भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

Submitted by भरत. on 18 March, 2019 - 01:23

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.

गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?

तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्‍या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.

सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्‍यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.

राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अ‍ॅपरंटली, इट अ‍ॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.

आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.

दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.

भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?

सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्‍या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

<<संडास बांधण्याची कल्पना ह् >>

------- कितीही प्रगती केली तरी आपल्या गरजा अन्न, वस्त्र, निवारा, (आता पुढे पाणी, हवा पण जोडतो). संडास बांधली जात असतील तर सामान्य जनतेसाठी चांगलीच गोष्ट आहे. ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्यांची पडताळणी करुन खर्‍या असतील तर स्विकारायच्या, मान्य करायच्या.

माझा मुख्य प्रॉब्लेम विश्वासाचा आहे. कुठलिही आकडेवारी मला स्विकारता येत नाही कारण अनेक वेळा या सरकारचा खोटेपणा उघडा पडला आहे. ३०० संडास बांधले हे नक्की आहे का ? का प्रत्येक संडासाला चार भिंती असतात.... आणि प्रत्येक भिंत या मोजणीत मोजल्या गेली?

माझा मुख्य प्रॉब्लेम विश्वासाचा आहे. कुठलिही आकडेवारी मला स्विकारता येत नाही कारण अनेक वेळा या सरकारचा खोटेपणा उघडा पडला आहे.>>
हा तुमचाच नाही तर बहुसंख्यांचा प्रॉब्लेम झालाय. इतकं फेक सरकार नव्हतं कधी कुठेच.

विकासाची लंगोटी उतरल्यामुळे आता हिंदुत्व/नेहरु/मोदी आडनाव्/राष्ट्रवाद याच्या चिंध्या लपेटण्यावाचुन काही गत्यंतय नाही हे कळुन चुकलं आहे.

वडगावशेरी, विमाननगर, खराडी, धानोरी, कळस, लोहगाव, एनआयबीएम रस्ता या परिसरात टँकरच्या फेऱ्या वाढल्या असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. >>>>>> भरत खास तुमच्या माहितीकरता सांगते. ( खवचटपणे नाही तर खरे बोलत आहे) पुण्यातले हे वरचे विभाग आहेत तिथे नेहेमीच पाणी मिळत नाही. हे आत्तापासुन नाही तर बर्‍याच वर्षापासुन चालू आहे, कारण टँकर लॉबी. या टँकरवाल्यांचे इथे एवढे वर्चस्व आहे की ते लोक पाण्याची पाईपलाईन पण टाकु देत नव्हते. इथे राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. माझ्या वडलांच्या मित्रांनी चंदननगर ( येरवडा) इथे घेतलेला फ्लॅट सुद्धा पाण्याच्या त्रासामुळेच सोडला.

काँग्रेस - भाजपा - शिवसेना- बहुजन पक्ष असे एकमेकात कितीका वैर असेना पण या पक्षांनी सर्वसामान्यांना कधी त्रास दिला नाही, पण राष्ट्रवादी पक्ष हा पुण्यात गुंड पक्ष म्हणूनच ओळखला जातो.

दुसरी गोष्ट, मी प्रो बिजेपी असल्याने माझे वरचे विधान कोणाला खोटे वाटत असेल तर वाटु दे पण जे पुण्याबाहेर रहातात, ज्यांना वस्तुस्थिती माहीत नाही, अशांनी यावर कमेंटस करु नये. कारण जो जिथे रहातो त्याला तिथले काळेबेरे ठाऊक असते. या महापालिकेतल्या काही लोकांचे टँकर लॉबीशी संंबंध आहेत. पैसा खाऊनच हे कामे करतात. बर्‍याच ठिकाणी पाणी वाया जाते तिकडे तक्रारी करुनही हे लोक लवकर येत नाहीत.

तरीही ज्यांचा विश्वास नाही त्यांनी आपला अमूल्य वेळ वाया घालवुन सर्व्हे करावा ही इनम्र इनंती !

फडणवीसांनी टँकर लॉबी तोडण्यासाठी काय काय केलं?
की पुणे महाराष्ट्रात येत नाही?

आतापर्यंत काँग्रेस +राष्ट्रवादीचे सरकार होते, मग इतक्या वर्षात ते पाणी प्रश्न का नाही सोडवु शकले ? अर्थात, गुंडांना ते कधी जमणार होते म्हणा. मग फडणवीसांकडुन तुम्ही लगेच अपेक्षा करताय? का त्यांनी आश्वासने दिली म्हणून ते अपराधी ? प्रत्येक ठिकाणी मुखमंत्र्यानेच जायला हवे, नाही का? मग २००५ साली जेव्हा मुंबईत पूर आला तेव्हा तुमच्या विलासराव देशमुखांनी काय मुक्ताफळे उधळली होती ती आठवा जरा, मग बोला.

