आयपीएल १२ - २०१९

Submitted by भास्कराचार्य on 20 March, 2019 - 09:11

आयपीएल - २०१९ ह्या आठवड्याच्या शेवटी सुरू होते आहे. आयपीएलचा तडका बसला, की लगोलग येणार्‍या विश्वचषकाची चव अजूनच लज्जतदार होणार आहे! कोण जिंकणार, कोण चांगलं खेळणार, विश्वचषकाची संघनिवड आयपीएलमधील कामगिरीवर ठरणार का - एक ना दोन! निवडणुका असतानाही ह्यावेळी आयपीएल भारतातच असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हवा चांगलीच गरम असणार आहे. स्पर्धा सुरू होईल तशी चर्चा जोमाने होईलच. वॉर्नर-स्मिथ जोडगोळी पुन्हा क्रिकेटमध्ये परतली आहे. सॅम कुरानसारखा खेळाडू ह्या वेळेस आहे. कोहलीसारखा खंदा फलंदाज व कप्तान ह्यावेळी आयपीएल आणि विश्वचषक दोन्ही मान पटकावण्यासाठी सज्ज आहे. जयदेव उनाडकत ह्याही वेळेस भरपूर किंमत घेऊन मैदानात उतरलाय. ह्याशिवाय रशिद चहल, चहल, कुलदीप यादव ह्यांच्या फिरकीची मजा लुटता येणार आहे. एकंदरीत भरपूर मजा येणार आहे!

पहिला सामना शनिवार २३ मार्च, चेन्नई विरुद्ध बेंगालुरू असा रंगणार आहे. आपल्या संघाचं समर्थन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, वादविवादाच्या फैरींची मजा लुटण्यासाठी, अचूक आणि मार्मिक व्यंगचित्रांनी घेतलेल्या 'फिरकी'साठी इथे आता धमाल करूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोहित शर्मा अजून आहे??? अर्थात असणारच. जोपर्यंत सीएसके आहे, त्याचा कॅप्टन धोनी आहे, तोपर्यंत ह्या प्लेयर्सना सुगीचे दिवस आहेत. परफॉर्मही करून जाईल तो.

दिपक चहार कन्सिस्टंटली भारी बॉलींग टाकतोय! >> चहार फक्त CSK मधून अशी बॉलिग टाकतो. इंग्लंड मधे पूर्ण निराशा केलेली Sad

पोलार्ड का असतो मुंबईच्या टीम मधे हे अंबानीला सुद्धा माहित नसावे.

"दिपक चहार कन्सिस्टंटली भारी बॉलींग टाकतोय!" - हे फक्त आयपीएल - सीएसके काँबिनेशन मधेच घडतं. असामी शी सहमत आहे. इंग्लंड मधे निराशा केली होती. दिपक चहार म्हणजे मोहित शर्मा, मनप्रीत गोनी, शादाब जकाती, सुदीप त्यागी कॅटेगरीतलं आणखीन एक नाव असण्याची शक्यता आहे. पण बेनिफीट ऑफ डाऊट म्हणजे चहार ने रणजी मधे सुद्धा अधून मधून चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मी थोडासा आशावादी आहे.

दिपक चहार कन्सिस्टंटली भारी बॉलींग टाकतोय! >> चहार फक्त CSK मधून अशी बॉलिग टाकतो. इंग्लंड मधे पूर्ण निराशा केलेली Sad

पोलार्ड का असतो मुंबईच्या टीम मधे हे अंबानीला सुद्धा माहित नसावे

>>> सहमत.

MI 7.5-8 च्या सरासरीने पहिल्या काही overs खेळते अशा आशेव्वर कि नंतर कोणी तरी (म्हणजे पांड्या बंधू लागले तर किंवा रोहित टिकला तर) पुढे वाढवून १८० पर्यंत गाडा ढकलेल. पण बुमरा नि थोडाफर थोरला पांद्या वगळता जे काही बॉलिंग कॉम्बो आहे त्याला १८० पुरणे अशक्य आहे. जनरल वॉरनर, बटलर, रसेल, बेअरस्ट्रो वगैरे लोकआंनी हा सफ नॉर्म २०० चा केलेला आहे.

"तोच कशाला.... रायडू, वॉटसन, ब्राव्हो, रैना, मोहीत शर्मा.... सगळेच यलो जर्सीत भारी खेळतात" - खरय! तसं तर टी-२० पुरता विचार केला तर धोनी सुद्धा सीएसके कडून जितका चांगला खेळतो तितकं चांगलं तो आंतरराष्ट्रीय सामन्यात नाही खेळत असं वाटतं.

"पोलार्ड का असतो मुंबईच्या टीम मधे हे अंबानीला सुद्धा माहित नसावे" - Happy बहुदा लकी चार्म म्हणून ठेवला असेल.

बहुदा लकी चार्म म्हणून ठेवला असेल. >> जिंकत तर नाही मेले, कसला आलाय लकी? Wink

धोनी सुद्धा सीएसके कडून जितका चांगला खेळतो तितकं चांगलं तो आंतरराष्ट्रीय सामन्यात नाही खेळत असं वाटतं. >> हो मलाही. (पूर्वीपासून नाही पण अलीकडे.)

