एक धागा किश्श्यांचा

Submitted by अरूण on 17 April, 2009 - 00:48

आपल्या पैकी बरेच जण गप्पा मारताना असंख्य किस्से सांगतात. पण ते बहुदा वाहून जाणार्‍या पानावर असल्यामुळे सगळ्यांनाच याचा आनंद घेता येत नाही. म्हणून हा धागा सुरु करत आहे.

तरी आपण सर्वांनी आपापले किस्से इथे लिहावेत, म्हणजे सगळ्यांना ते वाचता येतील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी मुलगी तीन वर्शाची असताना डे केअर मधे हा किस्सा घड्ला.
त्यांच्या वर्गात एक पेट Hamster ची जोडी होती. एक दिवस त्यातली ब्रिटनी "अचानक" व्यायली आणि तिला बाळ झाली. (आता हे सगळ मुलांच्या समोर नको होतं व्हायला पण झाल) ती बाळ still born होती.
दुसर्या दिवशी सगळ्या मुलांना घेउन teacher nee funeral केलं. बाळं गेली heaven ला. हे मझ्या लेकीचं
first encounter with death असल्यानी, सन्द्याकाली घरी अल्यावर तिनी खाता खाता casually विचारलं
"मम्मा तू कधी मरणारेस?"
दुसर्या दिवशी शाळेत ती ब्रिटनी पण मेली. झालं, परत वरात काढुन मागच्या ग्राउन्डवर funeral. ब्रिटनी गेली heaven ला. लेक सन्ध्याकाळी शान्तपणे सन्गितली.
We all cried..... Loudly... Principal had to came.
तिसर्या दीवशी मात्र शालेतून आल्यावर म्हणे.
"they told us about this guy mumma, he was a really nice guy but somebody shot him dead."
मला गरगरलच य डेड पुराणानी.म्हण्लं शाळेत काय चाल्लय काय, तेवढ्यात मोठी म्हाणाली, Martin Luther King? it was MLK birthday.
तर धाकटी म्हणे " Yaa thats that guy, he was really really nice guy but somebody shot him. Now he is in heaven, with Brintani and babies, behind our school"

माझ्या डोळ्या समोर tombstne अलेला "Brintani, babies & Martin Luther King RIP"
पुढे कित्येक दिवस तिला हेवन तिच्या शालेमागे जमिनीत आहे याची पक्की खात्री होती.

१९९२ ची हि घट्ना आहे आमचे यवतमाळ येथे वार्शिक अधिवेशन होते दिवसभरचे कामकाज झाल्यानन्तर करमंणूकिचा कार्यक्रम होता.राजा badhe हे कवी आमच्या मनोरन्जनार्थ खुप सुन्दर सुन्दर कवीता सादर करित होते त्यानि म्हट्लेली एक कवीता " रन्गू बाजाराला जाते अन सन्गे शेजार्याला नेते " सर्वाना इतकी आवडली कि सर्वानि त्याना " once more " दिला श्रोत्यान्च्या आग्रहास्तव त्यानि कवीता पुन्हा म्हटली.पुन्हा एकदा " once
more" मिळाला त्यानि एक किस्सा सान्गितला ते म्हणाले ," मी एका कार्यक्रमात श्रोत्यान्च्या आग्रहास्तव हिन्दी गाणे म्हटले. मला वाट्ते ते किशोरकुमार यान्चे गाणे होते .असाच चारदा " once more " मिळाल्यानन्तर मी श्रोत्याना विचारले " तुम्हाला खरच माझ गाण इतक आवड्ले ? नाही , तुम्ही चार वेळा " once more " दिला म्हणुन विचारतो ! ! " तेव्हा एक जण म्हणाला," आवडले वगेरे काही नाही, तुम्ही ते किशोर कुमारच्या आवाजा सारखे जो पर्यन्त म्हणत नाही , तोपावेतो आम्ही " once more" देतच रहाणार " कवी म्हणाले " मी कपाळावर हात मारुन घेतला.

