तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भयंकर स्लो होता कालचा एपि.. मी किती वेळा पुढे ढकलत होते तरी ईबाळाचं खुर्ची ऊठबस प्रकरणच चाललं होतं Lol

पुन्हा धीर एकवटून एक एपिसोड पाहिला. त्यापेक्षा एखाद्या तुलसी साडी सेन्टर मधे अर्धा तास बसून "यातला मोरपंखी कलर मधे दाखवा" टाइप संवाद ऐकत बसलो तरी कमी बोअर होईल.

बिपिन चा खोटे बोलण्याचा क्लास पाहताना इतका वेळ समोरच बसलेला बिपिन तुलसी साडी सेण्टर मधे जाउन आला हे त्याने तिथल्या तिथे "बनवले?" हे ती इतक्या अचंब्याने विचारते की सरच काय पण कोणीही तिला सहज गंडवू शकेल असे वाटते. अजूनही ते स्लो मो स्वगत तसेच सुरू आहे.

इशाचं पात्र आधीच मंद आणि बावळ ट .. शितु बरोबरच्या मुलाखतीत सुभापण किती वेळा म्हणला की इशा ही एक बावळट मुलगी दाखवली आहे.
त्याला कदाचित हा अनुभवाने झालेला साक्षात्कार असावा

तुपारे.. एक आगळीवेगळी चमत्कृती,
खास देवी आई ब्रँड ईशा निमकर पुरस्कृत,
मॅजिक शो..
आजपासून खास तुमच्यासाठी घेऊन येत आहोत;
अनोखे, कधीही न कल्पिलेले जादूचे प्रयोग;
रोज रात्री साडे आठ वाजता,
आपल्या आवडत्या
तुला
पाहते रे या कार्यक्रमात..
पाहत रहा रे झी मराठी
माझ्यातर्फे झी म साठी खास जाहिरात

काल शितुचा हसरा चेहरा बघून खूप बरं वाटल.
पण खरच जादूचे प्रयोग चालू केले आहेत.ते ही बरोबरच आहे,कारण शेवटी बाळालाच दाखवायचे आहेत ना.
पण अचानक विक्याला सावली दिसते,पैंजणाचा आवाज येतो म्हणजे कैच्याकैच.
निदान बँकग्राउंडला गाणी तरी लावायची
कही दीप जले किंवा गुमनाम है कोई,मेरे नैना ,लताचा आवाज तरी ऐकता आला असता.
हो पण ही गाणी ऐकल्यावर वहिदा रहमान,हेमामालिनी या डोळ्यासमोर येतात.
इथे मात्र शितु नंतर बाळ येणार.
पण लताच्या आवाजामुळे काही फरक पडणार नाही.

मालिकेच्या जनरल वकुबाच्या मानाने कालचे लेखन खरेतर बरे होते. चांगल्या वकुबाच्या नटीने स्वगताचे सोने केले असते. खरेतर जीवनात ली पहिली व सर्वात मोठी फसवणूक. पण एकदम थंडी डायलॉग डिलिव्हरी व चेहरा तर काय विचारू नका. रडायचे वेडा वाकडा केला कि झाले.
आवाज ऐकवत नाही. किती सिगरीटी पिते दिवसाला?! त्यामानाने देवी आईची बाई पण बरा अभिनय करते.

जयदीप व आईसाहेब आले पण ही गायब म्हटल्यावर ते ही गायब! ती परत येते तेव्हा आईबाबाच असतात घरात.

ते गाणे खरेच छान आहे कोणत्या सिनेमातले आहे? अजय अतूलचे आहे का?

इशाला दिवस गेले असतील का? जाड दिसत आहे म्हणून शंका आली.

अजय अतूलचे आहे का? >>हो
ते गाणे खरेच छान आहे कोणत्या सिनेमातले आहे? >> सिनेमा: "जाऊ द्या ना बाळासाहेब "

तुपारे.. एक आगळीवेगळी चमत्कृती,
खास देवी आई ब्रँड ईशा निमकर पुरस्कृत,
मॅजिक शो.. >>>>> ईशा निमकर नाही हो, 'बाबा दातार' पुरस्कृत कार्यक्रम आहे ना हा. परवाच कोणी तरी ही माहिती दिली होती की दातारांनी या सिरियलसाठी फायनान्स दिला आहे

आवाज ऐकवत नाही. किती सिगरीटी पिते दिवसाला?>> सिगरेटी पिते आणि घश्यातल्या घासण्या पण बदलते बहुतेक Uhoh
त्यामानाने देवी आईची बाई पण बरा अभिनय करते.>> Rofl
कालचा हि भाग पाहिला नाहीये .. पण फार फरक पडला नसावा असं वाटतं . कोणाला जमलं तर plz लिहा शॉर्टमध्ये काही महत्वाच्या असतील घडामोडी तर ...

