आयपीएल १२ - २०१९

Submitted by भास्कराचार्य on 20 March, 2019 - 09:11

आयपीएल - २०१९ ह्या आठवड्याच्या शेवटी सुरू होते आहे. आयपीएलचा तडका बसला, की लगोलग येणार्‍या विश्वचषकाची चव अजूनच लज्जतदार होणार आहे! कोण जिंकणार, कोण चांगलं खेळणार, विश्वचषकाची संघनिवड आयपीएलमधील कामगिरीवर ठरणार का - एक ना दोन! निवडणुका असतानाही ह्यावेळी आयपीएल भारतातच असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हवा चांगलीच गरम असणार आहे. स्पर्धा सुरू होईल तशी चर्चा जोमाने होईलच. वॉर्नर-स्मिथ जोडगोळी पुन्हा क्रिकेटमध्ये परतली आहे. सॅम कुरानसारखा खेळाडू ह्या वेळेस आहे. कोहलीसारखा खंदा फलंदाज व कप्तान ह्यावेळी आयपीएल आणि विश्वचषक दोन्ही मान पटकावण्यासाठी सज्ज आहे. जयदेव उनाडकत ह्याही वेळेस भरपूर किंमत घेऊन मैदानात उतरलाय. ह्याशिवाय रशिद चहल, चहल, कुलदीप यादव ह्यांच्या फिरकीची मजा लुटता येणार आहे. एकंदरीत भरपूर मजा येणार आहे!

पहिला सामना शनिवार २३ मार्च, चेन्नई विरुद्ध बेंगालुरू असा रंगणार आहे. आपल्या संघाचं समर्थन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, वादविवादाच्या फैरींची मजा लुटण्यासाठी, अचूक आणि मार्मिक व्यंगचित्रांनी घेतलेल्या 'फिरकी'साठी इथे आता धमाल करूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटचा बॉल नो बॉल होता, हे कळल्यावर दोन्ही टीम परत येऊन का खेळले नाहीत? त्या अंपायर ला मॅन ऑफ द मॅच द्यायला हवं, त्यानेच मुंबईला मॅच जिंकून दिली.

*आता ते कौशल्य आहे कि नाहि यावर दुमत असु शकतं...* मला नाही वाटत , स्वत: अश्विनही याला ' कौशल्य ' म्हणायचं धाडस करेल असं ! Wink
आजच्या मुंबईच्या विजयाचं श्रेय ( एबीडी शेवटपर्यंत खेळत असूनही ) मुखयत: दोन गोष्टीना जातं -
1) पंडयाचा उंच उडालेला झेल निशचितपणे विकेटकीपरचाच असूनही मोईनने धांवून तो झेल फसवला. इतकी मूलभूत चूक व्यावसायिक खेळाडूकडून अपेक्षित नाही व क्षमयही नाहीं. पंडयाने नंतर काढलेल्या धांवा आरसीबीला महागात पडलया व निर्णायक ठरल्या;
2) बुमराहचया 17व्या व 19 व्या अप्रतिम षटकांचा एबीडीचं वादळ रोकायला झालेला उपयोग.

"पंडयाचा उंच उडालेला झेल निशचितपणे विकेटकीपरचाच असूनही मोईनने धांवून तो झेल फसवला." - तो नोबॉल होता. पंड्या आऊट झाला नसता. अर्थात तरी त्याला शेवटच्या ओव्हर मधे रोखायला हवं होतं.

बुमराह कमाल बॉलर आहे. तो असताना शेवटच्या २ ओव्हर्स मधे २२ धावा निघणं फार अवघड होतं. तो शेवटचा नोबॉल अंपायर ने दिला असता तर काय झालं असतं कुणास ठाऊक? शेवटचा बॉल - जिंकायला ४ रन्स, स्ट्राईकवर एबी आणी बॉलिंग ला मलिंगा - ड्रीम सिक्वेन्स!

* तो नोबॉल होता. * _ साॅरी, माझ्या लक्षात नव्हतं आलं हें.
एबी हा एक चमत्कारच आहे ! तो खेळत असेपर्यंत सामना जिंकण्याचा विचार विरूद्ध संघाने स्थगितच ठेवावा !

भाऊ, आयपीएल ला सुरूवात होऊन आता जवळजवळ एक आठवडा पूर्ण होईल. पण इतक्या कालावधीत तुमचं एकही व्यंगचित्र आलं नाही. हा नोबॉल देण्यात येत आहे आणी तुम्हाला नोबॉल आणी पुढचा फ्री-हीट असे दोन व्यंगचित्रं काढायची विनंती करण्यात येत आहे. Happy

शेवटच्या ओव्हरला एबीडीला यॉर्करवर सिक्स मारणे जमत नव्हतं, पण मलिंगाने चार यॉर्कर आधीच टाकले होते, शेवटचा बॉल तेवढाच चांगला यॉर्कर करणं अवघड गेलं असतं. एबीडी स्ट्राईकवर होता, यॉर्कर जर फसला असता, तर एबीडीने त्या बॉलवर सिक्स नक्की मारला असता, सिक्स नाहीतर फोर सुद्धा गेला असता, फोर गेला असता तर मॅच टाय झाली असती.

