डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?

Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02

प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्‍या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पालीने पेंग्विन चाटून साफ करणे हे अशक्य हहपुवा आहे>> Happy Happy मी नेहमीच दिवे घेतो. हा प्रयोग परत करायचा विचार आहे मग आपण डिक्लर करू शकू कि पाल अंड्याला घाबरते कि आकर्षित होते. पण सध्या घरात पाल नाही आणि नेत्रप्रभा सुद्धा Happy

मला सुद्धा घरात पाल असेल तर कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामुळे पूर्वी यावर नेटवर शोधले होते. त्यात हे उपाय कॉमन दिसून आले.

१. मॉथबॉल/डांबरगोळी/नॅप्थॅलीनबॉल: या विविध नावानी ज्या पांढऱ्या गोळ्या दुकानांत मिळतात त्यांच्या वासामुळे पाली जवळपास येत नाहीत.

२. लसूणच्या पाकळ्या: यांच्या उग्र वासामुळे पाली पळून जातात.

३. पेप्पर स्प्रे: याचा तिखटपणा अत्यंत दाहक व झोंबणारा असल्याने पाली दूर राहतात.

४. अंड्याचे कवच: हे मी करून पाहिले आहे. अंड्याचे अखंड कवच किंवा दोन भाग करून पालींचा वावर असेल तिथे ठेवणे. पाली याच्या जवळपास फिरकत नाहीत. परिणामकारक होण्यासाठी दर चार-आठ दिवसाला बदलावी.

५. मोराची पिसे: पालींचा वावर असेल तिथे मोरपिसे लावणे. पाली त्या 'डोळ्या'तील रंगाना घाबरून जवळपास फिरकत नाहीत

६. कॉफी पावडर आणि तंबाकू याचे मिश्रण पालींकरिता विषारी असते असे सुद्धा अनेक ठिकाणी लिहिले आहे.

खिडक्या/दरवाजे जिथून पाल येण्याची अधिक शक्यता असते तिथे वरील उपाय करून पहा.

याशिवाय:

१. खिडक्या/दरवाजे बंद करून सुद्धा फटी/भोकं राहत असतील तर त्यावर सर्वात आधी उपाय करा. अशा जागेंतून रात्री बेरात्री पाल/कीटक वगैरे हमखास येतातच.

२. घराच्या आसपास साचलेले पाणी हटवणे. या पाण्यामुळे कीटक/डांस होतात. तसेच पालींना सुद्धा अंडी घालण्यासाठी अशा जागा सुरक्षित वाटतात.

३. अंधारलेली, कोंदट, बराच काळ मानवी वावर न झालेली, अडगळीची जागा पालींना सुरक्षित वाटते. अशा जागा घरात/आसपास शक्यतो राहू नयेत असे बघा. अधूनमधून सर्वत्र झाडू फिरेल असे पहा.

४. मांजर पाळा. मांजर पाल खात नाही. पण मांजराचा वावर असेल तर त्या भागात पालींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते असे एका वेबसाईटवर लिहिल्याचे आठवते.

५. उबदार जागेत पालींचा वावर जास्त असतो. थंड पाणी/हवा हे पालीना मानवत नाही. घरात आलेल्या पालीवर फ्रीजमधले थंड पाणी फेकल्यास ती बधीर होऊन पडते.

Technical answer :
egg shell contain sulphur which is harmful to lizard because the abdomen of lizards have pores and when it in contact with sulphur it will get dry or sometimes may burn .this sulphur also smells from birds beaks and lizard can odour sulphur so it also afraid of bird feathers
Source: doubtmania.wordpress.com

http://howlar.blogspot.com/2011/11/egg-shells-scares-lizards.html?m=1

मांजर पाळा. मांजर पाल खात नाही. पण मांजराचा वावर असेल तर त्या भागात पालींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते असे एका वेबसाईटवर लिहिल्याचे आठवते.>> भले शाब्बास!!! म्हणजे मागे कुत्री असेलेली मांजर येते तिला हाकलवायचे उपाय सांगून झाले आणि आता पुन्हा मांजर पाळायची !!.. Wink Wink

>> मागे कुत्री असेलेली मांजर येते तिला हाकलवायचे उपाय सांगून झाले आणि आता पुन्हा मांजर पाळायची !!

