तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच कारवी, तुमच्या खुसखुशीत पोस्ट्स ची मी चाहती आहेच... विडंबन सुद्धा जबरदस्त..._/\_

कारवी मस्त Rofl

विस खरच प्रेमात पडलाय की काय ईशाच्या? Uhoh कसा झेण्डेवर उखडला तो! काल ईशा मी आज तुमच्याबरोबर येणार नाही म्हटल्यावर विसच्या डोळयात जे दुखावलेपण दाखवलय ते खर वाटत होत. आता केडया खरच 'बाजीगर' करतो की काय!

विसने अशा थापा मारल्या चाळीच्या त्या लहान मुलालाही कळेल.

पण काल विसं ने हात धरुन चल म्हटल्यावर ईशाने बरा अभिनय केला.. >>>>>>> ++++++++++१११११११११

नवीन प्रोमो ,हा काय आता भासआभासाचा खेळ चालू होणार का? >>>>>>>> जुनाच प्रोमो नव्याने शूट केलाय. पण आधीच्या प्रोमोमधली शितू छान दिसत होती. नॅचरल. आताच्या प्रोमोमधला तिचा मेकअप गन्डलाय. भासआभासाचा खेळ ईशा खेळत असेल विसला धडा शिकवायला. कुठून एवढी अक्कल आली तिला?

निमकरान्ना प्रश्न पडायला पाहिजे होता, त्या प्रॉपर्टी सोहळयानन्तरच ईशा माहेरी यायला का बघत होती? सही न करण्यावरुन ह्याच भाण्डण झाल की काय? विसला सही न करण आवडल नसेल का? (मग ह्यान्च लेक्चर सुरु होईल, जावईबापून्ना तु सही केली नाहीस ते आवडल नाही बहुधा, मुकाटयाने सही कर बघू. ब्ला ब्ला ब्ला. त्या दिवशी तर चान्गल कौतुक करत होते लेकीच.) म्हणूनच ही विचित्र वागतेय की काय? वै वै.

असा यूजर नशिबी आल्याचे सहन न होऊन समस्त गूगल-मॅप-स्टाफ स्वखर्चाने हेलिकॉप्टर राईड घेऊन नायगार्‍यात उड्या घेईल. उद्या म्हणतील गरम गरम तव्यावरचे पोळी आहे. घोटभर घेणार का >>>>>>>>>> Lol

आधीच वयाच्या अंतरावरून केस केली कोणीतरी >>>>>>> कैच्याकै

त्यात अजाणता का असेना बापलेकीचे लग्न, नो वे, टाळ लागायचे अश्याने >>>>>>> ह्यावरुन आठवल, कलर्स हिन्दीवर मधुबाला सिरियल लागायची. त्यात लीपनन्तर मधुबालाची मुलगी तिच्या वडिलान्सारख्या दिसणार्या हिरोशी लग्न करते अस दाखवल होत. खुप चर्चा झाली होती ह्यावर. परिणामी सिरियलला राम म्हणावा लागला.

देवघर आणि कपाट बघून सर्र्रांना देवघरे चाळ आणि कपाटाचा कारखाना असं सुचले असेल...>> तरी बरं, ढोल्या गणपतीच्या गल्लीत, भिकारदासाच्या चाळीत महामठ्ठोपाद्ध्यायांच्या घरात रहायचो असं नाही म्हणाला. Wink

गेले दोन एपिसोडस् सुबोधला पावडर बिवडर जरा जास्त् लागल्यासारखी वाटतेय. Happy

महामठ्ठोपाद्ध्यायांच्या ओसरीत म्हणा मेधावि ---- म्हणजे मॅडम ओसरी शोधायला मोकळ्या .....
भले चाळ रेनोव्हेट होऊन स्टिल्ट पार्कींग असेल आता तिथे !!
मग मॅडम लिफ्ट्ने वर जाऊन दिसेल त्याना 'काका इथे ओसरी होती का? कधीच नव्हती? असं कसं ?' विचारून ओठ काढून रडणार.

