Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45
तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )
कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!
हा तिसरा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
विक्या आणि शितु म्हणिले की
विक्या आणि शितु म्हणिले की भरपूर ट्विस्ट येणार आहेत.म्हणून केड्या कशामुळे जास्त धक्का देऊ शकेल याचा विचार केला आणि मग ही कल्पना डोक्यात आली .
म्हणजे पुनर्जन्म अगदीच कॉमन होईल ,ज्याबद्दल प्रेक्षकांना खात्री आहे तरी विक्या म्हणतो की खुर्चीला खिळून राहा आणि ही जर मुलगी निघाली तर प्रॉपर्टीचा प्रश्न सुटलाच की ,फक्त एकच होईल अस काही झाल तर केड्याला खरच लोक मार मार मारतील.
मायबोलीकरांनो,माझ्या या
मायबोलीकरांनो,माझ्या या कल्पनेला हसू नका पण बाळ खरच नंदू आणि विक्याचच बाळ नसेल ना.>>> UP, अहो असे काही दाखवायची हिम्मत झी वाले करणार नाहीत. आधीच वयाच्या अंतरावरून केस केली कोणीतरी , त्यात अजाणता का असेना बापलेकीचे लग्न, नो वे, टाळ लागायचे अश्याने
बाकी कल्पना मस्तेय
आज इआई म्हणाली की चहा झालाय..
आज इआई म्हणाली की चहा झालाय...वाढू का? हे कसलं मराठी ह्यांचं ?
>> हो ना खूप चुकीची मराठी बोलतात ऐकायला कसंतरीच वाटत. परत जालिंदर इशाला म्हटला की "यावेळेस कशी रिस्क दाखवलीस...." रिस्क घेतली अस हवं होतं ना किंवा हिम्मत दाखवली असं.
गुगल मँपची सोय असताना हे बाळ
गुगल मँपची सोय असताना हे बाळ चालत सगळ्यांना विचारत होत.
त्या बंद खोलीचं रहस्य....
त्या बंद खोलीचं रहस्य.... चहयेद्या मधे समजलं. लोल... टाॅयलेट असेल म्हणे. चप्पल, मोबाईल, पाकीटबाहेर ठेवतो आणि आत गेलं की दारावर टकटक करायची नाही
>>>> UP भन्नाट आहे....
..
आज इआई म्हणाली की चहा झालाय..
आज इआई म्हणाली की चहा झालाय...वाढू का? >>>
उद्या म्हणतील गरम गरम तव्यावरचे पोळी आहे. घोटभर घेणार का 
गरम गरम तव्यावरचे पोळी आहे.
गरम गरम तव्यावरचे पोळी आहे. घोटभर घेणार का>>>
मला च ह ये द्या आवडत नाही.
मला च ह ये द्या आवडत नाही. कधी बरं असतं तर कधी काहीच्याकाही वहावत जातात.
पण त्यांनी ह्या बंडल सिरीयलींची पिसं काढली की थोडं बरं पण वाट्तं.
माझ्या माहितीप्रमाणे
माझ्या माहितीप्रमाणे माहीमच्या पुढे रिक्षा नसून टँक्सी असते तरीसुध्दा काल महालक्ष्मीला बाळ चालताना रिक्षा होती.
@UP
@UP
हेलिकॉप्टरला सगळं बजेट गेल्यावर, हाती रिक्षाच येणार ना
सगळी कडे ती छोटी रिसेप्शनला
सगळी कडे ती छोटी रिसेप्शनला नेतात ती सोनेरी पर्स. क पाटांचा कारखाना, देवघरे चाळ हे सर्व विसने थापा मारल्या आहेत हे इशाला कधी कळेल. घरात देवघर व कपाटाकडे बघि तल्यावर.
हिच्या वयाच्या मुली आता परी क्षा सबमिशन आटोपत आहेत.
आज इआई म्हणाली की चहा झालाय..
आज इआई म्हणाली की चहा झालाय...वाढू का? हे कसलं मराठी ह्यांचं ? >>>>> हि वाढते आणि ती राधिका मांडते ..........ह्य ह्य ह्य
चाळ नावावरून शोधली एक वेळ ठीक
चाळ नावावरून शोधली एक वेळ ठीक आहे पण कपाटांचा कारखाना हि काय खूण होऊ शकते का ठिकाण शोधायला ? त्या बिपिनचं खोटं बोलणं किती ओब्वियस होतं, सगळं कसं फोडून सांगितलं त्याने मी कसा खोटं बोललो ते.
नशीब पेपरची लाईन टाकणारा मुलगा माहीत्ये का नाही विचारत फिरलं ईबाळ
आज इआई म्हणाली की चहा झालाय..
आज इआई म्हणाली की चहा झालाय...वाढू का? >>
अरे देवा...स्क्रिप्ट मधे चुकीचं लिहिलं असेल तर कलाकार दे सुधारुन बोलु शकत नाहीत का ?
