भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

Submitted by भरत. on 18 March, 2019 - 01:23

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.

गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?

तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्‍या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.

सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्‍यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.

राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अ‍ॅपरंटली, इट अ‍ॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.

आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.

दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.

भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?

सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्‍या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

संपले का मनाचे श्लोक. स्ट्रॉमॅन आर्ग्युमेंटचा सर्वात उत्तम नमुना म्हणजे उदय यांची वरील पोस्ट. चालू राहू दे.

द्वेषाचे रसायन देशरुपी शरिरात हळूवारपणे पसरत आहे... ते बाहेर पडणार आहेच पण जेव्हा पडेल / निघेल त्यावेळी सर्वांसाठीच हानीकारक राहिल... यातुन तुमची, आमाची आणि कुणाचीच सुटका नाही>>>>>

सहमत. म्हणून सांगते, हा संघी, तो बीजेपी हा विचार सोडा. द्वेष टाळा. समोरचा तुमचा द्वेष करतो असे तुम्हाला वाटते म्हणून तुम्ही त्याचा द्वेष करता. गांधीजींची तत्वे आठवा रोज सकाळ संध्याकाळ. मौन हे ही शस्त्र आहे असे ते मानत.

{उदय, तुमच्यासारख्या लोकांना , जे स्वतःची आयडी लपवतात, त्यांना}
त्यांच्या प्रोफाइलमध्ये नाव, गावाचं नाव आहे. त्यांच्या संशोधनाबद्दलचा लेख त्यांनी लिहिला आहे.
हा प्रश्न विचारणाऱ्याने स्वतःची ओळख उघड केली आहे की लपवली आहे, ते मी विचारणार नाही. मला त्याने फरक पडत नाही.

<< तुम्हाला आतापर्यंत मी संतुलीत आय डी समजत होते, पण तुमचा बुरखा फाटलाय. >>
------- मी संतुलीत आय डी आहे हा तुमचा समज चुकीचा आहे. मी जातीयवाद आणि धार्मिक आधारावर द्वेष पसरवणार्‍यांच्या विरोधात आहे.

<< डायरेक्ट नाव लिहा की. मी आता पर्यंत कधीच मुस्लिम वा दलित लोकांना कमी लेखले नाही. >>
-------- नाव (आय डी) लिहील्याने काय फरक पडतो आणि किती लोकांचे लिहायचे?
तुमच्या लिखाणात तुम्ही स्वत: दलित यांना कमी लेखले नाही, लेखत नाही आणि हे स्तुत्य आहे....

पण मायबोलीवरच "..... गावाबाहेर उकिरडा आहे तिथे लोळा... " अशा हिणकस कॉमेंट वाचल्यावर मला त्या विरोधात कुठे पुसटसा विरोध ही जाणवला नाही. उकिरड्या मागचे संदर्भ सर्वानाच माहित असेल. प्रत्येक न पटणार्‍या कमेंटवर विरोध करणे अशक्य आहे हे पण समजतो, मर्यादा आहेत. मी काही स्क्रिन शॉट घेत नाही पण काही प्रतिसाद विसरल्या जात नाही.
माझ्यासाठी (मोदी, भाजपा विरोध करतो म्हणुन) धारदार शब्द असतील तर कुठेतरी अशा हिणकस कमेंटला पण मंद असा विरोध अपेक्षित होता. हातावर एक छोटी चापट.

<<पण तुमच्यासारखे एन आर आय भारत प्रेमाचे उमाळे फुटुन दुसर्‍याला कायम तुच्छ लेखत असतात. तुमच्यापेक्षा उघड शत्रु परवडले. >>
------- मी कुणालाही तुच्छ लेखत नाही... वैचारिक मतभेद आहेत आणि रहातिल...