Submitted by फारएण्ड on 16 April, 2019 - 19:56 >>>>> ?? !! ?? म्हणजे नाही जमले...
शोधू मी कुठे कशी प्रिया तुला.... शांता शेळके + अनिल-अरूण + लता -- नाव मोठं लक्षण खोटं

?? !! ?? म्हणजे नाही जमले...
शोधू मी कुठे कशी प्रिया तुला.... शांता शेळके + अनिल-अरूण + लता -- नाव मोठं लक्षण खोटं >>> ओह आठवले गाणे. नाही जमले असे नका समजू - ते मूळ गाणे इतके चांगले माहीत नाही मला त्याचे विडंबन पटकन कळायला Happy

कालच्या चहयेद्याच्या भागात तो कुशल बोलतो कि ती बंद खोली म्हणजे टॉयलेट आहे. विस तिकडे जाताना घड्याळ, पाकिट, मोबाईल काढून ठेवतो आत पडायला नको म्हणून Lol

तरी बरं, ढोल्या मारुतीच्या समोर भिकारदासाच्या चाळीत महामठ्ठोपाद्ध्यायांच्या घरात रहायचो असं नाही म्हणाला. Wink>>>>>>>>>>>> Lol तरी ईबाळाला काही कळलं नसतं...

कालच्या एपि मधे प्रत्येक वाक्यानंतर इथे ते अमुक तमुक होतं का? "कधीच नव्हतं" अरे काय प्रत्येक वेळेला तेच तेच... अगदीच डोक्यात गेलं ते

मायरा बोलत असताना सुभा सारखीच रिअ‍ॅक्शन द्यावीशी वाटली. किती पिडत होती त्याला. सर सर म्हणू नकोस सारखं Lol

परवा ईबाळ जालिंदरला भेटते तेव्हा त्याचा ‘विसची जात ‘ वाला डाइलॅाग कमीतकमी चारवेळा झाला.. बाकी सुचत नाही का लेखकाला?

कारवी .. धमाल!
ईबाळ मंदपणाचा कहर आहे.. किती वेळ लागतो ॲनालिसीस करायला.
हा चपला पालथ्या करायचा काय प्रकार के ला ईआईनी ?काहीपण दाखवतात
ईबाळ फेंगडी चालते असं नाही वाटंत?
आज विस कोणत्या वेगळ्याच खोलीत होता.. मला वाटलं की तीच बहुचर्चित खोली की काय ! पण आसा सहज आत आल्या म्हणजे ती नसावी. ..

काल इशा जालिदरला भेटुन घरात शिरते तेहा सुभा नुसत्या हावभावावरुन इशावर सन्शय ते राग सगळ व्ह्यक्त करतो पण माठ नुसत बधिर होवुन उभ..
इशा एकही वाक्य सरळ बोलत नाही सगळी वाक्य तोडुन तोडुन बोलते , नको तितके पॉझ घेवुन बोलल्याने सगळ इतक पुस्तकी वाटत एकायला .
आजच्या एपिसोड मधे मुझे एकान्त चाहिये करुन इशाने आइ-बाबानाच घराबाहेर काढल आणि तेच तेच परत मनातल्या मनात उगाळात बसली... जे आइबाबा असतानाही करता आल असत की त्याना कशाला घराबाहेर काढायच्य?

इशा एकही वाक्य सरळ बोलत नाही सगळी वाक्य तोडुन तोडुन बोलते , नको तितके पॉझ घेवुन बोलल्याने सगळ इतक पुस्तकी वाटत एकायला . >>> हम्म्म. मला पुस्तकीचं वाटतं तिचे, इशा म्हणून पण आणि गायत्री म्हणून मुलाखत देते तेव्हाही. मध्ये दोनदा tv वर बघितलं news channel वर, एकदा मागे संकर्षण शो करतो तेव्हा. फार बघावं असं वाटत नाही मग. सहजता नाही अजिबात.

