तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चुकून माकुन ती बाला पल्याड गेलीच तर हेची फळ काय मम तपाला असं होईल फाए चं. >>>>
मेधावि, फाएना फार सावधपणे करावे लागेल हे. लग्नानंतर चुकून जरी मुलाकडच्यांना कळले की हे स्थळ येण्यात कोणाचा सहभाग होता तर बुरे पिटतील फाए.

बाला पल्याड गेली तर काय प्रॉब्लेम नाही. शिकणे या प्रकाराची बोंब असल्याने तिकडचा अ‍ॅक्सेंट, चित्रीकरणाच्या रीतीभाती न आल्याने कोणी मंदाचाही रोल देईलसे वाटत नाही. कोपर्‍यात / कारंजात / प्रवेश्द्वारात पुतळा म्हणून उभी राहिली तर.

एक मजला खाली उतरून यायला तेवढ्यात बूट घातले की काय? >>>>
अंजली१२ Happy खडावा नव्हत्या याबद्दल प्रेक्षकांनी एकमेकांचे अभिनंदन केले पाहिजे?

त्याच्या ऐवजी प्रसाद ओक करणारे भूमिका असं कळलं >>>>
निधी, मग तुळसकर नाही येणार वाटतं? राजनंदिनी ऐवजी सरंजामेंचा पुनर्जन्म बघायचा लोकानी ?
घर सोडून गेलेत ते परत येताना बदलूनच येणार?
अपघात ---> प्लस्टिक सर्जरी + स्मृतीभ्रंश ---> प्रॉपर्टी हडपणे प्लॅन विसरणे ----> ईषा सेवा + जयदीपसोबत कंपनी सांभाळणे ---> पुन्हा प्रेमकहाणीच दळण + थोडी रडारड.
डोळ्यात-बदाम-बाया काय करतील आता?

पॉपकॉर्न घ्याss, टिश्यू घ्याss, रूमाल घ्याss, वेताची छडी, चिंचेचा फोक घ्याssss ....... २-२ रूपये. खास माबोकरांसाठी सवलतीच्या दरात. मर्यादित साठा, त्वरा करा.

कारवी ....... न.....ही...
कसल्या भन्नाट आयड्या देताय केड्याला.

बेबी बिपीनच्या बाइकवरून उतरून सरळ चालू पडली तेव्हा हातात डब्याची पिशवी नव्हती , हापिसात शिरताना आली.

कारवी आज एकत नाही, हर बॉल पर पे सिक्सर! विक्याने घर सोडायच्या आधी मी बघायची सोडली पण इथल्या कॉमेन्ट्स अजुनही वरच्याच पार्॑ड्यात आहेत म्हणजे मूळ चादरी फाडुन त्याची गोधडी करावी आणी तिच सगळ्याना आवडावि तस झालय.

रच्याकने, आनंदी गोपाळमध्ये पंचायतीच्या सिनमध्ये मिहिर आहे का, त्या घारे डोळेवाल्या सरपंचाच्या बाजूला बसलेला. >> हो

मालिकेने सपशेल गटांगळ्या खायला सुरुवात केली आहे... पार नाकातोंडात पाणी जायला लागले आहे..
आता केड्या कदाचित् मा न बा स्टाइल एखाद्या फिलर भूमिकेत अवतरेल असं वाटायला लागलं आहे..
सुभा आता आपल्यासमोर वीस वर्षांपूर्वीच्या "वीस" वर्षाच्या नव युवकाच्या रुपात येईल..
रच्याकने... कसं प्रेझेंट करतील बरं त्याला..
आणि शि तु पण विशीच्या आसपासची असायलाच पाहिजे..
ती अभिनेत्री म्हणून सकस आहेच.. पण विशीतील शि तु आणि सुभा.. कसं काय ब्वा

रच्याकने, आनंदी गोपाळमध्ये पंचायतीच्या सिनमध्ये मिहिर आहे का, त्या घारे डोळेवाल्या सरपंचाच्या बाजूला बसलेला. >>>> अगदी अचूक निरिक्षण.

