डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?

Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02

प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्‍या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अतुल पाटील ह्यांनी दिलेली लिंक विचित्र आहे...हे असले ग्ल्यू ट्रे वगैरे कोण वापरतं माहित नाही. पेटा वगैरे सारख्या संस्था चांगल्या रेस्क्यू टाईप्स कामांबरोबरच एक्स्ट्रीम फोटो टाकून भावना भडकावत डोनेशन्स जमवण्याची कामे करतात. ते सोडा.

मी वापरलेले स्टिकी पॅड्स लेडीज घड्याळाच्या डायलच्या आकाराचे छोटे छोटे पॅड्स होते. घराचे पेस्ट कंट्रोलचे कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपनीला दिले होते त्यांनीच ते ठेवले होते. असे काही पॅड्स पसरवून ठेवले की ते ऊंदीर वगैरेंच्या पायांना, सापाच्या अंगाला चिकटतात आणि ते पॅडसहित पळू शकत नाही. नंतर हातात ग्लव्ज घालून उंदरांचे पाय त्या स्टिकी पॅड्स पासून अलगद वेगळे करता येतात. काही ईजा होत नाही त्यांना म्हणूनच माझ्या आधीच्या प्रतिसादात 'जिओ ऑर जिने दो' साधता येते असे म्हणालो.
आपल्या घरातल्या पेट च्या पायांना हे पॅड चिकटल्यास ते काढण्यासाठी साधा साबणाच्या पाण्याचा स्प्रे पॅड्स वर मारा... आपोआप गळून पडतील असेही सांगितले होते.

DIY Mousetrap
असे बरेच आहेत यूट्यूब वर, योग्य वाटतील ते निवडता येतील.

करोना लॉकडाउन च्या आधी पेस्ट कंट्रोल करून घेतला होता.'ते काका इतक्या लांबून येऊन कणिक चिकटवून जातात तर आपणच घरातली कणिक चिकटवून पैसे काय वाचवत नाही?' असा मौलिक प्रश्न घरातल्या मुलीने विचारला आहे.(तेही डोक्यात आले होते, ग्रीन प्लस पेस्ट घरी आणली होती कणकेत मिसळून लावायला, पण कामवाल्या मावशिंकडे जास्त झुरळं झाली त्यांना दिली होती.

पेस्ट कंट्रोल केल्यावर बंद केलेल्या गॅलरीत पाल आली होती. ती पत्रे लावलेल्या गॅलरीत कशी आली यावर रिसर्च केला.स्पेशल चिकट पट्टीने तिचे सर्व एन्ट्री पॉईंट सील करणार आहे.हिट मारलं.मेली नाही.फक्त पत्र्याच्या वरच्या बाजूला जाऊन नाचत(फिरत) होती.मग तिला सोडून दिलं आणि दार लावून घेतलं.बिल्डर ने भंगार प्रतीची दारं दिल्याने हे खालून झिजलं आहे.तिथून पाल आत येऊ नये म्हणून दाराच्या उंबऱ्याला जुन्या बेडशीट ची घडी लावली आहे.आता ड्रॅकुला एन्ट्री थांबवायला लावतात तसा क्रॉस आणि लसणीच्या माळा इतकंच राहिलंय(लसूण महाग आहे फार.)

महत्वाचा अपडेट: मोर पीस पण लावलं होतं.तिला काहीही फरक पडला नाही.शेजारून गेली.रातआंधळी असेल.

हर्बल पेस्ट कंट्रोल आम्ही आमच्या घरी केलं, 99.90℅झुरळं गायब झाली.. चांगला result मिळाला

त्याच सर्विस provider कडून मैत्रिणीने तिच्या फ्लॅट मध्ये करून घेतलं.तिला फारसा चांगला result नाही मिळाला. सगळी झुरळं निवांत होती.

असं का बरं झालं असेल?

(तिचा फ्लॅट fully furnished आहे,आमचा नाही)

ओह वासावर पण असते का?मला वाटलं साप किंवा पक्ष्यासारखा लूक इतकाच फरक.
रबर चा खरा दिसणारा तपकिरी साप भिंतीवर चिकटवला तर घाबरेल का पाल?(एकदम सच्चाई ने विचारतेय प्रश्न, गंमत म्हणून नव्हे.)

Fully furnished flat म्हणजे लपाछपी खेळायला भरपुर जागा. मग कसा पडेल फरक??

गेल्या उन्हाळ्यात अडीच पाली मारल्या, दोन मोठ्या आणि एक शिशुपाल. हिट स्प्रे चा चांगला उपयोग झाला. परंतू पालीवर स्प्रे मारताना स्वतःचे नाक व तोंड स्कार्फ ने नीट झाकून घ्यावे. आता उन्हाळा सुरू झाल्याने पुन्हा पालीचे टेंशन.. !

रबर चा खरा दिसणारा तपकिरी साप भिंतीवर चिकटवला तर घाबरेल का पाल?>>>
एवढे सगळे प्राणी येतात तुमच्या घरी तर एक खरा साप आणायला काय हरकत आहे??