कालच्या चहयेद्याच्या भागात तो कुशल बोलतो कि ती बंद खोली म्हणजे टॉयलेट आहे. विस तिकडे जाताना घड्याळ, पाकिट, मोबाईल काढून ठेवतो आत पडायला नको म्हणून >>>>
मी तो चहयोद्या भाग पाहिला नाही पण खरच तेच लाॅजिकल वाटतंय. घरी आला की आधी तिथे जाणे.. दार बंद करणे.. दारावर वाजवलेलं न आवडणं .. नाही आवडत ना डिस्टर्ब केले की.. त्यात इतकं का लोक विचारतात??? कुठे गेला..इत का वेळ का???:D:D

आपल्यापैकी कोणी रोजच्या वापरासाठी सोनेरी उंच टाचेच्या चप्पल वापरतं का?...
आमच्या काळात तरी फक्त ठराविक कार्यक्रमांना फॅन्सी फूटवियर घालत असत..
... देवा, कशी चालते ती... त्यातही मार खाल्लाय पोरीने..
अग बये, सुधार स्वतःला,...
दिग्दर्शक असे सुमार कामाचे सीन असे कसे काय मान्य करतात?..
त्यांना समोरासमोर दोन अभिनयातील तफावत कळत नाही का?..
एकीकडे सुभा नुसती नजर उचलली तरी त्याच्या मनातले विचार प्रेक्षक वाचू शकतात...
आणि समोरच अभिनय शून्य नजरेचा,देहबोलीचा कलाकार..
आता मला ईशा पेक्षा, तिच्याकडून अभिनय करवून
घेणार्‍या महान लोकांबद्दल जास्त आक्षेप घ्यावा वाटतो..
...

चहयेद्या ने जाहीरपणे सांगितले आहे की ही एक विनोदी सीरियल आहे.. माबोकरांचे म्हणणे सर्वांना मान्य झाले म्हणायचे!!
कालच्या भागात; देवघरे चाळ, विठ्ठल पंढरपुरकर, लोखंडी कपाट इ.इ. आठवताना प्रत्येक वस्तूचे नाव घेऊन ती दरवेळेला सर्र्रर्र या खुर्चीवर बसून बोलले असे म्हणत बद्कन् पन्नास वेळा बसत होती ते मला खूप विनोदी वाटलं Biggrin Biggrin Biggrin

काल बाळाने स्वत:शी बोलतिना एक निरर्थक प्रश्न विचारलि की सर्रिंनी मिझ्या आईबाबांना पण का फसवल? त्यावेळी खरच अस वाटल की टीव्हीतून आत जाता येत असत तर किती बर झाल असत,हिला एक ठेवून देता आली असती
का फसवल किय,दगड,तुझ्याशी लगीन करण्यासाठी तुझ्यि आईबाबांना पण पटवायला नको का.
केड्याला हा प्रश्न तिला पडलेलि दाखवून तिच्यातला इनोसन्स दाखवायचा असावा ,पण मंदपणाच दिसला.
सर्रांनी फसवल फसवल म्हणत आहे ,अग पण का फसवल त्याचा विचार कर ना म्हणजे सगळ कळेल.
परत वेळेचा घोळ.बाळ खुरचीवरून देवघर आणि देवघर टू खुर्ची अस फिरत असताना टळटळीत दुपार होती आणि नंतर रोडवरून चालताना एकदम रात्र.

<<<त्यावेळी खरच अस वाटल की टीव्हीतून आत जाता येत असत तर किती बर झाल असत,हिला एक ठेवून देता आली असती>>> अरे किती हसवाल. Rofl

आणि प्रत्येक realisation च्या वेळी त्याच क्रमाने ती वागत होती. विचार मग चेहर्‍यावर काही कोड्यात पडल्याचे भाव मग खोलीत क्रमाक्रमाने नजर फिरवणं. मग एका मुद्द्याचा साक्षात्कार मग पुन्हा हाच क्रम. माझ्या मुलाला प्रश्न पडला की विस काय थापा तयार करताना खोलीभर सभोवार मान फिरवत होता की नजरेच्या ए§§§वढ्या परिघात हे सगळे तपशील सामावत होता (ओडिसी कि कोणत्या तरी नृत्यात नाही का डोळ्यांच्या टोक टू टोक व्यायाम असतात तसं).
कंटाळा आला एवढ्यांदा बघण्याचा आणि तिच्या चालण्याबाबत वरती कैरीने केलेलं फेंगडेपणाचं निरीक्षण अचूक आहे.