कॉं राकॉ वाईट म्हणून त्यांना लाथ मारून हाकलून दिले हो.
तुम्ही त्यांच्यामागे लपू नका. फडणवीस अभ्यासू आणि कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. एका माबोकरणीच्या शब्दांत - देव रॉक्स.

तुकाराम मुंढेंचं काय झालं?

जेलमध्ये रवानगी झाल्यावर आटा पिसिंग मग कसला पं.प्र. आणि कसला वि.ने. Proud >>>

असं काही होणार नाही..काळजी नसावी. २००२ पासून काँग्रेसने सगळे दगड पालथे करून पाहिलेत.. अगदी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती घुसडण्यापासून सगळं काँग्रेसने करून पाहीलंय..

<< काँग्रेस - भाजपा - शिवसेना- बहुजन पक्ष असे एकमेकात कितीका वैर असेना पण या पक्षांनी सर्वसामान्यांना कधी त्रास दिला नाही, पण राष्ट्रवादी पक्ष हा पुण्यात गुंड पक्ष म्हणूनच ओळखला जातो.>>

------- राष्ट्रवादीच्या पक्ष प्रमुखांना सध्याच्या भाजपा सरकारने २०१७ मधे पद्म विभूषण पुरस्काराने गौरविले होते तो गुंडांचा पक्ष कसा असेल ? पद्म विभूषण हा सन्मान भारतरत्नच्या खालोखाल येतो.

सामान्य नागरिकांना वेठिस धरणारी अशी गुंडगिरी संपायला हवी. पाच वर्षे सरकारात असल्यावरही पाण्याचे पाईप टाकण्यासारखी मूलभूत सुविधा पुरवण्याची कामे होत नसतील, रखडत असतील किंवा टॅकर लॉबी आडकाठी आणत असेल तर अशी कामे न होण्यात राजकीय इच्छाशक्तीचा प्रचंड अभाव दिसतो आहे.

मोदी-शहा-फडणविस हे अत्यंत शक्तीमान आहेत... त्यांच्यासमोर असली लॉबी आणि नाटके चालणार नाही. प्रश्न त्यांनी गंभिर असण्याचा आणि त्यांच्या प्राधान्याचा आहे.

आदरणीय मोदिजी २०१४ ला लोकसभा निवडणूक प्रचारात म्हणालेले,

" मी सत्तेवर आल्यावर तीन महिन्यात विशेष टीम तयार करून सगळ्या खासदारांवर असलेल्या गुन्ह्यांचा तपास करून कायदेशीर कारवाई करेल "

Rofl

अर्थात, गुंडांना ते कधी जमणार होते म्हणा. मग फडणवीसांकडुन तुम्ही लगेच अपेक्षा करताय? >> मग साधारण किती दिवस्/महिने/वर्षं अभ्यास करणाअर म्हणे ते..?? Proud

मग फडणवीसांकडुन तुम्ही लगेच अपेक्षा करताय? >> मुमं नाही हो, पण राज्याच्या गृहमंत्र्याकडुन तरी टँकर मालकांची गुडागर्दी मोडुन काढण्याचि अपेक्षा असुन नये का? Wink

रश्मी. आपण कितीकाळ व्हॉट अबाउटरी करणार आहात अजून? कोणी भाजपला काम दाखवा म्हटले की लगेच मागच्या सरकारचे दाखले देऊन ते आठवा हे आठवा करत राहायचे अजून? ते नालायक होते म्हणुन ह्यांना बसवले ना? त्या आधीच्यांबद्दल बोलून आताच्या समस्याम्वर तोंडगा कसा काढणार आहात ते बोला? त्रासदायक गुंडांना एका मिनिटात तुरुंगात धाडता येऊ शकते. फडणविसांना असे करायला किती काळ लागणार आहे? की करायचेच नाही?

