, जी मी पाळलेली नाही, तिच्यासाठी १९०० चा बॉक्स आणू? >>> Lol

कुत्री?? >> अहो मांजर म्हणालात ना ? >>> Lol

ती मांजर अत्यंत नालायक नीच कुत्री आहे >>> Lol

नाही अजून..... सगळे उपाय करून झाले...काही फरक पडत नाही..... त्याला आमची आणि आम्हाला त्याची सवय झाली आता

अरेरे! मी सुचवलेल्या धाग्याचा काहीच उपयोग झाला नाही वाटते.

उंदीर पकडायचा लाकडी पिंजरा हा उत्तम उपाय आहे. फक्त त्यात आमिष म्हणून सुक्या बोंबलाचा किंवा खाऱ्या माश्याचा तुकडा ठेवा. उंदीर हमखास पकडल्या जाईल. पण मग त्या उंदराला चार गल्ल्या सोडून लांब दूरवर सोडून या. मी सुरवातीला उंदराला समोरच्या फुटपाथवर सोडून यायचो, तर तो फिरून पुन्हा यायचा. तो उंदीरपण इतका मूर्ख होता ना, की त्याच पिंजऱ्यात त्याच आमिषाने त्याला तीन वेळा पकडले होते. तरी परत यायचा. शेवटी त्याला दूरवर सोडून आलो होतो. तेव्हा त्रास गेला.

पेपरमिंट तेल आणून विनेगार मध्ये पाच सहा थेंब एक १५ ओन्स च्या स्प्रे बॉटलमध्ये भरून मारा. उंदीराचा घुसमटून बाहेर पळतो आणि मरतो.

नाही अजून..... सगळे उपाय करून झाले..>>>>आमच्या घरात उंदीर आलाच तर चप्पल , केरसुणी/भुतारा /खराटा , काठी अशी सग्गळी आयुधं घेऊन आम्ही मारतो त्याला .. त्यासाठी बाकी सगळ्या वाटा बंद करून उंदराला कोंडीत पकडायचं .. मिळतो बरोब्बर मारायला .. हे अगदीच नाही जमलं तर

खाण्याच्या पदार्थात सुकं सिमेंट मिसळायचं .. उंदराने जर तो पदार्थ खाल्ला तर सिमेंट पोटात जाऊन घट्ट होतं .. आणि मग मरतो तो
बघा करून हे एकदा

तो एक खटकी असलेला चिमटा मिळतो ना
तो आणा. त्यात अडकून उंदीर मरतो मग मात्र तो मे उं चिमट्यातून सोडवून, तो चिमटा धुवून घ्यावा लागतो. तसाच वापरल्यास पुढचा उंदीर त्यात लावलेले बेट खायला येत नाही.

जाऊ द्या,
आता त्या मांत्री साठी एक दो खड्डो का शौचालय बनवून घ्या. स्वच्छ भारत सुंदर भारत. वाटल्यास उद्घाटनाला जवळपासचे प्राणीप्रेमी बोलवा.
पुढेमागे प्राण्यांचे सुलभ शौचालय पण काढता येईल जोडधंदा म्हणून.

नाही अजून..... सगळे उपाय करून झाले..>> अरे हो कि mi_anu तुमची मांजर कम कुत्री Ashwini_९९९ कडे पाठवा ना ! कित्ती सोप्पंय दोघींच्या डोक्याचा ताप एक दिवसात गायब ! Wink

पुढेमागे प्राण्यांचे सुलभ शौचालय पण काढता येईल जोडधंदा म्हणून.>> त्या आधी मग प्राण्यांना थोडी अक्षर ओळख व्हावी याचा पण क्लास चालू करता येईल .. म्हणजे मग "सुलभ शौचालय" स्त्रीयांसाठी / पुरुषांसाठी " हे वाचता पण येईल Wink

हो.मांजर आणि उंदीर यांची भेट घडवून आणता येईल.शिवाय मी मांजर कन्सल्टंसी फी पण घेईन ☺️☺️
मांजर शौचालय काढता येईल.पण फी म्हणून काय घेऊ?उंदीर का मेलेलं कबुतर?