'चौकीदार चोर आहे' हे आधी कोर्टात जाऊन सिद्ध करा भाटानो, आणि मग गाढवासारखे बोंबला 'चौकीदार चोर आहे' आहे म्हणून.
-

आज संध्याकाळी पुण्यात ‘खोटीच्या खोटी उड्डाणे’ या रवि नायर यांच्या पुस्तिकेच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन होत आहे. रवि नायर यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या साप्ताहिकाच्या १ एप्रिल २०१९च्या अंकात प्रकाशित झाला आहे. हा अनुवाद अवधूत डोंगरे यांनी केला आहे. या पुस्तिकेतील हा संपादित अंश...

https://www.aksharnama.com/client/trending_detail/3149

कोर्ट दुसऱ्यांसाठी , हे एक तर नथुगिरी करतात किंवा फेकुगीरी, तेच लोकांनी सत्य मानायचे.

पण मायबोलीवरच "..... गावाबाहेर उकिरडा आहे तिथे लोळा... " अशा हिणकस कॉमेंट वाचल्यावर मला त्या विरोधात कुठे पुसटसा विरोध ही जाणवला नाही. उकिरड्या मागचे संदर्भ सर्वानाच माहित असेल. प्रत्येक न पटणार्‍या कमेंटवर विरोध करणे अशक्य आहे हे पण समजतो, मर्यादा आहेत. मी काही स्क्रिन शॉट घेत नाही पण काही प्रतिसाद विसरल्या जात नाही.
माझ्यासाठी (मोदी, भाजपा विरोध करतो म्हणुन) धारदार शब्द असतील तर कुठेतरी अशा हिणकस कमेंटला पण मंद असा विरोध अपेक्षित होता. हातावर एक छोटी चापट.>>>>>>> मुळात दोन्ही बाजूचे लोक ( मोदींच्या बाजूचे व विरोधी ) एकमेकांवर कधी कधी खूप खालच्या स्तरावर प्रहार करत असतात, ते मलाही पटत नाही. पण जेव्हा मागे मी माझे नातेवाईक सैन्यात आहेत असा उल्लेख केल्यावर तुम्ही ती मनगढंत कहाणी लोक पसरवतात असे लिहीलेत. जर तुम्हाला वस्तुस्थिती माहीत नाही तर तुम्ही अशा कमेंट्स कसे करु शकता याचेच मला आश्चर्य वाटते.

वैचारीक मतभेद असावेत कारण त्यातुन सत्य मग ते कटु का असेना नेहेमीच बाहेर येते, पण याचा अर्थ हा होत नाही की समोरचा तुमच्या विरोधी पार्टीतला आहे तर तो आपल्या नेत्याचे सगळे गुन्हे झाकतोय. हो, मला मोदी आवडतात कारण आता पंतप्रधान असतांना त्यांनी चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न केलाय. भले त्यात ते यशस्वी होवोत अथवा न होवोत. जर तुम्हा लोकांना मोदींचे दोष दिसतात तर मग ते राहुलचे पण पहाण्याचा प्रयत्न करा.

बाकी बुलंद शहराच्या घटना, ग्रॅहम स्टेन्स व त्यांच्या दोन्ही चिमुकल्यांची हत्या याबाबतच्या तुमच्या विधानांशी मी पूर्ण सहमत आहे. बजरंग दल, सनातन व इतर धर्मातल्या सुद्धा कडव्या संघटनांवर पूर्ण बंदी आणली पाहीजे. मला कधीही या हत्या पटल्या नव्हत्या. यातील दोषींना दुसर्‍या गुन्हेगारांना पण जरब बसेल अशी शिक्षा झाली पाहीजे. कारण धर्म प्रसार हा गुन्हा नाही, स्टेन्स यांच्याशी चर्चा करुन धर्म प्रसाराची व्याख्या क्लीअर करता आली असती. पण या लोकांनी आतातायीपणा करुन जे नृशंस कृत्य केले त्याला फाशीच हवी.

मला मोदी आवडतात कारण आता पंतप्रधान असतांना त्यांनी चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न केलाय. भले त्यात ते यशस्वी होवोत अथवा न होवोत

~ हे भारताच्या सर्वच्या सर्व पंतप्रधानांबद्दल म्हणता येईल. पण मोदि आवडणार्‍यांना इतर काँग्रेसी पंप्रबद्द्ल कडवट द्वेष असतोच हे काही गुप्त नाहि.

