आयपीएल १२ - २०१९

Submitted by भास्कराचार्य on 20 March, 2019 - 09:11

आयपीएल - २०१९ ह्या आठवड्याच्या शेवटी सुरू होते आहे. आयपीएलचा तडका बसला, की लगोलग येणार्‍या विश्वचषकाची चव अजूनच लज्जतदार होणार आहे! कोण जिंकणार, कोण चांगलं खेळणार, विश्वचषकाची संघनिवड आयपीएलमधील कामगिरीवर ठरणार का - एक ना दोन! निवडणुका असतानाही ह्यावेळी आयपीएल भारतातच असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हवा चांगलीच गरम असणार आहे. स्पर्धा सुरू होईल तशी चर्चा जोमाने होईलच. वॉर्नर-स्मिथ जोडगोळी पुन्हा क्रिकेटमध्ये परतली आहे. सॅम कुरानसारखा खेळाडू ह्या वेळेस आहे. कोहलीसारखा खंदा फलंदाज व कप्तान ह्यावेळी आयपीएल आणि विश्वचषक दोन्ही मान पटकावण्यासाठी सज्ज आहे. जयदेव उनाडकत ह्याही वेळेस भरपूर किंमत घेऊन मैदानात उतरलाय. ह्याशिवाय रशिद चहल, चहल, कुलदीप यादव ह्यांच्या फिरकीची मजा लुटता येणार आहे. एकंदरीत भरपूर मजा येणार आहे!

पहिला सामना शनिवार २३ मार्च, चेन्नई विरुद्ध बेंगालुरू असा रंगणार आहे. आपल्या संघाचं समर्थन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, वादविवादाच्या फैरींची मजा लुटण्यासाठी, अचूक आणि मार्मिक व्यंगचित्रांनी घेतलेल्या 'फिरकी'साठी इथे आता धमाल करूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे मुंबईची मॅच होउन इथे एक पण पोस्ट नाही.... आयपीएल च्या उभ्या इतिहासात असे घडलेले आठवत नाही Wink

मुंबईची मॅच म्हणजे पोस्टींचा पाउस पडायला हवा होता खरतर!

पंत एक नंबर खेळला..... कम्माल!

>>भुवी ऑन फील्ड कॅप्टन्सी कशी करतोय हे बघायची उत्सुकता आहे!

वॉर्नर बहुदा विसरला होता की तो आता कॅप्टन नाहीये Wink

आज RRची मॅच!

कागदावर तरी RR ची टीम balanced दिसतीय
7 नंबरपर्यंत सॉलिड बॅटींग आणि सहा फुल टाइम बॉलींग ऑप्शन्स..... मजा आयेगा!

दिनेश कार्तिक ने शुभमन गीलला खाली का पाठवले. स्वतःला प्रतिस्पर्धी नको म्हणूनच. त्या निर्णयामुळे मॅच जवळ जवळ गेली होती. असली करंटी माणस कशी काय कॅप्टन होतात.
आय्पीएलच्या कामगिरीच्या माध्यमातून भारतीय टीम मधे वर्ल्ड कपला दोघांची निवड व्हावी असे मला मनापासून वाटते. रहाणे आणि शुभमन गील.
:).

मुंबईची कालची बेकार गोलंदाजी. लेग स्पिनर नाही आहे का? पाठिंबा मुंबईला असला तरी मला मुंबईची टीम चांगली वाटत नाही. युवराज आणि सूर्यकुमारला घ्याव लागतय म्हणजे बाकी आनंद आहे काय?.

काल Indian express मधे एका वेगळाच पैलू वाचायला मिळाला एका लेखात. How baseball coaches who are expert in teaching baseball players to hit "home run" are being consulted and employed by cricketers and academies to teach them hit them sixes. The technique is very different. जिज्ञासूंनी मूळ लेख वाचावा.

अजून अवांतर -
- गेल्या ११ वर्षात ज्या टीम ने सर्वात जास्त सिक्सर मारल्यात अशी टीम त्यावर्षी ६ वेळा जिंकली (हीच आकडेवारी पाहून मुंबईने टीम बनवली असावी.). आणि ज्या टीमने कमीत कमी सिक्सर मारल्या अशी टीम ७ वेळा तळाला राहिली.
- लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे प्रमाणे आतापर्यंत व अजूनही विकेट टिकवण्याची मानसिकता असल्याने फलंदाज सुरवातीपासून मारतझोडत नाहीत. पण खर म्हणजे टी२० मधे आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार प्रत्येक मॅचला अ‍ॅवरेज फक्त ६ विकेट जातात. म्हणून विकेटला जास्ती महत्व न देता सिक्सरला जास्त प्राधान्य दिल पाहिजे.
सध्याच्या मानसिकते नुसार विकेट टिकवणारे फलंदाज आधी जातात व नुसती हाणामारी करणारे नंतर . हे उलट पाहिजे. :). आणि हळू हळू स्थित्यंतर होईल.

