गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.
गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?
तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.
गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.
सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.
राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अॅपरंटली, इट अॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.
आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.
दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.
भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?
सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?
संसदेत विरोधकच तर बसतात- हो
संसदेत विरोधकच तर बसतात- हो तिथेच बसता लोकांनी दिलेली काम करयाची सोडून ..नाही तर इतक्या वर्षात अमेठी , रायबरेलीचा विकास झाला नसता का ?
छान
छान
आता हा धागा बन्द करा. कारण
आता हा धागा बन्द करा. कारण निवडणुका सुरु होत आही तेम्व्हा येथे बडबडून काही उपयोग नाही. प्रतिसादात मुद्दे सम्पल्यामुळे काही जण हलकट नीचशिरोमणी अशा शिव्या देऊन स्वतःची पात्रता दाखवत आहेत. मायबोलीच्या शिवराळ प्रतिसाद काढून टाकावे आणि त्या लोकाना सन्गावे की यापुढे जर व्यक्तीगत शिव्या द्यायच्या असतील तर मायबोली सोडून द्यावी.
ओह! The गोची झाली बहुधा,मोदी
ओह! The गोची झाली बहुधा,मोदी सरकारचे वाभाडे पाहुन.
एव्ह्ढं सग्गळं केलं मोदीने तर मग काँग्रेसकडुन गुजरातचे नेते नेहमीच लक्ष्य असा गळा का काढतोय तो?? स्वतः केलेल्या कामाबद्दल बोलायचे सोडुन नको त्या गोष्टींची उठाठेव कशाला हवी ?
वीज एक्सपोर्ट करा पण ह्यांना
वीज एक्सपोर्ट करा पण ह्यांना वीज जोडणी कधी देणार?
https://www.google.com/url?sa=i&source=web&cd=&ved=2ahUKEwjfqe270MfhAhXW...
सोनिया गांधी व राहुल गांधींनी
सोनिया गांधी व राहुल गांधींनी रायबरेलीत अर्ज दाखल करण्याआधी पूजा व हवन केलं आणि तेही काँग्रेसच्या कार्यालयात
हिंदू कर्मकांड कसे वाईट, होमहवनात किती तूप फुकट जातं, पूजाविधी म्हणजेअंधश्रद्धा,हे सगळं विज्ञानविरोधी असं बोलणाऱ्या पुरोगाम्यांना मोदींनी एक शब्द न बोलता एक्सपोज केलंय.
अर्थात, यावर स्पष्टीकरण येईल की आम्ही खरं म्हणजे हे काही मानतच नाही पण मूर्ख हिंदूना फसवण्यासाठी आम्हाला हे नाटक करणं भागच आहे.
मोदींनी एक शब्द न बोलता
मोदींनी एक शब्द न बोलता एक्सपोज केलंय.
Sonia Gandhi performed a puja
Sonia Gandhi performed a puja today before filing her nomination papers in Raebareli in Uttar Pradesh, which has voted her since 2004. She was seen, flanked by her children Rahul Gandhi, the Congress president, and Priyanka Gandhi Vadra at a havan organised by a party worker.
नाही तर इतक्या वर्षात अमेठी ,
नाही तर इतक्या वर्षात अमेठी , रायबरेलीचा विकास झाला नसता का ?
Submitted by Nmate on 11 April, 2019 - 02:23
>>> समस्या ही आहे कि अमेठीचा (रायबरेलीच माहित नाही) विकास व्हायला सुमारे दीडपट जास्त वेळ लागतो. कारण विकासकामासाठी तरतूद झालेला पैश्यापैकी ४०% "इधर-उधर" द्यावे लागतात. खुद्द प्रियांका ताईंनीं सांगितलंय तसं
५ वर्षं गावगन्ना फोकांदर्या
५ वर्षं गावगन्ना फोकांदर्या मारण्याऐवजी रयबरेली आणि अमेठीचा फेकुने विकास करुन दाखवायची संधी होती की मग..!
५ वर्षं गावगन्ना फोकांदर्या
५ वर्षं गावगन्ना फोकांदर्या मारण्याऐवजी रयबरेली आणि अमेठीचा फेकुने विकास करुन दाखवायची संधी होती की मग..! >>>
त्यांना अख्या देशाचा कारभार बघायचाय, राफूल आणि प्रियांका सारखे चकाट्या पिटायला नि वर त्या चकाट्यांची स्तुती करणारे भाट मिळण्याएव्हढे मोदी आळशी आणि नशीबवान नाहीत...