मुख्यमंत्री-गृहमंत्री ज्या शहर-जिल्ह्याचे आहेत तिथला गुंडागर्दी चा आलेख उंचावत गेला आहे. ते इथे पुण्यात काय करणार म्हणा. (मारो एक चक्कर नागपूरमे Wink )

रश्मी. आपण कितीकाळ व्हॉट अबाउटरी करणार आहात अजून? कोणी भाजपला काम दाखवा म्हटले की लगेच मागच्या सरकारचे दाखले देऊन ते आठवा हे आठवा करत राहायचे अजून? ते नालायक होते म्हणुन ह्यांना बसवले ना? त्या आधीच्यांबद्दल बोलून आताच्या समस्याम्वर तोंडगा कसा काढणार आहात ते बोला? त्रासदायक गुंडांना एका मिनिटात तुरुंगात धाडता येऊ शकते. फडणविसांना असे करायला किती काळ लागणार आहे? की करायचेच नाही?>>>>> हेला, याचा पाठपुरावा करण्याचे काम तिथल्या नागरीकांचे आणी नगरसेवकांचे आहे. पण लोक आणी सेवक दोघेही मुर्दाड आहेत. प्रश्न पक्षाचा नसतो, तर लोकांच्या समस्यांचा असतो. साधी गोष्ट सांगते की आपल्या सोसायटीत जर काही शासकीय वा आर्थिक काम निघाले की ते लगेच इतर कोणी जाऊन करेल का? मला आज वेळ नाही अशी सबब प्रत्येक जण कायम पुढे करतो. तुम्ही कदाचीत हा अनूभव घेतला असेलच. जर लोक एकत्र आले तर का नाही दबाव येऊन काम होणार? पण दुसर्‍याच्या घरात शिवाजी महाराज जन्माला येऊ द्या अशी विचारसरणी असणारे लोक काय आंदोलने करणार? आणी हे नगरसेवक काय कामे करणार?

१० वर्षापूर्वी आमच्या इथला एक अपक्ष नगरसेवक सगळ्यांची कामे निवडुन येण्या आधी धावुन धावुन करायचा. मग निवडुन आल्यावर त्याने लोकांची कामे करणेच बंद केले. मग त्यामुळे १४ सालच्या निवडणूकीत पडला. मग एक भाजपा मेंबर नगरसेवक बनला, तो कामे करतोय कारण त्याला बाकी शासकीय कामाचा खूप अनूभव आहे. आता परत उभा राहील की नाही माहीत नाही. आणी हो, आधी पुढारी बनलेले मग आमदार बनल्यावर कामे कशी करत नाहीत ते पण मी बघीतलेय. हे आमदार तर शिवसेनेचे होते. कामे केली नाहीत मग आपटले नंतर.

मला १०० टक्के मान्य आहे की गृहमंत्री या नात्याने तरी या राज्यातली गुंडागर्दीवर त्यांची जरब बसली पाहीजे, आणी तशी ती होत नाहीये. पण मी हेही म्हणेन की सत्ताधारी पक्ष कोणता का असेना, त्यांची गुंडांवर दहशत हवीच आणी लोकांनी पण मदत केली पाहीजे. वाईट अनूभव आल्यावर लोक पोलीसांपासुन दूर रहातात. मग जरब बसणार कोणावर?

<< मग एक भाजपा मेंबर नगरसेवक बनला, तो कामे करतोय कारण त्याला बाकी शासकीय कामाचा खूप अनूभव आहे. आता परत उभा राहील की नाही माहीत नाही. >>
----- छान छान....
काम करणारे नगरसेवक आहेत हे वाचल्यावर मनापासुन दाद द्यायला हवी. एक थाप तर बनायलाच हवी... अर्थात कौतुकाची. ते भाजपाचे आहेत म्हणुन काय झाले.

असाच (असे अनेक) अनुभव मागे वाचण्यात आला होता. तो अनुभव खरा असेलही. कथा व्यावस्थित मांडलेली असते. कथेमधे एक आमदार भ्रष्टाचारी आहेत/ निवडणूकात दारू/ पैसे वाटायची कामे करतात... त्याच पक्षाचे आधी असे काही नसायचे. अर्थात तो पक्ष काँग्रेस आहे हे सांगायला नको. अमक्याने तमक्याला सांगतांना नात्यांची / मैत्रीची/ कथा/ सत्य बेमालुम गुंफण असते.

या गोष्टी अपघाताने होतात, सत्य असतात, का कल्पनेने रचलेल्या असतात याचा वाचणार्‍याला अंदाज येत नाही. एका पक्षाची आणि विचारांची भलामण करण्यासाठी धारदार लेखणी सतत झिजते आहे.

निवडणूका हे धर्मयुद्ध आहे असे बिंबवले गेल्यावर खोटे बोलणे/ खोटे लिहीणे हे विनासायास जमायला लागते, नव्हे तेच अंगवळणी पडते. थोर विचारवंतांनी सांगितलेच आहे 'युद्धात / प्रेमात सर्व क्षम्य असते.'

तुकाराम मुंढेंचं काय झालं? हे तेच लोक आहेत जे श्रीकर परदेशींच्या वेळेस मूग गिळून बसले होते ? त्यावेळेस का नाही विचारलं कि का त्यांची बदली केली पिंपरी चिंचवड वरून?
https://www.theyouth.in/2018/05/29/ias-officer-got-death-threats-yet-he-...

