एक धागा किश्श्यांचा

Submitted by अरूण on 17 April, 2009 - 00:48

आपल्या पैकी बरेच जण गप्पा मारताना असंख्य किस्से सांगतात. पण ते बहुदा वाहून जाणार्‍या पानावर असल्यामुळे सगळ्यांनाच याचा आनंद घेता येत नाही. म्हणून हा धागा सुरु करत आहे.

तरी आपण सर्वांनी आपापले किस्से इथे लिहावेत, म्हणजे सगळ्यांना ते वाचता येतील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरीच नातेवाईक / मित्र मंडळी एकत्र जमली आणि विविध विषयांवर एकाच वेळी गप्पा चालू असल्या की बर्‍याचदा 'क्रॉस कनेक्शन्स' लागतात, संदर्भ चुकतात आणि अभावितपणे अशक्य विनोदनिर्मिती होते! या दिवाळीत त्याचा पुरेपूर अनुभव घेतला.

आम्ही सर्व चुलत भावंडे व त्यांचे परिवार एकत्र जमलो होतो. लंबवर्तुळाकारात खुर्च्या, सोफे इत्यादी मांडले होते. काहीजण खाली भारतीय बैठकीवर बसलेले. खादाडी, गप्पा, हशाला ऊत आला होता. काही जोक झाला की इतके हसणे होत होते की बस! तर एका ग्रूपमध्ये पूर्वी आपण किती व कसे फटाके उडवायचो, पण आता उडवत नाही अशी चर्चा चालू होती. दुसर्‍या ग्रूपमध्ये फराळाच्या चकल्या कोणाकडे किती केल्या / मागवल्या, किती खाल्ल्या - खपल्या व आता पुन्हा किती ऑर्डर कराव्या लागतील इत्यादी चर्चा चालू होती. तिसर्‍या ग्रूपमध्ये एक जपानी गेस्ट होत्या त्यांच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न चालू होता. माझ्यासारखे काहीजण एकदा या ग्रूपमध्ये, एकदा त्या ग्रूपमध्ये असा चर्चा सहभाग घेत होते.

अचानक समोरच्या बाजूला बसलेल्या एका बहिणीने मला विचारले, ''तुझी टिकली छान आहे गं! तुळशीबाग का?''

मी तिला जुन्या पर्समध्ये सापडलेल्या टिकली पाकिटाविषयी सांगत होते... म्हणत होते, त्या पाकिटातली टिकली आहे ही... तिचा गोंद एवढ्या काळानंतरही शाबूत राहिलेला दिसतोय वगैरे....

तर माझ्या वाक्यातील 'टिकली' एवढाच शब्द शेजारी बसलेल्या लहान मेव्हण्याने ऐकला. तो लगेच ''हो, हो, टिकली काय मस्त फुटते... नुसती देखील फोडता येते'' असे बोलू लागला. त्यांचा अगोदर चाललेला फटाक्यांच्या चर्चेचा भाग मी ऐकला नव्हता. त्यामुळे त्याचे बोलणे ऐकून मी चपापून 'आँ' करत कपाळाची टिकली चाचपली. माझा 'आँ'कार त्याला प्रश्नार्थक वाटला, त्यामुळे तो सरसावून, ''अगं, ती टिकली छानपैकी दगडाला बांधायची आणि तो दगड खाली टाकायचा जोरात... काय मस्त फुटते टिकली...'' असे सांगू लागला....
''काय, जुनी टिकली फु ट ते??'' माझा 'काय पण सांगू नकोस' वाला स्वर....
''अगं हो, जुनं पाकिट असलं टिकलीचं तरी चालतं.... मस्त फुटते टिकली...'' इति मेव्हणा.
क्षणभर माझ्या डोळ्यांसमोर कपाळाची टिकली दगडाला बांधून कोणीतरी फोडतंय असं दृश्य यायला लागलं. चुकून माझं कपाळ कुठं आपटलं तर....!!!!! टिकलीसोबत कपाळमोक्ष????!! कै च्या कै.... असा विचार येतोय तोवर माझ्या पलीकडे बसलेल्या एका भावाने आमच्या बोलण्यातला शेवटचा भाग ऐकला आणि लगेच, ''हो, हो, अगदी बरोबर आहे.... मी केलंय हे याआधी,'' असे बोलू लागला. मी दोघांकडेही सर्द होऊन बघतच बसले.... मग काही क्षणांनी ट्यूब पेटली!!! Light 1 लख्ख प्रकाश पडला की आम्ही वेगवेगळ्या टिकल्यांविषयी बोलत आहोत! मग काय.... हसायला आणखी एक निमित्त! Happy

मंगलोरमधे कुलसेकर नावाचा एक एरिया आहे. तिथे जाताना नवरा रिक्षेवाल्याला म्हणे
"सूतशेखर जायंगे?"

