भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

Submitted by भरत. on 18 March, 2019 - 01:23

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.

गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?

तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्‍या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.

सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्‍यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.

राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अ‍ॅपरंटली, इट अ‍ॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.

आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.

दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.

भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?

सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्‍या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भरत.,
((इथे लिहिणारे बहुतेक भाजपसमर्थक हिं दुत्ववादी आहेत. भ्रष्टाचार, विकास, विषमता, अर्थव्यवस्था यांच्याशी त्यांना काहीही देणघेणं नाही.))

मोदी समर्थक भ्रष्टाचार, विकास, विषमता, अर्थव्यवस्था याच मुद्द्यावरून मत देतात. लोकांना विकासकामं होताना दिसत आहेत. रस्ते बनत आहेत, मेट्रोची कामं सुरु आहेत. लोड शेडींग कमी आहे. पुण्यात गुरूवारी लाईट जात नाहीत म्हणे आता. पाणी कपात कमी आहे.पाण्याच्या समस्येसाठी वेगळं मंत्रालय स्थापणार, इस्त्राईलकडून टेक्नॉलॉजी घेणार आहेत. अर्थव्यवस्था ग्रो करते आहे. यूपीएच्या १० वर्षात घरांचे भाव वेड्यासारखे वाढत गेले, त्यात राजकारणी लोकांचा काळा पैसा शिरला, सामान्य माणसाला घर घेणं अशक्य बनलं, जे वाजपेयी काळात सहज शक्य होत होतं. आता गेली ५ वर्ष भाव त्या गतीने वाढत नाहीयेत, स्थिर आहेत. फूड इन्फ्लेशन कमी आहे. सरकारी कामं ऑनलाइन होऊ शकत आहेत. उद्योगांना पोषक वातावरण आहे. हे सगळं मॅटर करतं.

((ऊठसूट राहुलच्या जात धर्म वंश यांवर टिप्पण्ण्या करण्यापलीकडे त्यांची मजल जात नाही. बहुधा कुवतही नाही.))

राहुलच्या वंशाबद्दल नाही बोलणार तर कशाबद्दल बोलणार? तेच तर एकमेव कारण आहे ना तो तुमचा नेता असल्याचं. त्याच्या अमेठीमधील विकासकामाबद्दल बोलू का...पण ते तर कोणालाच माहित नाही. कॉग्रेसी समर्थक ब्राम्हणवाद , ब्राम्हणवाद म्हणून धुसफूस करत असताना राहुल स्वतःला जनेउधारी म्हणवत मिरवतो. यात विरोधाभास दिसतो म्हणून तो पॉईंट आऊट केला जातो. आता सोनियानी हवन केलं काँग्रेसच्या कार्यालयात. यातून दिसतं की हिंदुत्व किंवा नास्तिकत्व कशाशीच प्रामाणिक नाहीत काँग्रेसी लोक, सत्तेसाठी काहीही करतील.

मुळात यांना लोकशाही नको. अल्पसंख्यांकांवर यांचा राग, मागास जातीं, ग्रामीण भागात राहणारे, गरीब, कमी शिकलेले लोक यांच्याबद्दल तुच्छता. या सगळ्यांना मताधिकार असूच नये असं यांचं आतलं मत. भारतात अशी लोकशाही यायला कारण ठरलेल्या सर्वसमावेशक स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व करणार्‍या गांधी , सर्वांना समान हक्क देणारी घटना देणारे नेहरू आंबेडकर यांचा द्वेष.

ऑ!! एका गरीब मागासवर्गीय घरातून आलेल्या , आधीच्या पिढ्यात कोणी राजकारणी नसलेल्या , संघाचा सामान्य कार्यकर्ता असलेल्या कॉमन मॅनला विश्वासाने देश ओपवला आम्ही. आणि पुन्हा सोपवायचाय. यापेक्षा लोकशाहीची चांगली परिभाषा काय असू शकेल? तुम्ही तर एकाच कुटूंबाकडे कायम सत्ता ठेऊ इच्छित आहात. ही तुमची लोकशाही आहे का!