जरा चांगली अ‍ॅक्ट्रेस असती तर सर्व क्लू एकाच वेळी एक एपिफॅनि झाल्यासारखे खुर्चीत बसून महाल क्ष्मीचे चित्र, देवघर कपाट, कृ ष्णा ची व
वि ठ्ठलाची तसबीर ह्यावर नजर फिरवून मग चेहर्‍याचा व डोळ्यांचा क्लोज अप, आपण फसवले गेलो आहोत. सर्व खोटे बोलले सर ह्यावर अविश्वास ते राग चीड, कुटुंबियांना फसव ल्याचे दु:ख अगतिकता प्रेमभंग व एक जनरल एका क्ष णात स्वप्नाळू मुलीची स्वप्ने तुटुन सिनिक पणा
आणणे व बदला घेण्याचा निस्चय करणे हे सर्व एका कंटिनुअस सीन मध्ये घेता आले असते. प्रत्येक क्लूला तीच अ‍ॅक्षन हे फारच बेसिक झाले.

तिच्या वडिलांनी पैसे दिलेत म्हणे सिरीयल प्रोड्युस करायला....!!
स्पाँसर्ड कँडिडेट आहे तर! >> तरीच....मला वाटलंच होत की इशाला ओळखीनेच घेतलं असणार...पण तिला म्हणावं बाई ग संधी मिळालीय तर त्याच सोन कर अभिनय सुधार

म्हणजे इशा कडे अभिनयाच्या नावानं बोंब आहेच पण तिचे संवाद तरी काय लिहिलेले असतात ? काल चा सगळाच प्रसंग किती सुमार लिहिला होता . त्यात ह्या माठाचा अभिनय झिरो , कसा होणार सीन प्रभावी ?

त्या आसा पण अति तोडत बोलतात. दर तीन शब्दांनी तोडाव लागतं त्याना. " आज मी इशाला घरी आली की चहा करायला सांगणारे" हे एवढं वाक्य ही त्या मध्ये दोन वेळा तोडतात. त्यांचा तो श चा स्पेशल उच्चार तर डोक्यात जातो माझ्या.

नाही, असं पैसे देऊन घेतलं असतं तर तिला लगेच दुसरी फिल्म मिळाली नसती. परवाच वाचलं की एका मल्याळम फिल्मचा रिमेक असलेल्या 'कोल्हापूर डायरीज' मध्ये ती काम करते आहे. एवढीच बातमी असती तर दुर्लक्ष केलं असतं, पण बतमीमधील ही एक ओळ वाचा : depression:

After impressing the audience in Marathi TV serials with her brilliant performance, actress Gayatri Datar is now all set to make her Marathi debut with Joe Rajan's 'Kolhapur Diaries'.

आपल्यापैकी कोणी रोजच्या वापरासाठी सोनेरी उंच टाचेच्या चप्पल वापरतं का?...
आमच्या काळात तरी फक्त ठराविक कार्यक्रमांना फॅन्सी फूटवियर घालत असत..
... देवा, कशी चालते ती... त्यातही मार खाल्लाय पोरीने..
अग बये, सुधार स्वतःला,...
दिग्दर्शक असे सुमार कामाचे सीन असे कसे काय मान्य करतात?..
त्यांना समोरासमोर दोन अभिनयातील तफावत कळत नाही का?..
एकीकडे सुभा नुसती नजर उचलली तरी त्याच्या मनातले विचार प्रेक्षक वाचू शकतात...
आणि समोरच अभिनय शून्य नजरेचा,देहबोलीचा कलाकार..
आता मला ईशा पेक्षा, तिच्याकडून अभिनय करवून
घेणार्‍या महान लोकांबद्दल जास्त आक्षेप घ्यावा वाटतो..
...सुषमा ताई+++++++१११११११११११११११
अगदी मनातलं बोललात.

बाकी सर्वांच्या प्रतिक्रिया खूप छान, मजा आली वाचून.
कारवी, मेधावी, सुलु, सुषमा ताई, फोरहँड, UP.......सर्वच भारी
'प्रत्यक्षाहून प्रतिक्रिया सुंदर'

फोरहँड ... Lol
खरंच फोरहँड चे फटके असतात प्रतिक्रिया...!!!

