आयपीएल १२ - २०१९

Submitted by भास्कराचार्य on 20 March, 2019 - 09:11

आयपीएल - २०१९ ह्या आठवड्याच्या शेवटी सुरू होते आहे. आयपीएलचा तडका बसला, की लगोलग येणार्‍या विश्वचषकाची चव अजूनच लज्जतदार होणार आहे! कोण जिंकणार, कोण चांगलं खेळणार, विश्वचषकाची संघनिवड आयपीएलमधील कामगिरीवर ठरणार का - एक ना दोन! निवडणुका असतानाही ह्यावेळी आयपीएल भारतातच असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हवा चांगलीच गरम असणार आहे. स्पर्धा सुरू होईल तशी चर्चा जोमाने होईलच. वॉर्नर-स्मिथ जोडगोळी पुन्हा क्रिकेटमध्ये परतली आहे. सॅम कुरानसारखा खेळाडू ह्या वेळेस आहे. कोहलीसारखा खंदा फलंदाज व कप्तान ह्यावेळी आयपीएल आणि विश्वचषक दोन्ही मान पटकावण्यासाठी सज्ज आहे. जयदेव उनाडकत ह्याही वेळेस भरपूर किंमत घेऊन मैदानात उतरलाय. ह्याशिवाय रशिद चहल, चहल, कुलदीप यादव ह्यांच्या फिरकीची मजा लुटता येणार आहे. एकंदरीत भरपूर मजा येणार आहे!

पहिला सामना शनिवार २३ मार्च, चेन्नई विरुद्ध बेंगालुरू असा रंगणार आहे. आपल्या संघाचं समर्थन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, वादविवादाच्या फैरींची मजा लुटण्यासाठी, अचूक आणि मार्मिक व्यंगचित्रांनी घेतलेल्या 'फिरकी'साठी इथे आता धमाल करूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

*क्रिकेटची पातळी काही खास वाटली नाही आजपर्यंत.* - सहमत. अर्थात, फार मोठा अपेक्षाभंग झाला असंही नाहीं !

दिल्ली हातातली मॅच कशी काय घालवू शकतात? फक्त स्राईक रोटेट करून सुद्धा जिंकले असते. अश्विनचा सहा बॉलर्स घेऊन खेळण्याचा, गेयलला न घेण्याचा निर्णय योग्य होता.

गेल ला इंज्युरीमुळे बाहेर बसवलं होतं.

दिल्ली ला जयपूर चं पाणी बाधलं की काय? परवा सुद्धा हातातली मॅच घालवता घालवता (दोन वेळा) जिंकले. आज तर २१ बॉल्स मधे २४ रन्स हवे असताना (हातात ७ विकेट्स) हारले.

पंतकडून जास्त अपेक्षा ठेऊ नये, तो फक्त एक हिटर आहे, मॅच विनर नाही, प्रत्येक बॉलवर मोठा शॉट मारायला जाणं, अल्लडपणाचं लक्षण आहे. त्याच्या विकेट नंतर मॅच फिरली, मॉरिस, इंगरिम यांनी सुद्धा पंतपणा केलाच.

पंत च्या क्षमतेबद्दल शंका नाही. परंतू, परिपक्वतेचा, मॅच सिच्यूएशन अ‍ॅसेस करून खेळात बदल करण्याच्या अ‍ॅबिलिटी ची नितांत गरज आहे. अन्यथा एक चांगलं टॅलेंट वाया जाईल.

आज बंगळुरु आणि आरार तळाच्या जागेसाठी लढणार.. दोन्ही संघ जिंकण्यासाठी खेळतायेत असे वाटत नाही!

एकंदरीत यंदाचे आय पी एल कंटाळवाणे वाटतेय.. मी पुर्ण एकही सामना बघु शकलो नाही आता पर्यन्त... हे पाहण्यासाठी खास स्टार स्पोर्ट चे एच् डी पॅक अ‍ॅक्टीव्ह केले १९+२+ जीएस्टी रु खर्ची करून!!

आमचे स्टार स्पोर्ट्स हिंदी चालू आहे.... ते मधल्या ट्राय च्या गोंधळात हिंदी घेतले गेले आणि आता आकाश चोप्रा, इरफान पठाण आणि व्हीव्हीएसचे अगाध हिंदी ऐकावे लागतेय!