((यातले अनेक लोक परदेशात राहतात. तिथे त्यांना दुय्यम नागरिक म्हणून राहाय लागलं, तिथल्या बहुसंख्यांच्या द्वेषाचा फटका बसला तरी हे सुधारणार नाहीत.))

अमेरिकेबद्दल बोलायचं तर राहुल गांधी, ज्योतिरादित्य, सचिन पायलट सगळे इथे शिकायला होते. सोनियाजी उपचारांसाठीच काय चेकअपसाठी पण इथे येतात. म्हणजे गांधी परिवाराला भारतीय शिक्षणसंस्था , भारतीय डॉक्टर्स आपल्यासाठी दर्जेदार वाटत नाहीत, त्यांना अमेरिकाच हवी. India not good enough for them. पण इतर कोणी परदेशात असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यात? आणि द्वेषाच्या फटक्याचं म्हणाल तर भारतातच भरपुर द्वेषाचे फटके बसतात. त्यात बहुसंख्य, अल्पसंख्य असं काही नाही.

गांधी परदेशात उपचाराला जातात , पर्रिकरही गेले होते,

ते जातात , तसे भारतातही परदेशातून उपचारास लोक येतात, म्हणून केवळ या एका बातमीने इतके आंधळे अर्थ काढू नयेत.

भ्रष्टयाचाराचे म्हणायचे तर आजवर एकाही काँग्रेस राष्ट्रवाड्यास मोदी फडनवीसनी शिक्षा दिलेली नाही . ( फडणवीस म्हणजे , त्या डाळ प्रकरणात राजीनामा दिलेल्यांचे पुतणे ना ? त्यांची त्या प्रकरणात बरीच शोभा झाली होती म्हणे )

कामे ऑनलाइन होतात म्हणे , पूर्वीपासूनच होतात की , गेली कित्येक वर्षे आमचा पगार ओंलाईनच होतो आहे , अमेरिकेतही मोडीशिवायच ऑनलाइन व्यवहार होतात ना ?

मोदी सामान्य घरातून आले म्हणे , मग त्याला राहुल गांधींनी काय करायचे ? उद्या तुमच्या अमेरिकन मुलाला स्पर्धक म्हणून झोपडपट्टीतला मुलगा असेल , तर त्याचे कौतुक करायला तुमचा मुलगा महागडे क्लास , गाडी ह्यांचा त्याग करेल का ?

आणि जे लोक परदेशात काँग्रेस काळात गेले त्यातले किती लोक मोदी काळात भारतात परत आले ?

तुमचेच सोनिया परदेश उपचार लॉजिक लावले तर मोदी सरकार परदेशस्थ भारतीयांना आवडत नाही , म्हणून ते भारतात येत नाहीत , हेच सिद्ध झाले असे मानायचे का ?

सोनिया गांधी हिंदू नाहित , ख्रिश्चन आहेत , म्हणून त्या नास्तिक आहेत , हे तुम्हास कुणी सांगितले ? की भाजपात नसलेले , सगळे नास्तिक माना , असे अमेरिकेत शिकवतात का ?