अमेठी आणि रायबरेली काय
त्यांना अख्या देशाचा कारभार बघायचाय>> अमेठी आणि रायबरेली काय पाकिस्तानात आहेत का?
अमेठी आणि रायबरेली काय
अमेठी आणि रायबरेली काय पाकिस्तानात आहेत का? उत्तरासाठी गूगल मॅप्स पाहावेत.
राफूल व सोनिया गांधी तिकडचे खासदार असल्यामुळे अमेठी व रायबरेली गेली १५ वर्षे पार दुर्लक्षित आहेत.
उत्तरासाठी गूगल मॅप्स पाहावेत
उत्तरासाठी गूगल मॅप्स पाहावेत.>> अमेठी-रायबरेली मतदारसंघांसाठी वंशपरंपरागत हेटाळणी शब्दप्रयोग करायची दुर्बुद्धी झालेल्यांनीच पहावे गुगल मॅप्स..!
राफूल व सोनिया गांधी तिकडचे खासदार असल्यामुळे अमेठी व रायबरेली गेली १५ वर्षे पार दुर्लक्षित आहेत.>> तसे असेल तर मग तिथल्या लोकांसाठी फेकुने कामे करायलाच हवी होती म्हणजे निदान आतातरी तिथे फेकुचे १२ वी नापास उमेदवार निवडुन येण्याची शक्यता होती.
अमेठी-रायबरेली मतदारसंघांसाठी
अमेठी-रायबरेली मतदारसंघांसाठी वंशपरंपरागत हेटाळणी शब्दप्रयोग करयची दुर्बुद्धी झालेल्यांनीच पहावे गुगल मॅप्स..! >>
हेटाळणीपेक्षा गेली १५ वर्षे दुर्लक्ष झाल्याने अमेठी आणि रायबरेली अजूनही मागास राहिलेत. शेवटी ५ वर्षातून एकदा मतदारसंघाला भेटी देणारे व संसदेत झोपा काढणारे राफूल व सोनिया काय विकास करणार म्हणा ?
गावगन्ना फोकंदर्या हाणुन
गावगन्ना फोकंदर्या हाणुन किती विकास केला..? ५ वर्षात केलेला विकास सांगुन मते का मागत नाही मग फेकु..? आता पाकिस्तानचा बागुलबुवा उभा करुन मतदारांना भुलवण्याची नीच खेळी करावी लागतेय..? फेकुच्या बुळचटपणामुळे आपले ४४ जवान मारले गेले त्यांच्या मरणाचा सण करुन का मते मागितली जात आहेत..??
कोणीतरी मला मागे म्हणले की
कोणीतरी मला मागे म्हणले की अमेठी आणी रायबरेलीचे काय विचारता, वाराणसी वगैरेत काय केले मोदींनी?
आत्ता !! मोदी तर आता आहेत ५ वर्षापासुन. यांचे आजोबा, पणजोबा, आजी, आई वगैरे वगैरे तर बाबा आदमके जमानेंसे लढ रहे वहांसे, मग का नाही विकास झाला इतुक्या वर्षात?
निवडणूका आल्या की ताई, माई, बाबा, दादा , दीदी, भैय्या, भाई सगळे बेंबीच्या देठापासुन कोकलत असतात आम्हाला मत द्या म्हणून. मग पूर्वी काय सापशिडी खेळत होते का आपापल्या मतदार संघात?
अमेठी आणि रायबरेली काय
अमेठी आणि रायबरेली काय पाकिस्तानात आहेत का? उत्तरासाठी गूगल मॅप्स पाहावेत.
स्थानिक लोकप्रतिनिधी नी आपल्या मतदार संघात कोणते कम करायला हवे हे ठरवायचे अस्ते आणि त्याचा पाठपुरावा सरकारी पातळी करून ती कामे करून घ्यायची असतात .
पण त्यासाठी मतदार संघाची पूर्ण ओळख आणि अभ्यास हवा .
