Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45
तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )
कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!
हा तिसरा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मयरा फारच छान मला ती नटी अगदी
मयरा फारच छान मला ती नटी अगदी आवड त नाही पण साडीत एकदम परफेक्ट सॉफ्ट व सुरेख दिसत होती. तिला खरेच स्टाइल आहे. घरी बसून कॉफी पीत होती तेव्हाचा टॉप पण चांगला होता.
रुपाली व बिपीन पण गोड काम करतात.
अरूण राव एकदम लुजर नंबर वन्न. जेवायला बसू म्हटल्यावर लगेच अरे थांबू याना जावईबापूंसाठी. अरे हे काय चाळीतून वरून खाली थोडेच जायचे आहे ? तो मुंबईत कुठेतरी, हे कर्जत मध्ये.
कालच्या ड्रेसमध्ये इशा जेवढी
कालच्या ड्रेसमध्ये इशा जेवढी झंगड दिसत होती, तेवढीच मायरा मात्र सुरेख आणि नाजूक दिसत होती. साडी, रंग, मेकअप, ज्वेलरी, सगळंच जस्ट पर्फेक्ट. विसला काल चुकीच्या चॉईसची नक्कीच हळहळ वाटली असेल>> हो ना .. एकतर मुद्दामून इशा ला असे दाखवत आहेत , आणि ते आपल्याला कळत नाहीये
किंवा कपडेपट करणारे ३ लोकांना प्रयोगशील होण्याची फुल्ल मुभा असणार.
असं घरचीच माणसं जेवायला येणार म्हंटल्यावर असा झगा घालून बसतात का ?
इशा ला तन्मणी दिला का ?मी नाही बघितलं ते.. डायरेक्ट तन्मणी गळ्यात होता !
मला वाटले एखादी कांडी फिरवून जादू बिदू करते की काय.>> हो खरंच तसाच होता झगा.
त्यावर छोटेसे गळ्यालगतचे मंगळसुत्र आणी लांबडा हार खूप विसंगत दिसत होते>> नै त काय !
इशाचे सरंजामी थाटाचे यडचाप कपडे पाहीले की पहिली दुपटी बरी होती असं वाटतं. किमान मापात तरी होती>>
कृपया, ईशाचा त्या प्रसिद्ध
कृपया, ईशाचा त्या प्रसिद्ध झग्यामधील फोटो टाका ना कुणीतरी, सम्जेल तरी काय प्रकरण आहे ते
मला वाटलं होतं रुपाली आता
मला वाटलं होतं रुपाली आता आम्हला त्या खोलित घेऊन चल म्हणते की काय, पण हा पर्दाफाश - केड्याचं अजुन ठरलेलं नसल्याने - एवढ्यात होणार नाही.>>किल्ली विकूकडे असते, तोच दार उघडू शकतो.
किल्ली विकूकडे असते, >> मी
किल्ली विकूकडे असते, >> मी नसते विकुकडे

मी हिन्जवडीत असते
किल्ली, मला फोटो टाकता येत
किल्ली, मला फोटो टाकता येत नाहीत, पण वर्णन मात्र करता येतं.
काळा इव्हनिंग गाऊन होता. अगदी प्लेन आणि सरसकट काळा. स्लीवज पूर्ण आणि फक्त खांद्यावर बचबचीत जाड पांढरी एम्ब्रॉयडरी. कदाचित बऱ्या मुलीने घातला असता तर बरा दिसला असता, पण इशाच्या बाबतीत माझं म्हणजे नावडतीचं मीठ अळणी. टोटल विची लूक वाटला. नेहमी स्टेटसला न शोभणारे चंपट सलवार कुर्ते घालते आणि चाळीतुन येणाऱ्या लोकांना इम्प्रेस करायला मात्र इव्हनिंग गाऊन.
रुपाली इनोसंट नसणार.
तिने नक्कीच 50 shades वाचलं असेल आणि क्रिस्टिअन ग्रे च्या सिक्रेट रुमसारखी रूम आहे का विचारलं असेल. पण ढ इशाला पंचतंत्र आणि बिरबल वाचल्यामुळे रूपालीचा चावट प्रश्न कळला नसेल.