गांधी परदेशात उपचाराला जातात , पर्रिकरही गेले होते,- खरच ७० वर्षात साधा एवढा पण करू शकले नाहीत हे लोक कि निदान उपचार भारतात करून घेता यावा.
एकाही काँग्रेस राष्ट्रवाड्यास मोदी फडनवीसनी शिक्षा दिलेली नाही - मग छगन भुजबळ काय स्वातंत्र्य लढ्यात गेले होते का तुरुंगात., बैलगाडी वर कोण फिरत आहेत नक्की. राजमाता, जिजा आणि पुत्र सगळेच तर बैलगाडीत आहेत , आपल्याकडे न्याय व्यवस्था अशी आहे म्हणून बैलगाडी नाही तर अमेरिकेत असता तर सरळ जेल वारी झाली असती.
पूर्वीपासूनच होतात की , गेली कित्येक वर्षे आमचा पगार ओंलाईनच होतो आहे- हो का , खर्च पण पूर्वी ऑनलाईन च करत असाल नाही का ..उगाच मोदी ने कॅश काढावयाला लावली तुमची बाहेर...
मोदी सामान्य घरातून आले म्हणे , मग त्याला राहुल गांधींनी काय करायचे ?- प्रश्न लायकीचा आहे , राहुल गांधी १५ वर्ष काय करत होता त्याचा आहे..आम्हाला माहित आहे कि तो तुमचा राजकुमार आहे , त्याला तसाच ठेवा , प्रश्न हाच आहे कि त्याला किती ज्ञान आहे ते.. आलू से सोना आणि कोका कोला वाला काय ते शिकंजी वाला होता आणि काय शेतकरी डायरेक्ट एअरपोर्ट वर भाजी विकायला जाणार , आणि काय मला NCC काय आहे ते माहित नाही. सगळं लोकांनी बघितला आहे , देश चालवायला अक्कल लागते ती कुठून आणणार तुमचा राजपुत्र..
जे लोक परदेशात काँग्रेस काळात गेले त्यातले किती लोक मोदी काळात भारतात परत आले - ते येतीलही पण तुमच्या सारखी लोक आहेत ना अजून..तुमची एकदा घर वापसी होऊ द्या मग बघू कि कधी यायचं ते...
सोनिया गांधी हिंदू नाहित , ख्रिश्चन आहेत , म्हणून त्या नास्तिक आहेत , हे तुम्हास कुणी सांगितले- नास्तिक आहे असं कोणी म्हणणार नाही..आपल्या धर्माशी प्रामाणिक नाही अस म्हणतोय, कारण दर रविवारी शिक्षा होती त्याच काय, किती फटाके खाणार त्या पादरीचे ...
तुम्ही बहुतेक जात असाल दर रविवारी त्यांच्या ऐवजी प्रायश्चित करायला. तेवढीच जास्त चापलुसी..

काय समजले नाही , सोनिया ख्रिश्चन आहेत , पण त्यांच्या पक्षात सर्व धर्माचे लोक असतील तर सर्वाना समाधान वाटले , असे काहीही धार्मिक कृत्य त्यांच्या ऑफिसात होऊ शकते .
त्याला इतरांच्या पोटात दुखायचे कारण समजले नाही.

आम्ही गांधी कुठे जातात अन पर्रीकर कुठे जातात , ह्यावरून आमच्या क्षेत्राची योग्यता तपासत नाही, असेच म्हटले तर वाजपेयींच्या गुढग्याची सर्जरीही इथेच झाली ना ?

आजार झाला , त्यावर उपचार शोधा , आवडत असेल असेल तर इथे करा , नैतर ऑनलाइन तिकीट बुक करा. टेकसिने सुंदर एअरपोर्ट गाठा अन विमानाने हवे तिथे जा, हा विकास काँग्रेसनेच तर केला.

तुम्ही कोणत्या विमानात बसून सदेह अमेरिकेत गेले ? पुष्पक विमानातून का ?

तर अमेरिकेत असता तर सरळ जेल वारी झाली असती.

पाच वर्षे भारतात मोदी सत्ता आहे. अजून न्याय लागला नाही का ?

काँग्रेसच्या काळात रिझर्व्ह ब्यांका वाढली अन लबाड सरकारने ती साफ केली.

आणि मोदी सरकारात भारतात परत यायचे तर या ना , उगाच इतरांच्या घर वापसीची चिंता कशाला करायला ? आम्ही ह्याच देशात कष्ट करतो अन ह्याच देशाच्या प्रगतीत भर घालतो , जर आम्ही गुन्हेगार असूच तर आमचे सरकार आम्हाला शिक्षा देईल अन नसेल तर नाही.

