Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 31 January, 2019 - 06:45
तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )
कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!
हा तिसरा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
असंही दाखवतील इशाला ऑलरेडी
असंही दाखवतील इशाला ऑलरेडी सर्व माहीतेय म्हणून बदला घ्यायला तिनेच सर्व डाव रचला, मुद्दाम तिने बावळटपणाचं नाटक केलं वगैरे.
एक शक्यता.. इशा दादासाहेब आणि
एक शक्यता.. इशा दादासाहेब आणि कोणाची तरी मुलगी असेल. जन्मआईने इशा खरच बाळ असताना देवळात सोडलं असेल. निमकरांना सापडली आणि दत्तक घेतली.
2020 च्या पुरस्कारात बक्षीस
2020 च्या पुरस्कारात बक्षीस म्हणून केडीला झी स्कूलच्या शाळेत इयत्ता पहिलीत फुकट अॅडमिशन देतील.
म्हणजे काय, तर ----
म्हणजे काय, तर ---- कलाकारांनी वय विसरून रोल घ्यायचे, पात्रांनी वय विसरून उद्योग करायचे आणि लोकांनी आपले वय+ त्यासोबत आलेले अनुभव, शहाणपण, तर्कशुद्धता विसरून बघायचे >>>
बाय द वे विक्याला टायकून कोठून केले एकदम? इतके दिवस सरंजामे कं च्या मधे हस्तक्षेप न केल्याने व ऑफिस मधल्या केबिन मधे बसून ईशाला फोन फिरवत बसल्याने इतरांना काम करायल वेळ मिळाला. तसेच ईशा ते प्लॅण्ट्स मर्ज करणे वगैरे फंदात न पडता कपाटाचे दुकान व खोटे बोलण्याचे क्लासेस वगैरे करत बसल्याने कंपनीचे काम सुरळीत सुरू राहिले. कारण इतरांनाही आपापली कामे बाजूला ठेवून हॉलवे मधे उभे राहून यांचे संवाद ऐका वगैरे प्रकार करावे लागले नाहीत. उत्पादकता वाढली.
म्हणून बेस्ट बिझिनेस टायकून.
तो परवाचा देवी आई परात एपिसोड
तो परवाचा देवी आई परात एपिसोड : इशा खांबा ला टेकून रड त असते. हे सर्व माझ्याबरोबर का झाले का का का असा रडतानाच संवाद आहे. त्यात एका पॉज नंतर ती का का का म्हणते तेव्हा तिचा आवा ज अगदी खरखरीत नेक्स्ट लेव्हल आला आहे. स्वरयंत्र नक्की धोक्यात आहे. स्क्रीनिन्गची गरज आहे. झीवाल्यांना कळक ळीची विनंती.
नंदु आणि बाळ half sisters. हे
नंदु आणि बाळ half sisters. हे दाखवु शकतात.>>>> मन्या ऽ असेल असेल, त्यांच्या शब्दकोशात हाफ सिस्टर म्हणजे सख्खी बहीण असं असेल का....
काही प्रमाण, संहिता, नियमावली, सराव, असला काही विचारच करत नाहीत का हे लोकं!!
गेला बाजार स्क्रिप्ट संपादन, टेक- रिटेक असं पण नाही करत...
नुसत्या पाट्या टाकायचं काम चालू आहे
कालच्या एपिसोडची summary द्या
कालच्या एपिसोडची summary द्या ना कोणीतरी
नवीन प्रोमोनुसार फायनली
नवीन प्रोमोनुसार फायनली विक्या बंद खोलीचा दरवाजा उघडतो आणि कुणालाही माहित नाही असा पडद्यामागचा नंदूचा फोटो दाखवतो.तो बघून बाळ चक्कर येऊन खाली पडते.
म्हणजे बाळाला परातीत दिसलेला चेहरा नंदूचा आहे हे कळाव म्हणून इतके दिवस खोली बंद होती.