अजून एक किस्सा आठवला -
इंजिनीअरींगच्या दुसर्‍या सेमिस्टरला आमच्या बॅचच्या काही मुला-मुलींनी फायलींगचा जॉब (१ सेमी जाड आणि ५ सेमी बाजूचा लोखंडी चौरस कापून / कानसून त्याच्यापासून स्वस्तिक बनवायचे) बाहेरून किंवा दुसरीकडून बनवून आणला, अशी चुगली कोणीतरी केली. म्हणून बॅचच्या सगळ्या क्लास सेक्रेटरींना प्रिंसिपलांनी केबीनमध्ये बोलावले. तिथे लेक्चर देऊन झाल्यावर मग ते जरा प्रेमळ सुरात आम्हाला समजावू लागले. आणि अचानक एका मुलीला त्यांनी विचारले, की तुला पुरणपोळी करायला येते का? Lol

ती भैया असल्याने तिला पुरणपोळी माहीत नव्हती. म्हणून तिला पुरण कणकेत घालण्याची अ‍ॅक्शन करून ती काय असते हे समजावू लागले होते.. Rofl ... Rofl त्यांची ती अ‍ॅक्शन आठवल्यावर अजूनही हहपुवा होते.

किस्सा आहे माझ्या मित्राचा.
त्यावेळी आम्ही इंटर्नशिपला होतो. माझ्या या मित्राला देहूगांव पी.एच.सी मिळाली होती. एकदा नाईट ड्युटीला असतांना दोन गावकरी आले. अत्यंत गंभीर मुद्रा. याला विचारले- तुमच्याकडे सर्पदंशाची लस आहे का?
हा ड्युटीवर एकटा, सिनीअर डॉक्टर पुण्याला गेलेले. याआधी सर्पदंशाची केस हँडल केलेली नव्हती. त्यामुळे जरा घाबरला. पण म्हणाला- हो, आहे. कोणाला चावलाय साप? पेशंट कसा आहे, येऊ शकतो का इथे?
गावकरी म्हणाला, हो आणलाय सोबत. दुसरा गावकरी बाहेर गेला. परत आला तेव्हा त्याच्या एका हातात पिशवी, त्यात मेलेला साप. दुसर्‍या हातात एक पट्टा- एका कुत्र्याचा.
"हा साप या कुत्र्याला चावला आहे." तो शांतपणे म्हणाला.

सगळे समजावून घ्यायला मित्राला दोनेक मिनिटे लागली. आणि वीसेक मिनिटे त्या गावकर्‍यांना समजवायला, की हा माणसांचा दवाखाना आहे.
सुदैवाने गावात पशुवैद्यकीय अधिकारीही होता. त्याच्याकडे केस रेफर करण्यात आली. Happy

दोन आठवड्यांपूर्वी कॉलेजमधील सहाध्यायी अचानक योग जुळून आल्यासारखे एकत्र भेटलो. आठ-दहा जण जमले होते आणि न आलेल्यांची नेहमीप्रमाणे मुक्तकंठाने स्तुती करणे (!!) चालू होते. एवढ्यात कोणाला तरी कॉलेजातल्या पर्‍याची आठवण आली. पर्‍या आमच्याबरोबरही होता शिकायला, तो आमच्या आधीही होता आणि नंतरही होता म्हणे! त्याने पदवी शिक्षण पूर्ण केले नाही ते नाहीच शेवटी! पण अतिशय खुशमिजाज, हसतमुख माणूस! सारखा कायतरी जोक करणार आणि स्वतःच हसणार! तर पर्‍याची आठवण झाल्यावर ताबडतोब एकाने पर्‍याला फोन लावला. पर्‍या तेव्हा औंधमध्ये होता. आम्ही सगळे तिथून जवळच होतो. मग पर्‍याला लगोलग यायचा निरोप त्याच्यावर नेहमीप्रमाणे स्तुतीसुमने उधळत (!) देण्यात आला.
अर्ध्या तासाने पर्‍या आला. येऊन 'काय कसंकाय' करत एका खुर्चीवर स्थानापन्न झाला. सर्वांनी त्याच्याकडे पाहिले आणि हास्याचा एकच फवारा उसळला! घाईघाईत टी-शर्ट उलटा घालून आला होता बिचारा!