निदान गार्गी फुलें कडुन तरी ही अपेक्षा नव्हती
ते इशापेक्षा प्रेक्षकांना
ते इशापेक्षा प्रेक्षकांना कळायला होतं की विसं ने कशा थापा 'रचल्या' ते.....!!!
पण काल विसं ने हात धरुन चल म्हटल्यावर ईशाने बरा अभिनय केला....!!
झेंडे मस्त! ईशाला कशी संपवायची तेव्हढं फक्त सांग म्हणे!
मला "राझी" तलं तिच्या ट्रेनरचं वाक्य आठवलं.. " जब तुम्हे लगे की तुम्हारा राज खुल रहा है...तो समझ लो खुल चुका है !"
कालच्या स्पॉयलर वरून कळलं..
कालच्या स्पॉयलर वरून कळलं.. बाळ आणखी एकदा भोकाड पसरणार आहे .
कपाटांचा कारखाना, देवघरे चाळ
कपाटांचा कारखाना, देवघरे चाळ हे सर्व विसने थापा मारल्या आहेत हे इशाला कधी कळेल. घरात देवघर व कपाटाकडे बघितल्यावर.>>>>>
हो तेव्हाच कळेल पण ती यांकडे केव्हा बघेल तर जेव्हा ई आई ओरडून विचारेल की अगं ईशा चहा वाढू का?... या प्रश्नावर ती विचार करेल की जर बिपीन तुलसी साड़ी सेंटर वस्तु बघून सांगू शकतो, आईला प्यायचा चहा वाढावा वाटतो तर देवघर आणि कपाट बघून सर्र्रांना देवघरे चाळ आणि कपाटाचा कारखाना असं सुचले असेल...
..... वास्तविक ई आईचे चहा वाढणे आणि तुलसी साड़ी सेंटर बीप्याची थाप यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही... पण तरीही वडाची साल पिंपळाला लावली की समस्त जनता लॉजिक शोधकार्य सुरू करते.. सहाजिकच tpr चा trp वाढीस मदत होते..
माझ्या माहितीप्रमाणे
माझ्या माहितीप्रमाणे माहीमच्या पुढे रिक्षा नसून टँक्सी असते तरीसुध्दा काल महालक्ष्मीला बाळ चालताना रिक्षा होती. >>> तेच तर UP .....
गुगल मँपची सोय असताना हे बाळ चालत सगळ्यांना विचारत होत. >>>>>
महालक्ष्मीला असलेली चाळ जर एखादी व्यक्ती गिरगाव आणि अंधेरीला ( पवई -- तुंगा गाव -- चांदिवली त्रिकोणात) शोधेल तर गुगल मॅप बापडा काय मदत करेल? असा यूजर नशिबी आल्याचे सहन न होऊन समस्त गूगल-मॅप-स्टाफ स्वखर्चाने हेलिकॉप्टर राईड घेऊन नायगार्यात उड्या घेईल.
चहा वाढणे, घोटभर पोळी >>>>>
बोलतील, काही नेम नाही. वाटीभर केशर, थेंबभर श्रीखंडही म्हणतील. ऐकणार्याची मानसिक ताकद हवी पचवायची.
भावेंना रोमँटिक थ्रिलर सांगितले तसे गार्गी फुलेंना रोमँटिक कॉमेडी प्रकारची सिरीयल सांगितले असेल. त्या करतायत आपल्या कॉमेडी जिवेभावे.
परवा काय तर बाबांनी सकाळी बटाटे आणलेत तुला काचर्या आवडतात म्हणून. चाखून बघ. जसे बटाटे नव्हे शहामृगाचे अंडे आणलेय लेकीसाठी.
आम्ही डोळे उघडायला उशीर झाला तर पटकन म्हणून काचर्याच करतो की डब्याला.
त्या बंद खोलीचं रहस्य.... चहयेद्या मधे समजलं. लोल... टाॅयलेट असेल म्हणे. >>>
@ मेधावि, तेही इथलेच आहे. बहुतेक अमाच म्हणाल्या होत्या, मला नक्की आठवत नाही, विस खोलीत जातो ते वॉशरूम ब्रेकसारखे वाटते. ते लोकही इथून घेतात म्हणजे??
त्या ईशाला हो आणि का असे दोनच शब्दांचे वाक्य असले तरीही --- हो. का? // हो? का? // हो का? याचा उच्चार आणि अर्थही वेगळा असतो सांगा प्लीज कुणीतरी.
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/BwTmms_l4_0/?utm_source=ig_share_sheet&igshi...
नवीन प्रोमो ,हा काय आता
नवीन प्रोमो ,हा काय आता भासआभासाचा खेळ चालू होणार का?