कालच्या सामन्यात उडतउडत एक वाक्य कानावर आले.... बहुतेक आकाश चोप्राच होता तो!
श्रेयस अय्यरने बॅकफूटवर जाउन थोडीसी "जगह बनाके" वगैरे एक फटका मारला.... त्यावर आपले हिंदी समालोचक: मुंबईके रहनेवाले है.... जगह का इस्तेमाल जानते हे!.... और एक दो फूट मिलता तो शायद घरही बना डालते!
(शब्द थोडे इकडेतिकडे असतील पण साधारण असेच काहीसे होते) पडलो ना हसूनहसून!

आयपीएल न बघता त्याला नावं ठेवणं म्हणजे, सिनेमा न बघता त्यावर मोर्चा काढण्यासारखं आहे. आयपील भारी सुरु आहे, कालची मॅच सहा सात बॉल मध्ये फिरली. डीसी विरुद्ध केकेआरची मॅच तर सुपर ओव्हर पर्यंत गेली. आत्तापर्यंत तेरा मॅच झाल्या, यापैकी कुठलीच मॅच एकतर्फी झाली नाही.

आयपीएल न बघता त्याबद्दल बोलणं म्हणजे, सिनेमा न बघता त्यावर मोर्चा काढण्यासारखं आहे.>>> जवळपास प्रत्येक सामना पाहिला परंतु पुर्ण नाही पहावला....

कालची मॅच सहा सात बॉल मध्ये फिरली.>>>
ज्या पद्धतीने फलंदाज ज्या स्थितीत संघ असताना बाद होतात ते केवळ पहावत नाही..
सामना आवक्यात असताना अनावश्यक उंच फटके मारून, नसलेल्या रन्स पळून धावबाद होणे.. केवळ अनाकलनिय...
कित्येकदा तर सामने फिक्स करून खेळतात की काय इतपत संशय येतो!

आयपीएल जर फिक्स्ड वाटत असेल तर पैसे, वेळ, ऊर्जा, संवेदना, आपुलकी थोडक्यात एकंदरीत आयुष्य वाया घालवून बघण्यात काय हशील?

हो..... एकदा ती फिक्सिंग बिक्सिंगची शंका मनात आली की मग कशावरच विश्वास बसत नाही.... ज्यात त्यात फिक्सिंगच दिसायला लागत मग!
त्यापेक्षा ही आलम दुनिया आपल्यासारखीच निष्पाप आणि निरागस आहे या भावनेने बघाव्यात मॅचेस Happy

"आता आकाश चोप्रा, इरफान पठाण आणि व्हीव्हीएसचे अगाध हिंदी ऐकावे लागतेय!" - मी तर कधी कधी टाईमपास म्हणून हिंदी कॉमेंट्री लावतो. मजा येते ऐकायला. कॉमेंटेटर्स जरा जास्त मोकळेपणानं - पॉलिटिकली करेक्ट असण्याचा विचार न करता बोलतात.

काल एका रन-आऊट च्या वेळी स्क्वेअर लेग अंपायर क्रीझ च्या लाईन मधे उभा न रहाता बराच बाजूला उभा होता (कॅमेरा च्या सोयीसाठी). बॅट्समन क्रीझ ओलांडून, स्टंप्स चा ही पुढे होता, तरी थर्ड अंपायर कडे डिसीजन रीफर केला गेला. गावसकर हिंदी कॉमेंट्री करत होता. सॉलिड वैतागला. 'खाली-पिली टाईम बरबाद कर दिया' हे त्याचं वाक्य ऐकून वैट्ट हसलो.

