भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

Submitted by भरत. on 18 March, 2019 - 01:23

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.

गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?

तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्‍या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.

सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्‍यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.

राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अ‍ॅपरंटली, इट अ‍ॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.

आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.

दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.

भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?

सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्‍या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्हांंला काहीही समजवून सांगायची किंवा माहिती द्यायची माझी क्षमता नाही. मला क्षमा करा.
आत्ता आकाशवाणी एफेम गोल्डवर बेगम अख्तरच्या आवाजात उर्दू गझल ऐकतोय.

तुम्हांंला काहीही समजवून सांगायची किंवा माहिती द्यायची माझी क्षमता नाही. मला क्षमा करा.
तुम्ही तीच brigedi आणि कम्युनिस्ट लोकांची bhursat मत मांडणार दुसरे काय

भरत.,
काही मुद्द्यांवर प्रतिवाद पुन्हा-

//गेल्य दहा वर्षांत write off केलेल्या कर्जातली ८०% गेल्या पाच व र्षांत केली गेली. ही युपीएच्या काळात दिली होती, हे साळसूद उत्तर पुरेसं नाही. ती मोदींच्या काळात बॅड झाली.
इकॉनॉमी ग्रो करतेय ती सरकारी आकडेवारीत. तज्ञ्यांना त्याबद्दल खात्री नाही.//

2014 मध्ये NPA हा सर्वात मोठा प्रॉब्लम होता. मोदींनी हा प्रॉब्लेम निर्माण केला नाही, त्यांनी तो inherit केला. कर्ज कोंग्रेस काळातच दिली गेली होती. मोदींनी हे सर्व निस्तरलं , आता बरीच वसुली ऑलरेडी झाली पण आहे. मोदी काळात कर्ज बॅड झाली असं नाही, ती आधीच बॅड होती. मोदींमुळे हा सर्व फ्रॉड जगासमोर आला इतकंच. इकॉनॉमीबद्दल बोलायचं तर Price waterhouse cooper च्या रिपोर्टनुसार 2019 मध्ये भारताची इकॉनॉमी इंग्लन्डला मागे टाकेल. International Mometary Fund नुसार भारतीय इकॉनॉमी गेली पाच वर्ष जगातील fastest growing economies पैकी असून यात सरकारने केलेले रिफॉर्म महत्वाचे catalyst ठरले आहेत. Mckinsey & Company च्या मते इंडिया जगातील second fastest digitising economy आहे.

आघाडी सरकारच्या काळात मुंबईत मेट्रो सुरू झाली.

हो हो अंधेरी घाटकोपर मेट्रो कोण विसरेल Biggrin सध्या बाळराजे राहुल ज्या अनिल अंबानीला चोर म्हणत शिमगा करतात त्याच अनिल अंबानीला आघाडी सरकारने मुंबई मेट्रोचं करोडोचं पूर्ण काम दिलं आणि या कामाचा अनिल अंबानीच्या कंपनीला काही पूर्व अनुभवही नव्हता. Lol

((गृहबांधणीबद्दल बोलायचं तर फडणवीसांनी एफ एस आयची खिरापत वाटलीय. पर्यावरण विषयक नि यम शिथील केलेत.))

1999 ते 2014 या 15 वर्षात आघाडी सरकारने महाराष्ट्र देशाचं सिमेंट काँक्रीटच्या रखरखाट जंगलात कसं रुपांतर केलं हे सर्वांनी बघितलंय. लवासा कोणी बनवलं?
याउलट युनायटेड नेशन्सचा पर्यावरणविषयीचा सर्वोच्च पुरस्कार मोदींना मिळाला आहे. Champions of the Earth- winner of 2018 is Indian PM Modi.

