गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.
गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?
तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.
गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.
सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.
राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अॅपरंटली, इट अॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.
आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.
दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.
भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?
सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?
जिंदादिलीने बघा..
जिंदादिलीने बघा..
अमेठी आणि रायबरेली येथील
अमेठी आणि रायबरेली येथील विकासकामांच्या जोरावर राहुल व सोनिया २०१९ ला जनतेकडे नव्याने जाऊन मते मागू शकले असते. परंतु आधीची १० वर्षे जशी सत्ता असतानाही फुकट घालविली तशीच गेली ५ वर्षेहि घालविली. याला आळशीपणा नाहीतर काय म्हणावं?
हे लोक विकासाच्या गप्पा मारतात नि गरिबांना न्याय देण्याच्या वार्ता करतात ! गेली ४० दशके "गरिबी हटाव " मध्येच अडकून पडलेला इंदिरा काँग्रेस हा जगातील एकमेव पक्ष असेल.
घाण बघु नका. मोदीच्या आदर्श
घाण बघु नका. मोदीच्या आदर्श ग्रामचे ३/१३ बघा
अहो काँग्ग्रेस नको असेल तर
अहो काँग्ग्रेस नको असेल तर निवडुन देणार नाही त्यांना. आता मोदीची आदर्श ग्राम किती ग्राम पूर्ण झाली ते सांगा
भाजप किती वर्षं मंदिर वहीं
भाजप किती वर्षं मंदिर वहीं बनाएंगे मध्ये अडकलंय ते बघू नका.
त्यावरून देशात किती दंगे करवले तेही बघू नका.
भाजप किती वर्षं मंदिर वहीं
भाजप किती वर्षं मंदिर वहीं बनाएंगे मध्ये अडकलंय ते बघू नका. >>>
काहीतरी दुसरा मुद्दा शोधा.
मंदिराचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे आणि कुणी कितीही बोंबाबोंब केली तरीही न्यायालयाच्या निर्णयाचीच वाट हिंदू समाज पाहतोय.
पण गरिबी हटवायला आणि गरिबांना न्याय द्यायला कुठल्या न्यायालयाने काँग्रेसला थांबवलंय?
अहो काँग्ग्रेस नको असेल तर
अहो काँग्ग्रेस नको असेल तर निवडुन देणार नाही त्यांना. आता मोदीची आदर्श ग्राम किती ग्राम पूर्ण झाली ते सांगा >>>
मग भाजपाही लोकांना नको असेल तर निवडून देणार नाही.... लिहिणंच थांबवा मग
भाजपाही लोकांना नको असेल तर
भाजपाही लोकांना नको असेल तर निवडून देणार नाही. >> हा कुठला पक्ष?
तू फक्त घाणीतच लोळू शकतोस तेच
तू फक्त घाणीतच लोळू शकतोस तेच करत बस.>> कोण घाणीत का बरे लोळेल..? ही असली उपमर्द करणारी शाखेतली वाक्ये संघोट्यांवरच हाणावीत. वास्तवीक जीवनात शाखेतल्या बौद्धिकाचा सुतराम संबध नसतो हे सत्य एकदा पचवुन घ्यावे..!
हेलाला काही बोललं तर DJ का
हेलाला काही बोललं तर DJ का वाजतोय? त्याने जी भाषा वापरली त्या भाषेत त्याला उत्तर दिलंय. तुम्ही लोड नका घेऊ. बाकी शाखेत काय शिकवतात ते तुम्हाला खुप माहित आहे असे दिसते. कधी गेलेले म्हणायचे तुम्ही शाखेत कळू तर द्या. की सेवादलाच्या शिबीरात जाऊन जे शिकवतात ते अध्यक्षांप्रमाणे रोज सकाळी रात्री लवकर उठल्यामुळे शाखेतले वाटते.