मीरा, विस्तृत वर्णनासाठी धन्स
मीरा, विस्तृत वर्णनासाठी धन्स..
डो ळ्यासमोर उभी राहिली मठ्ठबै
नेहमी स्टेटसला न शोभणारे चंपट
नेहमी स्टेटसला न शोभणारे चंपट सलवार कुर्ते घालते आणि चाळीतुन येणाऱ्या लोकांना इम्प्रेस करायला मात्र इव्हनिंग गाऊन.
रुपाली इनोसंट नसणार. Wink तिने नक्कीच 50 shades वाचलं असेल आणि क्रिस्टिअन ग्रे च्या सिक्रेट रुमसारखी रूम आहे का विचारलं असेल. पण ढ इशाला पंचतंत्र आणि बिरबल वाचल्यामुळे रूपालीचा चावट प्रश्न कळला नसेल. Proud Lol >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

कालच्या ड्रेसमध्ये इशा जेवढी
कालच्या ड्रेसमध्ये इशा जेवढी झंगड दिसत होती, तेवढीच मायरा मात्र सुरेख आणि नाजूक दिसत होती. साडी, रंग, मेकअप, ज्वेलरी, सगळंच जस्ट पर्फेक्ट>> हो ना काहीतरीच ड्रेस होता ईशाचा विचित्रच. ती मूळ नायिका आहे ना मालिकेची मग dressing sense चांगला हवा ना. मायरा खूप सुंदर दिसत होती.. तस सोन्या पण छान दिसते आणि तीच आता ईकुटूंबासोबत जमायला लागलाय..
रच्याकने, मला तर या गोष्टीच tension आलय की ईबाळाला जेव्हा विसच खर रूप कळेल तेव्हा किती भोकाड पसरवेल
मला तर या गोष्टीच tension आलय
मला तर या गोष्टीच tension आलय की ईबाळाला जेव्हा विसच खर रूप कळेल तेव्हा किती भोकाड पसरवेल Uhoh>> ती सर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र आय ट्रस्ट यू म्हणेल.
मेधावि.. खूप मार्मिक बोलते.
मेधावि.. खूप मार्मिक बोलते. फारएण्ड....पुलंचा उल्लेख छान वाटले.
मी ऑफिसमध्ये काम करून कंटाळे कि येथील अभिप्राय वाचून खूप फ्रेश वाटतं.
मायबोलीकरांची आभारी आहे. चालूदे पिसे काढणे..
मूळ नायिका आहे ना मालिकेची मग
मूळ नायिका आहे ना मालिकेची मग dressing sense चांगला हवा ना>>
नायिकेचा dressing sense जितका वाईट तितकी ती सद्गुणी असा अलिखित नियम आहे मराठी मालिकांचा.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=icEkJkWfFwA नुसता ड्रेस बघा. जाहीरात सुरु झाल्याक्षणी ४ -५ व्या सेकंदाला दिसतं ईबाळ.
रुपालीनं नवराबायकोसंबंधीच्या
रुपालीनं नवराबायकोसंबंधीच्या तिच्या कल्पनांबाबत काही मूलभूत गोष्टींसाठी योग्य व्यक्तीकडून (इषा नाही) शंकानिरसन करून घ्यावं. >>>
यातल्या ईशा नाही या क्लॉज बद्दल सुपरलोल.