उगाच तुमच्या नाकर्तेपणाला इतर धर्माचे कारण सांगू नका. भाजपाच्या काळात पाकिस्तासाठी हेरगिरी करणारी पिलावळ , ध्रुव वगैरे नावाची व सक्सेना वगैरे आडनावाची निघाली ना ? त्यामुळे जात धर्म वगैरे न पाहता तुम्हीही इथे येऊन देशास हातभार लावावा.

तुमची cash मोदीने बाहेर काढायला लावली.
तुमच्या सारख्यानची घरवापसी झाली नाही.

हे असे पर्सनल बोलायचे नाही , नाहीतर सायबर क्राईमला स्क्रीनशॉट पाठवीन , तुमच्या घरचे आम्ही खात नाही.

वेबमास्टर , हे इतरांना चोर वगैरे म्हणणे इथल्या तत्वात बसते का ? की सरळ स्क्रीन शॉट सायबर क्राईमला पाठवायचे ?

मोडीने केश बाहेर काढली , तर त्यात सर्वात जास्त पैसे भरणारा गुजरातचा हिंदू की जैनच निघाला ! ना ख्रिसचन , ना मुसलमान , सगळ्या दुनियेने धिंडवडे पाहिले . मग आता ह्याचे प्रायश्चित्त तुम्ही कुठे घेणार , गंगेत का ? तरीच मोदीजी सारखे गँगा गँगा करत असतात , किती ते दुःख! काळ्या पैशाने मुसलमान अतिरेकी अन नक्षलींचा फायदा होत होता म्हणे ! तर इतका काळा पैसा भरलेला , ना मूसलमान ना नक्षली ! ह्यांचाच गुजराती हिंदू निघाला !! , जगभरचा काँग्रेसचा काळा पैसा शोधायला फिरले अन चोर ह्यांच्या राज्यातला निघाला , जिथे हे वीस वरसे सत्तेत होते.

आणि आता तर 2000 ची नोट अन सत्ता पूर्ण देशाची.

अहो ब्लॅककॅट थोडे शांत घ्या हो, हे स्वतःशीच बडबडत बसल्यासारखं काय चाललेलं असतं तुमचं. तिकडे ते दोन्हीकडचे राजकारणी रात्री एकत्रच जेवत असतील आणि मस्त बडीशेप चघळत आज कोणी कोणाची कशी धुतली याची हातांवर टाळ्या देत चर्चा करत असतील आणि इकडे तुम्ही उगीच तडतड करून स्वतःची तब्येत बिघडवताय.

मस्त विविधभारती लावा ऑल इंडिया रेडिओच्या अँप वर आणि चहासोबत आनंद घ्या. आठ वाजता एअर उर्दू लावा आणि सुरज के साथ साथ ऐका. दोन तास मस्त जातात. त्यांना व्हाट्सअप्प करून त्यांच्याशी बोला. उर्दूतले नवे शब्द शिका. आयुष्य आनंदात घालवा हो. ही इतकी तडतड बरी नाही.

पण प्रत्येक वाक्यात इतरांना उद्देशून तुमच्यासारखे हे शेपूट कशाला ? हे काय चित्रगुप्ताच्या डी एन ए तुन उपजलेत का ?

वंचित आघाडी आमच्यासाठी किंचित आघाडी आहे. त्यांनी खायची तेवढी मते खावीत व राहिलेली आम्हाला द्यावीत,'
इति ,कविवर्य रामदासजी आठवले

मस्त विविधभारती लावा ऑल इंडिया रेडिओच्या अँप वर आणि चहासोबत आनंद घ्या.

100% बरोबर
नेते मंडळी बघा कोण्ही किती ही आरोप करू dhyat लोड घेत नाहीत .
असे आरोपांचा विचार करत बसले तर राजकारणी लोक वेडी होतील .ते आरोप करणाऱ्या जनतेलाच वेडे banavtat