आज च्या मॅच चा निर्णय टीम सिलेक्शन वर बराच अवलंबून आहे. उनाडकट ला खेळवलं तर बंगळुरू जिंकेल, नाही खेळवलं तर राजस्थान ला जिंकायची संधी आहे. वेळ आली तर १० चा संघ खेळवावा पण उनाडकट ला खेळवू नये असं वाटतं. Happy

आयपीएल जर फिक्स्ड वाटत असेल तर पैसे, वेळ, ऊर्जा, संवेदना, आपुलकी थोडक्यात एकंदरीत आयुष्य वाया घालवून बघण्यात काय हशील?>>>>
मी आय पी एल कडे WWE च्या नजरेने बघतो. WWE मध्ये सगळ्या मॅचेस आधीच स्टोरीलाईन नुसार फिक्स असतात, पण तो थरार बघायला मजा येते. इथेही हा चार तासाचा थरार तशीच मजा देतो.

पैसे, वेळ, ऊर्जा, संवेदना, आपुलकी थोडक्यात एकंदरीत आयुष्य वाया घालवून बघण्यात काय हशील?>>>>
पैसे - चॅनेल आधीपासूनच आहे.
वेळ - रात्रीच्याच मॅच बघतो. आणि नेमक्या फालतू सिरियल्सच्या वेळी बघितल्यामुळे वेळ सत्कारणी लागतो. (नाहीतर 'आमचे हे' किंवा 'सर्रर्रर्रर्रर्रर्र' डोकं पिकवतो)
उर्जा - मस्त सोफ्यावर बसून/लोळून घरी बनवलेल्या लाह्या, खारवलेले शेंगदाणे, फुटाणे आणि चव बद्लवण्यासाठी शेंगदाणा चिक्की, राजगिरा चिक्की... स्वर्गसुख!!!
संवेदना - बिलकुल नाही, उत्तर वर दिलंय.
आपुलकी - सचिन, गांगुली, लक्ष्मण, फ्लेमिंग, याना बघून तेवढ्यापुरती वाटते.

"पण सॅमसन ऐवजी बिन्नी? मनन व्होराला तरी खेळवायच राव!" - राजस्थान ला बिन्नी विषयी अगम्य प्रेम आहे. उनाडकट नाही तर बिन्नी तरी असावा, म्हणजे बंगळुरू ला अगदीच सगळा पेपर अवघड जाणार नाही असा कयास असावा.

ते सगळं जाऊ दे.. उनाडकटला साडे आठ कोटी देऊन घेतलं होतं, पण आज मॅच खेळायला नाही घेतलं

फिक्स वगैरेबद्दल मी फारसा विचार करत नाही, पण ह्यावेळचा खेळ बर्‍यापैकी कंटाळवाणा वाटतो आहे, हे आयपीएल बघूनच वाटतं आहे. राजस्थान आणि बंगलोर २ संघ तर कायच्या काय खेळतायत, मुंबईचीही स्थिती फार वेगळी नाही.

रहाणे ची कॅप्टन्सी कळत नाही. गोपाळ ने ३ ओव्हर्स मधे ८ रन्स देऊन ३ विकेट्स काढल्यावर मधेच बिन्नी आणी स्टोक्स ला एक एक ओव्हर का दिली? प्रेशर रिलीज झालं उगाचच. तसंही राजस्थान वन बॉलर टू मेनी होते असं वाटलं. वरूण अ‍ॅरन ला एकच ओव्हर दिली. त्याच्या / बिन्नी च्या जागी एखादा प्रॉपर बॅट्समन खेळवता आला असता.

या स्टेडियमचा आकार मोठा आहे, त्यामुळे सिक्स जाणं सहज शक्य नाही, पण बॅटिंगसाठी हे स्टेडियम अनुकूल आहे, मागच्या वेळी या स्टेडियमवर १८० स्कोर झाला होता. आरसीबीची मदार फक्त बॅटिंगवर आहे, त्यामुळे जास्तीचे बॉलर घेऊन, दबाव टाकून, विकेट घेण्याचा प्रयत्न करू, असा काहीसा विचार राहणेने केला असावा, त्यामुळे वरुण आणि बिन्नी संघात आले.
स्कोर कमी आहे, त्यात स्टोक, आर्चर मागच्या वेळी चांगले खेळले होते, त्यांचा फॉर्म तसाच राहिला तर राजस्थान जिंकतील

राजस्थान जिंकले!