भाजपच्या आणखी एक गुणवंत
भाजपच्या आणखी एक गुणवंत नेत्या मनेका गांन्धी (ज्यांचा नवरा मुसलमान होता म्हणे) यानी आज सुलतानपूर येथी;ल सभेत मुसलमान समाजासमोर काही मुक्ताफळं उधळली आहेत
"This is important. I am winning. I am winning because of the love and support of people. But if my victory is without Muslims, I won't feel that good. Dil khatta ho jayega (Things will become sour). Then when a Muslim comes to me for work, I think let it be, how does it matter. It's all give and take, isn't it? We aren't all sons of Mahatma Gandhi, are we? (laughter). It's not that we keep on giving and then losing in the election. This victory will happen with or without you."
https://www.ndtv.com/india-news/lok-sabha-elections-what-bjps-maneka-gan...
आणखी एक गुण्वंत नेते आणि
आणखी एक गुण्वंत नेते आणि गृहमंत्री (पुलवामा हल्ल्याबाब्त खबर नसणारे) यांच्ञ पूर्णिया येथील सभेत त्यांची पंचाईत झाली. किसान योजनेचा लाभ किती जणाना झाला या प्रश्नावर ... ईथे वाचा
कधी गेलेले म्हणायचे तुम्ही
कधी गेलेले म्हणायचे तुम्ही शाखेत कळू तर द्या.>> ४ वर्षं जात होतो शाखेत. जिथे सदानकदा भगवं रक्तं, हिरवं रक्त, निळं रक्त वगैरे वगैरे फलतु गोष्टी नविन आलेल्या स्वयंसेवकांवर बिंबवण्याचंच काम चालतं. आता मला सांगा... हे भगवं, हिरवं, निळं रक्त वास्तवीक जीवनात कधी कुणी पाहिलंय काय..? निवासी शिबीरात तर रात्री काय चालतं हे सांगायचं हे ठिकाण नाही. पण मध्य रात्री शेजारील राष्ट्राच्या विरोधात घोषणा द्यायला लावणे किती निर्बुद्धपणा आहे..
निवासी शिबीरात तर रात्री काय
निवासी शिबीरात तर रात्री काय चालतं??? शिव शिव शिव.... असले भयंकर प्रकार होतात?
तरीच हे सारखे 'शाखेत येऊन बघा' म्हनत असतात.
आता ते प्रकार होत नसतील,
आता ते प्रकार होत नसतील, गणवेष बदलला आहे
मला मतदान करा अन्यथा, जेव्हा
मला मतदान करा अन्यथा, जेव्हा नोकरी मागण्यासाठी माझ्याकडे याल तेव्हा मी तुमचा विचार करणार नाही असे मनेका गांधी यांनी सुलतानपूर येथील मुस्लिमांना सुनावले आहे. मी जिंकून येणार याची मला खात्री आहे, तुम्ही मत द्या किंवा देऊ नका मात्र मत दिलं नाहीत तर जेव्हा तुम्हाला माझी गरज लागेल तेव्हा मलाही विचार करावा लागेल असं म्हणत मनेका गांधी यांनी सुलतानपूर येथील मुस्लिमांना इशारा दिला आहे.
मी जिंकणार हे नक्की आहे, लोकांची मला मदत होते आहे. मात्र माझा विजय मुस्लिम मतांशिवाय झाला तर मला फार काही चांगलं वाटणार नाही. मी कुठेतरी खट्टू होईन. जेव्हा मुस्लिम बांधव माझ्या दारात मदत मागायला येतील तेव्हा मलाही त्यांचा विचार करावा लागेल आणि माझ्या मनात ही गोष्ट येईलच की त्यांनी मला मत दिले नाही. आम्ही काय गांधीजींची ती लेकरं नाही जी फक्त फक्त वाटत बसू..आणि मतदानात मार खात राहू.. फक्त नोकरीचच नाही कोणतंही काम असलं तरीही तिथे व्यवहार हा आलाच.
तुम्ही मला मत दिलं नाही तर मलाही तुमचा विचार करता येणार नाही असा इशाराच मनेका गांधी यांनी दिला. आम्ही सगळं वाटून टाकायचं आणि तुम्ही आम्हाला मतदानात मार खाणार हे काही मला रुचणार नाही. मी जर तुमच्यापुढे मैत्रीसाठी हात पुढे केला आहे तर तुम्ही स्वीकाराली पाहिजे असेही मनेका गांधी यांनी म्हटले आहे. एवढंच नाही तर हा इशारा मी फक्त मुस्लिम बांधवांनाच नाही तर साक्षी महाराज आणि इतर सगळ्यांनाही देते आहे असेही मनेका गांधी यांनी म्हटले आहे.