त्यावरून आठवले. अजून फुले एकमेकांवर आपटलेली नाहीत. त्यामुळे विक्या-मायरा व बिपिन-ईशा असे सेन्ट्रल लाइन ला दोन कर्जत कसारा फाटे फोडू शकले असते, उगाच खुनशी बिनशी न करता. काल मायरा ची मीना कुमारी झाली होती एकदम. 'अजीब दास्तां है ये' सुरू करते का काय असे वाटले. तिकडे बिपिन ईशाला चॉकोलेट का काहीतरी देतो तेव्हा तेथेही पुढच्या ट्विस्टची मुळे दिसली. विक्या बेकार निघाल्याने ईशाला बिपिनच्या प्रेमाचा साक्षात्कार होउन ती तोच हॅरी पॉटर झगा नेसून कर्जत स्टे. वर पळत येते व नुकत्याच निघालेल्या लोकल च्या दारातून बिपिनचा पुढे केलेला हात पकडत शिरते अशी डीडीएलजेगिरी करतील बहुधा. फुले आपटलेली नसल्याने हिंदी पिक्चर लॉजिक प्रमाणेच इथे ही हीरॉइन नंतर दुसर्याबरोबर जाण्याचे चान्सेस आहेत.
हो हो बरोबर आहे ...अजून एक
हो हो बरोबर आहे ...अजून एक म्हणजे काल इशा रुपालीनं दोन बोटं आधी स्वतःच्या व लगेच दुसरीच्या ओठावर ठेवून बोटांचा मुका घेणे असं काहीतरी केलं तेव्हा बिप्या म्हणाला...ए मलापण...:) येस्स...बिपाशा थ्रेड सुरु होऊच शकतो
बिप्या म्हणाला...ए मलापण...:)
बिप्या म्हणाला...ए मलापण...:) >>>
सिरीयसली? आईसाहेब नेहमीच्या कौतुकमिश्रीत चेहर्याने हे पाहात होत्या काय? अशा वेळेस टिपिकल सॉन्या-फेस शिकवायला हवा सॉन्याने त्यांना.
तत्सम काहीतरी.
एक्झॅक्टली तसं नाही पण तत्सम काहीतरी.
बादवे, विक्या कुठंतरी अननोन ठिकाणी गुल झालाय. आई साॅन्या वगैरेंना हा प्रकार सवयीचा आहे पण झेंडेला ठाऊक नाही. हे कसं ब्वा?
श्रीमान जाळींदरराव येऊ घातले आहेत असं वाटतंय.
ईशा माहेरी आली आहे.. एक तर
ईशा माहेरी आली आहे.. एक तर नवीन प्लेट किंवा एकाच प्लेट मध्ये जेवण असा अजब पर्याय उपलब्ध आहे.
इथे कोणीतरी लिहिलं होतं की
इथे कोणीतरी लिहिलं होतं की इशा एक ड्रेस 24 तास घालते. रात्रीसुद्धा बदलत नाही. जान्हवी नाईट ड्रेस घालायची इ इ आणि अचानक इशा नाईट ड्रेस घालायला लागली आहे. हा नेहमीच कसा योगायोग असेल?
इशाने तेवढ्यात टंपडपणा केला. कोणती बाई नाईट ड्रेसवर तन्मणी घालून झोपेल? का? की कथानकाची गरज म्हणून उग्गीच कैच्याकै
होना. तन्मणी घालून झोपणं हे
होना. तन्मणी घालून झोपणं हे विशेषच आहे. ह्या कल्पना खरंच कशा सुचतात.
http://expertblogz.com
ज्यांना झगा बघायचाय...
http://expertblogz.com/sz6b1605-8566-4611-b085-0fea430a6525/3fde413b1d5f...
ही लिंक ओपन झाली तर ४ मिनिटापासून पुढे
विस आज लग्नाला 27 वर्ष
विस आज लग्नाला 27 वर्ष झाल्यासारखे संवाद म्हणत होता. म्हणे पूर्वी तू माझ्यासाठी जेवायला थांबायचीस. आता जेवून झोपलीस पण.
पूर्वी म्हणजे एकदाच की राव. लग्नाला जेमतेम 27 दिवस झाले असतील. 27 वर्षे नाहीत. ईशा द बावळटने म्हणायचं ना की तू फोन अँन्सर करत नव्हतास, उशीर होणार तर टेक्स्ट केलं नाहीस आणि तरीही मी वाट पहायची होती का? पण झी मराठीच्या बायका बाणेदार तडफदार हुशार फक्त नवरा सोडून बाकी सगळ्या जगासमोर असतात. अजून एक उदाहरण राधिका सुभेदार.