बाळाला रात्री पडलेल्या
बाळाला रात्री पडलेल्या स्वप्नात नंदूताई दिसते,ती दचकून जागी होते,बाबाबाबी पाणी देतात.इकडे झेंडे परत बाळाला मारण्याच बोलतो तर विक्या म्हणतो की माझ बाळावर प्रेम आहे(कालपर्यंत याला तिला एक लगावून द्यावीशी वाटत होती,आता प्रेम)
असो,मग बाळ सकाळी उठून त्या परातीयल्या चेहर्याबद्दल बाबीला(पुष्पा) सांगून तो सुंदर चेहरा माझ्या एखिद्या आत्या,मावशी वगैरेचा होता का अस विचारते ,विक्याला बाबाऔचा फोन येतो बाळ परत आल पण आजारी आहे.तो आता आज येणार आहे.
प्रीकँपने बॉम्ब टाकला
बाळ विचारत बाबीला तिची कोणी चुलत,काके,मामे बहीण आहे का विचारते.बाबीच्यि हातातला लिबूसरबताचा ग्लास खाली पडतो(सगळ सरबत वाया)
असो,मग ती सांगते,बाळाला,तुला एक सख्खी बहीण आहे.
विक्या तिला बाळाला मनवायला घरी आलेला आहे.
तुला एक सख्खी बहीण आहे.>> ए
तुला एक सख्खी बहीण आहे.>> ए काहीही चाललंय. आणि "आहे" म्हणजे हरवलीय की काय??
तमाम tpr च्या प्रेक्षकांना
तमाम tpr च्या प्रेक्षकांना नंदूच्या गळ्यातील तो जगप्रसिद्ध ऐतिहासिक तन्मणी ओळखता आला...
पण बाळाला ओळखता आला नाही..
कैच्याकै
आता स्टोरी फास्ट धावेल कदाचित् नंदू विकू च्या मुलाखती नुसार सुपर से भी उपर फास्ट होईल कथानक..
पण आपल्या बाळाला असे झेपेल का..
अगदीच इतर कलाकारांसमोर ऑड मॅन आउट आहे...
अब तो सुधर जा बेबी!!!!
नंदू , निमकरांची मुलगी म्हणजे
नंदू , निमकरांची मुलगी म्हणजे जरा अतिच हां . बाळच त्यांची मुलगी बरोबर वाटते
बंद खोलीत फक्त नंदूचा फोटो ???
बादवे , नंदूचा फोटो साक्षात गूगलकडे ही नसावा ??
या लोकाना अक्कल नाही शोधायची पण मिडिया पाळंमुळं खणून काढते की .
विकिशाच्या लग्नात त्यानी स्पेशल स्टोरीज नाही का बनवल्या , टीव्ही आणि पेपरात .
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/BwbFYv4lMun/?utm_source=ig_share_sheet&igshi...
new promo
अरे पण रानं जरी ईबाळाची सख्खि
अरे पण रानं जरी ईबाळाची सख्खि बहिण असेल तर तिचा नवरा माहीत हवा ना ईआई-बाबांना.
म्हणजे काय, तर ----
आणि वय वय काय लावलय मंडळी? ते म्हणालेत ना वय विसरायला लावणारी कहाणी.....म्हणजे काय, तर ---- कलाकारांनी वय विसरून रोल घ्यायचे, पात्रांनी वय विसरून उद्योग करायचे आणि लोकांनी आपले वय+ त्यासोबत आलेले अनुभव, शहाणपण, तर्कशुद्धता विसरून बघायचे >>> Lol >>> +२२२२२२२२२२२२२२ ... थोड्या दिवसाने आपणच विसरणार
तमाम tpr च्या प्रेक्षकांना नंदूच्या गळ्यातील तो जगप्रसिद्ध ऐतिहासिक तन्मणी ओळखता आला...
पण बाळाला ओळखता आला नाही..