फक्त निवडणुकी पुरत तिथे जावून समस्या समजत नाहीत
५ वर्षं गावगन्ना फोकांदर्या
५ वर्षं गावगन्ना फोकांदर्या मारण्याऐवजी रयबरेली आणि अमेठीचा फेकुने विकास करुन दाखवायची संधी होती की मग..!- हा हा हा हा , अजून एक येऊद्या , पप्पू ने चांगलं शिकवलंय तुम्हाला कॉमेडी करायला
नाही तर इतक्या वर्षात अमेठी ,
नाही तर इतक्या वर्षात अमेठी , रायबरेलीचा विकास झाला नसता का ?>>
खासदार काय नगरसेवक असतात काय? काय अब्यास काय अब्यास
इथे लिहिणारे बहुतेक
इथे लिहिणारे बहुतेक भाजपसमर्थक हिं दुत्ववादी आहेत. भ्रष्टाचार, विकास, विषमता, अर्थव्यवस्था यांच्याशी त्यांना काहीही देणघेणं नाही.
ऊठसूट राहुलच्या जात धर्म वंश यांवर टिप्पण्ण्या करण्यापलीकडे त्यांची मजल जात नाही. बहुधा कुवतही नाही.
मुळात यांना लोकशाही नको. अल्पसंख्यांकांवर यांचा राग, मागास जातीं, ग्रामीण भागात राहणारे, गरीब, कमी शिकलेले लोक यांच्याबद्दल तुच्छता. या सगळ्यांना मताधिकार असूच नये असं यांचं आतलं मत. लं भारतात अशी लोकशाही यायला कारण ठरलेल्या सर्वसमावेशक स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व करणार्या गांधी , सर्वांना समान हक्क देणारी घटना देणारे नेहरू आंबेडकर यांचा द्वेष.
यातले अनेक लोक परदेशात राहतात. तिथे त्यांना दुय्यम नागरिक म्हणून राहाय लागलं, तिथल्या बहुसंख्यांच्या द्वेषाचा फटका बसला तरी हे सुधारणार नाहीत.
--------------
राहुल सोनियांनी अमेथी - रायबरेलीसाठी काम केलं नसेल, तर तिथले मतदार त्यांना नाकारतीलही. भारतात पक्षीय लोकशाही आहे आ णि पक्षाच्या ध्येयधोरणांवर ,कामगिरीवर मतदान होतं. भाजप मात्र मोदींच्या नावावर अबकी बार आणि फिर एक बार मतं मागणार. आधीच्या साठ वर्षांत केलं नाही इतकं काम आ म्ही साठ महिन्यांत क रतो असं म्हणणा रा शेवटी त्या कामाबद्दल न बोलता मुदतवाढ मागतोय यातच काय ते आलं.
मोदींनी आदर्श ग्राम यो जनेत दत्तक घेतलेल्या गावात स्वतःच्या निधीतून एकही काम केलेलं नाही, असं माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात लिहून आल्याचं वाचलं.
यातील प्रत्येक शब्द आजच्या
श्रीमंतांचा द्वेष. नोटबंदी मध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांची वाट लावली म्हणून नोटबंदीचं समर्थन.
मुस्लिमांचा द्वेष. त्यांचं खाणं बंद करून टाकलं म्हणून गोमास बंदीचं समर्थन.
स्वतंत्र बाण्याच्या स्त्रियांचा द्वेष. शनिमंदिराच्या गाभाऱ्यात, शबरीमला मंदिरात प्रवेश बंदी. म्हणून त्या बंदीचं समर्थन.
परभाषिक लोकांचा द्वेष. ते लोकं इथे येऊन मेहनत करून नोकरीत पाय रोवत असतील तर त्यांचा द्वेष.
नवऱ्यावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून असलेली गृहिणी करियर बनवणाऱ्या स्त्री चे पाय खेचते, तिच्या कॅरेक्टर मध्ये खोट शोधते. तिची बदनामी करते. जिथे तिथे जमेल तसे तिचे मानसिक खच्चीकरण करू लागते. कारण त्या करियर ओरिएंटेड स्त्री सारखं आयुष्य त्या गृहिणीला जगायचं असतं पण ते जमत नाही म्हणून तिचा द्वेष करणं ओघाने आलंच.
नास्तिक माणूस तर्कशुद्ध विचार करतो, जुन्या बुरसट विचारांची ओझी झुगारून टाकतो, कर्मठ प्रथांना जुमानत नाही. देवाच्या धर्माच्या नावावर चाललेल्या पिळवणुकीला चॅलेंज करतो, तर त्याचा द्वेष.
आयुष्यभर तथाकथित शिस्तीत राहून सेक्श्युअली फ्रस्ट्रेट झालेला adult जमाव जेव्हा एखाद्या तरुण कपल ला चौपाटीवर उघडपणे एकमेकांच्या जवळ बसलेलं बघतो, त्यांना मजा करताना बघतो तेव्हा त्यांचा द्वेष करू लागतो, मग संस्कृतीच्या नावाखाली त्यांना कुणी मारहाण करतो आणि वरून त्या मारहाणीचे समर्थन करतो.
