तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तो स्सर्र...स्सर्र वाला डायलॉग आणि त्याची चिडचिड तुफान जेन्युईन वाटली Lol
ईबाळ जेव्हा आवाज चढवून किंवा चिडून बोलते...जसे की 'तुम्ही कुठे होतात सर' तेव्हा अजून भयाण टोन होतो तिच्या आवाजाचा.

आजचे रानोमाळ लॉजिकः

कंपनीतून कामगार काढण्याचा निर्णय योग्य. पण ते न काढता आख्खे युनिट दुसर्‍या युनिट मधे मर्ज करणे हा त्यावर "तोडगा" (त्याबद्दल अभिनंदन. सरांच्या पाया पडणे वगैरे). पण कामगार युनियन, किंवा "लेबर कॉण्ट्रॅक्टर" ला ते मान्य नाही - कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न वगैरे.

त्याबद्दल रात्रभर फाइली चाळून मिळणारी माहिती = ०. त्यानंतर दोन मिनीटे सापशिडी खेळून मिळणारी माहिती =१००

आता पुढे लॉजिक घनदाट अरण्यात. तेथे कॉमन सेन्स चा सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही.
कंपनी कामगारांकरता काही अमाउन्ट "सॅन्क्शन करते". म्हणजे काय? माहीत नाही. पण ते मधेच कोणतरी खाते. कोण? लेबर कॉण्ट्रॅक्टर खातात का? कारण ते एकदम गप्प झाले. पण ही सगळी माहिती कंपनीच्या फाइल्स मधे असते? त्यात कंपनीतच कोणीतरी फ्रॉड आहे. तो आपल्याला सरप्राइज द्यायचे असल्याने तो विक्याचा शॉक सीन येइपर्यंत हे कामगार लोकही "चला आपण त्या फ्रॉड करणार्‍या व्यक्तीला भेटू" असे नाव न घेता बोलतात. आता लेबर कॉण्ट्रॅक्टर पैसे खातो तर हेड ऑफिस मधल्या फ्रॉड चा काय संबंध? आणि त्या मीटिंग ला मिहीर पासून ते परांजप्यांपर्यंत सर्वजण खाली मान घालून का उभे आहेत? मला तर वाटले विक्या आता विनोद खन्ना स्टाइल "एकाला प्रश्न तर दुसर्‍याला थप्पड" पद्धतीचे इण्टरोगेशन करतो की काय. पण मुळातच याबाबतीत लीगल हेड, अकाउण्ट हेड सकट अगदी त्या सपनापर्यंत सर्वांना खाली मान घालायचे काय कारण? सपना वगैरे लोकांना ही माहिती असण्याचे काही कारण आहे का? एकतर लेबर कॉण्ट्रॅक्टर ला पैसे दिले की पुढचे अकाउण्टिंग कंपनीत मुळात कशाला असेल?

आणि हे सर्वात केकवरचे क्रीमः
"आपण कामगारांना पैसे देतो तरीही प्रॉफिट का होत नाही?" - अगदी रास्त प्रश्न आहे. कारण प्रॉफिट हा कामगारांना दिल्या जाणार्‍या पैशांवर ठरतो. हे ईशा लॉजिक. इतर सर्व लॉजिकांना फिके पाडणारे.

विनोद खन्ना स्टाइल "एकाला प्रश्न तर दुसर्‍याला थप्पड" पद्धतीचे इण्टरोगेशन करतो की काय. >> तसेच वाटत होते. Happy

आज विकू आभार प्रदर्शन करत होता. ईशाच्या छोट्या डोक्यावर विश्वास ठेवला आणि तिने तो सार्थ केला असे काहीसे म्हणत होता.
मायला ईशाला का शिक्षा झाली नाही ह्याचा विचार करत असतांना विकूचा फोन येतो आणि तो तुझी आठवण आली असं सांगतो पण तिला हे कळत नाहीये की तो ईशाला शिक्षा करायला तिचा प्यादे म्हणून उपयोग करतोय.
दुसर्या दिवशी मायरा चक्क साडी नेसून विकूची वाट बघत असते.
ईआई आणि ईबाबा कर्जतला जायला निघतात तेव्हा बिपिन आणि रुपाली आम्ही पण तिकडेच निघालो असे सांगून टॅक्सी बुक करू पाहतात. ईबाबा आपण ट्रेनने लवकर पोहोचू असे जेव्हा म्हणतात तेव्हा ईआई "बोलले" असे न म्हणता चक्क "झाले ह्यांचे सुरू" म्हणाली.
साॅन्या ईशाला बोलावून चक्क तिचे कौतुक करते.
ईबाळाने केस कापलेले दिसताय.
ईआई आईसाहेबांना गावाकडचे पापड कुरडया देते.
आईसाहेब ईशाला ऑफिसमधे ईशाने चांगले काम केल्याबद्दल राजनंदिनीचा तनमणी भेट देतात.
पुढे जाऊन मायराला आणि ईशाला विकूचा डाव कळल्यावर त्या त्यालाच शिक्षा देतील.

