डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?

Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02

प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्‍या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

"बुलबुल पाळा.. पाली टाळा..."

सालाबाद प्रमाणे यावेळीही आमच्याकडे बुलबुल दंपतीने घरटे बनवले.
यावेळी नेहमीप्रमाणे झाडावर घरटे बनवायच्या ऐवजी पक्षांचा एक जुना गोल पिंजरा बाल्कनीत टांगला होता आणि त्याच्यावर रानजाईचा वेल चढवला होता, त्यावरच या जोडप्याने घरटे बनवले....
आपल्या पिल्लांसाठी "बाल-पालीचा" खाऊ घेऊन आलेला बुलबुल...

आणि एका वेळी एक आख्खि शिशुपाल खाणारे हे बुलबुलाचे पिल्लू..
तीन आचक्यात ह्या पठ्ठ्याने संपूर्ण शिशुपाल गिळंकृत केली..

ह्यासाठी बुलबुल दांपत्याच्या पालीच्या शिकार मोहीमेदरम्यान घरातील सीलिंग फॅन एक्झोस वगैरे प्रकार सावधानी बाळगण्यासाठी बंद करणे गरजेचे आहे.

आमच्या खिड़क्यातून बुलबुल, चिमणी आत आली की लगेच स्विच ऑफ़ करायला धावपळ करावी लागते. अनेकदा हे पक्षी सवयीने तो हवेचा झोत टाळून शिताफीने आपला मार्ग काढ़तानाही पाहिलेय पण खबरदारी आपणच घेणे आवश्यक असते.
(बुलबुल पक्षी विशेष करून पिकलेल्या फळांवर टोच मारायला येतात.. सोन केळी ख़ास त्यांच्यासाठी मुद्दाम उघड़ी ठेवतो आम्ही)...

पाळून बघावा का?..... नक्की पाळा.बुलबुल घरभर शिटतात त्याचे काय करावे असा धागा वाचायला मिळेल. Light 1

>>>>'शिशुपाल' हा शब्द अगदीच आवडल्या गेला आहे! Happy <<<<
@ शंतनू .. त्याचे श्रेय माबोकर मनिम्याऊ आणि शांकली यांचे..

एसीच बाहेरच युनिट आणि भिंतीच्या बेचक्यात याने घरटं केलं होत. अगदी आत्तापर्यंत दिसायचे पण सध्या मांजर तिच्या पिल्लांसह बऱ्याच काळापासून वास्तव्याला असल्याने हे कुठेतरी निघून गेलेत. बरेच होते आधी. मी त्यांना चपाती ,भेळ-शेव खाऊ घालायचो पण नंतर बंद केलं. कावळ्याने यांची अंडी खाऊन टाकली होती. पालीला मला यांचा काहीच उपयोग दिसला नाही. पण मांजरीमुळे आता पाल दिसत नाही . मांजरीनेपण लै वैताग दिलाय. पिल्लांसाठी घुशी-खारुताई-पक्षी घेऊन येते आणि ती घाण काढायला कामवाली बाई नकार देते. एकदिवस नाकाला रुमाल बांधून सर्व साफ करावं लागलं. पिल्लं लांब सोडून येन पण बरोबर वाटत नाही.

आत्मा येऊ नये म्हणून दाराला उलटी नाल लावतात तसे गॅलरी दाराला फटीला एक जाड घरातली चादर लावली आहे.आता कुत्री बाहेर राहूदे, झाडावर जाऊदे,मरुदे.मी माझ्या परीने लेव्हल बेस्ट प्रयत्न केले.☺️☺️
नवे हिट आणायचेय.आणि माणकेश्वरी ऍग्रो स्टोअर मधून ग्रीनप्लस पेस्ट.ते संध्याकाळी लवकर बंद होते.
सध्या संध्याकाळी उशीर होत असल्याने (मावळता) सूर्य न पाहिलेला माणूस झालाय.

पाली थेट "नैनन से नैनन लडाके " आपल्याला घाबरवतात. इतका मग्रुर, मुजोर घाणेरडा प्राणी जगात अजुन नाही. लहान कमोडो ड्रॅगन असतात पाली म्हणजे Sad Sad

>> मांजराने यायला नको......... म्हणून चांगला उपाय सांगा.
>> Submitted by mi_anu on 6 July, 2018 - 18:54

निलगिरी तेलाच्या वासाला मांजरे थांबत नाहीत. एखाद्या जागेत मांजर यायला नको असेल तर हे तेल त्या ठिकाणी अधून मधून शिंपडत जा. (सोर्स: स्वानुभव) बायदवे, ते मांजराच्या शी चे फोटो धाग्यातून काढून टाका हि विनंती. Uhoh Uhoh

Submitted by अजय चव्हाण on 24 May, 2019 - 16:08
>>
पुर्वी २५-३० वर्षापुर्वी सांधेदुखीवर घोरपडीचे तेल लावत. नाक्यावर वैदू लोक कढईत घोरपडीचे तेल बनवून देत. त्याची आठवण झाली. अर्थात मनेका ताईंनी हे प्रकार बंद केले.