आजचा एपी कैच्या कैच.. विस घरी
आजचा एपी कैच्या कैच.. विस घरी आला रात्री आणि सरळ चिडचिड सुरू केली बाळाला काय बोलला , नंतर आईसाहेबांना काय बोलला,मग आईसाहेबांचं रडणं (रडणं की घाबरन तेच कळाल नाही
) , परत लगेच विसने बॅग पॅक केली आणि सरळ निघाला बाहेर यात विस villain कमी
आणि psycho च जास्त वाटत आहे. परत बाळाने जास्त अडवलपण नाही..
ऑफिस मध्ये बाळाला file delete झाल्या तर माहिती नाही काय करायचं तर एफएमला सांगावं लागत एवडी basic गोष्टपण माहिती नसावी !!! एकीकडे तिला हुशार दाखवतात आणि एकीकडे मठ्ठ एक कायतर ठरवा म्हणा..
आणि हे काय मधेच निघाला ईशाच माहेरी जाण्याचं काही संबंधपण नाहीये.. विस अचानक घरातून गेला कुठे तेपण माहिती नाही आणि अशा condition मध्ये कुठलीच मूलगी माहेरी कशी जाईल!! आणि इआई सारखी काय म्हणत होती सरंजामेंनची सून बर गम्मत म्हणून म्हणत असेल पण इआई अशिपण म्हणाली की सरंजामेंनची सून आहे ती तिच्यासाठी जेवायला साधं करून कस चालेल.. अरे किती तो कृत्रिमपणा.. आजचा एपी ज्यांनी ज्यांनी बघितला ते खरच खूप हिम्मतवान आहेत
रच्याकने, मालिकेचा trp अजून घसरला वाटत कारण जाहिराती कमी झाल्यात
सिरीयसली. महा रटाळ झालेत गेले
सिरीयसली. महा रटाळ झालेत गेले काही भाग, विशेषतः ते विक्या आणि ईशा मधले, किंवा "जयदीप भाउजी/सॉन्या वहिनी" छाप संवाद. आजी जनरेशन ला ऐकायला आवडणारे काही- "नवरा घरी आल्यावर सुद्धा ऑफिसचे काम....", "याचे श्रेय जयदीप भाउजींनाही आहे" वगैरे.
बघितला तो भयंकर झगा आणि
बघितला तो भयंकर झगा आणि tanmani,... आवरा कुणीतरी ह्यांना खरंच
हिचा झगा ग झगा ग
हिचा झगा ग झगा ग
कोणाला पहायचाय झगा ....
कोणाला पहायचाय झगा ....

Long shot

इशूबेबीचे नाइट गाऊन सुद्धा
इशूबेबीचे नाइट गाऊन सुद्धा झगामगा असतात..

आणि प्लेन अगदी चेहर्याला मॅचिंग
मालिका वाले प्रेक्षकांना कोणतेच समाधान लाभू देणार नाहीत..
ना स्टोरीचे, ना डायरेक्शनचे, ना कॉश्च्यूमचे,
आणि कोणाच्या लक्षात आले आहे का विस च्या त्या जादुई कपाटात जेमतेम दोन तीन जोड कपडे होते... त्यामानाने बॅगेचे आकारमान केवढे मोठ्ठे वाटले
रुपालीचे केस मस्त आहेत!
रुपालीचे केस मस्त आहेत!
हॅरी पॉटर झगा, बिपाशा थ्रेड, सॉन्या फेस, श्रीमान जालींदरराव, हिंमतबाज प्रेक्षक ..........
सगळ्याच कमेंट्स लोल...!!
मेक ओव्हर केला ना तर रुपाली
मेक ओव्हर केला ना तर रुपाली इशाला कधीच मागे टाकेल. केस सुरेख चांगली फिगर व फीचर्स, शार्प बोलायची सवय. मंद पणा नाही. व कॉमन सेन्स आहे अधेड उमर की आदमीसे शादी न करनेका.
Pages