बाय्दवे, मांकडिंग करायला हि एक प्रकारची नॅक असावी लागते. आता ते कौशल्य आहे कि नाहि यावर दुमत असु शकतं...>> एकतर मांकडींगम्हणनेणे मुळातच चूक आहे. विनू मांकड यांनी आधी सूचना देऊन नंतर आउट केले होते. आश्विनने ती तसदी घेतली नव्हती. Happy

* मला नाही वाटत , स्वत: अश्विनही याला ' कौशल्य ' म्हणायचं धाडस करेल असं ! >> अस कस . अश्विन तर नक्की म्हणेल हे मलाच फक्त जमत. म्हणजे बोलिंग अ‍ॅक्शन मधे निवांत थांबून फलंदाज क्रिझच्या बाहेर जायची वाट बघून मग आउट करणे. Happy अश्विनी कावा. Happy

काल मुंबई जिंकली हे योग्यच झाले. अम्पायर शेवटी खेळाचा एक भाग असतो. बुमराचा एक चेंडू वाइड नसताना दिला गेला.

मुंबई बॅटींग करत असताना एका षटकाच्या शेवटच्या चेंडू फलंदाजाच्या पायावर लागला असूनही वाइड बॉल दिला गेला. मिळालेल्या जास्तीच्या चेंडूवर विकेट पडली. Happy

१. मांकडिंग ने बाद करता येते > हा आय सी सी चा नियम आहे.
२. वॉर्निन्ग द्यायची असते हा कुठेही नियम नाही.
३. हे माहिति असून फलन्दाज गाफील असेल तर त्याची चूक आहे.
४. एक तर आय सी सी ने मांकडिंग करता येनार नाही असा नियम बनवावा किंवा वॉर्निन्ग चा नियम बनवावा , हे दोनही सध्या असतित्वात नाहीत

मग अश्विनचे काय चुकले ??

बुमराचा एक चेंडू वाइड नसताना दिला गेला<<<<

१. अंपायर जेव्हा वाईड बॉल देतो, ती डिलिव्हरी बघून, लक्ष ठेवून, त्यावर विचार करून, निर्णय दिलेला असतो, तो निर्णय चुकीचा किंवा बरोबर असू शकतो. पण नो बॉल जेव्हा अंपायर देत नाही याचा अर्थ अंपायर बॉलरच्या पायाकडे बघतच नव्हता, त्याचं लक्षच नव्हतं, त्याने काहीच निर्णय घेतला नाही.

२. नो बॉल आहे की नाही या बद्दल जर अंपायर साशंक असेल तर तो थर्ड अंपायरची मदत घेतो, हे बऱ्याच वेळा होतं. पण इथे अंपायरच लक्षचं नव्हतं, मग साशंक तरी कुठून होणार.

मग अश्विनचे काय चुकले ??>> नियमाप्रमाणे काहिही नाही.
फक्त अश्विन क्रिकेटर आहे, पण तो क्रिकेट खेळत नव्हता. Happy

चैतन्य : म्हणूनच क्रिकेटमधे जरतरला अर्थ नाही. नो बॉल दिला नाही. वाइड दिला. आउट झाला. मॅच संपली. निर्णय झाला. विषय संपला. आता रडून काहिही उपयोग नाही. :).

क्रिकेटमधे एक गोष्ट चांगली शिकायला मिळते. बोट वर गेलं की मुकाट्याने बॅट काखेत घालायाची, ग्लोव्हस काढायचे, परत चालायला लागायचं. हातवारे करून काही उपयोग नाही:) कडू निर्णय निर्विकारपणे स्विकारायची चांगली सवय होते. Happy

क्रिकेट फक्त फलंदांजांचा खेळ होत चा;लला आहे.सगळे नियम बॉलरच्या विरुध असताना , आता पळण्यासाठी सुद्धा हेड स्टार्ट हवा का ?

१. मांकडिंग ने बाद करता येते > हा आय सी सी चा नियम आहे.
२. वॉर्निन्ग द्यायची असते हा कुठेही नियम नाही.
३. हे माहिति असून फलन्दाज गाफील असेल तर त्याची चूक आहे.
४. एक तर आय सी सी ने मांकडिंग करता येनार नाही असा नियम बनवावा किंवा वॉर्निन्ग चा नियम बनवावा , हे दोनही सध्या असतित्वात नाहीत

मग अश्विनचे काय चुकले ??