कालचा भाग बघायला जमलं नाही .. पण फार काय घडलं असावं असं वाटत नाही
आपल्यापैकी कोणी रोजच्या वापरासाठी सोनेरी उंच टाचेच्या चप्पल वापरतं का?>> आणि रोज रोज ती छोटी पर्स ज्यात एक मोबाईल कसाबसा मावतो ..
एकीकडे सुभा नुसती नजर उचलली तरी त्याच्या मनातले विचार प्रेक्षक वाचू शकतात...>> हो एकदम १०० % खरं
कालच्या एपि मधे प्रत्येक वाक्यानंतर इथे ते अमुक तमुक होतं का? "कधीच नव्हतं" अरे काय प्रत्येक वेळेला तेच तेच... अगदीच डोक्यात गेलं ते>> नै त काय ! Angry
आणि ते परवा ‘विसची जात ‘ वाला डाइलॅाग कमीतकमी चारवेळा झाला.. >> हो खूप इरिटेट झालेलं तेव्हा पण
मायरा बोलत असताना सुभा सारखीच रिअ‍ॅक्शन द्यावीशी वाटली. किती पिडत होती त्याला. सर सर म्हणू नकोस सारखं Lol>> हो ना .. कळतं ना साधारण जेश्चर वरून कि बाबा हा बिझी दिसतोय .. तरी हीच टुमणं चालूच .. Uhoh अर्थात हेच दाखवायचं होतं त्यांना म्हणा ..

पब्लिक अजूनही ही मालिका बघून वर ईथे प्रतिक्रीया पण लिहीताहेत... कोपरापासून दंडवत!
यातली अर्धी गँग तर हवा २ वर आलीये ना कुठल्याश्या स्पर्धेत भाग घ्यायला. बहुतेक लवकर आटोपणार मालिका.
तत्पूर्वी, 'अंबाबाई वाली ती बाई' (समास सोडवा) अवतरली की ईशा ला आत्मज्ञान होवून मग एका आठवड्यात गजा पुराण संपवतील बहुतेक. शेवटच्या भागात मदन चोप्रा (स्व. सरंजामे) अवतरतील का याची उत्सुकता आहे.
असो. मिटर डाऊन असल्याने सुभा व ईतर कुणी तक्रार करत नसावेत बहुदा. अन्यथा अशक्य लांब रेंगाळतय प्रकरण...
एक मात्र झाले. ईशा मूळे (समोर) बाकी सर्व जण छान अभिनय करतात, अगदी झेंडे सुध्धा असे पब्लिक चे मत झाल्याने मालिकेतील ईतर सर्व खूश आहेत. Happy
अमची कौटूंबीक बँड्विड्थ सध्ध्या संभाजी, हवा २, व राखेचा २ मध्ये खर्ची पडते आहे त्यामूळे तुला पाहते पाहीले जात नाही.

ईबाळ मंदपणाचा कहर आहे.. किती वेळ लागतो ॲनालिसीस करायला. >>>>>>>>> एपिक सीन होता तो. Rofl

हा चपला पालथ्या करायचा काय प्रकार के ला ईआईनी ?काहीपण दाखवतात >>>>>>>> घरच्या माणसाला जर घरी यायला उशीर होत असेल तर झीमच्या सिरियल्समध्ये ( या सुखान्नो या) उम्बरठयावर ( की उम्बरठया शेजारी?) उपडा पेला ठेवतात, जेणेकरुन तो माणूस लवकर घरी परततो अशी रीत आहे. ते चपला पालथ्या ठेवणे सुद्दा तसलाच प्रकार असेल.

निमकर एवढे वाट बघतायत ईशाची, काळजी करतायत, तर रुपालीने सगळ खर सान्गून टाकायला हव होत त्यान्ना.

ईबाबा विचार करतात ही मुलगी रात्रीच कुठे जात असेल. निमकर आता ईशावर 'भलताच' डाउट घेतील अशी शन्का यायला लागलीये.