<चांगले निर्णय > चांगले हा शब्द सापेक्ष आहे. नोटाबंदीला चांगला निर्णय म्हणणारे लोक नक्कीच डोळ्यांवर कातडं ओढून जगत असणार.
आता निवडणुकांदरम्यान कोटी कोटी रुपयांच्या रोख रकमा सापडताहेत. नक्षलवादी हल्ले होताहेत.
नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, दहशत वाद, नक्षलवाद संपला होता. आता पुन्हा नोटाबंदी करावी लागेल.

नोटबंदी म्हणजे कबिराचा दोहा आहे.
बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय,
जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय।

काँग्रेस , राष्ट्रवादी , मुसलमान , नक्षली , पाकिस्तानी , स्वीस ब्यांक , सगळ्यांच्या नावाने बोंबलुन झाले.

पण सर्वात जास्त काळा पैसा भरणारा गुजरातेतच बसला होता!
Proud

संघ परिवाराचे हिंदूराष्ट्र म्हणजे काय ?

तुम्ही काय खावं काय नाही ?
कसे कपड़े घालावे कसे नाही ?
कोणासोबत लग्न करावे कोणासोबत नाही ?
कोणा सोबत झोपावे कधी झोपावे ?
कोणा सोबत प्रेम करावे, कोणा सोबत नाही ?
किती मुलं जन्माला घालावी ?
कोणतं शिक्षण घ्यावं ?

याची आचार संहिता म्हणजे हिंदूराष्ट्र !

कोणाला काही शंका ?>> Uhoh

हा अवगुण म्हणजे बिनदिक्कत खोटे बोलणे. Pathological Liar ! मग ते पंतप्रधान असो वा मायबोलीवर चे काही ठराविक प्रचारी आय डी. आमच्या घरी मुस्लीमांचे/ ख्रिश्चनांचे / दलितांचे येणे जाणे होते, रोजच राबता होता. आमच्या घरात तर अजिबातच द्वेषाचे असे कुठलेही वातावरण दिसले नाही / नव्हते.... , आम्ही एका ताटात जेवायचो. पण आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्याच खुप मागे राहिलेल्या बांधवां बद्दल कमालीची टोकाची टिका असते.... .
कुठे काही मुद्दा निघाला तर समोरच्याला पटवण्यासाठी आमच्या घरात.... , माझ्या क्ष वर्षांच्या जॉब मधे अनेक देशांच्या विविध लोकांशी संबंध आला... , आमच्य घरी ".... थापा... " वातावरण होते.... आमच्य घरी म्हणत पुढे पचवता येतील तेव्हढ्या थापा हाणायच्या.... मग या थापेत कधी माझ्या मावस आत्याची दोन चुलत भाऊ देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यात असे पण सोडायचे...
वाचणार्‍याला खरे खरे 'वाटणारा' वैयक्तिक अनुभव वाटतो.... पण अनुभव असतो खोटा किंवा मनाचा खेळ... जे नाही आहे ते दाखवण्याचा, रंगवण्याचा प्रयत्न. या मुशीत तयार झाल्यावर... पुढे राजकारणात येतात... आता खोटे बोलण्याची सवय अगदी अंगवळणी पडली आहे मग अतिरेकी तळांवर हल्ला करुन ३०० मारले असे समस्त देशवासीयांना सांगतात. प्रश्न सरकारला विचारल्यावर थयथयाट करायचा. तिनशेची खातरजमा करायची जबबदारी प्रश्न विचारणार्‍यांची. प्रसिद्ध होणारी विकासाची बहुतेक सर्व आकडेवारी खोटी असते किंवा धादांत खोटी असते किंवा कमालीची दिशाभूल करणारी भरकटवणारी असते. दहा पैकी चार निर्णय चुकले म्हणजे आभाळ कोसळणार नाही...>>>> जनरीक बोलल्याचा आव आणून केलेली व्यक्तीगत टीका वाटत आहे, असल्यास निषेध, नसल्यास 'काहीही हं ***'. बाकी सेवा दल शिकवणूक जिंदाबाद! सगळ्यात अभ्यासू लोक्स इकडेच असतात...असो!

