डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?

Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02

प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्‍या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बोके शी नाही करत का?
दोघांनी एकत्र शेजारी शेजारी बसून विधी उरकले तर काय करु?

गुड आयड्या
शहाणीला त्या टाइल्स च्या आजूबाजूला मातीच माती आणि कुंड्या आहेत त्या दिसल्या नाहीत का?

त्या जागेवर चिकटपट्टी उलट बाजूने ठेवा .. म्हणजे चिकट बाजू वर येईल अश्या पद्धतीने .. मांजरांना ते आवडत नाही असा विडिओ मी तुनळी वर पाहिला होता
असे ४ ५ वेळा करून बघा ..
किंवा त्या जागी पाणी ओतून ठेवा फरशीवर ... मांजरांना ओलं आवडत नाही ..

सही.चिकटपट्टी पूर्ण टाइल्स वर नाही ठेवता येणार.साधारण ६ फूट बाय ३ फूट एरिया.
पाणी रात्री ओतून बघते.पण तिला काही फरक पडलेला दिसत नाहीये.रात्रभर पाउस, ओली फरशी असूनही कार्यक्रम केलेलाच होता.एकदा पहाटे वॉच ठेवून पेकाटात लाथ घालावी लागणार आहे.

पण चिकटपट्टीला नको ते चिकटलं तर काय करणार Lol
पाण्याचा उपाय सोपा आहे, पण रात्रीतून वाळून जाईल पाणी. पहाटे गजर लावून पाणी ओतायचं मग Lol
आमच्या दाराबाहेर पॅसेजमध्ये एक वटवाघूळ येऊन शी करून जायचं. मग रात्री झोपण्यापूर्वी तिथे बेगॉन स्प्रे मारायचो. सलग 3/4 दिवस असं केल्यावर मग ते यायचं थांबलं. पण हा उपाय मांजराला लागू पडेल असं नाही.

साधारण ६ फूट बाय ३ फूट एरिया>> या आकाराची लाकडी फ्रेम बनवा सहज शक्य असेल तर .. आणि त्याला मधेमधे चिकटपट्यांची जाळी बनवा आडवी उभी random पद्धतीने... ग्रीड लेआऊट सारखं ..

पाण्याचा उपाय सोपा आहे, पण रात्रीतून वाळून जाईल पाणी>>>> नाही पण भरपूर ओतायचं चांगल थबथबीत
पण चिकटपट्टीला नको ते चिकटलं तर काय करणार>> नाही ते काय डायरेक्ट येऊन बसणार नाही पायाला जरा जरी चिकटपट्टीचा स्पर्श झाला तरी मांजराला ते आवडत नाही सो ते पुढे जाणारच नाही

चांगली ईंडस्ट्री ग्रेड टेप आणते>> ती रुंद असते पार्सल च्या बॉक्स ना लावलेली तसली आणा म्हणजे एरिया जास्त कव्हर होईल

त्या नालायक कुत्री साठी, जी मी पाळलेली नाही, तिच्यासाठी १९०० चा बॉक्स आणू?
नवीन Submitted by mi_anu on 6 July, 2018 - 19:16
कुत्री?? >> अहो मांजर म्हणालात ना ?
नवीन Submitted by anjali_kool on 6 July, 2018 - 19:17
>>
Rofl

अवांतर : यावरून लबाड कोल्हा हि गोष्ट आठवली
एक कोल्हा एका आज्जीच्या अंगण्यातली बोरं खायला जायचा रात्री /पहाटे आणि शिवाय शी करून जायचा ..
आजी बघते बघते आणि एक दिवस लोखंडी तवा चांगला चरचरीत तापवून ठेवते ..
कोल्होबा आपला कार्यक्रम करण्यासाठी बसणार ... तेवढ्यात जोरात चटका बसतो आणि तो कुई कुई करत पळून जातो

येस, मांजरं काकडी, झुकिनी असल्या लंबु़ळक्या चिझांना पार घाबरून टाण्ण्कन उडी मारायचे व्हिडू लय आहेत यूट्यूबवर... हा सोपा उपाय आहे... करून पाहा अनु (आणि हो, नंतर त्या काकड्यांत जीव न गुंतवता त्या फेकून दे; मांजरीनं पॉटी केलेली नसेल तरीही...)

असल्या घाबरण्यामागे नक्की काय कारण असेल पण?

ब्लिचिंग पावडर पेरून किंवा फिनेल शिंपडून ठेवलं तरी मांजरं, कुत्रे (संदर्भ: मांजर नालायक नीच कुत्री आहे Wink ) तिथे घाण करत नाहीत असं वाचलंय.
कुत्रे नक्कीच करत नाहीत कारण मी अंगणात अशी ब्लिचींग पावडर पेरून ठेवायचे एक कुत्रा रोज रात्री घाण करुन जायचा त्यावर उपाय म्हणून. आणि खरंच नंतर तो यायचा/घाण करायचा बंद झाला.

देवा!

२-४ दिवस सकाळी लवकर उठा, अन मांजरीला लाकूड फेकून मारा. दोन चारवेळा पेकाटात बसली की परत येणार नाही.

इतका सोपा इलाज कुणीच कसा सांगितला नाही? 106.gif

अवांतर:- गेल्या सहा महिन्यांपासून All-out all night डासांसाठी वापरते आहे, अजिबात डास राहत नाहीत आणि स्प्रे चा जो असह्य गुदमरवणारा वास असतो तो नाहीये. झोपायच्या 15 min आधी बेडरूम्स मध्ये स्प्रे मारुन, दार लावून घेते. आणि मग 15 मिनिटांनी झोपायला जाते.

डॉ साहेब, ती पहाटे केव्हातरी येते.आम्ही निशाचर प्राणी.पहाटे झोपेत मागचं दार उघडून लाकूड मरेपर्यंत तिची शी पूर्ण होऊन ती पळून गेली असेल.
आज फिनेल मिश्रित पाणी टाकलं आहे.काकडी ठेवली आहे.उद्या सकाळी क्लास आहे त्याला जाताना कामवाल्या मावशीना फोन करून धबाधब चालत बाहेर जाऊन बादली घेऊ नका, फिनेल चं निसरडं पाणी आहे असं सांगावं लागेल.

Pages