"जिंकत तर नाही मेले, कसला आलाय लकी?" - खरं तर युवराज आणी पोलार्ड ही दोन्ही ओझी एकत्र वहात असल्याचा फटका मुंबईला बसतोय. वर शर्मा - डि कॉक जोडी नंतर एकदम पंड्या बंधूच आहेत. मधे बर्यापैकी पोकळ वासा आहे. त्या दोघांपेक्षा इशान किशन आणी एविन लुईस हे खूप जास्त भरवशाचे ऑप्शन्स वाटतात.

जिंकत तर नाही मेले, कसला आलाय लकी? >> Lol

धोनी सुद्धा सीएसके कडून जितका चांगला खेळतो तितकं चांगलं तो आंतरराष्ट्रीय सामन्यात नाही खेळत असं वाटतं. >> +1

- खरं तर युवराज आणी पोलार्ड ही दोन्ही ओझी एकत्र वहात असल्याचा फटका मुंबईला बसतोय. >> युवराज कमीत कमी प्रयत्न करतोय असे तरी वाटते, पोलार्ड जाऊ दे ..... एका वर्षाच्या पुण्याई वर एव्हढा टिकलेला खेळाडू क्रिकेटच्या इतिहासाममधे नसावा.

धोनी सुद्धा सीएसके कडून जितका चांगला खेळतो तितकं चांगलं तो आंतरराष्ट्रीय सामन्यात नाही खेळत असं वाटतं<<<<

नाही हो, असं काही नाहीये.

2018 ला ऑस्ट्रेलिया टूर झाली होती, त्यात धोनीने शेवटच्या दोन्ही ओडीआय मॅचेस नॉट आऊट राहून जिंकून दिल्या होत्या, धोनीला मॅन ऑफ द सीरिज दिलं होतं.

या वर्षी, भारतात झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या तीनही वन डे मध्ये धोनी नव्हता, त्या तीनही मॅच भारताने हरल्या.
धोनीचं महत्त्व तो खेळत नसला की लक्षात येतं.

चैतन्य रासकर, टी-२० पुरतच मर्यादित ठेवलय धोनी विषयी डिस्कशन. वन-डे हा वेगळा प्रकार आहे.

"एका वर्षाच्या पुण्याई वर एव्हढा टिकलेला खेळाडू क्रिकेटच्या इतिहासाममधे नसावा." - जयदेव उनाडकट त्याच मार्गावर आहे.

"तसं तर टी-२० पुरता विचार केला तर धोनी सुद्धा सीएसके कडून जितका चांगला खेळतो तितकं चांगलं तो आंतरराष्ट्रीय सामन्यात नाही खेळत असं वाटतं."

पोलार्ड ला का ठेवलय त्याचे उत्तर मिळाले Wink रैना ज्या तर्‍हेने खेळत होता ते बघून कोणाला विकेट मिळेल एव्हढाच प्रश्न होता. surprising part was there were no short balls to him at all ????

पोलार्ड्ने आता पर्यंत दोन ब्रिल्यंट कॅचेस (पॉइंट, मिडविकेट) घेतल्या आहेत; राहुदे त्याला टिममध्ये...

मुंबई जिंकली. हिंदी कॉमेंट्री मधे कुणीतरी, भाई वि. अण्णा (हिंदीत अन्ना) मॅच असल्याचा उल्लेख केला होता. भाई जिंकले.

पॉवरप्ले मधे दिल्ली संथ खेळले आहेत आणी २ विकेट्स पण गेल्या आहेत. तशी बॅटींग वीक वाटते दिल्ली ची. पंत चालेल ह्या आशेवर असतात ते नेहमी असं वाटतं. अय्यर आणी पंत खेळताहेत, सातवी ओव्हर आहे. अजून एखादी विकेट लवकर पडली तर अवघड जाईल.

पंत आपली राष्ट्रीय संघातील जागा गृहीत तर धरत नाहीय ना ! पूर्वीची एक लोकप्रिय नाटयछटा होती, जी एक वाकप्रचारच झाली होती -' पंत पडले , राव चढले ' ! सावध, पंत !!

१. पंतची जागा फिक्स आहे, हे त्याला पण माहितेय.

२. विकेट कीपिंग मध्ये धोनी नंतर वृद्धिमान सहा हा उत्तम खेळाडू होता, पण तो इन्जुरड झाला. त्यांनतर कार्तिकला संधी मिळाली होती, पण तो त्याची जागा पक्की करू शकला नाही. त्यानंतर पंत आले. त्याची जागा घेईल असा खेळाडू भारताकडे नाही. त्यामुळे धोनीला बॅकअप म्हणून पंतला वर्ल्ड कप स्क्वाड मध्ये स्थान मिळेल.

३. पंत हिटर आहे, मॅच विनर नाही, त्याने डोमेस्टिक क्रिकेट अजून खेळायला हवे, हे वर्ल्ड कप झाल्यावर सिलेक्शन कमिटीच्या लक्षात येईल.

४. ईशान किशन सुद्धा विकेट किपर म्हणून चांगला खेळाडू होता, पण आपल्या महान कॅप्टनला तो खेळाडू आवडत नाही, मागच्या वर्षीच्या आयपीलच्या एका मॅचमध्ये, कोहलीने ईशान किशनला शिव्या दिल्या होत्या, त्याचा व्हिडिओ युट्युबवर आहे, त्यांनतर ईशान किशनच नाव भारतीय टीमसाठी घेतलं गेलं नाही

५. धोनीला बॅक अप म्हणून कार्तिकला स्थान द्यावे. पण हा पंत नको.

Pages