ओह्ह असे पण झालेय का या धाग्यात पूर्वी. तरीच. त्यांनी मांजर हाकलली त्यामुळेच पाली वाढल्या असतील Biggrin

मस्त टिपा मिळतायत इथे.
आता कुत्री झालेल्या मांजरीला परत शी करायला बोलावून मोबदला म्हणून कुत्री झालेली पाल पळवायला सांगते.
कोणाला मांजरनीज भाषा येते का इथे? ☺️

घरात आलेल्या पालीवर फ्रीजमधले थंड पाणी फेकल्यास ती बधीर होऊन पडते.<<<<<
Lol सध्या भयंकर उन्हाळ्यामुळे फ्रिजमधले थंड पाणी प्यायलाच पुरत नाही, तिथे पालीशी रंगपंचमी कोण खेळणार?

अनु, ते काहीतरी वाक्य लिहिले की पाली येत नाहीत म्हणे! (काहीतरी 'कांची नरद चा राजा') इतके त्यांना वाचता कसे येते देव जाणे?

आमच्या कडे आधीच गार पाणी संपवून बाटल्या न भरल्याबद्दल भांडणं होतात.त्यात अजून पालीला एक बाटली लागली म्हणजे झालंच.
श्रद्धा, मी भिंतीकडे बघत आता तोच विचार करते.घाण अक्षरात कांची नारद राजा लिहिलं तर पाल जाईलकी नाही जाणार?किंवा मिंगलीश मध्ये लिहिलं तर?
निजलेलं मांजर ☺️☺️माझ्या डोक्यात नीज माझ्या मांजरलाला वाजायला लागलं.

हिट नवाचं विष स्पेसिफिकली अर्थ्रोपोड्स प्रकारच्या प्राण्यांवर काम करतं. मुंग्यांपासून मच्छर, झुरळांपर्यंत. अगदी मधमाशी गांधीलमाशीपर्यंत. अन याचा परिणाम ऑल्मोस्ट इन्स्टन्ट असतो.

त्याच वेळी, याने माणसाला त्रास होत नाही. अर्थात, सस्तन प्राण्यांना.

त्याचप्रमाणे, सरिसृप वर्गातील प्राणी अर्थात पाल सरडे, साप इत्यादींवर काहीही परिणाम होत नाही.

हां.

पाली घरात येऊ नयेत म्हणून सर्व एन्ट्री मार्गां भोवती "लक्ष्मणरेषा" मारा. पाल यांना ओलांडताना मी तरी पहिली नाहिये.

अनु, ते काहीतरी वाक्य लिहिले की पाली येत नाहीत म्हणे! (काहीतरी 'कांची नरद चा राजा') इतके त्यांना वाचता कसे येते देव जाणे? >>> मराठीत लिहीलेलं तरी नाही वाचता येत, मी लिहीलेलं श्रीरामपुरच्या घरात. त्यावरुन पाली आरामात जायच्या Wink .

धमाला आहे धागा Lol

त्याच वेळी, याने माणसाला त्रास होत नाही. अर्थात, सस्तन प्राण्यांना.
>> are u sure? I personally know many human beings (yes, mammals) who suffered (asthma attack) due to hit.
Anu has also said she has suffered after using hit.

मे ते ऑगस्ट ह्या वेळात सहसा पाली घरात येतात. तो त्यांचा विणीचा काळ असतो बहुदा. घर स्वच्छ असले तर बाकीचे महिने पालींचा त्रास सहसा होत नाही. त्या सहसा घराच्या बाहेरच्या बजूला (सहसा पाइपच्या आडोशाने) वावरतात.

मोठ्या पाली बर्‍यापैकी हुशार असतात. त्या ठरावीक एरियातच वावरतात. आपली चाहुल लागली की निघून जातात. त्यामुळे सकाळी लौकर किंवा रात्री उशीरा उठायचे असल्यास त्यांना आपली चाहुल लागेल असे बघायचे - पाय आपटायचे, दार ठोकायचे इ. जेल-फिल ला त्ग्या भीक घालत नाहीत. त्यांना मारण्याचा एकमेव उपाय म्हणजे चप्पल. त्यांना उत्तम अभिनय येतो. त्यामुळे चप्पलेच्या एका तडाख्यात त्या मेल्याचे नाटक करतात पण आपण त्याला न बळी पडता चप्पलेचे प्रहार चालू ठेऊन त्यांचा बळी घ्यायचा. पण मग त्या नंतर होणारा राडा किळसवाणा असतो. त्यामुळे मी 'चाहुल' वाला उपाय निवडतो.

