आयपीएल १२ - २०१९

Submitted by भास्कराचार्य on 20 March, 2019 - 09:11

आयपीएल - २०१९ ह्या आठवड्याच्या शेवटी सुरू होते आहे. आयपीएलचा तडका बसला, की लगोलग येणार्‍या विश्वचषकाची चव अजूनच लज्जतदार होणार आहे! कोण जिंकणार, कोण चांगलं खेळणार, विश्वचषकाची संघनिवड आयपीएलमधील कामगिरीवर ठरणार का - एक ना दोन! निवडणुका असतानाही ह्यावेळी आयपीएल भारतातच असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हवा चांगलीच गरम असणार आहे. स्पर्धा सुरू होईल तशी चर्चा जोमाने होईलच. वॉर्नर-स्मिथ जोडगोळी पुन्हा क्रिकेटमध्ये परतली आहे. सॅम कुरानसारखा खेळाडू ह्या वेळेस आहे. कोहलीसारखा खंदा फलंदाज व कप्तान ह्यावेळी आयपीएल आणि विश्वचषक दोन्ही मान पटकावण्यासाठी सज्ज आहे. जयदेव उनाडकत ह्याही वेळेस भरपूर किंमत घेऊन मैदानात उतरलाय. ह्याशिवाय रशिद चहल, चहल, कुलदीप यादव ह्यांच्या फिरकीची मजा लुटता येणार आहे. एकंदरीत भरपूर मजा येणार आहे!

पहिला सामना शनिवार २३ मार्च, चेन्नई विरुद्ध बेंगालुरू असा रंगणार आहे. आपल्या संघाचं समर्थन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, वादविवादाच्या फैरींची मजा लुटण्यासाठी, अचूक आणि मार्मिक व्यंगचित्रांनी घेतलेल्या 'फिरकी'साठी इथे आता धमाल करूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज केकेआर ने टाकलेल्या विकेट्स बघितल्या तर खरच खेळाडूंचा इंटरेस्ट संपत चालल्यासारखा वाटतोय!
डगआउटमधूनच हरुन आल्यासारखे वाटतायत KKR!

रसल एवढा चांगला बँट्समन असुनही 3 किंवा 4 नंबरवर का खेळु दिल नाही.
बिंनडोक कुनीकडचे.
एका हाताने 150 पर्यंत पोहचवली असती त्याने मँच.

काहीच्या काही मॅच झाली. राहुल असाच खेळत राहिला तर वर्ल्ड कप मधे खेळवायलाच हवय त्याला. लाडचे पहिले दोन शॉट्स कसले सुंदर होते राव.

राजस्थानची हाराकिरी पुढे चालू! >> राजस्थान मधे राहाणे, त्रिपाठी, सॅम्सन, स्मिथ असे चार जण आहेत जे एकाच प्रकारे खेळतात, त्यांना हार्ड बॉल आवडतो नि स्मिथ चा थोडाफार अपवाद वगळता strike rate वाढता ठेवताना झगडतात. बटलर गेला कि काय होईल कोण जाणे ?

घ्या आता नवा विषय चर्चेला.... धोनीचे असे मैदानात येउन अंपायर्सशी वाद घालणे नियमात बसते का?

Spirit of the game मध्ये तर नक्कीच नाही बसत!
अंपायरचा निर्णय कितीही चुकीचा असला तरी तो मान्य करावाच लागतो हे काय नवीन आहे का क्रिकेटमध्ये?

मला वाटले होते post match presentation मध्ये त्याला काहीतरी विचारतील त्याबद्दल पण काही फारशी चर्चा झाली नाही!

Craziest over I have seen so far. जडेजाचा सिक्स गेलाच कसा ? जडेजा पडला समऊ शकतो, स्टोक्स कसा पडला ? Happy

धोनीचे असे मैदानात येउन अंपायर्सशी वाद घालणे नियमात बसते का? >> असा नियम असल्याचे माहितीत नाही. टेस्ट क्रिकेट मधेही मैदानात येउन वाद घातल्याची उदाहरणे आहेत. spontaneous reaction वाटली मला. त्या बॉलचा action reply का दाखवला नाही देव जाणे.