ईशा निमकर नाही हो, 'बाबा दातार' पुरस्कृत कार्यक्रम आहे ना हा>>>>>>> तेच ते ओ
Biggrin Biggrin Biggrin :खोखो
काहीही म्हणा एकच चेहरा दिसणार आहे कडक इस्त्री केलेला... कितीही भावना ओता, टिंगल टवाळी करा.. काssssही फरक नाही पडणार....
काल मी तुपारे वर केलेलं सोटी पोरगी पाहिलं..
... मस्तच... आपलेच विचार मांडलेत
Lol Lol

जयदीप व आईसाहेब आले पण ही गायब म्हटल्यावर ते ही गायब! ती परत येते तेव्हा आईबाबाच असतात घरात.>> खरच ना.. इथे सून कुठे न सांगता गेलिये तर काळजीने नक्कीच थांबायला पाहिजे होत.. पण मग ती देवी आई आणि आईसाहेब आमने सामने आल्या असत्या.. मुलगी हरवली आहे..पोलिसात जायची वेळ आलीये तरी ईशाच्या आईला डायरेक्टर ने रडवल काही नाही.. नाहितर कोणत्या तरी सिरीयल मध्ये सारखी आई पदर लावायची डोळ्याला...

चांगल्या वकुबाच्या नटीने स्वगताचे सोने केले असते. खरेतर जीवनात ली पहिली व सर्वात मोठी फसवणूक. पण एकदम थंडी डायलॉग डिलिव्हरी व चेहरा तर काय विचारू नका. रडायचे वेडा वाकडा केला कि झाले.>>> तेजश्री प्रधान आठवली मला..थोडी ओवर ऐक्टिंग करते..पण ऐक्टिंग तरी करते ती.. कालचा भाग तसा पिक वर जायला हवा होता.. पण बाळा कडे सोन्याची माती करण्याची अगम्य ताकद आहे त्याला कोणीच काही करु शकत नाही

खरंच फोरहँड चे फटके असतात प्रतिक्रिया...!!! >>>
अनुराज - ते फारएण्ड आहे.>>>>
Sorry... घाईत लिहिताना टायपिंग मिस्टेक झाली.

नाही, असं पैसे देऊन घेतलं असतं तर तिला लगेच दुसरी फिल्म मिळाली नसती. परवाच वाचलं की एका मल्याळम फिल्मचा रिमेक असलेल्या 'कोल्हापूर डायरीज' मध्ये ती काम करते आहे. >> एकदा नाव झालं तर मग कुठेपन घेतात.
शेवटी आपल्याकडे असच तर चालत, आणि बाळाला सगळ्यांनी बघितलेलं आहे कस का होईना नाव झालय तीच मग घेणारच की Happy

शिल्पाची एन्ट्री तेवीसला आहे, कारण जीवलगा बावीसला सुरु होतंय. ते प्रवाहवाले पण सगळ्या सिरीयल्स पोस्टपोन्ड करतात आधी गाजावाजा करत एक तारीख डीक्लेअर करतात, मग पुढे ढकलतात ऐनवेळी.

काल शितुचा हसरा चेहरा बघून खूप बरं वाटल. >>>>>>>> +++++++१११११११

मालिकेच्या जनरल वकुबाच्या मानाने कालचे लेखन खरेतर बरे होते. चांगल्या वकुबाच्या नटीने स्वगताचे सोने केले असते. >>>>>>> अगदी अगदी. हिच्यापेक्षा जुही चावलाच्या आवाजातल स्वगत ऐकवल असत.

शितु बरोबरच्या मुलाखतीत सुभापण किती वेळा म्हणला की इशा ही एक बावळट मुलगी दाखवली आहे. >>>>>>> एकीकडे ईशाला बावळट, आत्मविश्वास नसलेली मुलगी दाखवली आहे, तर दुसरीकडे तीच ईशा बिनधास्तपणे विस प्रपोज करते, प्रेमात पुढाकार घेते! Uhoh

इशाला दिवस गेले असतील का? >>>>>>>> ती जोगतीणबाई ईशा अचानक चक्कर येऊन पडली अस म्हणाली. मेबी तसच असेल. म्हणजे विसला प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आणखी एक प्लॅन मिळाला.

2 3 वाक्य च होती काल रुपाली ला..पण देहबोली नेत्र पल्लवी यातून किती सहज अभिनय करते ती... >>>>>>>>> ++++++++२२२२२२२२२

नाहितर कोणत्या तरी सिरीयल मध्ये सारखी आई पदर लावायची डोळ्याला... >>>>>>>> स्टार प्रवाहवरची 'साथ दे तु मला' ह्याच उत्तम उदाहरण आहे.

आईसाहेब म्हणतायत की ईशा नाही आली तर विस अन्न पाणी त्याग करेल म्हणे. तो कसला अन्न पाणी त्याग करतोय, चान्गला खाऊन पिऊन डाराडूर झोपला असेल.

