Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 31 January, 2019 - 06:45
तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )
कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!
हा तिसरा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खरवस आला म्हणजे उल्लेख आला.
खरवस आला म्हणजे उल्लेख आला. लाँग शॉटमध्ये सासूबाईंनी भरवला १ चमचा. चमच्यातही दिसला नाही आणि डब्याचाही क्लोजप नाही. >>>
कहर आहे हे!
आता इथे सारखा सारखा खरवस
आता इथे सारखा सारखा खरवस वाचुन करावासाच वाटू लागलाय
पहिल्या पाडव्याला काय खाऊन
पहिल्या पाडव्याला काय खाऊन छाने छाने चेहरा केला विसने माहीत नाही. >>>
हे आत्ता नोटिस केले
गोडगोड रामॅन्टीक सुभ्याचा गजा
गोडगोड रामॅन्टीक सुभ्याचा गजा होणार ह्याची भिती न वाटता आता इशाचा वाढीव अभिनय बघावा लागणार ह्याचीच धास्ती वाटतेय.
तिच्या रिअॅक्शन्स खूपच स्लो असतात. जरा म्हणून स्पार्क नाही पोरीत...अती मेंगळट. नशिबानं मोठा हात दिलाय तर त्याचं सोनं करायचं होतंस ना गं बाये....
गोडगोड रामॅन्टीक सुभ्याचा गजा
गोडगोड रामॅन्टीक सुभ्याचा गजा होणार ह्याची भिती न वाटता आता इशाचा वाढीव अभिनय बघावा लागणार ह्याचीच धास्ती वाटतेय.
तिच्या रिअॅक्शन्स खूपच स्लो असतात. जरा म्हणून स्पार्क नाही पोरीत...अती मेंगळट. नशिबानं मोठा हात दिलाय तर त्याचं सोनं करायचं होतंस ना गं बाये>>>>>मेधावी, एक नंबर पोस्ट....
तिने काल वाढीव काम पण केलेन् हो, काल नाही का आईने लिंबू मिरची आणायला सांगितलेली(मला वाटलं की आता ई आई अमावस्येला लिंबू मिरची वाले उपचार चालू करते की काय) तर या मॅडमनी कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे जादा समान बळंबळंच खरेदी केले...
त्या कागदावरील बातमी (खोटा गजा पाटील वारला) पाहिल्यावर उमगले की याच साठी केला होता जादा खरेदीचा अट्टहास!!!
नेक्स्ट एपी प्रोमो पाहूनच धोक्याची सूचना मिळाली आहे, त्यात बाळ ओठ काढून रडणार असावे..
इशा खरं तर इतरत्र खूप सुंदर
इशा खरं तर इतरत्र खूप सुंदर दिसते. गोड चेहरा, रेशमी केस, गालावरच्या खळ्या फार गोड दिसतात पण एकदा का ती अभिनयासाठी उतरली की सगळ्याचं मातेरं होतं.
>>इशा खरं तर इतरत्र खूप सुंदर
>>इशा खरं तर इतरत्र खूप सुंदर दिसते. गोड चेहरा, रेशमी केस, गालावरच्या खळ्या फार गोड दिसतात पण एकदा का ती अभिनयासाठी उतरली की सगळ्याचं मातेरं होतं.>> +2,3,4,5...

हो ना... त्या पेक्षा मॉडेलिंग केलं तर चालेल जास्त... तिथे घासणीसारख्या आवाजाचा पण प्रश्न सुटेल पण फक्त उंचीत मार खाल्ला...
हो ना... त्या पेक्षा मॉडेलिंग
हो ना... त्या पेक्षा मॉडेलिंग केलं तर चालेल जास्त>>> please..तिची शरीरयष्टी अजिबात मोडलींग सारखी नाही.. हात नाजूक नाही आहेत..फार फार तर जाहिराती मध्ये मॉडल चालली असती.. काहे दिया परदेस वाली पण तशीच होती.. अभिनयात मट्ठ..ती दिसायला तरी सुरेख आहे.. zee वाले अभिनयाची ऑडिशन घेत नाहित का..???
जे ऑलरेडी बाळाला माहित आहे
जे ऑलरेडी बाळाला माहित आहे,केवळ तेच सांगायला जालिंदर ला इतके महिन्यांनतर आणल.very very poor screenplay and writing
ते बाळ तर बघवत नाही.अग माठ,मतदान केंद्रासारख्या ऑफिसमध्ये कळल ना खर नाव तरी दगड तेच तेच विचारत फिरत आहे.