पाली सारखा निरुपद्रवी प्राणी नाही. पाल एवढी घाबरते घालवायला गेले की, की अगदी थिजून जाते. तिला हात पाय शेपूट हलवता येत नाही. अशावेळेस तिला शेपटाने उचलून दूर टाकता येते. किंवा १० - १५ मिनिटे जाऊ द्यावी लागतात तिच्यात जीव येऊन ती निघून जायला.

तुमच्या पाली वेगळ्या आमच्या वेगळ्या
आमच्या घाबरवतात, जोरात पळतात, छतावर आम्ही असलेल्या स्पॉट च्या वर थांबतात,अंगावर धावून येतात.

अंगावर धावून येतात. >>>
पुढल्या वेळेस अंगावर धावून आली की बघा आपल्या कपड्यांवर एखादा किडा तर नाही ना, किंवा फुलपाखरांच्या आकाराचे डिझाइन असलेले काही घातले तर नाहीय ना, कपडे, स्कार्फ, डूल, हेअर क्लिप वगैरे ...

पाल हां मुळात कुठला प्राणी नाहीचै ! समस्त नवरे मंडळींनी बायकोच्या धाकाला काटशह देण्यासाठी बनवलेले ते एक अद्भुत रहस्यमय गनिमीकावा तंत्रज्ञान आहे. ज्या प्रमाणात बायकोची धाकटशाही जास्त त्याच्या समप्रमाणात त्या घरात पालींचा वावर जास्त अशी ही युगानुयुगे चालत आलेली दैवी रचना आहे.

पाली आपल्या डोळ्यात डोळे घालून उर्मट आणि खुनशीपणे पहात अंगावर येतात हे सत्य आहे. इट्स अ फॅक्ट Sad

मी कित्येक लहान मुली पाहिल्या आहेत ज्या पालींना घाबरत नव्हत्या, मोठ्या झाल्यावर घाबरायला लागल्या.
स्त्रियांनी पालीला/झुरळाला घाबरलं पाहीजे हे समाज मुलींना लहानपणा पासून बिंबवत असतो. तर मुलं तर शूर असतात त्यांनी घाबरता कामा नये, घाबरला तर बायल्या हे सुद्धा बिंबवत असतो. घरा घरात विनोदांमधुन, कथा साहित्यातून, आणि टीव्ही शोज, चित्रपटातून सुद्धा. हे जगभरातून चालतं. अनेक चित्रपटातून (कॉमेडी असेल तर हमखास, नसेल तरी मध्येच जरा वातावरण बदल म्हणून) एखादा सीन असतो. पार्टी सुरू असते, रंगात आली असते मग मध्येच पाल किंवा झुरळ येऊन होणारा महागोंधळ घाबरलेल्या, जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या, सैरावरा पळणाऱ्या बायका. मग कुणी एक मर्द का बच्चा जाऊन ती पाल किंवा झुरळ उचलून घेऊन जातो किंवा ती खोटी होती हे दाखवतो.
वरवर हे तर विनोद यामुळे कुणी खरंच पालीला घाबरायला सुरवात करणार का असं वाटत असलं तरी सतत होणारा हा मारा अंतर्मनात रजिस्टर होत जातो. (या सारख्या अनेक गोष्टी असतात ज्याचे समाजाकडून नकळत आपले ब्रेनवॉश होत असते.) परीणामी बहुतेक स्त्रियांमध्ये पाली झुरळांचा फोबिया नकळतपणे समाज रुजवतो. हे बालपणापासून झालेले एक प्रकारचे ब्रेनवॉश असते.

ओसोडीमुळे सुद्धा पाली/झुरळांची प्रचंड भीती निर्माण होऊ शकते काही रुग्णांच्या मनात. त्यात त्यांना पाल / झुरळ आपल्याच कडे रोखुन बघत आहे आणि आता जाऊन त्यांची सगळी गँग घेऊन आपल्यावर चालून येणार आहे असे वाटते, पण इथे अशा वाटण्यात स्त्री/पुरुष भेद नसावा.

इथे वाचा या स्त्रीने आपला फोबिया कसा घालवला.

