आयपीएल - २०१९ ह्या आठवड्याच्या शेवटी सुरू होते आहे. आयपीएलचा तडका बसला, की लगोलग येणार्या विश्वचषकाची चव अजूनच लज्जतदार होणार आहे! कोण जिंकणार, कोण चांगलं खेळणार, विश्वचषकाची संघनिवड आयपीएलमधील कामगिरीवर ठरणार का - एक ना दोन! निवडणुका असतानाही ह्यावेळी आयपीएल भारतातच असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हवा चांगलीच गरम असणार आहे. स्पर्धा सुरू होईल तशी चर्चा जोमाने होईलच. वॉर्नर-स्मिथ जोडगोळी पुन्हा क्रिकेटमध्ये परतली आहे. सॅम कुरानसारखा खेळाडू ह्या वेळेस आहे. कोहलीसारखा खंदा फलंदाज व कप्तान ह्यावेळी आयपीएल आणि विश्वचषक दोन्ही मान पटकावण्यासाठी सज्ज आहे. जयदेव उनाडकत ह्याही वेळेस भरपूर किंमत घेऊन मैदानात उतरलाय. ह्याशिवाय रशिद चहल, चहल, कुलदीप यादव ह्यांच्या फिरकीची मजा लुटता येणार आहे. एकंदरीत भरपूर मजा येणार आहे!
पहिला सामना शनिवार २३ मार्च, चेन्नई विरुद्ध बेंगालुरू असा रंगणार आहे. आपल्या संघाचं समर्थन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, वादविवादाच्या फैरींची मजा लुटण्यासाठी, अचूक आणि मार्मिक व्यंगचित्रांनी घेतलेल्या 'फिरकी'साठी इथे आता धमाल करूया!
गोल्फ ला कसले आलेत नियम,
गोल्फ ला कसले आलेत नियम, काहीही नियम नसतात,
एक होल असते, त्यात ठराविक वेळा शॉट मारून बॉल ढकलायचा असतो. ठराविक शॉटस पेक्षा 1 शॉट कमी लागला तर बर्डी, दोन कमी लागले तर ईगल, एक जास्त लागला तर बोगी आणि तेव्हढेच शॉट्स लागले तर पार म्हणतात.. असे एकूण 18 होल्स असतात, प्रत्येक प्लेयरला ते संपवायचे असतात, आज 4 दिवस एक tournament चालते.. संपला विषय.
हा हा. हिम्स्कुल, तुमचा
हा हा. हिम्सकुल, तुमचा बहुतेक गॉल्फ आणि गोट्या/शीगरुपी या खेळांमध्ये गोंधळ झालेला आहे. अहो गॉल्फ ऑफिशियल रुल्सचं पुस्तक आहे आणि या रुल्सचा कीस काढणारी अनेक पुस्तकं आहेत...
जे लोक्स बोलताहेत सामना फिक्स
जे लोक्स बोलताहेत सामना फिक्स होता तेच लोक्स 23 मे नंतर EVM ला नावं ठेवतील
आता ही अफवा कोणी पसरवली की
आता ही अफवा कोणी पसरवली की नीता अंबानीची तंत्रशक्ती बघून BCCI तिला वर्ल्ड कप मध्ये सोबत घेऊन जाणार आहे.
>>तंत्रशक्ती
>>तंत्रशक्ती
मंत्रशक्ती म्हणायचे आहे का?
असामी,
आयपिल मुळे मात्र एक धोका/फायदा हा आहे की सर्व संघांना महत्वाच्या खेळाडूंचे कच्चे//पक्के दुवे कळून चुकतात, ज्याचा फायदा/गैरफायदा विश्वचषकासाठी होऊ शकतो.
+१००. आजकाल बहुतेक काहीही घडलं तरी लोकांना मनासारखं वाटत नाही... guess its case of too many choices..! previously there were only three: win, lose, or draw.
रच्याकने: DRS मूळे मात्र, (ईम्रान) ताहीर बाबा चे ते फेमस सेलीब्रेशन ग्रीन बत्ती लागण्या आधी पॉझ मोड मध्ये जाते एव्हडाच काय तो फायदा. अन्यथा तो प्राणी वाघ मागे लागलेल्या शहामृगागत कधिही पळत सुटतो.
वर्ल्ड कप क्रिकेटची सध्या
वर्ल्ड कप क्रिकेटची सध्या प्रसारित होत असलेली जाहिरात मला आवडली नाही. उगीचच नाचून बिचून राणी एलिझाबेथची टिंगल किंवा तिला खिजवणे चालले आहे असे वाटले.
<<<<<मॅच रंगतदार झाली तरी
<<<<<मॅच रंगतदार झाली तरी तक्रार असते, एकतर्फी..............आपण खेळाची मजा कशी लुटायची हे विसरत चाललो आहोत का ? Sad>>>
अगदी सत्य.
तक्रार करणारे कायम दोष शोधत असतात. शिवाय इतरांनी छान म्हंटल्यावर, आपण चुका काढून टीका करणे हे intellectual असल्याचे लक्षण समजतात काही लोक. फक्त आवाज चढवून अधिकारवाणीने बोलायचे.
खेळाचे स्वरूप मुळात खेळणारे नि अंपायर निर्णय देणारा एव्हढेच. मग त्यात फक्त तंत्र कौशल्य एव्हढेच बाघायचे. इतर चुका, कमी दर्जाचा खेळ अधून मधून होणारच. कुठल्याहि खेळात अंपायरची चूक असणेहि अगदी साहाजिक आहे.
पण सगळे लक्ष आजकाल जिंकणे नि हरणे याकडेच.
खेळ, खेळातले कौशल्य वगैरे ऐवजी पैशालाच जास्त महत्व दिल्या जाते. पैसे देऊन खेळ बघण्याबरोबर करमणूकहि सतत होत राहिली पाहिजे. तरच लोक पैसे देऊन पहायला येणार!
म्हणून आता खरे तर टेक्नॉलॉजीच्या पुढे जाऊन कोर्ट कचेर्याहि होतील!!
मग काय मजाच! वकील तर पुरेसे पैसे दिले तर खोट्याचे खरे नि खर्याचे खोटे करण्यात तरबेज!
आयपिल मुळे मात्र एक धोका
आयपिल मुळे मात्र एक धोका/फायदा हा आहे की सर्व संघांना महत्वाच्या खेळाडूंचे कच्चे//पक्के दुवे कळून चुकतात, ज्याचा फायदा/गैरफायदा विश्वचषकासाठी होऊ शकतो. >> मला वाटते कि IPLचा सर्वात न मह्त्वाचा फायदा भारतीय खेळाडूंना हा होतो कि आंतरराष्ट्रिय स्तरावर न खेळलेल्या किण्वा होतक्रू खेळाडूंना data analysis हा प्रकार जवळून बघायला मिळतो. हे exposure domestic cricket मधे अजूनही मोजकेच आहे. IPL च्या scouting team कडून कानाकोपर्यामधे होणारे scouting हा दुसरा फायदा. - बुमरा, पांड्या हे त्यातून आले नि fast track झाले.
(No subject)
Pages