हा अवगुण म्हणजे बिनदिक्कत खोटे बोलणे. Pathological Liar ! मग ते पंतप्रधान असो वा मायबोलीवर चे काही ठराविक प्रचारी आय डी. आमच्या घरी मुस्लीमांचे/ ख्रिश्चनांचे / दलितांचे येणे जाणे होते, रोजच राबता होता. आमच्या घरात तर अजिबातच द्वेषाचे असे कुठलेही वातावरण दिसले नाही / नव्हते.... , आम्ही एका ताटात जेवायचो. पण आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्याच खुप मागे राहिलेल्या बांधवां बद्दल कमालीची टोकाची टिका असते.... . >>>>

सहमत , काही लोक "मी काही वर्षे सन्घात गेलो होतो" वगैरे लोणकढी थापाही मारत असतात आणि सन्घाच्या नावाने फक्त वाइट बाबी सान्गण्यात पुढे असतात... प्रत्य्क्षात ते लोक सेवादलाचे सदस्य असतात.

दुसऱ्या टप्प्याचं मतदान तोंंडावर आलेलं असताना भाजपने आपल्या 'फिर एक बार, मोदी सरकार' या घोषणेत आणखी दोन ओळी जोडल्यात.
मतदानाचे एकूण किती टप्पे आहेत? पाच की सात?
तोवर गझल तयार होऊ शकेल.

दुसऱ्या टप्प्याचं मतदान तोंंडावर आलेलं असताना भाजपने आपल्या 'फिर एक बार, मोदी सरकार' या घोषणेत आणखी दोन ओळी जोडल्यात.
नवीन Submitted by भरत. on 16 April, 2019 - 19:10
<<

ते भाजपाचे जाऊद्या हो. पहिले हे सांगा की
कॉंग्रेस आता म्हणतेय "अब होगा न्याय" मग गेली सत्तर वर्षे सत्ता यांच्या हातात होती तेंव्हा कॉंग्रेसी नेते गोट्या खेळत होते की काय ?

बाळ बीबीसीन्यूज हब, आधी साधं अंकगणित शिका.
२०१९-१९४७ = ७२.
यात जनता पक्ष, ह्वीपीसिंग, चंद्रशेखर , देवेगौडा, गुजराल यांची ७ , वाजपेयींची सहा आणि मोदींची पाच कमी केली की उरतात ५४ . सत्तर नाही. असो.
आता गेली पाच वर्षं नेहरूंचं भूत मोदींना काम करू देत नव्हतं असं तुम्ही म्हणत असाल. असो.
पण या गेल्या पाच वर्षांत वाढलेला अन्याय दूर करायलाच ही न्याय योजना आणावी लागली.

पण तुम्ही भाजपचं जाऊ द्या असं का म्हणताय, बाळ बीबीसीन्यूजहब?

नवीन Submitted by भरत. on 16 April, 2019 - 19:45
<<

ठिक आहे.
त्या ५४ वर्षात कॉंग्रेसने भारतीय जनतेबरोबर "न्याय" का केला नाही ??
व आता निवडणुकीच्या तोंडावर, 'न्याय' करण्याची बुद्धी कॉंग्रेसला कशी सुचली हे ही सांगा ?

पण तुम्ही भाजपचं जाऊ द्या असं का म्हणताय, बाळ बीबीसीन्यूजहब?
Submitted by भरत. on 16 April, 2019 - 19:45
<<

हे ह्यासाठी म्हणतोय की भाजपाचे बरे-वाईट पाहायला पक्षात एकसे एक नेते आहेत, कॉंग्रेससारखा तो एकखांबी तंबू नाही शिवाय या एकखांबी तंबूचा, तो मुख्य खांब आहे मंदबुद्धी. म्हणून म्हटले तुम्ही भाजपाचा फार विचार करु नका.

Pages