रिक्षावाला हा हाडाचा रिक्षेवाला असल्याने "नाही" म्हणालाच. Happy

हा किस्सा मी या आधी लिहिलाय का? आठवत नाही पण तरी लिहिते. माझ्या भावाने समक्ष बघितलेला.

शिमग्यातून कोकणात नाटके होत असतात. असंच एका छोट्याशा गावातलं हौशी कलाकाराचं नाटक होतं. विषय होता रामायणाचा. . नाटक हौशी असलं तरी लायटिंग्/साऊंड/ स्टेज साठी खास मुंबईतून माणसे आणलेली होती. सीतेचा भूमीप्रवेश होतो तो सीन चालू होता. इथे स्टेजमधे एक मॅनहोलसारखं केलं होतं. एक खटका दाबला की सीता भूमीमधे. Happy

नाटकामधे सर्व डायलॉग बोलून झाले. सीता अगदी हात जोडून "हे धरणीमाते, मला तुझ्या उदरात पुन्हा आश्रय दे" म्हणाली. कडाकडा विजांचे आवाज, भकाभक लाईट पाजळून झाले. स्टेजवाल्या माणसाने बरोबर त्याच्या क्लूला खटका दाबला आणि.....

राम भूमीत गडप्प.. Happy सीता आणी राम यांच्या उभे राहायच्या जागेत काहीतरी घोळ झाला होता. स्टेजवरचे तर सर्व अवाक झालेच. प्रेक्षकामधे हसायला पण लागले. पण सीतेच्या पात्राचे प्रसंगावधान बघा. त्याच्या तोंडून डायलॉग "देवा, कधीतरी तुझ्या दरबारामधे न्याय आहे रे बाबा" Happy

याच वाक्याबरोबर नाटकावर पडदा टाकण्यात आला.

lol

"देवा, कधीतरी तुझ्या दरबारामधे न्याय आहे रे बाबा" >>> Lol त्या सीतेला माझे दंडवत Happy

श्री, मी लिहिलेल्या किस्स्यामधे तुम्हाला काय थाप वाटली? हौशी नाटकामधे असे प्रसंग घडतच असतात.

आमचं लग्न म्हणजे महाराष्ट्र आणि आंध्र असा संगम.. पुण्यात शिक्षण झाल्याने अहोंना गरजेपुरते मराठी येते.. काही वाक्य शब्द कळायला खुप वेळ लागतो.
लग्नानंतर प्रथमच यांना घेऊन माहेरी गेले होते, माझ्या चुलत भावाने पाहुणचारास बोलविले, खाणे पिणे आटोपल्यावर वहीनीने मानपानासाठी पाटावर दोघांना बसायला सांगितले, माझी ओटी भरून यांना हातात पैसे व नारळ देत वहीनीने म्हटले, "टीशर्ट घ्या"..
आमच्या ह्यांनी घातलेला टीशर्ट ओटी घेतो त्याप्रमाणे लांब केला, वहीनीला काहीच समजेना, ती गोंधळून बघू लागली..
मला हसू आवरता आवरेना, मग यांना सांगितले तुम्हाला टीशर्ट घालायला आवडतात म्हणून त्या म्हणाल्या की टीशर्ट घ्या..
असे खुप किस्से आहेत, शेअर करेनच..

नंदिनी Rofl भारी किस्सा आहे! माझ्या डोळ्यांसमोर तो प्रसंग उभा राहिला.