टी-शर्ट ठाकठीक करून आल्यावर पर्‍याने आमच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच्या शैक्षणिक सहलीची आठवण काढली! त्याचबरोबर आग्र्याला ताजजवळ पाहिलेल्या सश्यांची! ''ससे'' म्हटल्यावर उपस्थितांमधील १-२ मुली आणि बाकीची मुलं जी फिदीफिदी हसू लागली की बस्स! उर्वरित अबोध जनतेला काही उलगडा होईना! तेव्हा पर्‍याने उकलून सांगितले, ''आग्र्याला आपली बस सकाळी सकाळी पोचली तेव्हा खिडकीतून मला रस्त्याच्या कडेला टमरेल घेऊन बसलेले लोक दिसू लागले. मला जरा इतरांची गंमत करायची हुक्की आली. आणि मग मी जोरात ओरडलो - 'अर्रे, ससाऽऽ... केवढे ससे बसलेत इथं...' हे ऐकल्यावर बसमधल्या माझ्या आजूबाजूला बसलेल्या तमाम पोरींनी माझ्याभोवती एकच कोंडाळं केलं... 'कुठाय ससा? काय रे ए पर्‍या, दाखव की कुठाय ससा!' आणि मी रस्त्याच्या कडेला बसलेल्या लोकांकडे बोट दाखवलं... 'तो बघ ससा.... हा आणखी एक दिसला बघ... बाबो! केवढे ससे!!' सगळ्या पोरी 'ईईईई' करत खिडकीपासून बाजूला झाल्या. तेव्हापासून आम्ही सर्वजण रस्त्याच्या कडेला कोणी बसलेलं दिसलं की 'ससाऽऽ' म्हणून हसतो!''

या किश्शानंतर पर्‍याला (पुन्हा एकदा) पोरींनी बदड बदड बदडून काढले हे वेगळे सांगायला नकोच!

माझा पण एक किस्सा
ग्रॅजुएशन पूर्ण झाल्यावर मी सुगम संगीत शिकत होते. शास्त्रीय संगीताच्या ३ परिक्षा देउन झाल्यावर माझ्या गुरुंनी त्यांच्या प्राकृतिक अस्वास्थ्यामुळे क्लासेस बंद केले आणि बाकी शिक्षकांच्या शिकवण्याची पद्धत न आवडल्याने मी शास्त्रीय संगीत शिकायचे बंद करुन सुगम संगीत शिकायला सुरुवात केली.

कल्याणमध्ये श्री. मंदार सोमण यांच्या "सामवेद" क्लासेसचे वर्षातुन दोन मोठे कार्यक्रम होत असत क्लासमधील विद्यार्थ्यांना स्टेज मिळाण्याच्या हेतुने १. दिवाळी पहाट आणि २. गुरुपौर्णिमा. यातल्या दिवाळी पहाटचा हा किस्सा.

एका वर्षी दिवाळी पहाटचा कार्यक्रम झाल्यावर मी आणि माझी मैत्रिण स्टेजवरुन खाली येउन बाहरे निघालो ओळखीची लोक भेटत होती, गप्पा, कौतुक सगळ चालु होत. तेव्हढ्यात शाळेत माझ्या वर्गात असलेली एक मुलगी माझ्या समोर आली आणि काही कळायच्या आत मला मिठी मारुन माझ्या गाण्याची, आवाजची तोंड फाटेस्तोवर स्तुती सुरु केली. त्यामधली काही वाक्य "मुग्धा तुझा आवाज कित्ती छान आहे, खूप गोड आहे." वगैरे वगैरे. मला काही कळेचना ही अशी का बडबडतेय.. शाळेतली जवळ जवळ १० वर्ष आम्ही एकत्र होतो, शाळेच्या प्रत्येक प्रोग्रॅममध्ये मी गात होते, सगळ्या शाळेला माझा आवाज चांगला असल्याच माहित असताना हिला आज साक्षात्कार झाल्यासारखी स्तुती चालु होती....१० वर्षात एकदाही ही साध बोलली पण नव्हती माझ्याशी.... यासाठी एकदा ४४०व्होल्टचा शॉक बसला आणि दुसरा तर इतका जबरा होता की मी पडायचीच शिल्लक होते..... एक तर तिचा नुसत बोलतानाचा आवाज खूप मोठा होता, म्हणजे शेवटच्या बेंचवर बसुन बोलली तर पहिल्या बेंचवरच्यांना सहज ऐकु जायच..... अशी ती सगळी स्तुती संपल्यावर मला म्हणाली


मी पण गाण शिकते आहे सरांकडे
Uhoh

मुद्दमहुन हा धागा वर आणत आहे.
"धागेरिया" झालेल्या रुग्णांनी विनासंकोच लाभ घ्यावा.
म्हणजे भारंभार नविन धागे पडणार नाहीत.