झालं.म्हणजे साप घरी आला की हिट किंवा झाडू पण मारता येणार नाही.स्वतःच आयुष्यभर टेबल, बेड आणि खुरच्यांवरून चालावं लागेल.पालीला 500 रु च्या हिट ने काम होतं.नीट वापरलं तर पर पाल 10 रु मध्ये भागतं

थोडा करोना पासून बदल: पाल अपडेट.
पेस्ट कंट्रोल आणि फिनेल च्या पाण्याने गॅलरी धुतल्यावर एक पाल होती.ती बेडरूममध्ये आल्याने नवऱ्याने मारली.
योगायोगाने परवा त्याच जागी(गॅलरीच्या झिजलेल्या दारातून आत उंबरठ्याजवळ अजून एक जायंट पाल दिसली.नवऱ्याने तीही मारली.
या सर्व पाली बहुतेक आमच्या बरोबर शांततेत जगत असाव्या.पेस्ट कंट्रोल नंतर वासाने बाहेर पडून जीवाला मुकल्या.
प्रदर्शनात पाल रिपेलर डिव्हाईस मिळतात गोल डबी सारखे.कसे काम करतात माहीत नाही, पण 4 आणले होते.त्यातला एक बेडरूम च्या दारामागे आहे. अजून पाल त्या बाजूला आलेली नाही.म्हणजे डिव्हाईस ला संशयाचा फायदा देता येईल.लॉक डाऊन संपला की अमेझॉन वरून युव्ही रेज वाला पाल रिपेलर पण मागावेन.पाली मरण्यापेक्षा त्या बाहेर जाणे त्यांनाही आवडेल.

@अनु, तुमच्या राशीला हे प्राण्यांचे त्रास का जास्त येतात?
कोई पुराने जन्म की दुष्मनी?
मागे ती स्वच्छ भारत सुंदर भारत वाली मांजर होती. नंतर पाली?
कुठली शांती बाकी आहे का? Rofl

पाल म्हणजे बाबो. परवा बाथरूमच्या काचा धुण्याची सुरसुरी आली म्हणून जोशात उतरत्या काचांवरून पाणी ओतत होते तर खत्तरनाक अनुभव आला. काचेपलीकडे जाळीवर मोठ्ठी काळी पाल होती, तिला माझा जोश सहन झाला नाही.. बदकन् आली खाली.. मग माझ्यातआणि तिच्यात सुरक्षित अंतर ठेवून एकीकडे बाथरूमच्या दाराशी गेले नि हाकाटी सुरू केली. Lol

बादवे, सध्या चिलटं भारीच त्रास देत आहेत. तेलकट कागद वगैरे टांगून काही उपयोग होतो का? खरंतर उन्हाळ्यात नसतात चिलटं आमच्याकडे. ह्यावेळी कशी काय आली कुणास ठाऊक.

पालींची मलाही फार भीती वाटते पण मारणे जीवावर (?) येते.
एकदा एक पाल बेसिन मध्ये पडली होती व तिला काही केल्या तिथुन भींतीवर चढता येत नव्हते. आयुष्यात पहिल्यांदी पाल पकडली. हातात प्लास्टीकच्या पिशव्या घातल्या आणि पक डुन घराबाहेर सोडुन दिले. काल परवाच एक पाल जमिनीवर सरपटत होती व सकाळी बाथरुममध्ये पुन्हा जमिनीवर पसरली होती. पुन्हा तोच प्रयोग केला व गच्चीवर सोडुन आलो. आता पुन्हा एक पाल घरभर पुन्हा जमिनीवर फिरताना दिसते आहे. प्रश्न पडलाय कि गच्चीवर सोडलेली पालच परत घरी परतली कि ही दुसरी पाल आहे. पण पाल पकडण्याआधी मनाची फार तयारी करावी लागते. एकवेळ विषारी सापाला पकडेन पण पाल नको असे होते.

कालच रात्री घरात पालीने प्रकट होऊन दर्शन दिले. मग साधारणपणे दहा मिनिटे थयथयाट आणि धावाधाव करून झाल्यावर एकदाची तिला बाहेर घालवली. एवढं कमी होतं म्हणून की काय रात्री पालीचं स्वप्नही पडलं...
त्या फियर फॅक्टर मध्ये लोकांना घरात आलेल्या पाली पळवून लावायचे टास्क दिले पाहिजेत.

मला समहाऊ पालींची अजिबात भीती वाटत नाही. मी पाल, शिशुपाल, सर्व किडे हे हातात उचलुन बाहेर टाकते. सिंगापुरात उदंड पाली आहेत. त्यामुळे महिन्यातुन 1/2दा तरी पाल उचलायची वेळ येतेच!! बाकी लिंबाच्या झाडावरच्या अळ्या घरात आणून त्यांची फुलपाखरे होईपर्यंत पैदास करणे, फिशटॅन्कचे मासे आणि हॅमस्टरचे दाणापाणी पण!! पण पण मोठी झुरळं बघितली कि मात्र माझी ततपप होते. हा एकच किटक आहे जो मी नक्की मारते किंवा कोणाला तरी मारायला लावते. त्यांना जीवदान नाही. बाकी सब चलता है.

@ आभा, कृपया हलके घ्या, तुम्ही सिंगापूर चा उल्लेख केला त्यातच सारे आले. तुम्ही सर्वभक्षी देशाच्या प्रवेशद्वारात आहात हेच तुमचे रणरागिणी असण्याचे कारण असावे.

Pages