रच्याकने, आनंदी गोपाळमध्ये पंचायतीच्या सिनमध्ये मिहिर आहे का, त्या घारे डोळेवाल्या सरपंचाच्या बाजूला बसलेला.>>>
तो voice modulation आणि dubbing च्या कार्यशाळा घेतो विक्रम गोखलेंबरोबर.. कोथरूडच्या सिटी प्राईड आवारात जाहिरात लावलीय.
हा काय voice modulation शिकवत असेल असा प्रश्न पडला मला..

< हा काय voice modulation शिकवत असेल असा प्रश्न पडला मला..> Lol
मिहीर म्हणजे तो विगवाला का?

मायरा आणि झेण्डेचे डाउटस ऐकून हसाव का रडाव तेच कळत नव्हत.आता विस काय कुक्कल बाळ आहे का जालिन्दरने पळवायला.
झेण्डेला विसचे सगळे अड्डे माहितीये ना, त्याला तो कुठे गेला हे माहित असू नये हे पटत नाही. अ‍ॅटलिस्ट त्याने मुम्बईच्या फार्महाउसवर तरी चेक कराव.>> हो ना.. झेंडे विसला शोधण्याऐवजी तर्क वितर्क लावत आहे..
शनिवारच्या भागात दिसलेले जादूचे प्रयोग...>> Biggrin कारवी मानलं तुम्हाला.. काय तुफान फटकेबाजी केलीत..

विस ऐवजी प्रसाद ओक भूमिका करणार आहे असं कळलं>> अरे देवा Sad विसचा उत्तम अभिनय ही एकच तर चांगली गोष्ट आहे मालिकेमध्ये

क्काय...? विस ऐवजी.....आय मीन सुबोध ऐवजी प्रसाद ओक..? बिग नो नो..!!
आम्ही डोळ्यांत बदाम ग्रूप चे सदस्य हे कदापीही मान्य करणार नाही!
काल ईशा व मायरा- झेंडे एका हॉटेल मधे गेले होते.... ईशा म्हणे..इथे कसं मोकळं मोकळं वाटतंय..!!
ईशा तशी बरीच डेरींगबाज दिसते..मायरा झेंडेना घोळात घेऊन विक्या च्या भूतकाळाविषयी विचारत होती...
सॉन्याला काय झालं? एकदम ओरडा आरडा....!!

कालच्या भागात साॉन्याने एकच डायलॅाग तीन वेळा बोलून दाखवला. - ब्रो इन लाॉ कोणालाही काहीही न सांगता जाणार ,इ.इ.
इन्स्पेक्टर प्रद्युम्नची मक्तेदारी झी वाले मोडणार यात शंका नाही; कारण मा.न.बा. मध्येही बरेचदा हा प्रकार असतो.

इशा अजूनही खोटे बोलून नवर्‍याला सावरून घेते.!!! अरे समथिंग इज नॉट करेक्ट असा संशयही येत नाही का ह्या निरागस लोकांना? आता एकदम ऑफिसात भले मोठे आर्थिक रिपर्कशन्स असलेले निर्णय घेते लगेचच. सर्वांना शिक्ष णाचा खर्च रिएंबर्स करणार. निदान वाडकर बाईबरोबर बसून बोलून बजेट आहे का तेबघून असे निर्णय घ्यावेत ना?! राधिका व ही एकदम डिरेक्टर लेव्हल डिसिजन्स बिनधास्त घेतात.

प्रसाद ओक करणारे भूमिका असं कळलं >>>>> चांगलं होईल.सुजकट,पारोश्या चेहर्‍यापेक्षा आता नवीन,त्यातल्यात्यात तरुण चेहरा आवडेल.
अ‍ॅक्टिंग चांगलं म्हणून किती सोसायचं?

मालिका अति वाढवायची असेल आणि ते सु भा ला नको असेल, म्हणून सोडतोय की काय. प्रसाद ओक व्हिलन उत्तम करेल, सु भा पण करू शकतो उत्तम व्हिलन.