((राहुलचा वंश - तुम्ही त्याला मिक्स्ड ब्रेड म्हटलंय. भाजपचे अनेक नेते तो उल्लेख करतात. ))

राहुलला पार्ट इटालीयन पार्ट पारसी पार्ट ब्राम्हण म्हटलं होतं. अमेरिकेत तसं बोलायची पद्धत आहे. मी हाफ आयरिश हाफ जर्मन आहे, माझी रुममेट पार्ट फ्रेंच आहे असं लोक सहज बोलतात त्यात काही derogatory अर्थ नसतो. जर काँग्रेस जातपात मानत नाही तर राहुलचं ब्राम्हण असणं मिरवण्याची काय गरज आहे?
काँग्रेस जातीपातींचं विष निवडणुकीसाठी नेहमीच पसरवत असते. कारण जर हिंदू एक झाले आणि मग हिंदू-मुस्लिम-ख्रिस्ती-इतर असे सगळेच एक झाले तर विकासाच्या मुद्यावरच निवडणूक होईल आणि तेच तर नकोय.
सी पी जोशी नावाचे कॉग्रेसचे राजस्थानातले ज्येष्ठ नेते आहेत. 'धर्म के बारे में कोई जानता है तो पंडित जानते हैं लेकिन PM मोदी, उमा भारती, साध्वी ऋतंबरा जैसे नेता हिंदू धर्म की बात करते हैं.' असं विधान यांनी राजस्थान निवडणुकीआधी केलं. फक्त ब्राम्हणाने (!) हिंदू धर्माबद्दल बोलावं, ब्राम्हणेतर ओबीसी मोदी, उमा भारती यांना तो हक्क नाही. किती फालतू मानसिकता आहे ही. त्यावेळी हे त्यांचं वैयक्तिक विधान आहे असं काँग्रेसने म्हणून हात वर केले पण निवडणुकीनंतर बक्षीस म्हणून या माणसाला राजस्थान विधानसभा अध्यक्षपद दिलं. आणि तरी जातीयवादी कोण तर भाजपवाले???
राजस्थानात अशा प्रकारे पीएमची जात काढायची, उलट महाराष्ट्रात राजू शेट्टीकडून आक्षेपार्ह विधान करवून घ्यायचं. थोडक्यात काय तर शक्य तितकी भांडणं लावत राहायचं.

((भारतात द्वेष सहन करावा लागला असं तुम्ही म्हणता, तेव्हा तुम्हां ला द्वेष म्हणजे काय हे माहीतच नाही आणि त्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजा.))

अगेन- you are writing off my experiences as nothing which doesnt help.

काँग्रेसला ६० वर्षात जे जमलं नाही ते जुमला पार्टीने ६० महिन्यात करून दाखवले .
https://youtu.be/3JiJq0MEa4g

शेण खाण्याचा आणि इतरांना ही खाऊ घालण्याचा किती तो अट्टाहास !!

या कपिल लाच सर्वोच्च न्यायालयाने थोबाडले आहे. ही गोष्ट ध्यानात घेतली असती तर हा विडिओ इथे टाकण्याचा विचार आलाच नसता !!

जनता समजदार आहे,ती चोर चौकीदार नाही. चौकीदारच स्वतःचे थोबाड झोडून घेईल.

<<राहुलला पार्ट इटालीयन पार्ट पारसी पार्ट ब्राम्हण म्हटलं होतं. अमेरिकेत तसं बोलायची पद्धत आहे. मी हाफ आयरिश हाफ जर्मन आहे, माझी रुममेट पार्ट फ्रेंच आहे असं लोक सहज बोलतात त्यात काही derogatory अर्थ नसतो. जर काँग्रेस जातपात मानत नाही तर राहुलचं ब्राम्हण असणं मिरवण्याची काय गरज आहे? >>
------ अमेरिकेत तसं बोलायची पद्धत असेल, पण भारतात नाही आहे.

<< काँग्रेस जातीपातींचं विष निवडणुकीसाठी नेहमीच पसरवत असते. कारण जर हिंदू एक झाले आणि मग हिंदू-मुस्लिम-ख्रिस्ती-इतर असे सगळेच एक झाले तर विकासाच्या मुद्यावरच निवडणूक होईल आणि तेच तर नकोय. >>
------ खोटे बोला पण रेटुन बोला.... पुन्हा पुन्हा बोला.

<< .... वाईट म्हणायचे म्हणून संस्कृतपेक्षा उर्दू महान म्हणणारे बघून मी धन्य धन्य झालो. >>
-------- जात, धर्म आणि आता भाषेचा द्वेष.... उर्दू कानाला खुप मिठ्ठास लागते.

<< मोदी और मुसलमान : नोएडा के मुसलमान चाहते हैं मोदी फिर बनें प्रधानमंत्री? >>
------- छान छान... पाकच्या पंतप्रधानांना पण मोदींचे सरकारच हवे आहे...