फारेण्ड, भगवती, धमाल प्रतिसाद....
आपल्या भाषेला "लॉजिक रानोमाळ" हा नवीन शब्द मिळाल्याबद्दल फारेण्ड यांचे मनापासून आभार..
आता कुठेही काहीही तर्कविसंगत दिसले की हाच शब्द वापरला जातो...
कालचा मिसलेला एपी आज रिपीट पाहताना लॉजिक न शोधता मजा घेत बघता येईल
Happy Happy Happy :स्मित

त्यात सतत पोळीचा लाडू खायला घालून, सतत पकावू बडबड ऐकवून, सतत स्सर..स्सर...स्सर करून त्यांनी विसचे डोके फिरविले आहे. >>> Lol

इशाचा झगा पाहीला का? जरा हुकलीये का असं वाटलं.>>> जरा का म्हणून संपूर्ण म्हणा...
तात्पुरता मैत्रिणीचा (अनफिट) आणलेला वाटला....
नायिकेचा कपडे पट सुद्धा कथानका प्रमाणेच गंडलाय
Uhoh Uhoh

ह्या विक्याला हेडबाईंना नंदिनी दाखवायच आहे ना,म्हणून हे सगळ चालू आहे ना ,मग आता प्रामोवरूनतरी आईसाहेब गळाला लागत आहेत तर आता हा कशाला माती खात आहे,ब्ँग घेऊन कुठे जात आहे.
केड्या, हा छळ थांबव आता.

कोणी नोटिस केलंय का झी च्या तुपारेच्या प्रोमोज मध्ये शेवटी ती बाई म्हणते रात्री ‘साढ़े आठ’ वाजता.

निमकरांकडे ती एकच गिफ्ट बॅग आहे वाटतं. पैसे पण त्याच बॅगेत आणले होते.
कोणी पापड कुरडया अशा बॅगेत देईल का? रिकामीच वाटत होती तशीही. Proud
ईबाळाचा झगा महाविनोदी

अरे कुणीतरी त्या ईआईला सांगा रे... कधीतरी स्वतःच्या हाताने काहीतरी बनवून विकूच्या घरी पाठव ना गं बाई...
फॉर अ चेंज पो ला ऐवजी गावाकडचे पा आणि कु दिल्या..
बिपीन, रुपालीचे अनुकरण करून किमान एक मिठाईचा पुडा तरी आणायचा ना...
ही पुष्पा पुढे नक्की पो ला सारखे पदार्थ खायला घालून जावयाचा सूड घेईल
पोळीच्या लाडवाच्या धास्तीने जावई बापू चायनीज खायला पळाले
Lol Lol Lol Lol

तो बिपीन आधी सारखं काहीतरी एकच वाक्य म्हणायचा ना? बाबांना विचारू का असं काहीतरी? आणि खूप शामळू वागायचा. आता बराच नॉर्मल वाटतो.

काय झालयं तरी काय विकूला? ईशा इतक्या वेळा त्याला घरी कधी येणार हे विचारायला फोन करत होती आणि हा मायराबरोबर डिनरला जायचा प्लान करतोय. मायराला माहीत आहे ना की ईशा घरी आहे तर ती कर्जतवरून इतक्या लांब ते ही मायरामॅम बरोबर कशाला जेवायला येईल?
ईशा, रूपाली आणि बिपिनला घर दाखवताना पायघोळ झग्यात अडखळत चालताना वाटत होती.
ईशाचा मोठ्ठा बंगला पाहून बिपिन, रूपाली खरंच हरखून गेले होते. त्या तिघांनी खरच खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या.
ईशा त्या दोघांना सांगते की मी दोन वेळ नशीबवान ठरले एकदा विक्रांतसर मिळाले आणि दुसर्यांदा तुमच्यासारखे मित्र मिळाले. अगदी तसेच ईआई पण आईसाहेबांना म्हणते की आम्ही दोनदा नशीबवान ठरलो एकदा विक्रांतसर जावई म्हणून मिळाले आणि दुसर्यांदा तुमच्यासारख सासर मिळाले तेव्हा..... आतासुद्धा त्या बंगल्याच्या खिडकीतून उंच इमारतीचे वरचे मजले दिसत होते.
विकू मायराला तुझे ऑफिसमधले वजन कमी होऊ देऊ नकोस असे सांगून ईशाचे जास्त चालणारे डोके मायरामुळे खर्ची ह्वावे ह्याची सोय करू पाहतो.