फार पूर्वी दूरदर्शनवर एक सिरीयल होती गौरी फुले मेन नायिका त्यात प्रसाद ओक व्हिलन होता, त्याची पहिलीच सिरीयल ती, तेरा भागांची होती. अवघाची संसार मध्ये मेन हिरो तोच आणि व्हिलनिश रोल तर होता.

क्काय...? विस ऐवजी.....आय मीन सुबोध ऐवजी प्रसाद ओक..? बिग नो नो..!!
आम्ही डोळ्यांत बदाम ग्रूप चे सदस्य हे कदापीही मान्य करणार नाही! >>>>>>>> +++++++++११११११११११

प्रसाद ओक व्हिलन उत्तम करेल, सु भा पण करू शकतो उत्तम व्हिलन>>>>>>> प्रसाद ओक मला लाउड व्हिलन वाटतो. 'अवघाची संसार' चा भयन्कर अनुभव आहे. पुन्हा अवघाची संसार पार्ट २ नको. तसेही प्रसाद ओक रोमॅन्टिक कितपत वाटेल ही शन्का आहे. नाही म्हणायला वादळवाट आणि होमिसुयाघ बर्यापैकी रोमॅन्टिक दिसला. पण त्याच्यासाठी डोळ्यांत बदाम वगैरे कधीच आले नाहीत. उलट अवघाची संसार मुळे राग आला होता. Lol

बादवे सुनील बर्वे चालेल विस म्हणून.

अरे समथिंग इज नॉट करेक्ट असा संशयही येत नाही का ह्या निरागस लोकांना? >>>>>>> निमकरान्ना आलाय

सर्वांना शिक्ष णाचा खर्च रिएंबर्स करणार. निदान वाडकर बाईबरोबर बसून बोलून बजेट आहे का तेबघून असे निर्णय घ्यावेत ना?! >>>>>> कधी कधी ही तिच्या शरीरात राजनन्दिनी घुसल्यासारखी वागते तर कधी कधी मठ्ठपणा (स्सर) करते. वाडकर बाईन्ना पहिल्यान्दाच कुणाच तरी कौतुक करताना आणि मनापासून हसताना पाहिलय.

काल कुणी ऑब्झर्व केल का, ईशा काल विससारखी टेबलावर दोन्ही तळवे टेकून उभी होती. इतका कॉन्फिडन्स? आता हिच्यात नक्की कोण घुसलय, राजनन्दिनी की विस? Uhoh

ईशा तशी बरीच डेरींगबाज दिसते. >>>>>> अखेर विसचा घर सोडून जाण्याचा ( इल्लॉजिकल) डाव कामी आला तर. चान्गलच आहे. ही अशीच डेरींगबाज राहू दे.

सॉन्याला काय झालं? एकदम ओरडा आरडा.. >>>>>> आम्बटगोड, आईसाहेब जयदीपला विसला शोधत नाही म्हणून ओरडल्या त्याचा सॉन्याला राग आला. तसे सॉन्याचे विसबद्दलचे मुद्दे बरोबर होते. जयदीप सुद्दा चक्क सहमत होता तिच्याशी. बादवे, काल सॉन्याशी जयदीप बोलताना नॉर्मल वाटला.

हो ना.. झेंडे विसला शोधण्याऐवजी तर्क वितर्क लावत आहे.. >>>>>> मला वाटत तो येडा बनून पेढा खात आहे. त्याला माहित असेल, विस कुठे आहे ते.

मी अवघाची संसार अगदी सुरुवात बघितलेली, मला नव्हती आवडत. मग भाचीने कळवलं की तिची एन्ट्री आहे सिरीयलमध्ये, तेव्हा तिचा रोल बघण्यासाठी दोन एपी बघितले, बास. त्यानंतर एकदम शेवटचा बघितला मग.

प्रसाद ओक फार कंगोरे नसलेल्या हिरोचा भाऊ/मित्र type भूमिकाच नीट करू शकतो. किंवा मग एकदम विनोदी भूमिका. कॉमिक सेन्स आणि timing चांगलं आहे त्याचं. निगेटीव्ह रोल मात्र अजिबातच जमत नाही त्याला.
अर्थात हे माझं वैयक्तिक मत.