@मानव >> तुम्ही म्हणताय ते बरोबर असु शकतं. पण सगळ्यांच्या बाबतीत नाही. कारण मी पालीला/कॉकरोचला घाबरणारे मुलं/पुरुष बघितलेय.
मला पालीची किळस आधीपासूनच होती. पण माझ्या रुममेट मुळे जास्तच वाढली. ती पालीच्या पिल्लू ला पण घाबरायची आणि तिच्यामुळे मला दचकायला व्हायचे.
Happy

@मानव आपले खूप आभार तो लेख अफाट आहे. you seem to be uncanny. My phobia seems to have a psychological component.
मला ओसीडी नाही at least its not diagnosed
पण मला कळतय की ही भीती विचित्रपणे माझ्या एका symptom शी निगडीत दिसते. You have thrown light on something important for me.
___________________________
तुम्हाला तो लेख कसा सापडला? तुम्हाला एवढी माहीती कशी? जस्ट ब्राउझ करताना सापडला?
____________________
>>>>>>He pointed out that if I allowed myself the discomfort of lizards, I’d confront the transient, impotent nature of discomfort, and eventually not feel that discomfort at all. >>>>>>
Psychology is a wonderful science. Angels often come in disguise of psychiatrists. कसला सुरेख लेख आहे. त्या डॉक्टरांनी परफेक्ट डायग्नोस केलय तिला.
________________
अनुचेही या धाग्याबद्दल, आभार.

मी पालिबद्दल एकही पिक्चर पाहिलेला नाही.लहानपणी अभ्यासाला गॅलरीत बसल्यावर एक पाल वरून अंगावर पडली होती.
नंतर ऑफिस कँटीन मध्ये दरवाजा बंद केल्यावर आणि ऑब्जेक्टिव्ह पूर्ण केल्यावर दारावर पाल दिसली होती.अश्या परिस्थितीत किंचाळता पण येत नाही.आपली आणि पालीची डीग्निटी ठेवून सावधपणे सुरक्षित बाहेर यावे लागते
बाळ नवे आणि मी नवी आई होते तेव्हा रात्री जागताना छतावर पाल दिसली.मग मी बाहेरच्या खोलीत बिछाना हलवला.तिथे ती नाही आली.
पाल शांतपणे फिरत नाही.मूर्ख असते.छतावर फिरते.तिथे ओल असेल तर खाली पडते.पडल्यावर नाचते.मग पळते.मारली तर शेपटी सोडते.ते वेगळं आवरावं लागतं.कधीमधी 2 पाली(पाल आणि मिस्टर पाल) रोमान्स करताना खाली पडतात.हे सर्व लहानपणी जंगलाजवळ घर असल्याने पाहिलं.सासरी शक्यतो पाली येऊ नये, आल्या तर बाहेर जाव्या, बाहेर जायला तयार नसल्या तरी देवाघरी जाव्या अशी व्यवस्था गेली अनेक वर्षे केली आहे.
झुरळाशी मला प्रॉब्लेम नाही.ते एका झाडूत मरतं.

सासरी शक्यतो पाली येऊ नये, आल्या तर बाहेर जाव्या, बाहेर जायला तयार नसल्या तरी देवाघरी जाव्या अशी व्यवस्था गेली अनेक वर्षे केली आहे.>>>>कृपया मार्गदर्शन करावे,
मला पालीची भीती वाटत नाही,किळस मात्र खूप वाटते,शक्यतो घरात येत नाही,फ्लॅट सिस्टिम मुळे असेल कदाचित,पण घरात आलेल्या पालीवर/पिल्लावर मी आधी डायरेक्ट हिट मारते मग झाडू

झुरळाशी मला प्रॉब्लेम नाही.ते एका झाडूत मरतं. >>>उडते झुरळ झाडूने मारणे फार कठिण असते इकडे तिकडे उडून जाते. त्याला हिट च बरे पडते.
मला साध्या झुरळा ची भिती नाही वाटत पण उडत्या वाटते कारण ते उडून नेमके आपल्याच अंगावर येते.
एकदा लहान असताना आम्ही एका देवळात गेलो होतो तिथे एका कोनाडाच्या भोकतून 100पेक्षा जास्त झुरळे ये जा करत होती. जशा मुंग्या असतात तशी झुरळे होती. घाबरुन वाट लागली त्यातली काही उडत ही होती.

@श्रद्धा : अर्थात सगळ्यांच्या बाबतीत हे लागू होणार नाही. मी लहानपणी झुरळाला घाबरायचो, पण लौकरच गेली ती भीती.
@सामो: काही रुग्णांची काळजी घेण्याच्या जबाबदारीमुळे थोडीफार तज्ञांकडून मिळालेली माहिती आणि थोडेफार वाचन आहे, एवढंच. हा लेख मागे बूकमार्क करून ठेवला होता, सर्च करूनच वाचलेल्यांपैकी एक.

बाकी आपल्या सुप्तमनात एखादी गोष्ट केव्हा रजिस्टर झाली असेल हे सांगता येईलच असे नाही, सजग मनाने त्याची दखल न घेता ही हे घडु शकते.

Pages