स्मिथ, रहाणे, सॅमसन बद्दल असामी शी सहमत आहे. पण शेवटच्या ओव्हर मधे १८ रन्स डिफेंड न करता येणं हे अनाकलनीय आहे.

पण शेवटच्या ओव्हर मधे १८ रन्स डिफेंड न करता येणं हे अनाकलनीय आहे. >> नशिब गां* तो क्या करेगा पांडू हे लक्षात ठेव, जडेजाची ती चित्र सिक्स गेली तिथेच सगळे चित्र बदलले.

केदार जाडेजाचा तो शॉट कोणाला कसा फिक्स करता येईल सांग बर Happy

केदार जाडेजाचा तो शॉट कोणाला कसा फिक्स करता येईल सांग बर Happy
>>
असामी , २ २ नो बॉल शेवटच्या ओव्हरला . अन कालच्या अन मुंबईच्या सामन्यातील लास्ट ओवर सिमिलारीटी पहा.
आधी अशक्य टार्गेट , मग फ्री हिट , सेट बॅट्समन ऑट ,शेवटचा बॉल थ्रिलर ...

मी फिक्सिंग आहे , म्हणत नाही , पण प्रत्येक मॅच दुसर्या टाईम ऑट नंतर फिरते हेही पटत नाही. Sad

बघ तू जे म्हणतोस त्यात किती जणांना फिक्स करावे लागेल हे पाहा. एव्हढ्या स्केल वर करणे शक्य वाटतेय का ? एकदा ह्या विचारांमधे शिरलास तर परत कधीच मजा उपभोगता येणार नाही. दुर्लक्ष कर.

धोनी फाईन वर सुटला नुसता. जर त्य बॉल वर बॅटस्मन कॅच ऑट झाला असता तर काय निर्णय घेतला गेला असता ह्याचे कुतूहल आहे. अंपायरने ताबडतोब नो बॉल दिला होता त्यामूळे बॅटस्मन आर्ग्यू करू शकला असता का ?

बघ तू जे म्हणतोस त्यात किती जणांना फिक्स करावे लागेल हे पाहा. एव्हढ्या स्केल वर करणे शक्य वाटतेय का ? एकदा ह्या विचारांमधे शिरलास तर परत कधीच मजा उपभोगता येणार नाही. दुर्लक्ष कर.

धोनी फाईन वर सुटला नुसता. जर त्य बॉल वर बॅटस्मन कॅच ऑट झाला असता तर काय निर्णय घेतला गेला असता ह्याचे कुतूहल आहे. अंपायरने ताबडतोब नो बॉल दिला होता त्यामूळे बॅटस्मन आर्ग्यू करू शकला असता का ?

स्वरूप, आज खुश तो बहुत होंगे तुम! Happy

अडखळत का होईना, राजस्थान ने लाईन क्रॉस केली. जी मॅच सहज जिंकायला हवी होती, ती उगाचच रंगतदार करून दाखवली.पण स्पर्धेत टिकून राहिले, हे ही नसे थोडके.

आरसीबी सहज जिंकतील असं वाटतय.

>>स्वरूप, आज खुश तो बहुत होंगे तुम! Happy

बहुत वगैरे नाही रे (पण थोडासा झालोच खुश.... खोट कशाला बोला Wink )

*.....that tomorrow is World cup selections.* मला एक कळत नाहीय कीं 'आयपीएल मधलया कामगिरीचा संघ निवडीवर परिणाम होणार नाही ', ' एक दोन नांवं सोडली तर इतर संघ निश्चिंत झालेलाच आहे ' इ. विधानं संबंधितांकडून कां केलीं जाताहेत.

जिंकतेय जिंकतेय असं वाटता वाटता अचानक टीम्स ने गियर बदलत किंवा कोलॅप्स होत मॅच हारणं, रन- अ - बॉल सिच्युएशन मधे अनावश्यक शॉट्स मारून बॅट्समन ने आऊट होणं, हे जरा अती प्रमाणात होतय ह्या एडिशन मधे.

Pages