>> शाहिर , सोप्या शब्दात , trevor chappell चे underarm बोलिंग करताना जे चुकले तेच Happy

*मग अश्विनचे काय चुकले ?? * -
अंपायरने फलंदाजाला बाद ठरवलं, याचाच अर्थ अश्विनचे नियमानुसार काहीही चुकलेलेच नाहीं. मूळात , त्यावर चर्चाही नाही.

चला लोकहो... move on!

Fantsay Leagues खेळताय का कुणी?

आम्ही (आम्ही म्हणजे ऑफिसचा ग्रूप) यावेळी IPLT20 वरची लीग खेळतोय..... चांगला वाटतोय फॉरमॅट..... रोज रोज चेंजेस करायला धावपळ करावी लागत नाही.... एकदाच चेंजेस करायचे आणि ८ मॅचेस (एक राउंड) निवांत बघत बसायचे.... Cool!

अज हैद्राबाद वि. राजस्थान. राजस्थान ला जे काही पॉईंट्स कमवायचे असतील ते त्यांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू असेपर्यंतच कमवावएत. नंतर अवघड जाईल असं वाटतय. पण हैद्राबाद ला हैद्राबादमधे हरवणं सोपं नाही. मागच्या मॅच ला रसेल ने त्यांचे प्लॅन्स गंडवले, पण ते अपवादात्मक असावं.

सामना हैदराबादच्या आटोक्यात !
*व्यंगचित्रं काढायची विनंती करण्यात येत आहे*. -

असे भुरकटून लगेच पुढे काय धांवताय व्यंगचित्रं पोस्ट करायला; अहो, कळतंय ना, तुमचं मांकडींग करायचंय त्याना !!20190314_222829.jpg

सामना हैदराबादच्या आटोक्यात !
*व्यंगचित्रं काढायची विनंती करण्यात येत आहे*. -

असे भुरकटून लगेच पुढे काय धांवताय व्यंगचित्रं पोस्ट करायला; अहो, कळतंय ना, तुमचं मांकडींग करायचंय त्याना !!20190314_222829.jpg

भाऊ Happy

तुमचं मंकडिंग इथे कोण करणार?

हैद्राबाद नं राजस्थान च्या हातातून मॅच काढली. दोन्ही मॅचेस राजस्थान ना गमावल्या. परत एकदा 'तळीराम' व्हायची तयारी??

साॅरी , डबल पोस्ट झालं आणि आतां काढूनही नाही टाकतां येत.असो, एकसे भले दो ( बहूधा, एकसे बुरे दो ) ! Wink
सॅमसन माझा आवडता खेळाडू. पंत, साहा व तो एकाच वेळी अवतरणं हें बॅड लक . जसं, बेदी व आपला शिवलकर एकाच वेळी आले; एकाच दर्जाचे असूनही बेदी जगभर गाजत राहिला व बिचारा शिवलकर फक्त रणजी खेळाडूच राहिला!

बाय द वे , किपर हे करियर निवडण हेच रिस्कि नाही का ? एका जनरेशनला २ ते ३ किप्र पुरतात , तेवढ्यात ४० ५० फलंदाजाना संधी मिळालेली असते Sad

भाऊ, छान! Happy

किपर दुय्यम फलंदाजी प्रमुख असे करियर निवडायचे!

*किपर हे करियर निवडण हेच रिस्कि नाही का ? * आतां तर विकेटकीपर- बॅटसमन असणंही अपरिहार्य झालंय ! पण हें रिस्क जाणूनही आपलं सर्वस्व पणाला लावतात, त्यांच्या पॅशनला व जिद्दीला सलाम!!

आज मलींगाचा नो-बाॅल दिला नाहीं म्हणून पंचावर टिकेची झोड उठलीय. पण त्या निर्णायक वेळी कांहीही झालं तरीही नो-बाॅल, वाईड बाॅल पडणार नाही याची 100% दक्षता घेणं शेंबडया मुलालाही कळतं, तें मलिंगाला कळूं नये ? कुणी त्याबद्दल मलींगाला कां नाही झाडत ? वरच्या पातळीवरील सामन्यांचा पंचापेक्षांही मलिंगाला अधिक अनुभव असावा व म्हणूनच मलिंगाची चूक अधिकच अक्षम्य ठरते.

ही असली बॉलींग घेऊन राजस्थान प्ले ऑफ्स ला पोहचेल असे वाटत नाही!
सॅमसन मात्र मस्तच खेळला काल... रहाणेच्याही काही सिक्स बघायला मजा आली!

Pages