डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?

Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02

प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्‍या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ती मांजर अत्यंत नालायक नीच कुत्री आहे >> Lol
आमच्या दुसर्‍या मजल्याच्या जिन्यावर ४ ते ५ मांजरी असायच्या नेहमीच.
पहिल्या मजल्यावर नाहीत की तिसर्‍यावरही नाहीत. त्यांना आमच्याच मजल्यावार काही अतिप्रेमी लोकांनी जागा दिली होती.
रोज त्या मिळुन जिन्यावर, जिन्याच्या पॅसेजमधे घाण करायच्या. चालताना मुश्किल आणि वर दुर्गंधी.
शिवाय खायला जो काही माशांचा कचरा आणायच्या तो ही अर्धवट तिथेच.
कुणी काही बोलायचं नाही.
त्या दिवशी सोसायटीच्या अध्यक्षांना खडसावुन कंप्लेंट करायला लावली.
लगेच मांजरांना पकडुन नेले.

रात्री झोपायच्या आधी तिथे जुनं वर्तमानपत्र पसरवून ठेवा. तिला कदाचित ते आवडणार नाही. आणि तिने शी केलीच तरी तुम्हाला ती कागदासकट फेकून देता येईल. धुण्याचे कष्ट थोडे कमी होतील.

त्या orange tiles तिला लाल मातीच वाटत नसेल ना?

एखादा जुना फोन असेल तर झिप लाॅक मध्ये घालुन १०/१५ भितीदायक आवाजाचे अलार्म लावुन ठेवा. असे सलग आठवडाभर करा. बघा फायदा होतोय का!

मी अनु,
नशीब तुमच्या ओटीवर ती ,मांजर शी करून जाते.आमच्याकडे काळ्या मांजरांची जोडी होती.त्यातली मांजर गॅस खाली शी करून ठेवायची.ऑफिस मधून येऊन चहा करायच्या आधी ती घाण काढायची.नंतर चहा प्यायची इच्छा मरायची.एकदा माझ्या भावाने माझे करवादने ऐकून थांब मी करतो अरु नकोस तिला म्हणून काढले.उलटी करायचा राहिला.नंतर माhiत नाही पण आमच्या गल्लीतील मांजरे eकदम कमी होऊ लागली,त्यात हे दोघे होते.

पेपर चे पण बरे वाटतेय.जरा उद्योग होईल पण वर्थ इट.
रोझवूड किंवा सिट्रॉनेला शिंपडून ठेवता येईल पण तो अत्तर दिवे किंवा 1 चमचा अश्रू टाकून पाणी शुद्धीकरण सारखाच उपद्व्याप होईल ☺️☺️

गॅस खाली शी हे फारच यक आहे.मला लहानपणी मांजरी आवडायच्या पण आता हे उद्योग पाहिल्यावर लाथा माराव्या वाटतात.त्यात मुलीने अनेकदा मांजरीशी तिला नको असताना सलगी करू नको बजावून पण जिंजार नावाच्या मांजरीला (ही ती शी करणारी नाही, दुसरी) उचललेले आणि आता नुकतेच तिने खोल पंजा मारून 5 रॅबीप्युर चा कोर्स पूर्ण केलाय.

मी रोज रात्री पेपर पसरते. सकाळच्या घाईत उचलते.कधीकधी ओले असतात, व्याप होतो.पण उपाय काम करतो.
मांजरीने तिथे शी करणे सोडलेय, आता डायरेक्ट ड्राय बाल्कनी च्या नळाजवळच्या मोरीत शी करते.ती नळाने धुता येते.
यापुढची स्टेप मोरीत पण पेपर पसरणे करावी लागणार आहे. Happy

काल पेपर टाकायला विसरले तरी आज पहाटे मांजरीने शी केलेली नव्हती. >>> तिथे शी करायची सवय मोडली असावी तिची.

undir ghusala ahe gharat ... pinjara thevun baghitala ..kahi upyog nahi.. konakade kahi upay asalyas pl sanga.

https://www.maayboli.com/node/44433

@ Ashvini_९९९, वरील धागा वाचा. काहीतरी उपाय नक्की सापडेल. (सूचना : धागा वाचताना हसून हसून मुरकुंडी वळल्यास त्याला आम्ही जबाबदार असणार नाही)

Sticky trap मिळतो...त्याचा उपयोग होतो का?
<<
हो. उपयोग होतो. पण नंतर त्याला चिकटलेला जिवंत उंदीर घराबाहेर फेकणे/मारून फेकणे हे शौर्यकर्म करण्याची हिम्मत आहे का? तसे असेल तरच तो प्रकार करा.

आमच्या गावी खमंग भजी बनवून त्यात उंदीर मारायचे औषध टाकून ठेवले जात असे घराच्या कोपर्‍यात व वळचणीला. अगदी चारपाचच छोटी भजी बनवायची. हा उपाय घरात कुत्री, मांजरं व छोटी बालकं असतील तर मुळीच करू नये.

गिरिपुष्प् (उंदिरमारी) नावाची वनस्पती आहे. त्याची पाने पसरवुन पहा. प्रत्येक कोपर्यात. पण हि विषारी असतात.
इथे पहा..
https://abpmajha.abplive.in/maharashtra/kolhapur-rat-snake-enters-villag...

Pages