इशाचा झगा पाहीला का? जरा हुकलीये का असं वाटलं.>>> जरा का म्हणून संपूर्ण म्हणा...>>. झगा बघण्यासाठी मालिका बघावी लागली. Happy

बेडरुम बघून झाल्यावर हि दुसरी रुम तुमची स्पेशल रोमँटीक रूम आहे का? असे काहिसे रुपालीने विचारले Proud

पाहिला तो झगा. मुळात घरच्या डे टाइम कॅजुअल फॅमिली गेट टुगेदरला काळा ड्रेस तोही फॉर्मल? कशाला? बिचारे मराठी लेखक दिग्दर्शक . ती
अ‍ॅडॅम्स फॅमिली मधील आई सारखी दिसत आहे. वर त्या इंग्रजी ड्रेसावर मंगळ सुत्र व तन्म णी पण? राजनंदिने साडीच नेसायची ना?! नववधू दिसेल तरी.

एपिसोड १७९ मध्ये मायरा साडी नेसून एकदम छान दिसत होती. प्रसन्न वाटले तिला बघून. शी कॅण रिअली कॅरी ब्लू आय लायनर. व निळे नेलपेंट एकदम जास्ती आहे पण ते बरेच दिवस आहे. साडी, ब्लाउज व कानातले, सॉफ्ट मेक अप व लाइट लिप स्टिक सुरेख आहे.

हे लोक मुंबई कर्जत अर्ध्या तासात जातात का? तू आधी पुढे हो व मी नंतर येतो करायला? किती श्रीमंत आहेत. इतके पेट्रोल रोज वाया घालवतात?

इशाचे सरंजामी थाटाचे यडचाप कपडे पाहीले की पहिली दुपटी बरी होती असं वाटतं. किमान मापात तरी होती.

विक्या अन् मायरा केमीस्ट्री कुछ जम्या नाय. इशाबरोबर छान वाटायची.

बेडरुम बघून झाल्यावर हि दुसरी रुम तुमची स्पेशल रोमँटीक रूम आहे का? असे काहिसे रुपालीने विचारले >>अगदी अगदी. रुपालीनं नवराबायकोसंबंधीच्या तिच्या कल्पनांबाबत काही मूलभूत गोष्टींसाठी योग्य व्यक्तीकडून (इषा नाही) शंकानिरसन करून घ्यावं.

मला वाटलं होतं रुपाली आता आम्हला त्या खोलित घेऊन चल म्हणते की काय, पण हा पर्दाफाश - केड्याचं अजुन ठरलेलं नसल्याने - एवढ्यात होणार नाही.

लोकहो ते रानोमाळ चे क्रेडिट पुलंना द्या. त्यांच्या एका लेखात (बहुधा "खुर्च्या - एक न नाट्य") मधे एक वाक्य आहे - "कर्ता कर्म क्रियापद रानोमाळ हरवले आहे" असे काहीतरी. तेथून ते सुचले.

काय रटाळ भाग झालेत गेले १-२. ते ईशा एकदम हॅरी पॉटर मधल्या एखाद्या कॅरेक्टरसारखी तो काळा ड्रेस घालून आली. मला वाटले एखादी कांडी फिरवून जादू बिदू करते की काय. मायराचे काम चांगले होते पण आजच्या भागात.

यांच्या कर्जतच्या घराच्या बाजूला २५-३० मजली इमारती दिसल्या आज. अचानक डेव्हलपमेण्ट झालेली दिसते. ते दोन कुत्रेही सध्या किमान उल्लेखापुरते आलेत.

सपनाच्या जागी एक बदली सपना आली होती तीही गायब होउन मूळ सपना परत आलेली दिसते.

इशाचे सरंजामी थाटाचे यडचाप कपडे पाहीले की पहिली दुपटी बरी होती असं वाटतं. किमान मापात तरी होती.>>>> Rofl

कालचा ईशाचा तो ड्रेस बघुन बराच वेळ मला तिचे हात कुठे गेलेत ते कळेना. Uhoh कारण हाताकडे डिझाईन होते. त्यावर छोटेसे गळ्यालगतचे मंगळसुत्र आणी लांबडा हार खूप विसंगत दिसत होते.

कालच्या ड्रेसमध्ये इशा जेवढी झंगड दिसत होती, तेवढीच मायरा मात्र सुरेख आणि नाजूक दिसत होती. साडी, रंग, मेकअप, ज्वेलरी, सगळंच जस्ट पर्फेक्ट. विसला काल चुकीच्या चॉईसची नक्कीच हळहळ वाटली असेल Proud

मायरा मात्र सुरेख आणि नाजूक दिसत होती. साडी, रंग, मेकअप, ज्वेलरी, सगळंच जस्ट पर्फेक्ट+११११
तेव्हढाच एक सीन पाहिला

Pages