काहे दिया पेक्षा हे इ बाळ
काहे दिया पेक्षा हे इ बाळ काकणभर बरी आहे असं मला वाटत.
ती काहे वाली png च्या जाहिरातीत येते, जर ही प्रभाव पाडत नाही
इशाच्या गोड खळ्या आवडतात फक्त
इशाच्या गोड खळ्या आवडतात फक्त मला पण ती मुलाखत देते तेव्हाही तिचं बोलणं मला जाम पुस्तकी वाटतं, सहजपणा नसतो त्यात. त्यामुळे इशा म्हणून आणि गायत्री म्हणून पुस्तकी बोलते असंच वाटतं मला. फार एकसुरी वाटतं.
काहीही हं!!!
काहीही हं!!!
म्हणे बिझनेस टायकून ऑफ द इयर.... उगीचच जो कंपनीचा कधीच मालक नव्हता, नाहिये, भविष्यात होणार पण नाहिये अशा व्यक्तीला कोण पुरस्कार देईल ओ??... काय प्रकारची डोकी वापरतात कोणास ठाऊक....

गेला बाजार "उत्कृष्ट व्यवस्थापक ऑफ द इयर"... असं काहीतरी नाव द्या ना मग....
खरे पुरस्कार असतात तेव्हा सत्यता पडताळून पाहतात ना..
कैच्याकै डोक्यावर पडलेत सर्व तुपारे..
काल जालिंदरनी बाळाला विचारलं
काल जालिंदरनी बाळाला विचारलं भीती नाही का वाटत तुला इथे एकटीला? मनात म्हणलं बाळानी जगप्रसिद्ध भोकाड पसरलं तर तूच घाबरशील
म्हणे बिझनेस टायकून ऑफ द इयर
म्हणे बिझनेस टायकून ऑफ द इयर >>>> हे म्हणजे राधाक्काला जसे मधे मधे पुरस्कार मिळत असतात तसं झालं. आता बह्हुतेक ईबाळ ते जगप्रसिद्ध भोकाड पसरून ऐन पुरस्कार सोहळ्यात विस हा गजा पाटील असल्याचं उघड करेल.
मनात म्हणलं बाळानी जगप्रसिद्ध
मनात म्हणलं बाळानी जगप्रसिद्ध भोकाड पसरलं तर तूच घाबरशील >>>
आता विक्या व्हिलन निघाल्यामुळे जालिंदर हा एक सद्गुणी व ईशाबद्दल काळजी असलेला मनुष्य आहे असे निष्पन्न झाले आहे का? त्याचे आधीचे वागणे तरी तसेच दाखवते. सध्या ईशाच्या जीवाला धोका इण्डिकेटर गायब दिसतोय. तसेच सरांचे डाएट कंट्रोल वगैरेही.
एचूणातच सिरीअलचे खरे हिरो
एचूणातच सिरीअलचे खरे हिरो देवीआईवाली बाई आणि जालिंदरच आहेत असं ठरलं तर.
आता विक्या व्हिलन निघाल्यामुळे जालिंदर हा एक सद्गुणी व ईशाबद्दल काळजी असलेला मनुष्य आहे असे निष्पन्न झाले आहे का? त्याचे आधीचे वागणे तरी तसेच दाखवते>>हो. खरंच.
सध्या ईशाच्या जीवाला धोका इण्डिकेटर गायब दिसतोय. तसेच सरांचे डाएट कंट्रोल वगैरेही.>> इशाच्या जिवाला धोका झेंडे/विकु कडूनच आहे आता.
डायट कंट्रोल - कसचं काय? परवाच सोनी आणि जयदु सॅन्डविचेस चापत होते परातभर.
विक्यानं मात्र मिठाई इवलीशीच घेतली परवा. जरा बारीक वाटतोय सद्ध्या.
एचूणातच सिरीअलचे खरे हिरो
एचूणातच सिरीअलचे खरे हिरो देवीआईवाली बाई आणि जालिंदरच आहेत असं ठरलं तर. >>>
मनात म्हणलं बाळानी जगप्रसिद्ध
मनात म्हणलं बाळानी जगप्रसिद्ध भोकाड पसरलं तर तूच घाबरशील >>>
बघायला हवा जगप्रसिद्ध भोकाड पसरणे सीन.
कैच्याकाई दाखवतात.. बाळ कधी
कैच्याकाई दाखवतात.. बाळ कधी विनाकारण भोकाड पसरेल हे तसंही कधी सांगता येत नै,आता तर कारणपण मिळालय बाळाला गळा काढायला!
कैच्याकाई दाखवतात.. बाळ कधी
.