कैच्याकै >>>>>>>>>>>>>>> हो ना
अरे पण रानं जरी ईबाळाची सख्खि बहिण असेल तर तिचा नवरा माहीत हवा ना ईआई-बाबांना. >>>>> केड्या च डो क खुप वेगळ आहे... तो ह्यात पण आप ला अ ती शहाणपणा दाख्वेल
इकडे झेंडे परत बाळाला मारण्याच बोलतो तर विक्या म्हणतो की माझ बाळावर प्रेम आहे(कालपर्यंत याला तिला एक लगावून द्यावीशी वाटत होती,आता प्रेम) >>>>>> अचानक प्रेमाची उपरती झालीय.... केड्याला
नवीन प्रोमोनुसार फायनली विक्या बंद खोलीचा दरवाजा उघडतो आणि कुणालाही माहित नाही असा पडद्यामागचा नंदूचा फोटो दाखवतो.तो बघून बाळ चक्कर येऊन खाली पडते.
म्हणजे बाळाला परातीत दिसलेला चेहरा नंदूचा आहे हे कळाव म्हणून इतके दिवस खोली बंद होती. >>>>> अख्या जगाला जे माही त होते.... ते फक्त ईशा बा ळाला दाखवायला केड्याने क्रीयेट केलेल सस्पेन्स......
केड्या कुठे फेड्शील ही पापे........
मायबोलीकरांनो,केड्याने एक
मायबोलीकरांनो,केड्याने एक हिंट आपल्याला दिली आहे की तो वयाच गणित कस मांडत असेल
बघा.आच आपल्या कँलेंडरात चैत्रपौर्णिमा आहे ,बरोबर
पण काल बाबी निमकरांना म्हणाली की आता अष्टमी सुरू होत आहे म्हणून बाळाला स्वप्न पडत आहेत,त्यामुळे ते आज पूजि करणार आहेत.
म्हणजे आपली जेव्हा पौर्णिमा तेव्हा केड्याची अष्टमी,म्हणजे सात दिवसांच्या फरकाने तो गणित मांडतो ,आता आपल्याला पडलेल वयाच कोड ,या फरकाने सुटू शकेल
म्हणतात ना चोरच चोरी केल्याचा एखादातरी पुरावा ठेवतो अड्गदी तसच आहे केड्याच,
प्राजक्ता_शिरीन.....।नंदू ही जर बिछडी हुई बेबी असेल तर बाबाबाबींना माहित नसणार तिच पुढे काय झाल.
नंदू ही जर बिछडी हुई बेबी>>>>
नंदू ही जर बिछडी हुई बेबी>>>>> मग निमकर बाबाई च वय काय??
इषा २१-२२ ची. तिच्या जन्माच्या आधी नंदु मेली २१-२२ व्या वयात.
मग निमकर बाबाई च वय काय??
मला वाटतं, रानं इआई ची सख्खी
मला वाटतं, रानं इआई ची सख्खी बहिण असावी, कदाचित पिंकी ची जुळी जी दत्तक गेली दादासाहेबांना
ईशा बाळाला सख्खी बहीण
ईशा बाळाला सख्खी बहीण असण्याचा ई आईचा डायलॉग हा शत प्रतिशत डोंगर पोखरून उंदीर काढणारा असणार आहे..
याची नक्की खात्री...
एव्हाना केड्याच्या लेखणीची धाव ओळखता यायलाच हवी, नाही का??
पिंकीची जुळी+++++++
पिंकीची जुळी++++++++1111111111++++++
हो,बाबी बाळ सिरियस होत आहे अस लक्षात आल्यावर म्हणेल"अग बाई,मी मजा करत होते"
हो काहीही शक्य आहे केड्या
हो काहीही शक्य आहे केड्या च्या बाबतीत... आणि तसंही ईशाची आई नुसती .. "सक्खी बहिण.." असं पुटपुटली .....कुणाची ते थोडीच सांगितलंय....मे बी...ईशाच्या बाबांची ही बहिण असू शकते........ लहान!