ते लिहिणा-याच्या बौद्धीक आकलन, सामाजीक बॅकग्राऊंड, संस्कार, नम्रता आणि गेलेली केस नसणे यावर ठरेल.

<<<हा किस्सा मी या आधी लिहिलाय का? आठवत नाही पण तरी लिहिते. माझ्या भावाने समक्ष बघितलेला.

शिमग्यातून कोकणात नाटके होत असतात. असंच एका छोट्याशा गावातलं हौशी कलाकाराचं नाटक होतं. विषय होता रामायणाचा. . नाटक हौशी असलं तरी लायटिंग्/साऊंड/ स्टेज साठी खास मुंबईतून माणसे आणलेली होती. सीतेचा भूमीप्रवेश होतो तो सीन चालू होता. इथे स्टेजमधे एक मॅनहोलसारखं केलं होतं. एक खटका दाबला की सीता भूमीमधे. Happy

नाटकामधे सर्व डायलॉग बोलून झाले. सीता अगदी हात जोडून "हे धरणीमाते, मला तुझ्या उदरात पुन्हा आश्रय दे" म्हणाली. कडाकडा विजांचे आवाज, भकाभक लाईट पाजळून झाले. स्टेजवाल्या माणसाने बरोबर त्याच्या क्लूला खटका दाबला आणि.....

राम भूमीत गडप्प.. Happy सीता आणी राम यांच्या उभे राहायच्या जागेत काहीतरी घोळ झाला होता. स्टेजवरचे तर सर्व अवाक झालेच. प्रेक्षकामधे हसायला पण लागले. पण सीतेच्या पात्राचे प्रसंगावधान बघा. त्याच्या तोंडून डायलॉग "देवा, कधीतरी तुझ्या दरबारामधे न्याय आहे रे बाबा" Happy

याच वाक्याबरोबर नाटकावर पडदा टाकण्यात आला.

Submitted by नंदिनी on 18 November, 2011 - 15:40 >>> Rofl

अफाट किस्सा आहे हा

गेम ऑफ थ्रोन्सचा जबरदस्त चस्का लागला आहे मला. काल मॅनेजरने बुट्टी मारल्याने ऑफिसमध्येच दुसऱ्या सिझनचे ४ भाग संपवले. मध्येच एच आरचा फोन आला. तिने ॲडमिनकडून मेल आला का विचारले. "आय हॅवन्ट रिसिव्ह्ड इट यट माय लेडी" माझे अदबशीर उत्तर. Proud

सेम पिंच....
या विकेंडला मी ७वा सिजन संपवला.

दरम्यान, मी ग्रुप सीईओ पुढे शॉपफ्लोअर ला प्रेजेंटेशन देताना माय लॉर्ड बोललो होतो Lol

काल मॅनेजरने बुट्टी मारल्याने ऑफिसमध्येच दुसऱ्या सिझनचे ४ भाग संपवले
>>> कोणता ऑफिस आहे हे.. माझा रिसुम फॉरवर्ड कराल का ☺️

मला तंद्री लागायची खूप वाईट सवय आहे, त्याचे खूप सारे किस्से आहेत, अगदी हायवेदेखील इकडे तिकडे न बघता स्वतःच्याच तंद्रीत पार करून गेलीये. अगदी आजचेच सांगायचे तर आज सकाळी ट्रेन थोडया लेट होत्या अन त्यापेक्षा मी, सो मागची ट्रेन पकडली. चालू ट्रेन पकडायची सवय असल्याने विंडो सीट मिळाली, अन एकटी असल्याने लागली तंद्री, मी आपल्याच विचारात अशी काय गुंग होते की चांगले चार स्टेशन पुढे गेली Angry
अन्नोउन्समेंट सुदधा ऐकू येत होती, तरी उतरायचे काही सुचले नाही

>>>>वीबी तुम्हाला विसराळु पणाचा आजार असु शकतो अस मला वाटत.>>>>> कशावरुन? एका किश्श्यावरुन??? _ /\_

सामो Lol

माझही व्हायचं अस.. सकाळची शाळा असताना कितीतरी वेळा बसमधे झोप लागायची आणि 4-5 बसस्टॉपनंतर कळायच..

Pages