क्रिकेट ची क्वालिटी खरच सब-पार आहे. कोहली - रहाणे ह्या भारतीय टेस्ट टीम च्या कप्तान-उपकप्तान जोडीला गूगली ओळखता येऊ नये हे चिंताजनक आहे. बाकी ब्टलर ज्या पद्धतीनं आऊट झाला त्यावरून पार लगान च्या काळापासून इंग्रजांना अजूनही स्पिन बॉलिंग खेळता येत नाही असंच म्हणावं लागेल.

एकंदरीतच ह्या आयपीएलमध्ये माल कमी आणि मसाला जास्त अशीच परिस्थिती वाटते आहे. क्रिकेटची पातळी काही खास वाटली नाही आजपर्यंत. >> +१ पूर्ण सामने बघवत नाहिट असे कधीच झाले नव्हते आधी. सुमार quality वाटतेय,

सुमार quality वाटतेय>> प्लेअर्स ना ही कन्सेप्ट बोअर झाल्यासारखं वाटतंय. पैसा मिळतोय म्हणून टाकणं टाकल्यासारखं चालू आहे. IPL hasn’t yet established as a channel gateway for Indian T20 side (we still select T20 based on ODI performance & vice versa, & that too from same pool of players.
सुरवातीला T20 was young player’s game. ज्या कारणास्तव द्रविड, तेंडुलकर आणि गांगुलीनी २००७ च्या विश्वचशकातून माघार घेतली. आता जुनी खोंडं काय जायचं नाव घेत नाहियेत. त्यामुळे नव्या खेळाडूंना IPL मधून चमकून खूप फायदा होत नाहिये. मग ते ही पाट्या टाकतायत.

Dravid's reaction on drama around Ashwin's mankading:

"I think some of the reactions were overblown. Questioning Ashwin's character because he did that is totally wrong. He has every right to his view. You might not agree with it, but it was well within his rights to do it and that does not make him a bad person. Like I said, I would rather he had warned first, but if he chose not to do it, then that's his interpretation and you can't have issue with that.

"It is not about being a gentleman or a non-gentleman. This is not a judgement on his character, but his reading of the law. He has not cheated anybody, nor is he a bad person because he did that," Dravid further said

Full Interview:
https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/sports/story/rahul-dr...

स्वरूप, वाचला आहे हा इंटरव्ह्यू. द्रविड विषयी तू आणी मी सेम पेज वर आहोतच. मी ह्या बाबतीत त्याच्याशी संपूर्ण सहमत नाही होऊ शकत. अश्विन ला एक माणूस म्हणून वगैरे जज नाही करता येणार हे बरोबर आहे. पण एक खेळाडू म्हणून त्याचं कॅरेक्टर नक्कीच पहाता येतं. आणी तेव्हढ्यापुरतच आपला त्याच्याशी संबंध आहे.

जस्ट टू क्लॅरीफाय, मंकडिंग पद्धतीनं त्यानं बटलर ला आऊट केल्याचा निषेध नाहीये. पण त्याने ज्या पद्धतीनं उडी मारून, मोठा पॉज घेऊन, बटलर ला फॉल्स सेन्स (बॉल टाकत असल्याचा) देऊन, वाट बघून आऊट केलं आणी वर ते इंस्टिंक्टीव्ह असल्याची मखलाशी केली ते मी पटवून घेऊ शकलो नाहीये. कदाचित त्यानं, 'मी हे आधी पाहून, प्लॅन करून त्याला तसं जाळ्यात अडकवलं' असं म्हटलं असतं, तरी मी त्याची बाजू समजावून घेऊ शकलो असतो.

असो.. त्या प्रकरणाला आता बराच काळ लोटला. आज मुंबई वि. चेन्नई. भाऊ, फारएण्ड - कसं काय, बरं हाय, आय अ‍ॅम मुंभै - काही अंदाज?

अँकी - सहमत आहे. आपली वन-डे ची आणी टी-२० ची टीम आणी स्ट्रॅटेजी बरीचशी सारखीच असते. टी-२० हा प्रकार, आयपीएल, सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी वगैरे नंतर सुद्धा भारतात पुरेसा रुजलेला नाहीये. कदाचित, पॉवर हिटींग, अ‍ॅथलॅटिसीझम, हे प्रकार आपल्याकडे नॅचरली येते नसल्यामुळे असं असेल का?

Pages