- गेल ने १००० च्यावर सिक्सर आतापर्यंत मारल्या आहेत.
- डॉन ब्रॅडमनने त्यांच्या करिअर मधे ६ सिक्सर मारल्या होत्या. Happy

काल पंतने पार हेलिकॉप्टर शॉट मारून सिक्स सुद्धा मारला, भारी खेळला, त्यामुळेच डीसीचा स्कोर दोनशेच्यावर गेला, पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध वन डे मध्ये असा का नाही खेळला?

जे खेळाडू ipl मध्ये चांगले खेळतात आणि देशाच्या संघात खेळताना नांगी टाकतात त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे.

मुंबईने नेहमीप्रमाणे हरून सुरवात केली आहे.

आज राजस्थान वि. पंजाब! युनिव्हर्स बॉस गेल चमकणार का?

राजस्थान ची टीम बॅलन्स्ड वाटतेय पंजाब च्या तुलनेत. पण टी-२० मधे एखादी वादळी खेळी (काल ची रसेल आणी पंत ची इनिंग) , एखादं बॉलिंग स्पेल मॅच चा निकाल बदलवू शकतं. बघू काय होतं ते. काल कार्थिक चं वरच्या क्रमांकावर बॅटींग ला येणं, वर्ल्डकप साठी ऑडिशन देण्याचा प्रकार वाटला. आज रहाणे काय करतो ते बघायचं.

युवराज चा फॉर्म असाच राहिला तर विश्वचषकासाठी चवथ्या क्रमांकाच्या फलंदाजांचा शोध संपेल. त्याचा अनुभव आणि गुणवत्ता याची बरोबरी कुणालाही करण शक्य नाही. फक्त वेगवान गोलंदाजीचा सामना करताना तो कमी पडतोय हे जाणवलं. शिवाय युवी संघात असला कि विश्वचषक मिळतो. आतापर्यंत जिंकलेल्या दोनही विश्वचषकात त्याची कामगिरी अवर्णनीय सुंदर झाली आहे.

उनाडकट ला घेतलंच पाहिजे आणी खेळवलच पाहिजे असा काही राजस्थान चा नियम आहे का? एकहाती मॅच जिंकून देणारा - प्रतिस्पर्धी संघाला - असा हा बॉलर आहे.

You need to get Gayle early..... If he get to spend sometime in the middle; he becomes unstoppable!

रहाणेचे बॉलींग चेंजेस आज गंडल्यासारखे वाटले.... गौथम आणि धवलला सुरुवातीची सलग आठ षटके द्यायला हवी होती आणि आर्चरला सगळ्यात शेवटी ठेवायला हवे होते!

उनाडकटबद्दल बोलायलाच नको.... तो फक्त पुण्याकडून एक सीझन चांगला खेळला

"तो फक्त पुण्याकडून एक सीझन चांगला खेळला" - त्या आणी एका चांगल्या रणजी सीझन च्या पुण्याईवर अजून किती दिवस तग धरणार आहे कुणास ठाऊक? आज गोपाळ ला गेल असताना आणायचं नाही ह्या सबबीखाली अगदीच एक ओव्हर दिली. राजस्थान ची ही टॅक्टीक कितपत योग्य आहे, माहीत नाही. नुकत्याच संपलेल्या विंडीज - इंग्लंड वन-डे सिरीज मधे रशीद खान ने गेल ला चांगली बॉलिंग केली होती.

एका फिक्स केलेल्या आणि खाजगी टूर्नामेन्ट च्या पर्फॉर्मन्स वरून विश्वचषक टीम निवडली जानार असेल तर अवघड आहे,....

अरेरे! राजस्थान ने अगदीच रॉयल मेस केली आज. हातातला घास पंजाब च्या तोंडात, अगदी उखाणा वगैरे घेऊन भरवला. बटलर च्या विकेट ची चर्चा तर होईलच.