कैच्याकाई दाखवतात.. बाळ कधी
कैच्याकाई दाखवतात.. बाळ कधी विनाकारण भोकाड पसरेल हे तसंही कधी सांगता येत नै,आता तर कारणपण मिळालय बाळाला गळा काढायला! >>>>
विक्यानं मात्र मिठाई इवलीशीच
विक्यानं मात्र मिठाई इवलीशीच घेतली परवा>>>>> जबरी निरीक्षण आहे.
बघायला हवा जगप्रसिद्ध भोकाड
बघायला हवा जगप्रसिद्ध भोकाड पसरणे सीन. >>>>>> काल एक नवीन शोध लागला. ईबाळ जगप्रसिद्ध भोकाड पसरताना कित्ती ते गदागदा अन्ग हलवते!
विक्यानं मात्र मिठाई इवलीशीच घेतली परवा >>>>>>>> अगदी अगदी त्या राजेशकडे खून करण्याआधी मात्र हयाने चार चमचे साखर असलेला चहा प्यायला. ह्याचा डायबिटिस सुद्दा खोटा असेल अस वाटतय.
सध्या ईशाच्या जीवाला धोका इण्डिकेटर गायब दिसतोय. तसेच सरांचे डाएट कंट्रोल वगैरेही.> तसाही जालिन्दरकडून ईशाच्या जीवाला कधीच धोका नव्हता. त्याला जर तिला मारायचच असत तर लग्नाआधीच मारुन टाकल असत. त्याला फक्त विसच सीक्रेट सान्गायच होत तिला. म्हणूनच विस आणि झेण्डे त्याला घाबरत होते.
जालिन्दर म्हणतो की त्याने विसला बिझनेसमध्ये पार्टनरशिप दिली, विसने फसवल. इकडे विसने त्याच्या उलट सान्गितल होत.
म्हणे बिझनेस टायकून ऑफ द इयर >>>>>>> पुरस्कार मॅनेज करु शकतो तर मग प्रॉपर्टी का नाही मॅनेज केली विकूने? वीस वर्ष थाम्बून राहयची गरज नव्हती त्याला.
तो झेण्डे नाकातल्या नाकात बोलतो, त्यामुळे त्याचे डायलॉग्स कळतच नाही. प्रीकॅप मध्ये झेण्डे अस काय बोलला, ते ऐकून विस खुप चिडला त्याच्यावर?
झेंडेने विचारल की बाळ कुठल्या
झेंडेने विचारल की बाळ कुठल्या पध्दतीने मेलेल तुला इवडेल म्हणून विक्यि म्हणाला की विलास तोंड सांभाळून बोल ,त्यावर झेंडे म्हणाला की ग ती जिवंत राहिली तर तू राहाणार नाहीस
पण कस काय,बाळाला अगदी कळल तरी तिच्याकडे पुरावे कुठे आहेत,जालिंदर ने सांगितल की आपण भेटायच नाही.हा तरी कशाला भाव खात आहे,
आज इआई म्हणाली की चहा झालाय..
आज इआई म्हणाली की चहा झालाय...वाढू का? हे कसलं मराठी ह्यांचं ?
रिअली?/ कठिण आहे!!
रिअली?/ कठिण आहे!!
जालिन्दर च टोक जोडुन लॉजिक
जालिन्दर च टोक जोडुन लॉजिक साधल्याबद्दल केड्याचे अभिनदन !
मायबोलीकरांनो,माझ्या या
मायबोलीकरांनो,माझ्या या कल्पनेला हसू नका पण बाळ खरच नंदू आणि विक्याचच बाळ नसेल ना.
चहयेद्यामध्ये परत येत आहेत,
चहयेद्यामध्ये परत येत आहेत, कितीवेळा येणार आणखी.
चहयेद्यामध्ये परत येत आहेत,
चहयेद्यामध्ये परत येत आहेत, कितीवेळा येणार आणखी. >>> जेथे विनोद करायचे तेथे अगदी फालतू करतात, आणि सिरीज च्या एपिसोड मधे जेव्हा गंभीर बोलतात तेव्हा हसू आवरत नाही. त्यामुळे तेथे वेगळे काही करण्यापेक्षा एखादा एपिसोडच दाखवा म्हणावं. तो प्रॉफिट लॉस वाला चालेल.
मायबोलीकरांनो,माझ्या या कल्पनेला हसू नका पण बाळ खरच नंदू आणि विक्याचच बाळ नसेल ना. >>> केवळ हसू नका लिहील्याने लोल स्माइली टाकत नाही
पण अशी शक्यता निर्माण झाली आहे का?
Pages