श्री, कोकणात एक 'खेळे' नावाचा हौशी नाटकाचा प्रकार असतो, त्याबद्दल कधी काही ऐकलं आहे की नाही? तिथे असे प्रसंग घडणं सहज शक्य आहे. Happy

सारीका Lol

नंदिनी, माफ करा, पण हा सीता व रामाचा विनोद मी इयत्ता दुसरीत असताना (हे उपरोधिक नसून खरच सांगतोय) ऐकला होता. आपण तो प्रत्यक्ष पाहिला असालच, पण हा असाच जोक पुर्वी ऐकवला जायचा हे मात्र खरं आहे. अर्थातच, यात आपण थाप मारलीत असे निदान मी तरी म्हणणार नाही. Happy

बेफिकीर Rofl
अगदी असेच लिहायला आलो होतो पण म्हटले मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? Proud

काहीही म्हणजे अगदी काहीही खपवणे चालू आहे इथे.

नंदिनी , सगळे किस्से पहिल्यापानापासुन वाचले तर म्हणजे मी का तसं म्हणतोय ते कळेल. बायदवे तुझ्या किश्श्यासाठी नव्हती ती पोस्ट गैरसमज नसावा .

मी हा किस्सा बहुतेक जुन्या मायबोलीत लिहिला होता, असं मलाच आधीपासून वाटतय Happy .

माझ्या भावाने हा किस्सा कोळथरे गावच्या नाटकात पाहिला होता. साधारण चार ते पाच वर्षापूर्वी. (तेव्हा बेफिकिर इयत्ता दुसरीत शिकत असतील तर माहित नाही!!!!) तेव्हा हा किस्सा खूप गाजला होता, लोकल न्युजपेपरमधे बातमीदेखील आलेली होती. कुणाला हवेच असल्यास मी रत्नागिरीला जातेय तेव्हा न्युज क्लिपिंग शोधून मिळते का बघेन. Light 1

अर्थात याच्या आधी अशा प्रकारचा किस्सा कधी घडलाच नव्हता असे बिल्कुल म्हणणे नाही. असूही शकतेच की. कोकणात दशावतार, खेळे या नाट्यप्रकारांचे इतके प्रस्थ आहे की दरवर्षी शिमग्याला/गणपतीला प्रत्येक गावातून वाडीतून नाटकं होत असतात. त्यामधे असेच भन्नाट किस्से घडतच असतात. संतोष पवारांची यदाकदाचित सारखी व्यावसायिक नाटकं अशामधूनच आलेली आहेत. बर्‍याचदा डायलॉग उत्स्फूर्त असल्याने ते जाम विनोदी असतात.

असो. ज्याना थाप वाटते त्याना वाटो. मी काय इथे लोकाचे मतपरिवर्तन करायला बसलेली नाही. Happy

गेल्या आठवड्यात आमच्याकडे रात्री घरातील चिल्ल्यापिल्ल्यांच्या दात घासण्याच्या कुरकुरीवर काहीतरी गप्पा चालल्या होत्या तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलेला हा किस्सा :