काल ईशांत शर्माच्या पहिल्या ओव्हरमधे सुद्धा स्लीप लावलेली नव्हती. वाट लावणार हे बोलर्सची. स्ट्राइक वर कोण होता लक्षात नाही पण एका बॉलला निक केलेही, पण स्लिप मधे कोणीच नसल्याने फोर गेली. आता पुढे दोन महिने शर्मासाहेब बोलिंग करताना पहिल्या ओव्हर्स मधे सुद्धा ऑफ ची लाइन धरणार नाहीत. मग नंतर वर्ल्ड कप आणि त्याही पेक्षा जास्त नंतर टेस्ट्स मधे जर पहिल्या ओव्हरमधे लेग साइड ला त्याचे बॉल पडले तर बोलू नका Happy

दिडशे वर्ष आपल्यावर इंग्रज जुलूम करत आले तेव्हा त्यांना काय वाटलं नाय, मग तो बटलर आऊट झाला त्यात काय एव्हडा राग येतोय त्यांना.

दिडशे वर्ष आपल्यावर इंग्रज जुलूम करत आले तेव्हा त्यांना काय वाटलं नाय, मग तो बटलर आऊट झाला त्यात काय एव्हडा राग येतोय त्यांना.>>>

अहो बटलर ला विकत घेतलेला आहे राजेशाही राजस्थान्यांनी. त्यामुळे ते म्हणत आहेत विकत घेऊन न्याय करत आहेत!

काल ईशांत शर्माच्या पहिल्या ओव्हरमधे सुद्धा स्लीप लावलेली नव्हती. वाट लावणार हे बोलर्सची. >>> हो. पण शर्माजी वर्ल्डकपमध्ये असणारेत का?

'आयपीएलमध्ये बोलर्सची वाट' आणि 'स्पिरिट ऑफ क्रिकेट' ह्या ज्वलंत मुद्द्यांवर चर्चा करायची आहे का? Proud

RR ने काल टिपीकल RRगिरी केली.
सुरुवातीला अश्या सोप्प्या सोप्प्या मॅचेस घालवतात हातातून आणि मग शेवटीशेवटी एकेका पॉईंटसाठी झगडत बसतात!

बटलरच्या विकेटनंतर RR च्या बॅट्समननी फारच बेजबाबदार खेळ केला.... पंजाब ने चांगली बॉलींग केली नक्कीच पण ते काही इतके अनप्लेयेबल वगैरे नव्हते की धपाधप विकेट पडाव्यात

बाकी त्या अश्विनच्या मंकडींग बद्दल.... It was unlike Ashwin!
अश्विन जर कॅप्टन नसता किंवा नॉन स्ट्राइकर एंडला बटलर नसता तर अश्विन असाच वागला असता का?.... बहुदा नाही!
वॉर्निंग द्यायला पाहिजे होती वगैरे ठीक आहे पण हे सगळे इतके ठरवून झाले असेल असे वाटत नाही.
I think, Ashwin reacted like that in the flow of moment आणि मग ज्या प्रकारे बटलर खेळत होता आणि मॅच पंजाबच्या हातातून निसटून चालली होती ते बघता अश्विनने अपील मागे घेतले नाही!

शेन वॉर्नने अश्विनवर टीका केली आहे, तो म्हणाला अश्विनला बॉल टाकायचा नव्हता आणि जर बॉलरकडून बॉल टाकला गेला नाही तर तो बॉल "डेड" होतो, अशा वेळी एखाद्याला आऊट करणं क्रिकेटच्या स्पिरिटच्या विरोधात आहे.
या विकेटनंतर मॅच फिरली, नाहीतर काल आरआर सहज जिंकले असते.

अश्विनने प्रेस कॉन्फरेन्स मध्ये सांगितलं की खेळाच्या ओघात, इन्स्टिंक्ट मुळे असं झालं. त्याला तसं आऊट करायचं होतं, ते त्याने केलं. बटलर म्हणाला असं आऊट करता येत नाही, तेव्हा अश्विन आणि बटलर मध्ये वाद तर झाला.

बटलर फार चिडला आहे, मॅच संपल्यावर त्याने अश्विन बरोबर शेक हॅन्ड पण केला नाही, या दोघांमधली पुढची मॅच बघायला मजा येईल,
ट्विटरवर एक कॉमेंट वाचली.
अगर बटलर की जगह कोहली होता तो आज अश्विन हमारे बीच नही होता. Biggrin

Hi guys, just a question on yesterday Ashwin dismissal. He clearly stopped half way bowling the ball and waited for batsman to go out of crease . Now if it is OK or not , is another debate. My question is how many times you would be allowed to that.
If Butler was already outside before bowling it was OK. But he was in if Ashwin had bowled ball normally. Because if you want to use it as Chess move , any slow bowler can wait in his stance , just for batsman to go out. Is there a rule that you can attempt this so many times only.

Again I am not against Mankading (I am against calling it that) it is a means to keep non striker from stealing extra yard .
But Ashwin stopped just for Butler to go out (Butler was in if ball was normally bowled) I don't think rule was designed for that.

Pages