पालीची पिल्ले मात्र बिनडोक असतात. ती कुठेही येतात. मग त्यांना चपलेने मारणे हा एकमेव उपाय असतो.

मोठ्या पाली बर्‍यापैकी हुशार असतात.>>> असतीलही.आईकडे एक मोठी पाल आहे.आई म्हणाली ठराविक वेळेला ती बाहेर येते आणि चिक्चिक आवाज करते.संध्याकाळी पाणेसात ते सातदरम्यान गलेलठ्ठ पाल प्रकटते.हे मीही पाहिलं.आई म्हणाली जाऊ दे.पालीचा मला काही त्रास नाही,दारे उघडी असल्याने परत येणारच.आइकडे एकही झुरळ या १०वर्षांत पाहिले नाही.पण पाल आहे.पालीला मारण्यापेक्षा मला तिची सोबत होते असं पूर्वी आई म्हणत असे.

मला झुरळ, छोटे मोटे किटक, गोम वैगेरे यांची अजिबात भिती वाटत नाही ..घरात दिसले तर बाहेर सोडून येतो...मारत नाही..का जीव घ्यावा त्यांचा?? सत्यम शिवम सुंदरम म्हणतो ना आपण..
सगळ्यांत शीव आहे विद्रुप,विचित्र,घाणेरेडं,किळसंवाणं वाटणारे प्राणी, किटक ह्यातही तोच आहे..जसे आपण ह्या पर्यावरणाचे घटक आहोत तेसुद्धा आहेत...भिती वाटते,किळसं वाटते म्हणून त्यांना मारणं चुकीचं आहे..मच्छरांना मात्र मारलचं पाहीजे कारण त्यांचा आपल्याला त्रास नंतर त्यांच्यामुळे आजार होऊ शकतो..

एकदा काही वर्षापूर्वी मी जेवण बनवत होतो..भात झाला होता..डाळीला फोडणी द्यायची होती म्हणून पातेलात तेल गरम करायला ठेवलं...मी जिरे मोहरी आणि फोडणीचा ऐवज टाकणार तोच का कशी कोण जाणे एकदम पालच त्यात पडली...अक्षरक्षः ती तळत होती...मी तर जाम घाबरलो..गॅस बंद करावा हेसुद्धा सुचलं नाही तेव्हा ..नंतर थोड्या वेळाने गॅस बंद करून पातेलासकट ती पाल बाहेर फेकून आलो...जेवायची तर इच्छाच झाली नाही त्यादिवशी...म्हणून हल्ली किचनमध्ये लक्ष्मणरेखा आखलेत ,मोरपिसे वैगेरे ठेवली आहेत... त्यामुळे पाल नाहीच येत आमच्याकडे.. झुरळे दिसतात कधी तर सोडून येतो..

आमच्याकडे खूप पाली आहेत. पण कोणतीतरी पुण्याई असेल की त्या हॉल सोडून इतर कोणत्याच खोलीत जात नाहीत. (हॉल मध्ये टीव्ही असल्याने त्या हॉल सोडून जात नाहीत असा आमचा संशय आहे Lol )

मुख्यतः पावसाळी किडे किंवा पंखवाल्या उडणाऱ्या मुंग्या आल्या की पटापट मुंग्या खातात आणि घर स्वच्छ ठेवतात. घरात पट्कन जाळी जळमटे लागत नाहीत.

पंखवाल्या मुंग्या नसताना त्या भिंतीवर फिरत राहतात पण खाली उतरत नाहीत. पिल्ले मात्र कधीतरी उतरतात त्यांना झाडूने केराच्या सुपात घेतो आणि न मारता घराबाहेर फेकून देतो. आम्ही त्यांना मारत किंवा हाकलत नाही कारण आम्हाला खरंच त्यांचा काहीही त्रास होत नाही.

फोडणीच्या वाफेने पालीची छतावरची व्हॅक्युम ग्रिप सुटली असेल>>>>>

हो बहुतेक असचं झालं असेल.....

Pages