निवडणूका हे धर्मयुद्ध आहे असे बिंबवले गेल्यावर खोटे बोलणे/ खोटे लिहीणे हे विनासायास जमायला लागते- म्हणूनच इशरत जहाँच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी अयोध्याच्या मंदिराचे दरवाजे उघडून दूरदर्शन वरून लाईव्ह टेलिकास्ट होता तर ..

असाच (असे अनेक) अनुभव मागे वाचण्यात आला होता. तो अनुभव खरा असेलही. कथा व्यावस्थित मांडलेली असते. कथेमधे एक आमदार भ्रष्टाचारी आहेत/ निवडणूकात दारू/ पैसे वाटायची कामे करतात... त्याच पक्षाचे आधी असे काही नसायचे. अर्थात तो पक्ष काँग्रेस आहे हे सांगायला नको. अमक्याने तमक्याला सांगतांना नात्यांची / मैत्रीची/ कथा/ सत्य बेमालुम गुंफण असते.>>>>> उदय, बेस्ट वे. तुम्ही मला इग्नोर करा, मी तुम्हाला कधीचेच केलेय. तुम्हाला फक्त आणी फक्त काँग्रेसींचेच खरे वाटते, वाटु द्या. बाहेर राहुन इथल्या गोष्टी तुम्हाला बेमालुम कथा वाटतात ना, वाटु दे.

आमच्याकडे म्हण आहे , हो भाऊ तू मोठ्या बापाचा. तशी गत आहे तुमची.

हो, आणी बायकांटाईप लेकी बोले सुने लागे असे लिहु नका. हिम्मत असेल तर लिहीणार्‍याचे नाव घ्या. पण ते तुमच्यात नाही सोडुन द्या.

मी येथे प्रतिवाद करतो तो इतरांना फोलपणा दिसावा म्हणुन. कधी व्यावस्थित रचलेल्या कथा असतात.... भोळ्या मायबोलीकरांचा चटकन विश्वास बसतो.... आणि ते असत्य अनुभवालाच सत्य समजतील. मायबोलीकरांना सावध करणे हे माझे कर्तव्य समजतो. वाचण्यात, समजण्यात चुक झाली, लक्षात आली तर मान्य करतोच आहे.

नाव लिहील्याने काय फरक पडणार आहे ? व्यक्त केलेले/ झालेले विचार वाचतो, समजतो आणि प्रतिसाद देतांना तो बहुतेक वेळा इतरांसाठी दिलेला असतो. प्रतिसाद वैयक्तिक नसेल याची काळजी घेतो...

<< उदय, बेस्ट वे. तुम्ही मला इग्नोर करा, >>
------ येथे लिहीलेले वाचतो... ते इग्नोर कसे आणि का करायचे?

<<मी तुम्हाला कधीचेच केलेय. >>
------ तुमच्या निर्णयाचा आदर आहे.

सार्वजनिक व्यासपीठावरच्या चर्चेत सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेली, पडताळून पाहता येऊ शकेल अशी माहिती मांडावी असं माझं मत.
मला एखादी गोष्ट आठवण असेल आणि तिचा पुरावा देता येत नसेल तर ती मी मांडणार नाही.
माझ्या वर्तुळातले दाखले देऊन जनरलायझेशन करणार नाही.

.
रच्याकने आज लोकसत्ताने पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर पहिल्या पानावर छापलंय.
मी हा मुद्दा आणला कारण सनव यांनी महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती सुधारली असं लिहिलंय.

<< हो, आणी बायकांटाईप लेकी बोले सुने लागे असे लिहु नका. हिम्मत असेल तर लिहीणार्‍याचे नाव घ्या. पण ते तुमच्यात नाही सोडुन द्या. >>
------ किती stereotype
अर्थासाठी
https://en.oxforddictionaries.com/definition/stereotype

नामोल्लेख करणे म्हणजे हिंमत आणि टाळणे म्हणजे हिंमत नाही असे मी मानत नाही. दर्जेदार विचारांचा (पटले अथवा नाही तरी) नेहेमीच आदर करतो आणि तेव्हा नावाचा जरुर उल्लेख करेल, मनापासुन दाद मिळेल. असत्य कथा नामोल्लेखास पात्र ठरत नाहीत.

57217978_2234010223355773_2000080250142195712_n.jpg

बाई स्वत: काय म्हणते आहे पहा. भगवा आतंकवाद आवश्यक आहे म्हणत आहे. तेही स्वत:च्या तोंडाने .. कुठे गेले ते भामटे निर्लज्ज खोटारडे भाजपे आता?

Pages