:माबोकरांच्या अंदाजानुसार
ईशाने नक्की कोणाशी लग्न केले आहे याची शक्यता - - - - - - - - - -
(1)20 वर्षाने मोठा असलेल्या प्रौढाशी
(2)गजा मामा (आसांचे बंधुराज)
(3)गजेंद्र मौसाजी (नंदू पिंकी जुळ्या बहिणी)
(4)विक्रांत फूफा (ई बाबांची नंदू बहीण)
आवराच.
आवराच.
हि सिरियल समोर सुरू असली तरी मला रजिस्टर होत नाही आईशप्पत
आंबटगोड.........बाळाने
आंबटगोड.........बाळाने आत्याबद्दल विचारून झाल आहे त्यावर तर पुष्पाने टॉन्ट पण मारला की तो सुंदर होता ना मग तुझ्या बाबांकडून कोणीच नसणार ,जसकाही पुष्पाच माहेर म्हणजे अप्सरांची खाणच आहे.
नंतर बाळ विचारणार आहे की माझी कोणी बहीण आहे का तेव्हा पुष्पा नाहक लिंबूसरबत सांडून मग बॉम्ब फेकणार आहे जो फुस्का आपटीबार निघणार आहे.
पण मला अजूनही वाटत आहे की विक्या माईंडगेम्स खेळत आहे ज्यात त्याला आता झेंडे पण नको आहे.प्रेम वगैरे आहे हे ही खोटच असाव
सोन्याच अंड देणारी कोंबडी अशी हा झेंडे मारायला निघाल्यावर विक्याने प्रेमाची गुगली टाकली
माझ्या आठवणीनुसार काही दिवसांपूर्वी झेंडे विक्याला म्हणाला होता की ती खोली बाळाने उघडली तर आपण संपलो,आता संपण्यासारख त्या खोलीमध्ये काहीच नाही.विक्याने खोली मँनेज केली आहे.
त्याचा कोणतरी जबरदस्त खबरी आहे जो झेंडेलाही माहित नाही ,त्याच्याकडून विक्याला कळल असाव की बाळाला सगळ माहित झाल आहे
सुभा म्हणत आहे ना की गजा पाटील नालायक आहे आणि तुम्हाला धक्के बसणार आहेत.
विक्याने खोली मँनेज केली आहे.
विक्याने खोली मँनेज केली आहे.
त्याचा कोणतरी जबरदस्त खबरी आहे जो झेंडेलाही माहित नाही ,त्याच्याकडून विक्याला कळल असाव की बाळाला सगळ माहित झाल आहे>>>>
एवढी धाव नाही ओ केड्याची...
त्या खोलीबद्दल झेंडे असं काही म्हणालाय ता केड्या इसरलंय..
किंवा संवाद लेखिका आणि केड्या यांच्यात संवाद नाही अशी possibility आहे.
पण तरी तुमची थिअरी केड्याने वाचली आणि आता तो त्याप्रमाणे कथा मॅनेज करेल अशी अपेक्षा करूया
बाळाने आत्याबद्दल विचारून झाल
बाळाने आत्याबद्दल विचारून झाल आहे त्यावर तर पुष्पाने टॉन्ट पण मारला की तो सुंदर होता ना मग तुझ्या बाबांकडून कोणीच नसणार ,जसकाही पुष्पाच माहेर म्हणजे अप्सरांची खाणच आहे.>>>> म्हणून तर ईशा च्या आईने अप्सरा आली वर नृत्याविष्कार केला होता
काल बाबी निमकरांना म्हणाली की
काल बाबी निमकरांना म्हणाली की आता अष्टमी सुरू होत आहे म्हणून बाळाला स्वप्न पडत आहेत,त्यामुळे ते आज पूजि करणार आहेत. >>> सुरु व्हायला अष्टमी आहे की श्रावण ???
लोल सगळ्याच कमेंट्स!
सर्व प्रतिक्रिया झकाssssssस!
सर्व प्रतिक्रिया झकाssssssस!
इथे मालिकेची पिसे काढने नाही तर मालिका सोलणे चालू आहे.
सुटलेत सगळेच
सुटलेत सगळेच
Pages