आपल्या वादग्रस्त
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या साक्षी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मला मत द्या अन्यथा मी तुम्हाला शाप देईन असं म्हणत साक्षी महाराजांनी स्वतःलाच मत देण्याचं आवाहन केलं आहे. मी एक संन्यासी माणूस आहे. तुम्ही मला निवडून दिलंत तर मी निवडून येईन. निवडणूक हरलो तर देवळात भजन किर्तन करेन पण मला निवडलं नाहीत तर तुम्हाला शाप देईन असं महाराज म्हटले आहेत
निघाली कॉमेडी एक्स्प्रेस...
निघाली कॉमेडी एक्स्प्रेस...
मतदार यादीतून आखलाख अन
मतदार यादीतून आखलाख अन कुटुंबाचे नाव गायब झाले
मतदार यादीतून आखलाख अन
मतदार यादीतून आखलाख अन कुटुंबाचे नाव गायब झाले
>> कुटूंब शिल्लक आहे हे काय ??
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पदवीचा घोळ संपता संपताना दिसत नाही. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पदवीधर असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करणाऱ्या स्मृती इराणी यांनी यावेळी मात्र केवळ १२ वी पास असल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे इराणी या पदवीधर नसल्याचं स्पष्ट झालं असून काँग्रेसने मात्र 'क्योंकी मंत्रीजी भी कभी ग्रॅज्युएट थी,' असा टोला लगावला आहे.
येलची डिग्रीपण नाही का?
येलची डिग्रीपण नाही का?
मतदार यादीतून आखलाख अन
मतदार यादीतून आखलाख अन कुटुंबाचे नाव गायब झाले- बातमी नीट पसरवत जावं उगाच तोंडावर पडतात हे , सगळं कुटुंब दुसऱ्या गावात गेलाय , मतदार यादीतून नाव कमी झालाय मूळ गावातून, पण त्यांनी दुसरीकडे जाऊन मतदान केलाय..
इराणी या पदवीधर नसल्याचं स्पष्ट झालं असून काँग्रेसने मात्र 'क्योंकी मंत्रीजी भी कभी ग्रॅज्युएट थी- आधी आपण काय दिवे लावलेत ते तरी सांगा, राजमातांच्या स्पेल्लिंग मिस्टेक आणि रॉल विंची चे डिग्री सर्टिफिकेट जग जाहीर आहे , ते पण दाखवा ना ..प्रश्न हा आहे कि १५ वर्ष काय केले , ते तर कोणी बोलायला तयारच नाही. मूग गिळून बसतात मग चापलुसी वाले..एवढाच लै ज्ञान होता तर मग एखादा मंत्रालय सांभाळून दाखवायचा होता ना मौनी बाबाच्या काळात..
किती ती तडतड. असे चिडू नका.
किती ती तडतड. असे चिडू नका. ब्लड प्रेशर वाढेल. एक दीर्घ श्वास घ्या. थंड पाणी प्या.
(No subject)
गोमुत्र प्यायला मिळाले नसेल
गोमुत्र प्यायला मिळाले नसेल म्हणून कदाचित बिपी हायपर होत असावा..
https://youtu.be/Dzokf3Iu5NY
https://youtu.be/Dzokf3Iu5NY ही क्लीप काहीतरी वेगळंच सांगतेय.
या व्यतिरिक्त इतरही काही पाहिल्या. सर्व क्लीप मध्ये काम झाल्याच मान्य केलय. पण नंतर केलेल्या कामाची व्यवस्थित निगा राखली गेली नाही असे दिसतेय.
मोदी है तो मुमकिन है...
मोदी है तो मुमकिन है...
घ्या... हे तर चक्क उर्दू है भाउ....
मोदी अस्ति शक्यम अस्ति
मोदी अस्ति शक्यम अस्ति
पण त्यांनी दुसरीकडे जाऊन
पण त्यांनी दुसरीकडे जाऊन मतदान केलाय..
हे कुठे दिले आहे ?
Pages