सनव यांनी दिलेल्या उत्तरांवर पुढे -
अर्थव्यवस्था - देशात बेकारी वाढली. सरकार रोजगाराचे, बेकारीचे आकडे लपवून ठेवतंय. सरकारी आस्थापनांच्या कर्मचार्‍यांचेच पगार खोळंबतात. खासगी क्षेत्रात नवी गुंतवणूक होणं थांबलंय. गेल्या पाच वर्षांत किती आयपीओज आले? गेल्य दहा वर्षांत write off केलेल्या कर्जातली ८०% गेल्या पाच व र्षांत केली गेली. ही युपीएच्या काळात दिली होती, हे साळसूद उत्तर पुरेसं नाही. ती मोदींच्या काळात बॅड झाली.
इकॉनॉमी ग्रो करतेय ती सरकारी आकडेवारीत. तज्ञ्यांना त्याबद्दल खात्री नाही.
रस्ते, मेट्रो यांची कामं आधीही होत होती. आघाडी सरकारच्या काळात मुंबईत मेट्रो सुरू झाली.
गृहबांधणीबद्दल बोलायचं तर फडणवीसांनी एफ एस आयची खिरापत वाटलीय. पर्यावरण विषयक नि यम शिथील केलेत.
पाणीपुरवठा - गेल्या तीन वर्षांत पाऊस चांगला झाला. यंदा काय चित्र आहे पहा. लो ड शे डिंगबद्दल मीच धागा काढल होता.
गुजरात निवडणुकांच्या तोंडावर मोदींनी नर्मदा धरणा चं उ द्घाटन केलेलं. त्यासाठी पाण्याची नासाडी केली. तिथे आज पाणी समस्या आहे. नर्मदा प्रकल्प हा मोदींचा सगळ्यात जास्त महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
नोटाबंदी आणि जीएसटीमुळे मार खाल्लेल्या लहान उद्योजक, व्यापार्‍यांबद्दल लिहावं तित कं थोडंच.
मोदींची अर्थविषयक कामगिरी दाखवताना नोटाबंदीचा उल्लेख केलाच पाहिजे.
२. राहुलचा वंश - तुम्ही त्याला मिक्स्ड ब्रेड म्हटलंय. भाजपचे अनेक नेते तो उल्लेख करतात. इथे तुम्ही साळसुदपणे घराणेशाहीक डे वळलात. यातही तुमचा साळसूदपणा असा की फक्त टॉप लेव्हलच्या घराणेशाहीला विरोध . बाकी सगळीकडची घराणेशाही गोड.

आमचा घराणेशाहीला कठोर विरोध आहे.*

* अटी लागू.

ब्राह्मणवाद याचा अर्थ तुम्ही हेतुतः चुकीचा लावत आला आहात. सातींशी झालेला तुमचा वाद अजूनही असेल मायबोलीवर.
३. लोकशाही नको - पुन्हा माझ्या म्हणण्याचा विपर्यास केलात. हमहत्त्वाकांक्षी अ‍ॅस्पिरेशनल मिडल क्लास हा जो भाजपचा कोअर पा ठिराखा आहे -त्याचा आरक्षणाला विरोध आहे. गरिबांना केलेल्या मदतीला विरोध आहे. शेतकर्‍या च्या प्रश्ना शी देणंघेणं नाही. सतत आम्ही करदात्यांच्या जिवावर हे सगळे फुक टे पोसले जातात ही टिमकी वाजत असते. भाजपने हरयाणा- राजस्थान मध्ये पंचायत निवडणुकांत शिक्षणाची अट घालून अनेकांना लोकशाहीच्या रिंगणातून दूर केलं.

गांधी घराण्यातला नेता असण्याबद्दल मी आधीही लिहिलंय. लोकांना तो पटला, आवडला तर लोक त्याला निवडतात. गांधी घरा ण्यातले सगळे नेते असे निवडणुकीत जनतेचा कौल घेऊनच सत्तेत आले. सोनिया गांधींनी तर विरोधी पक्षात असताना काँग्रेसची धुरा सांभाळली आणि विजय मिळवला. राहुलही आता विरोधी पक्षातूनच सुरुवात करतोय.