आजकाल प्राण्यांचे केशकर्तनालय,हाॅस्टेल, हाॅटेल अशा नवलाईचे प्रकार निघाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर एक छोटासा सल्ला होता.
प्राणी मालक आपले आपले प्राणी प्राॅयर अपाॅईंटमेंट घेऊन येतील शीशी करायला.
लगे हातो मालकांचा ही वेळ सत्कारणी लावायला त्याच्या साठीही हाॅरीझोंटल डिप्लाॅयमेंट करू शकतो.
माझा सल्ला पेटंट करायला काय करावे लागेल? Rofl

शेवटी एकदाचा उंदीर सापडला... मेलेला.....आत्ताच त्याला घराबाहेर टाकून आलो....नेहमीप्रमाणे नवऱ्याने आणि मुलीने भरपूर गोंधळ घातला....जिवंत उंदीर काय मारेल अश्या उड्या दोघं मारत होते.....शेवटी मी आणि मुलाने मिळून तो शोधला आणि लांब फेकून आलो....

शेवटी एकदाचा उंदीर सापडला... मेलेला.....आत्ताच त्याला घराबाहेर टाकून आलो....नेहमीप्रमाणे नवऱ्याने आणि मुलीने भरपूर गोंधळ घातला....जिवंत उंदीर काय मारेल अश्या उड्या दोघं मारत होते.....शेवटी मी आणि मुलाने मिळून तो शोधला आणि लांब फेकून आलो....

२००.

धाग्याचे टायटल वाचून उगंच उत्तर म्हणून

सामोसे
चटणी
इन्व्हेस्ट
लोणचे

असली उत्तरे लिहावीशी वाटतात मला.

पाली, डास, झुरळे, उंदीर कधी घरात येत नाहीत.
मुंग्या आल्या तर प्रथम घराचा तो भाग काळजी पूर्वक तपासून जिथे जास मुंग्या दिसतील, तिथे मुंगी नाशक स्प्रे माराञचा. स्वैपाकघर किंवा डायनिंग रूम सोडून इतरत्र कुठेहि खायचे नाही. पाहुणे आल्यावर गच्चीत किंवा इतरत्र खाणे झाल्यास पाहुणे गेल्यावर लगेच स्वच्छता करावी.

पण घराभोवतीच्या भागात, मोल्स (घुशी) बिळे करतात, भाजी लावली तर ससे, हरणे खाऊन टाकतात.

माझ्या मैत्रीणीच्या घरी झुरळांची प्रचंड मोठी वस्ती होती... दिवसा पण ते इकडुन तिकडे विहरत असायचे
तिच्या अनुभवा नुसार हिट मारुन फारसा फरक पडला नाही..
मग त्यांनी हर्बल पेस्ट कन्ट्रोल केले , ४-५ दिवसात सगळीकडे कच्र्यात धूळ सापडावी त्याप्रमाणे झुरळांची भरपूर प्रेते सापडली, झुरळे दिसणे कमी झाले आणि १५ दिवसांत सम्पूर्ण निर्मूलन !! झुरळमुक्ती मिळाली तिला Happy

कुत्री उर्फ शी करणाऱ्या मांजराचा अपडेट:
ती आता शी करत नाही.बहुतेक दीक्षित डायट करत असेल.पण एका जाळी च्या लॉंद्री बॅग मध्ये कंपोस्ट असतं ती बॅग तिने बाजूने 5 इंच भगदाड पाडून खराब केलीय.त्यात थोबाड घालून स्टार्टर उर्फ गोगलगाय आणि किडे खाते.कंपोस्ट सांडते.मग त्या भगदाडात पेपर कोंबून ठेवावा लागतो.आता ती बॅग बदलून कार ग्रेड मेटल चा झाकण कंपोस्ट बिन घ्यायचाय.कुत्रीला मेटल बिन चे झाकण उघडता येणार नाही.

Pages