<कर्ज कोंग्रेस काळातच दिली गेली होती. मोदींनी हे सर्व निस्तरलं , आता बरीच वसुली ऑलरेडी झाली पण आहे. मोदी काळात कर्ज बॅड झाली असं नाही, ती आधीच बॅड होती. मोदींमुळे हा सर्व फ्रॉड जगासमोर आला इतकंच.>

हे व्हॉट्स अ‍ॅप फॉर्वर्ड म्हणून वाचायला ठीक आहे. None of these is supported by facts.
तुम्हाला बॅड डेब्ट्सचा अर्थ माहीत आहे का?
पी चिदंबरम यांनी सरकारला आवाहन केलेलं की write off केलेल्या कर्जातली किती काँग्रेसच्या काळात दिली गेली होती, किती नंतरच्या काळात, तसंच किती कर्ज मोदींच्या काळात एन पीए झाली याचं बायफरकेशन द्या. सरकारकडून याला उत्तर मिळालेलं नाही.

प्रत्येक बुडीत कर्ज फ्रॉड नसतं. निर्णय चु कले, परिस्थिती बदलली हेही घटक असतात.

बरीच म्हणजे किती वसुली झाली? I have the data. Do you?

<अमेरिकेत तसं बोलायची पद्धत आहे>
हा भारत आहे. इथे अशा बोलण्याचा नेमका काय अर्थ होतो ते तुम्हांला माहीत आहे. जर्सी गाय आणि संकरित बछडा हे मोदींचे शब्द आहेत.

सी पी जोशींना त्यांच्या वक्तव्याबद्दल राहुलनी दिलगिरी व्यक्त करायला लावली होती.

मी आधीही लिहिलंय, राहुल हिंदू नाही, असं म्हणून हिंदूंना त्याच्या विरोधात उभं करण्याच्या भाजपच्या खेळीला दिलेलं हे प्रत्युत्तर आहे. ते काम करतंय, हे तुमच्या आणि इथल्या अनेकांच्या उदाहरणावरून दिसतंय.

तुमचे मुद्दे घराणेशाही, राहुलची हेरेडिटी, धर्म यापलीकडे जात नाही.

इथे तुमच्या धर्मामुळे तुमचा पहलू खान किंवा अखलाक होणार नाही. तुमच्या जातीमुळे उनामध्ये जे झालं ते तुम्हांला भोगावं लागणार नाही. तुमच्ता विचारांमुळे तुमची गौरी लंकेश किंवा दाभोलकर होणार नाहीत.

<< मी आधीही लिहिलंय, राहुल हिंदू नाही, असं म्हणून हिंदूंना त्याच्या विरोधात उभं करण्याच्या भाजपच्या खेळीला दिलेलं हे प्रत्युत्तर आहे. ते काम करतंय, हे तुमच्या आणि इथल्या अनेकांच्या उदाहरणावरून दिसतंय. >>

------ ते काम करतय हेच तर पोटदुखीचे मुख्य कारण आहे.
या निमीत्ताने जात, धर्माचा पगडा मनात किती खोलवर घट्ट रुजला आहे हे प्रत्येक वेळी उघड झाले आहे.... अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात आल्यावरही जात जाता जात नाही... कुठे जात दिसली नाही, कुणी उल्लेख केला नाही तरी चर्चेत जातीला ओढून आणायच्या कष्टाचे, चिकाटीचे कवतुन वाटते.

अगदी. राहुलचा डीएन ए आणि अ‍ॅन्सेस्ट्री हा यांच्यासाठी निवडणुकीचा मुद्दा आहे, यातंच काय ते आलं.
काँग्रेस जातीचं राजकारण करतं म्हणताना तुमच्याकडे अली असेल तर आमच्याकडे बजरंगबली आहे आणि तो दलित आहे, असं म्हणणारा यो गी कुठे झाकून ठेवणार ? यांनी तर देवांच्याही जाती काढल्या.

अमित शहा इथे धर्माधारित भेदभावाचं जे उदाहरण सेट करताहेत, ते ट्रंप किंवा त्यांच्या वारसाने अमेरिकेत केलं की कळेल.

financial express मधील लेखातून काही समजतं का बघा. तुमच्या लाडक्या व विश्वासू indian express-loksatta ग्रुपमधलाच पेपर आहे हा.