परदेशस्थ भारतीयांचा मुद्दा - यालाही तुम्ही ट्विस्ट दिलाय. भाजपचे पाठिराखे इथे अनेक ग टांचा घाउक द्वेष करतात. त्या लोकांचं जगणं अवघड हो ईल अशी परिस्थिती निर्माण करण्यात सरकार साथ देतं किंवा डोळेझाक करतात. मोदींच्या पा ठिराख्या अनिवासी भारतीयांना यात काही वावगं वाटत नाही.
आता ते ज्या लोकशाही असलेल्या देशात राहतात, तिथे अल्पसंख्यांक, स्थलांतरित म्हणून असा द्वेष सहन करावा लागला, तर असा तो मुद्दा आहे. भारतात द्वेष सहन करावा लागला असं तुम्ही म्हणता, तेव्हा तुम्हां ला द्वेष म्हणजे काय हे माहीतच नाही आणि त्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजा.

मधलनिनास्तिक, हिंदु धर्म घोळ तुम्हांला खरंच कळत नाहीए की वेड पांघरताय?
रामसेतू हा रामाने बांधला होता का? अमुक एक जागा रामाची जन्मभूमी होती का? राम नावाचा ई श्वरी अवतार होता का? या प्रश्नांची उत्तरं एक सरकार म्हणून काय द्यायला हवीत? ती उत्तरं देताना श्रद्धा हा मुद्दा नव्हता.

मोदींचा घणाघात; 'दोन पंतप्रधान'वर भूमिका मांडण्याचे पवारांना आव्हान
म. टा. प्रतिनिधी, नगर
'अखंड भारतासाठी स्वातंत्र्यसैनिक व जवानांनी बलिदान दिले असताना काँग्रेस जम्मू-काश्मीर वेगळे करून देशाचे तुकडे करू इच्छित आहे व या त्यांच्या भूमिकेसोबत शरद पवार आहेत,' असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केला. 'राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेस सोडलेल्या पवारांनी 'एका देशात दोन पंतप्रधान' या काँग्रेसच्या भूमिकेवर मौन बाळगले आहे

आजवर भारतात1 आणि काश्मिरात 1 असे स्वतंत्र पंतप्रधान कधीही नव्हते,

ह्यांच्या काळात अफवा उठली तर उत्तर पवारनी अन राहुल गांधींनी द्यायचे, मग मोदी चौकीदार का झालेत ? घाल ना तुरुंगात !

एकमेकांची व्यक्तीगत उणीदुणी काढून भांडू नका. काँग्रेसचे गुणवंत अध्यक्ष राहुल गांधीनी बघा या विद्यार्थीनीला बॅडमिंटन कोर्ट का बनू शकत नाही ते समजावून सांगितले ते ऐका आणी ते इतरांना समजावून सांगा. (त्या मुलीला किती समजलं ते तिच्या चेहर्यावरील भावांवरून समजून घ्या. Proud )
https://youtu.be/UcW1SXQw7Qo

प्रश्न काय विचारलंय आणि उत्तर काय दिलय raga नी कशाचा कशाला काही संबंध नाही .
त्यान्चे पाठीराखे पण तसेच आहेत .

उस कोर्ट के जज्ज को काँग्रेसने नियुक्त किया था असे मोदींनी उत्तर दिले असते.

भाजपचे पाठिराखे इथे अनेक ग टांचा घाउक द्वेष करतात.>>>>

त्याला उत्तर म्हणून ते उरलेले अनेक गट भाजप पाठीराख्यांचा घाऊक द्वेष करतात.

इथे माबोवरच वाचले की भाजपला फक्त 31 टक्केच मते मिळाली. म्हणजे भाजप पाठीराखे 31 टक्केच आहेत. (गेली 5 वर्षे भाजप म्हणजे भयंकर मोठा ब्रम्हराक्षस असेच लिहिले गेलेय, ते वाचून वाचून।ही संख्याही आता खूपच कमी झालेली असणार) उरलेले 69 टक्के इतर अनेक गट आहेत. ह्या 69 टक्क्यांनी शांतीचा संदेश द्यायचे काम हाती घ्यायचे. स्वतःपासून सुरवात करायची. 31 टक्क्यांच्या द्वेषाला द्वेषाचे उत्तर मिळाले नाही तर ते तरी किती काळ एकटेच द्वेष करत बसणार. 69 टक्के या बाबतीत गांधीजींची विचारसरणी का अमलात आणत नाहीत? गांधीजींवर त्यांची प्रचंड श्रद्धा आहे हे वेळोवेळी लिहितात. ती आचरणातून दाखवली तर गांधीविचार आजही कसे लागू केले जाऊ शकतात याचे प्रात्यक्षिक घडेल.