तशीही मालिका फारशी बघत नाही.श्रुतिका म्हणूनच ऐकली जाते.कधी जाता येता विस पाहिला तर आता कंटाळाच येतो.रूप नको,निदान स्वच्छ रहा इतकी अपेक्षा आहे.
पण त्याच्यासाठी डोळ्यांत बदाम वगैरे कधीच आले नाहीत>>> प्रसाद ओक हा डोळ्यात बदामासाठी नाही तर पडद्यावर सुसह्य वाटण्यासाठी हवा आहे. Wink Wink

सॉन्याचे सगळे मुद्दे बरोबर होते. पण टेप अडकत होती त्याच त्याच मुद्द्यांवर... वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे ३ वेळा एकच पॉईंट... ओक्के वी गॉट इट Proud

आज इशाला जरा जास्तच संवाद होते का? आणि मोठे पण? तिचा आवाज किती चिरका आणि गळ्यात कफ अडकल्यासारखा येतो. एक पुडी ड्रेनेक्स टाकून घशात अडकलेला कचरा मोकळा करावा का? की गोल ब्रशने घासून घ्यावा?

तिला दिग्दर्शकाने प्रत्येक संवाद म्हणायच्या आधी घसा खाकरून आवाज मोकळा करायची आठवण करायला हवी. रोजच्या परिचयात विचित्र आवाजाची माणसं असतात, पण इथे लीड हिरोईन म्हणून काही अपेक्षा असतात आणि परत एकदा 'नावडतीच मीठ अळणी'

एवढा मोठा ३५०० कोटींचा मालक असा अचानक कोणालाही न सांगता घरातून निघून जातो, ह्यात कोणालाही कसं वावगं वाटलं नाही? अरे पोलिसात तक्रार द्या!
मिडियाला अजून कशी खबर लागली नाही? विपाशाच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागताच ईशाच्या घराभोवती वेढा घातला. इथे अख्खा माणूस गायब होतो आणि घरात, बाहेर, ऑफिसमध्ये फक्त कुजबुज? मिडियाला तर पत्ताच नाही. आमचा तैमूर साधा शिंकला तरी मिडीयात त्याची खबर होते.

त्याचं ते नेहमीचं आहे म्हणे. घरचेही लपवून ठेवतात. आईसाहेब सुलभा देशपांडेंसारखा अभिनय (डोळे ) करायला जातात असं वाटतं.

सुभा मालिका सोडतोय का?? त्याच्या ऐवजी प्रसाद ओक करणारे भूमिका असं कळलं.>>> ते प्रत्येक सिरियलमधे असते तसं असेल. सुबोध जाईल आणि विकू म्हणून प्रसाद ओक ची एन्ट्री होईल.

सुभा कामानिमित्त बाहेर गेला असताना त्याचा अपघात होऊन बाल बाल बचावणार.
पण यात त्याच्या चेहर्‍याला जबर मार बसणार .
त्यामुळे त्याच्या फक्त 'चेहर्‍याची' च प्लॅस्टिक सर्जरी केली जाणार.
त्यानंतर प्रसाद ओक नवीन सरंजामशाही चालवणार !
असं काहीसं असेल Wink

लोकहो, उद्या विस परत येणार आहे, गणपतीच्या देवळाय - होसूमीयाघ मधेही गणपतीचचं मंदिर होतं - खरतरं कर्जत च्या देवळात भेटायला हवे होते दोघे.

नवीन प्रोमोप्रमाणे आता बेबी गायब होणार आहे आणि विक्या वेड्यासारखा तिला शोधणार आहे आणि झेंडेची कॉलर पकडून ती कुठे आहे अस विचारल्यावर"विक्रांत,तू ईशाच्या प्रेमात वेडा झाला आहेस का अस झेंडेने विचारल्यावर विक्या चक्कर येऊन कोसळणार आहे.
थोडक्यात केड्याने लपाछपीचा खेळ मांडला आहे.

Pages