India’s bad loans are fifth highest in the world and surged dramatically after March 2015. While at face value it would seem like the quality of assets deteriorated after Narendra Modi came to power, the reality is completely different. The NPA chart shared by Reserve Bank of India’s Deputy Governor N S Vishwanathan during his speech shows that India’s bad loans were only 2.36% in 2011, which kept surging, rather slowly, until March 2015 when it rose dramatically.

Reason: The RBI tightened norm for NPA recognition in 2015, after which banks had to recognise some assets as NPA, which otherwise were considered ‘standard assets’.
This growth in stressed assets was, in turn, the outcome of rapid credit growth during 2006-2011, N S Vishwanathan said in his recent speech.

While the surge in NPAs is problematic, it’s surge since 2015 is a good sign — that banks are acknowledging NPAs than concealing them through what’s called in banking parlance ‘evergreening’. “The resulting recognition of true asset quality at banks largely explains the spurt in NPAs during the last three years,” the deputy governor said.

And even as reporting of NPAs rose since 2015, the RBI suspected that banks were still underreporting them. In April last year, the central bank asked all banks to reflect in their notes if their NPAs differed from that of regulator’s. As a result, we witnessed massive NPA divergence in banks like the State Bank of India, HDFC Bank, Axis Bank, Yes Bank, IndusInd Bank..

हे काम रघुराम राजन यांनीच सुरू केलं होतं. कुठे आहेत ते?
HDFC Bank, Axis Bank, Yes Bank, IndusInd Bank.? या खासगी क्षेत्रातल्या बँका आहेत. खासगी क्षेत्रातल्या बँकाही सरकारचे आदेश मानून कर्ज देतात का?

ती कर्ज एन पी ए का होतात? मोदींच्या काळातही एन पी ए वाढत जाण्याचं रेग्युलेटरी प्रेशर हे एकच कारण आहे का? अर्थव्यवस्था सुधारतेय तर कर्ज परत करण्याचं प्रमाण का घ टतंय. हे लोण आता मु द्रापर्यंत पोचलंय. ती तर आधीच्या सरकारच्या काळात नव्हती.
विलफुल डिफॉल्टर्स आणि बॅड डिसिजन, एकंदर बदलत्या अर्थव्यव्स्थेचा प रिणाम यांचा वा टा किती?

I am reading regularly on this and disclosure is not the only factor.
In fact the governement is now moving towards relaxing the norms, even going against the tribunal.
So for the disclosure issue both the credit and blame lies with RBI, so long as the govt doesnt interfere. The present govt has started interfering in this too.

अगर आप मायबोली पे जो राजकारणी धागे होते है उन धागो के चिखल मे लोळणेवाले लोगों को पुछोगे तो वो लोग कहेंगे भाई मजा आ गया, और मै ये मजा मायबोली के हर मायबोलीकर को देना चाहता हू.

संघ परिवाराचे हिंदूराष्ट्र म्हणजे काय ?

तुम्ही काय खावं काय नाही ?
कसे कपड़े घालावे कसे नाही ?
कोणासोबत लग्न करावे कोणासोबत नाही ?
कोणा सोबत झोपावे कधी झोपावे ?
कोणा सोबत प्रेम करावे, कोणा सोबत नाही ?
किती मुलं जन्माला घालावी ?
कोणतं शिक्षण घ्यावं ?

याची आचार संहिता म्हणजे हिंदूराष्ट्र !

कोणाला काही शंका ?

संघ परिवाराचे हिंदूराष्ट्र म्हणजे काय ?

तुम्ही काय खावं काय नाही ?
कसे कपड़े घालावे कसे नाही ?
कोणासोबत लग्न करावे कोणासोबत नाही ?
कोणा सोबत झोपावे कधी झोपावे ?
कोणा सोबत प्रेम करावे, कोणा सोबत नाही ?
किती मुलं जन्माला घालावी ?
कोणतं शिक्षण घ्यावं ?

याची आचार संहिता म्हणजे हिंदूराष्ट्र !

कोणाला काही शंका ?>

>>>>>

तुम्हाला हा अर्थ सांगितला गेला याचा अर्थ तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती देऊन फसवतेय. सावध राहा.