झुरळं मारण्याच्या प्रश्नावर गांधीजी सांगतात स्वच्छता पाळा, म्हणजे झुरळं येणार नाहीत. पण ते खूप झुरळं झाल्यावर काय करायचं ते सांगायला विसरले. आता स्वच्छता अभियान राबवायला लागणार.

मागच्या वेळेसारखा जोश दिसत नाही सोशल मिडीयावर. २०१४ ही पहिली निवडणुक होती जी सोशल मिडीयवर लढली गेली.

झुरळं मारण्याच्या प्रश्नावर गांधीजी सांगतात स्वच्छता पाळा, म्हणजे झुरळं येणार नाहीत. पण ते खूप झुरळं झाल्यावर काय करायचं ते सांगायला विसरले. आता स्वच्छता अभियान राबवायला लागणार.>>>>> Rofl

आम्हाला झुरळे म्हणून संबोधल्याबद्द्ल थेंकू. Proud पण तुम्ही गांधीजींना झुरळांबद्दल् कधी विचारायला गेला होतात ते नाही सांगीतलेत.

आम्हाला झुरळे म्हणून संबोधल्याबद्द्ल थेंकू
~ कायपण काय अंगावर घेता हो तुम्ही..?. तुम्ही स्वत:ला झुरळ का म्हणवून घेत आहात पण?

@विठ्ठल ,@भरत.,@आ.रा.रा.,@हेला ,@मार्मिक गोडसे,@उदय

इथल्या प्रत्येक "अभिजनांची" सामान्यांकडून हाड हाड होणाऱ्या कुत्र्यासारखी अवस्था होऊ नये म्हणून हा व्हिडिओ एकदा कृपया बघा.
तुमची बुद्धी एका घराण्याच्या पायी वाहून तिची अवस्था क्षुद्राहून क्षुद्र करून घेण्यापेक्षा हा व्हिडिओ बघून कृपया एकदा पुनर्विचार करा ही कळकळची विनंती !!

अभिजन बदमाशांची टोळी
https://www.youtube.com/watch?v=qGFtWANILPk

हाड हाड होणाऱ्या कुत्र्यासारखी अवस्था होऊ नये !!

फक्त मोदीला वाईट म्हणायचे म्हणून संस्कृतपेक्षा उर्दू महान म्हणणारे बघून मी धन्य धन्य झालो.
आहे मी मोदीविरोधक, पण इतकीही अक्कल गहाण नाही टाकलीय.
ज्ञानेश्वर, तुकारामांना मध्ये ओढायची काहीही गरज नव्हती... तुमचा गोंधळ चालू द्या!

गल्ली चुकली की वो अज्ञातवासी.
मेकॉले आणि नेहरूंनी संस्क्रुत मारली म्हणणाऱ्यांना दाखवून दिलं की संस्क्रुतात असलेलं ग्यान या दोघांनी मराठीत आणलं. त्यासाठी छळ साहिला.

उर्दू भारताची भाषा नाही म्हणणाऱ्यांना खरं काय ते सांगितलं.

संस्क्रुतला हाड हाड कुठे केलं?

आणि याचा मोदींशी काय संबंध?
हा वाद मोदी यायच्या आधीपासूनचा आहे.

उर्दू भारताची भाषा नाही म्हणणाऱ्यांना खरं काय ते सांगितलं.
कशी आहे ते तुम्ही सांगा मला खूप ustukta
आहे .
फक्त खरी महिती द्या

Pages