हा विस पण ना? आईसाहेब घरात आल्यात ह्याची चाहूल घेऊन लाईट बन्द केली, आधी चालू होती. असा उलटा कारभार करण्यापेक्षा आधीच काळोख करुन ठेवायचा ना, आणि बसून राहायच खुर्चीत. आसा आल्या तर ठीक, नाही आल्या तर डुलकी काढायची खुर्चीत. हाकानाका.

काल इशा जालिदरला भेटुन घरात शिरते तेहा सुभा नुसत्या हावभावावरुन इशावर सन्शय ते राग सगळ व्ह्यक्त करतो पण माठ नुसत बधिर होवुन उभ.. >>>>>>> असे कुठले आईवडिल आहेत जे जावई मुलीची उलटतपासणी करताना मख्खपणे बघत राहतात?

एकीकडे सुभा नुसती नजर उचलली तरी त्याच्या मनातले विचार प्रेक्षक वाचू शकतात... >>>>>>>>>> +++++++++१११११११

फ्लॅशबॅकमध्ये 'देवघरे चाळीत राहायचो' सान्गताना विसची नजर देवघराकडे जाते ते स्पष्टपणे कळत होत. विस खोट बोलतोय हे तेव्हाच कळल होत.

धन्स अनुराज Happy

त्या आसा पण अति तोडत बोलतात. दर तीन शब्दांनी तोडाव लागतं त्याना. " आज मी इशाला घरी आली की चहा करायला सांगणारे" हे एवढं वाक्य ही त्या मध्ये दोन वेळा तोडतात. >>>>>>>> चहा करायला ईशा कशाला हवीये. मन्दा आहेच की.

मायरा बोलत असताना सुभा सारखीच रिअ‍ॅक्शन द्यावीशी वाटली. किती पिडत होती त्याला. सर सर म्हणू नकोस सारखं Lol>> हो ना .. कळतं ना साधारण जेश्चर वरून कि बाबा हा बिझी दिसतोय .. तरी हीच टुमणं चालूच >>>>>>> नैतर काय. उगाच नाही विस तिला ' दुसरा नमुना' म्हणतो.

आणि ते परवा ‘विसची जात ‘ वाला डाइलॅाग कमीतकमी चारवेळा झाला.. >>>>>>> अगदी अगदी. ईशाच्या जागी आणखी कुणी असत तर वैतागून म्हणाला असता, ' ते माहितीये , पुढच सान्ग'

बाकी जालिन्दरभाऊ दोन्हिकडे चमकत आहेत. तुपारे आणि स्टार प्रवाहवर मोलकरीण बाई, सॉलिड बॅटिन्ग चालू आहे. Happy

सॉन्या ईशाच्या बाजूने गेली आहे.

योग बर्याच दिवसान्नी दिसलात. Happy बहुतेक लवकर आटोपणार मालिका. >>>>>>> मे मध्ये सम्पणार अस म्हणतायत. सध्या एवढ फास्ट दाखवतायत त्यावरुन तरी असच वाटतय. बाकी खखोदेजा.

ईशा ला आत्मज्ञान होवून मग एका आठवड्यात गजा पुराण संपवतील बहुतेक. >>>>>>> शितूची एन्ट्री, तिचा फ्लॅशबॅक अजून बाकी आहे ना.

बाकी सर्व जण छान अभिनय करतात, अगदी झेंडे सुध्धा >>>>>>>> झेंडे तर पहिल्यापासूनच छान अभिनय करतात. कधी कधी सुभाला सुद्दा खाऊन टाकतात.

मी तो चहयोद्या भाग पाहिला नाही पण खरच तेच लाॅजिकल वाटतंय. घरी आला की आधी तिथे जाणे.. दार बंद करणे.. दारावर वाजवलेलं न आवडणं .. नाही आवडत ना डिस्टर्ब केले की.. त्यात इतकं का लोक विचारतात??? कुठे गेला..इत का वेळ का???: >>>>>>>>>> Rofl

चहयेद्या मध्ये विस पायजामेच खर रुप दाखवायला हव होत. मजा आली असती. Biggrin

पुढच्या भागात ईशाच्या मागून ट्रक येतोय अस दाखवलय. बहुधा जोगतिणबाई तिला वाचवेल आणि शितूच दर्शन देईल अस दाखवतील.

Pages