संघोट्यांच्या तोंडात एक, पोटात एक, वागण्यात तिसरेच. जे वागतात त्यावरुन दिसते काय आहे हिंदुराष्ट्र...

आणि दुसर्‍यांना कायम बोळ्याने दूध पिणारे समजणे सोडून द्या. अकलेवर-बुद्धिमत्तेवर तुमची एकमेव मक्तेदारी नाही.

आणि दुसर्‍यांना कायम बोळ्याने दूध पिणारे समजणे सोडून द्या. अकलेवर-बुद्धिमत्तेवर तुमची एकमेव मक्तेदारी नाही.
bhartachi अर्थ व्यवस्था ज्या udhyog पती वर अव्लम्बुन आहे ते सर्व bjp वाले आणि हिंदु च आहेत

ज्यानी भारतास industries मध्ये प्रगत केले त्यांची नावे शोध नेटवर .
नाहीतर भारत म्हणजे साप आणि विंचवाच्
देश अशी ओळख होती

bhartachi अर्थ व्यवस्था ज्या udhyog पती वर अव्लम्बुन आहे ते सर्व bjp वाले आणि हिंदु च आहेत
>>>
अहो तुम्ही किती सेल्फ गोल करता!

Rofl

पोसा त्यांना देशात आणि देशाबाहेर.. परदेशी करार करा आणि कर सवलत पदरात टाका दिवाळखोर उद्योगपतींच्या.

<<याची आचार संहिता म्हणजे हिंदूराष्ट्र !
कोणाला काही शंका ?>>

------ शंका असायचे कारण नाही, अगदी सत्य कथन केले आहे.
सोबत आजन्म कुणाचा तरी ( बहुतेक वेळा मुस्लीमच असतात) द्वेष करायला शिकवतात. मुस्लीम जगात नसतील तर कुणाचा द्वेष करणार? यादी (लिस्ट) मधे मुस्लीमांच्या नंतरही नावे आहेत... आज प्राधान्य कमी आहे. द्वेष करायला समोर कुणीच नसेल तर राष्ट्र निर्माण कसे होणार...

एका विशिष्ट समाजाबद्दल द्वेष आणि सततच द्वेष यातुन आजन्म सुटका नाही. समाजसेवेच्या बाह्य आवरणाखाली विविध संस्था आहेत. सं स्थांची नावे तर अफलातुन / कल्पक असतात आणि प्रत्येक नाव खुप गोंडस वाटते.... पण सर्वांमधे एक समान अवगुण आहे.

हा अवगुण म्हणजे बिनदिक्कत खोटे बोलणे. Pathological Liar ! मग ते पंतप्रधान असो वा मायबोलीवर चे काही ठराविक प्रचारी आय डी. आमच्या घरी मुस्लीमांचे/ ख्रिश्चनांचे / दलितांचे येणे जाणे होते, रोजच राबता होता. आमच्या घरात तर अजिबातच द्वेषाचे असे कुठलेही वातावरण दिसले नाही / नव्हते.... , आम्ही एका ताटात जेवायचो. पण आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्याच खुप मागे राहिलेल्या बांधवां बद्दल कमालीची टोकाची टिका असते.... .
कुठे काही मुद्दा निघाला तर समोरच्याला पटवण्यासाठी आमच्या घरात.... , माझ्या क्ष वर्षांच्या जॉब मधे अनेक देशांच्या विविध लोकांशी संबंध आला... , आमच्य घरी ".... थापा... " वातावरण होते.... आमच्य घरी म्हणत पुढे पचवता येतील तेव्हढ्या थापा हाणायच्या.... मग या थापेत कधी माझ्या मावस आत्याची दोन चुलत भाऊ देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यात असे पण सोडायचे...
वाचणार्‍याला खरे खरे 'वाटणारा' वैयक्तिक अनुभव वाटतो.... पण अनुभव असतो खोटा किंवा मनाचा खेळ... जे नाही आहे ते दाखवण्याचा, रंगवण्याचा प्रयत्न. या मुशीत तयार झाल्यावर... पुढे राजकारणात येतात... आता खोटे बोलण्याची सवय अगदी अंगवळणी पडली आहे मग अतिरेकी तळांवर हल्ला करुन ३०० मारले असे समस्त देशवासीयांना सांगतात. प्रश्न सरकारला विचारल्यावर थयथयाट करायचा. तिनशेची खातरजमा करायची जबबदारी प्रश्न विचारणार्‍यांची. प्रसिद्ध होणारी विकासाची बहुतेक सर्व आकडेवारी खोटी असते किंवा धादांत खोटी असते किंवा कमालीची दिशाभूल करणारी भरकटवणारी असते. दहा पैकी चार निर्णय चुकले म्हणजे आभाळ कोसळणार नाही...