@ ईशा चाळ शोधणे मिशन एपिसोड
@ ईशा चाळ शोधणे मिशन एपिसोड --
शोधू मी अता कुठे गजाची चाळ
कोणी ना दावी मार्गही, मजला ऽऽऽऽ
होती महालक्ष्मीला स्टेशन बाहेर
कपाटे हो ऽऽ बनती जिथे
आता बाई सापडेना झाला कहर
फिरते मी ऽऽ तिथल्या तिथे ऽऽ
काका हा काही सांगेना, मजला ऽऽऽऽ
शोधिल्या मी गिरगावी उंच चाळी *
पुसिले मी ऽऽ चार जणा
फिरे उन्हात ही निमकर बाळी
दया नाही ऽऽ आली कुणा ऽऽ
चाळ न ऐशी सांगती, मजला ऽऽऽऽ
शोधिण्या मी गेले मग बैठ्या चाळी **
पोचले हो ऽऽ अंधेरीला
महालक्ष्मी पुसिते मी भारी भोळी
फिरते परि ऽऽ पवईला
चाळ न-मिळेहो येथेही, मजला ऽऽऽऽ
फिरले मी वेड्यापरि रानोमाळी
रहेजा-विहारी ऽऽ गे तीनदा
चांदिवली जाणे मग आले भाळी
त्याच जागी ऽऽ गेले कैकदा
पाट्या बँक्वेटच्या हासती, मजला ऽऽऽऽ
शोधण्याचा आव आणिला मी भारी
बघणारे ऽऽ हसती गाली
पसाभर अक्कल ना कोणी वापरी
महालक्ष्मी ऽऽ फिरे बबली
प्रेक्षक हो ऑटो पाहुनि, थिजला ऽऽऽऽ ***
शोधू मी अता कुठे गजाची चाळ
कोणी ना दावी मार्गही मजला ऽऽऽऽ
तळटीप --
* ईशाने तिला असलेल्या माहितीवरून चाळ महालक्ष्मी एरिआत शोधणे अपेक्षित होते. ती मुंबईत जिथे अजून बहुमजली जुन्या चाळी अस्तित्वात आहेत तिथे गिरगावात शोधत होती. महालक्ष्मीला नव्हे.
** नंतर ती मुंबईत जिथे जुन्या बैठ्या चाळी अस्तित्वात आहेत तिथे शोधत होती. अंधेरीला, महालक्ष्मीला नव्हे.
*** ईशाच्या संवादावरून ती महालक्ष्मी एरिआतच शोधत होती !! आणि तिच्या मागून-पुढून ऑटोरिक्षा धावत होत्या. ज्या महालक्ष्मी एरिआत नसतात. त्यांची वाहतूक मर्यादा वांद्रे येथे संपते.
मूळच्या सुंदर गाण्याची वाट लावलेली ज्यांना आवडणार नाही त्यांची मी आधीच क्षमा मागते.
भले शाब्बास कारवी !! एक नंबर
भले शाब्बास कारवी !! एक नंबर ..अफलातून जमलंय विडंबन ! घे _/\_ घे
कारवी...जबरदस्त..!!
कारवी...जबरदस्त..!!

@कारवी - धमाल विडंबन... मी
@कारवी - धमाल विडंबन... मी सागर कारंडेच्या आवाजात इमाजीन करून बघितलं!
गुगल मँपची सोय असताना हे बाळ
गुगल मँपची सोय असताना हे बाळ चालत सगळ्यांना विचारत होत. >>>>>
महालक्ष्मीला असलेली चाळ जर एखादी व्यक्ती गिरगाव आणि अंधेरीला ( पवई -- तुंगा गाव -- चांदिवली त्रिकोणात) शोधेल तर गुगल मॅप बापडा काय मदत करेल? असा यूजर नशिबी आल्याचे सहन न होऊन समस्त गूगल-मॅप-स्टाफ स्वखर्चाने हेलिकॉप्टर राईड घेऊन नायगार्यात उड्या घेईल. >>>> ह्य ह्य ह्य
भले शाब्बास कारवी !! एक नंबर
भले शाब्बास कारवी !! एक नंबर ..अफलातून जमलंय विडंबन ! घे _/\_ घे +११११११
कारवी.....विडंबन अफलातून.....
कारवी.....विडंबन अफलातून......गाऊनही पाहिल..मस्त.
नेहमीच्या पिसं सदस्यांना
अज्ञातवासी, Ajnabi स्वागत...
UP गायलत पण... !!
थँक्स कारवीजी,
थँक्स कारवीजी,
झीम च्या FB पेजवर या सिरीयल चे विविध प्रोमो बघून लाखोल्या वाहिल्या मात्र 'कानाला खडे' मध्ये राखेच्या मधील मुले आली होती त्या एपिसोडचे कौतुक केले , याची दाखल घेऊन चक्क त्यांनी मला 'टॉप फॅन' ची पदवी बहाल केली
Pages