तुपारे वर केलेलं सोटी पोरगी पाहिलं.. >>>>>>>> सुषमाताई, सोटी पोरगी म्हणजे? Uhoh

पण अचानक विक्याला सावली दिसते,पैंजणाचा आवाज येतो म्हणजे कैच्याकैच. >>>>>>> सॉन्या असेल ती. तिचा डाव असेल.

कालचा हि भाग पाहिला नाहीये .. पण फार फरक पडला नसावा असं वाटतं . कोणाला जमलं तर plz लिहा शॉर्टमध्ये काही महत्वाच्या असतील घडामोडी तर ... >>>>>>>> जोगतीणबाई ईशाला नन्दू दाखवते. ईशाला फसवणुकीचा जबर धक्का बसून तिला ताप चढतो. जोगतीणबाई तिला घरी आणते एवढेच दाखवलेय. काल विस नाही दिसला एपिसोडमध्ये.

आता मेबी अस दाखवतील, ईशाला झोपेत सगळा फ्लॅशबॅक दिसेल ( बापरे एवढ मोठ स्वप्न! कलन्क चित्रपटाचा रेकॉर्ड मोडेल. Proud ) तिच्या सगळया प्रश्नान्ची उत्तरे तिला आणि प्रेक्षकान्नाही मिळतील. फ्लॅशबॅक बहुधा सोमवारी किव्वा तेवीस तारखेला दाखवतील.

ते प्रवाहवाले पण सगळ्या सिरीयल्स पोस्टपोन्ड करतात >>>>>>>>> हम्म. ' डॉ. बाबासाहेब आम्बेडकर' बायोपिक सिरियल सुद्दा मे महिन्यात ढकलली. आणखी एक गुरुदेव दत्त म्हणून मालिका येणार होती प्रवाहवर.

नंदिनी बहुतेक बाळाची सख्खी बहिण आहे कारण बाळाला सख्खी बहिण असते .
शेवटी दाखवून दाखवून बाजीगरच केला>>>>>UP अगदी अगदी
अरे कुणीतरी हा वयाचा घोळ थांबवा रे, कोणी संख्या तज्ञ नाहीयेत का आपल्यात. .
ईशा आणि राज नंदिनी यांच्यात सध्याच्या कथानका नुसार किमान 20 वर्षाचे अन्तर असले पाहिजे...
असे असेल तर ईशाची सख्खी बहीण कोण जाणे कोण आहे..

सध्यातरी अस धरुन चालू की नंदू कुंभ के मेले मे आई बाबा से बिछडी हुई वो बेटी है जिसे दादासाहबने अँडॉप्ट किया था.
म्हणजे जयदीप,बाळ आणि नंदूताई भावंड.
विक्याने ताईशी लग्न केल,ताई मेली आणि 10महिन्यांनी लाडक्या बहिणीच्या रुपात आली,आणि मग वर्तमानातल्या जीजूशी लग्न केल
आता सांगा बर,पुष्पा आणि निमकरांच खर वय काय.
दादासाहेबांच वय काय,पहिल्या,दुसर्या बायकोच वय काय
केड्या अरे किती पाप करशील?

अरे कुणीतरी हा वयाचा घोळ थांबवा रे, कोणी संख्या तज्ञ नाहीयेत का आपल्यात. . >>>>>
आता सांगा बर,पुष्पा आणि निमकरांच खर वय काय.
दादासाहेबांच वय काय,पहिल्या,दुसर्या बायकोच वय काय >>>>>

आपल्यात संख्यातज्ज्ञ असून काय उपयोग ? वयाचे गणकयंत्र केड्यांच्या ताब्यात आहे.
अमा नाहीतर फारएण्ड आता फोरहँड सरसावून लिहीतील एखादी पोस्ट वयाचा हिशोब मांडणारी. Happy तेव्हा वाचू.

आणि वय वय काय लावलय मंडळी? ते म्हणालेत ना वय विसरायला लावणारी कहाणी.....
म्हणजे काय, तर ---- कलाकारांनी वय विसरून रोल घ्यायचे, पात्रांनी वय विसरून उद्योग करायचे आणि लोकांनी आपले वय+ त्यासोबत आलेले अनुभव, शहाणपण, तर्कशुद्धता विसरून बघायचे
मग तुमच्या का लक्षात वय फॅक्टर अजून? विसरा बरं मुकाट्याने. सुखी व्हा.

असं कसं वय विसरा!
उदा:
1. येत्या निवडणुकीला या बाळाने voting केलं तर बाळ नक्कीच 18+ आहे.
2. विसने आसा म्हणाल्या त्याप्रमाणे किमान 20-21 वर्ष लग्न केलंच नाही.
3. म्हणजे ईआई-बाबाने 18ते20 वर्षांचा gap घेतला असावा का?

छे,मला तर वाटत आता ह्या
दोघींपैकी ईबाळ दत्तक असावं.(जाऊदे-मरूदेत.एकच कळत नाहिए सुभाने कथा वाचली नव्हती काय,sign करण्याधी.) Angry Angry

Pages