Pathological Liar याबद्दल अधिक माहिती नेटवर मिळते,
https://www.healthline.com/health/pathological-liar

संघटना अगदी घट्ट आहे.... कुठेही खुट्ट झाले तर जमाव कमी वेळात हातात लाठ्या काठ्या (क्वचित सुरे, कात्र्या) घेत समोरच्याला कुचलायला तयारच असतो.... मग त्या रागाच्या भरात स्टेन्स, सोबत दोन लहान बछडे जिवंत जाळली जातात, क्वचित गोध्राच्या आवरणाखाली गुजराथ २००२.... गोरक्षेच्या नावाखाली अनेक हल्ले/ हत्या , गोमांसच्या संशयावरुन पोलीस ठाणे जाळणे, पोलीसांना जिवाने मारणे किंवा २०१९ लखनौ मधे आणि इतरत्र काश्मीरींना मार दिला जातो... किंवा गुडगाव मधे २५- ३० लोकांचा मोठा जमाव एका लहानशा घरांत जबरदस्तीने शिरतो आणि घरातल्या निशस्त्र लोकांना यथेच्छ बडवतो. यांची मर्दुमकी केवळ देशाच्या आतच. आणि ते पण निशस्त्र, निरपराधी देशबांधवां समोरच असते. सामान्य भारतीय लोक तुरळक घटना म्हणुन दुर्लक्ष करतात आणि आपल्या कामाला लागतात.... कारण ते (मार खाणारे) आपले कुणीच नाही.

आपल्या लहानग्यांना संस्काराच्या नावाखाली अतिरेकी विचारांची बनवू नका. त्यांना चांगली घडवा, चांगली शिकवा... द्वेष पसरवणार्‍या अतिरेक्यांपासुन सावध रहा, अनेक योजने लांब ठेवा. आणि समस्त मानव जातीवर मनापासुन प्रेम करा.

द्वेषाचे रसायन देशरुपी शरिरात हळूवारपणे पसरत आहे... ते बाहेर पडणार आहेच पण जेव्हा पडेल / निघेल त्यावेळी सर्वांसाठीच हानीकारक राहिल... यातुन तुमची, आमाची आणि कुणाचीच सुटका नाही. थोर नेते महात्मा गांधी आणि आपल्या सर्वांचे अत्यंत लाडके असे बापूजी यांचा सत्य आणि अहिंसा हा महामंत्र जपा. Happy

मग या थापेत कधी माझ्या मावस आत्याची दोन चुलत भाऊ देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यात असे पण सोडायचे...
वाचणार्‍याला खरे खरे 'वाटणारा' वैयक्तिक अनुभव वाटतो..>>>>>>> उदय, तुमच्यासारख्या लोकांना , जे स्वतःची आयडी लपवतात, त्यांना हे खोटेच वाटणार. आणी हो, होते आणी आहेत माझे नातेवाईक सैन्यात. तुमच्यासारखे बाहेर देशात सुरक्षीत बसुन शाब्दिक तलवारी हवेत उडवत नाहीत.

तुम्हाला आतापर्यंत मी संतुलीत आय डी समजत होते, पण तुमचा बुरखा फाटलाय. तुमचा सो कोल्ड, हो कोल्डच पुरोगामीपणा ठेवा तुमच्याकडे. लाज वाटते मला माझीच की या माणसाला आतपर्यंत दोन्ही बाजू पारखणारा समजत होते. कशाला उगाच लेकी बोले सुने लागे असे लिहीताय. डायरेक्ट नाव लिहा की. मी आता पर्यंत कधीच मुस्लिम वा दलित लोकांना कमी लेखले नाही. पण तुमच्यासारखे एन आर आय भारत प्रेमाचे उमाळे फुटुन दुसर्‍याला कायम तुच्छ लेखत असतात. तुमच्यापेक्षा उघड शत्रु परवडले.

Pages