वर्ष होते साधारण इ. स. १९७८-७९. कोल्हापुराजवळचे एक छोटेसे गाव. तेथील एका सधन शेतकर्‍याच्या जमिनीचा सर्व्हे करायला माझे वडील त्या गावी गेले होते. रात्री त्या शेतकर्‍याच्या घरीच मुक्काम करायला लागला. चांगले सात-आठ माणसांचे ते कुटुंब होते. ऐसपैस घर. थोडेफार रिनोव्हेट केलेले. माणसेही अघळपघळ. 'सायेब शहरातून आल्याती' म्हणून त्यांना खूप कौतुक आणि 'आपल्या जमिनीचं' काम करायला आल्याती म्हणून जास्तच कौतुक. अगदी भोळी माणसं. धावून धावून वडिलांना काय हवे-नको बघत होती. त्यांच्या भारावलेल्या आदरातिथ्याने माझ्या वडिलांना जास्तच संकोचायला होत होते.
दुसर्‍या दिवशी सकाळी वडील उठले तशी शेतकरीदादा मुखमार्जनासाठी गरम पाणी घेऊन आले.
''अहो, कशाला...'' माझे वडील.
''र्‍हाऊ द्या... आसं करा, तोंड धुऊनच घ्या, कारभारीण च्या बनवून आणंल तंवर आवरून घ्या तुमचं. कसं? बाथरुमात समदी तय्यारी करून ठ्येवली हाय.''
''बरं, बरं...'' म्हणून वडिलांनी बॅगेतून टॉवेल, टूथब्रश, टूथपेस्ट इत्यादी सामान काढले.
''आवो सायेब, याची काय गरज न्हाय,'' शेतकरीदादा उद्गारले, ''त्ये बाथरुमात ठ्येवलंय समदं.... टावेल हाय, टूथपेस्ट, ब्रश समदं ठ्येवलंय...''
माझे वडील पण बुचकळ्यांत पडले जरा. पण कदाचित 'असेल केली तयारी' म्हणून शेतकरीदादांच्या म्हणण्याला मान देऊन बाथरुममध्ये गेले.
तिथे एका ओट्यावर टीनच्या कपात टूथपेस्ट ठेवलेली दिसत होती, खुंटीवर एक टॉवेलही टांगलेला दिसत होता. पण टूथब्रश काही दिसत नव्हता.
''भाऊ, टूथब्रश???'' वडिलांनी त्यांच्यामागे आलेल्या शेतकरीदादांना विचारले.
''ह्यो काय, समोरच तर हाय की... बगा, हाय का न्हाय तुमच्या शहरावानी....!!!'' शेतकरीदादांनी समोर अंगुलीनिर्देश केला. वडिलांनी त्या दिशेने पाहिले तर काय, समोर भिंतीच्या एका खिळ्याला दोर्‍याने टांगलेला टूथब्रश लोंबकळत होता!! एकाच झटक्यात तो ''फॅमिली टूथब्रश'' होता हे वडिलांनी ओळखले. पूर्वी घरात कॉमन टूथपेस्ट, साबण वापरायचे तसाच हा ''कॉमन टूथब्रश''!!!!

शेतकरीदादा मोठ्या अपेक्षेने ''सायबांकडे'' बघत होते. इतके तत्पर की त्यांनी थेट टूथब्रशवर पेस्ट काढून माझ्या वडिलांच्या हातात ठेवायचे बाकी होते! आणि आता वडिलांना भल्या सकाळी शेतकरीदादांना न दुखावता ''फॅमिली टूथब्रश''ने दात घासण्यापासून स्वतःला कसे वाचवावे ह्या बिकट समस्येने घेरले होते.
वेळ काढायचा म्हणून त्यांनी गरम पाण्याने हात-पाय तोंड धुतले.
''सायेब, ब्रश... घेताय न्हवं?'' बाजूला अदबीनं उभ्या असलेल्या शेतकरीदादांचा प्रश्न.
''असं करा, मला तुम्ही माझ्या बोटावरच पेस्ट काढून द्या. हिरडी दुखते आहे जरा... ब्रशने उगाच त्रास होईल. आज बोटानेच घासतो दात!'' वडिलांनी वेळ मारून नेली.
बिचार्‍या शेतकरीदादांना खरं सांगणार तरी कसं? वडिलांनी तेव्हा मौन राहणंच पसंत केलं.

त्यानंतर जवळपास ३० वर्षे वडिलांनी याच व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये भ्रमंती केली. कैक वेळा शेतकर्‍यांच्या घरी मुक्काम करायला लागला. पण असा 'फॅमिली टूथब्रश'चा पाहुणचार त्यांना परत कधी अनुभवायला मिळाला नाही!

अरुंधती, >फॅमिली टूथब्रश >> Lol पण त्या शेतकरी कुटुंबाच्या आदरातिथ्याबद्दल आणि त्यामागची भावना जाणवून अगदी कौतुकही वाटले. Happy

(तेव्हा बेफिकिर इयत्ता दुसरीत शिकत असतील तर माहित नाही!!!!)>>> हे वैयक्तीक रोख असलेले वाक्य वाटले. असो! चार पाच वर्षापुर्वी नव्हे मी अजूनही पहिलीतच आहे. Happy

ज्याना थाप वाटते त्याना वाटो. मी काय इथे लोकाचे मतपरिवर्तन करायला बसलेली नाही.>>>

मला ती थाप वाटलेलि नाही. पण इसवीसन १९७६ मध्ये मला हा किस्सा माझ्याच आईने ऐकवला होता. Happy

ते प्रत्यक्षात होणार नाही असे मला मुळीच वाटत नाही आहे.

Pages