याचा द्वेष, त्याचा द्वेष. सगळ्यांचा द्वेष. एक अशी पिढी आपण तयार करतोय किंवा तयार केलीये जी फक्त द्वेषावर जगतेय. माणूस द्वेषावर तेव्हाच जगू लागतो जेव्हा स्वतःबद्दल कमालीचा न्यूनगंड मनात असतो. आपण जेव्हा आपल्या प्रगतीचा वेग इतरांइतका राखू शकत नाही, स्वतःच्या क्षमतेवर give up करुन टाकतो, तेव्हा घरी बसून द्वेष करणं हा सर्वात सोप्पा शॉर्टकट उरतो.
आणि हाच समाज सदैव एका अश्या नेत्याच्या शोधात असतो जो त्या द्वेषाला सन्मानदायक रूप देईल. एकदा का असला नेता मिळाला कि त्यास देवत्व देऊन नसलेले गुण त्याच्या पर्सोनालिटी ला चिकटवून त्याची लार्जर दॅन लाईफ इमेज उभी करत, त्या इमेज ची मनातल्या मनात किंवा जाहीर पूजा करत त्या इमेज चा प्रसार आणि प्रचार करण्यात आयुष्य घालवतो.
शेवटी इतकं बोअरिंग आणि लांबलचक आयुष्य घालवायचं तर काहीतरी मोटिव्ह हवंच. मग नफरत हेच जगण्याचं सर्वात स्ट्रॉंग मोटिव्ह बनून जातं...
#रँडम_थॉट्स
Sunil Akerkar
कोन्ग्रेसच्या काळात स्वतःची
कोन्ग्रेसच्या काळात स्वतःची सर्वाधिक प्रगती झालेले लोक झेव्हा कोन्ग्रेसला नावे ठेवतात तेव्हा सखेद आशचर्य वातते.
मग नफरत हेच जगण्याचं सर्वात
मग नफरत हेच जगण्याचं सर्वात स्ट्रॉंग मोटिव्ह बनून जातं...>>>>> छान! मोदी द्वेषींनी जरूर वाचावे.
मोदींनी आदर्श ग्राम यो जनेत
मोदींनी आदर्श ग्राम यो जनेत दत्तक घेतलेल्या गावात स्वतःच्या निधीतून एकही काम केलेलं नाही, असं माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात लिहून आल्याचं वाचलं.>>>> कुठे वाचलंत ?
आम्ही तर व्हिडीयो बघितला त्यात मोदींनी जे गाव दत्तक घेतलंय तिथे एकदम जबरदस्त काम झालंय. आणि सोनिया गांधी आणि मुलायम सिंग यादव यांनी दत्तक घेतलेल्या गावात बोर्ड लावण्या पलिकडे काहीच काम झालेलं नाही. बहुतेक तो व्हिडीयो फेक असावा. किंवा मोदींनी जे गाव दत्तक घेतलंय तिथे राहूल गांधींनी स्वतःच्या निधीतून काम केले असेल.
https://www.scoopwhoop.com/pm
https://www.scoopwhoop.com/pm-modi-adopts-3rd-village-heres-a-progress-c...
https://www.youtube.com/watch?v=bMUMOPeEdxs
जिंदादिलीसे देखिये जनाब
त्यांना काय, ते तर म्हनतील,
त्यांना काय, ते तर म्हनतील, इथे ब्बसूनच लिहितोय.
फेकण्याची अख्खि युनिवर्सिटी आहे इथे..
मग नफरत हेच जगण्याचं सर्वात
मग नफरत हेच जगण्याचं सर्वात स्ट्रॉंग मोटिव्ह बनून जातं...>>>>> छान! मोदी द्वेषींनी जरूर वाचावे.
- एवढंच वाचलं का बे चोंग्या?
(No subject)
- एवढंच वाचलं का बे चोंग्या?
- एवढंच वाचलं का बे चोंग्या? >>>> अरे डेंगळ्या त्या पुर्ण उतार्याचं ते सार आहे ते समजून घे. पण तुझ्या सारख्या निलाजर्याला ते समजणारच नाही म्हणा. तू फक्त घाणीतच लोळू शकतोस तेच करत बस.
Pages