एक धागा किश्श्यांचा

Submitted by अरूण on 17 April, 2009 - 00:48

आपल्या पैकी बरेच जण गप्पा मारताना असंख्य किस्से सांगतात. पण ते बहुदा वाहून जाणार्‍या पानावर असल्यामुळे सगळ्यांनाच याचा आनंद घेता येत नाही. म्हणून हा धागा सुरु करत आहे.

तरी आपण सर्वांनी आपापले किस्से इथे लिहावेत, म्हणजे सगळ्यांना ते वाचता येतील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा खरे तर वेंधळेपणाचा किस्सा म्हणूनही खपून जाईल, पण तरीही इथे सांगतेच!! Proud

माझ्या जवळच्या नात्यातील साधारण पासष्ट वर्षाच्या बाई. काही महिन्यांपूर्वी मोबाईल वापरायला शिकल्या आहेत. त्यांनी एकाच नावाच्या दोन व्यक्तींचे मोबाईल नंबर्स, एक नात्यातील व दुसरी व्यक्ती परिचित, त्यांच्या मोबाईलवरील डिरेक्टरी कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असे लिहिलेले : सतीश : अमका तमका नंबर, (त्याखाली लगेच) सतीशराव : अमका तमका नंबर.

काल त्यांचा मोबाईल वाजला. बाई आंघोळीला गेलेल्या. मोबाईल स्क्रीनवर सतीश नाव झळकत होते. बाईंची लेक तिथेच होती. तिला वाटले, नात्यातील सतीश नामक व्यक्तीचा फोन आहे. तिने तो कॉल घेतला व सतीशशी आपले नातेवाईक समजून बोलायला सुरूवात केली. वस्तुस्थिती ही होती की हा दुसर्‍या सतीशरावांचा, जे ओळखीतील आहेत, त्यांचा फोन होता. पहिली काही मिनिटे जुजबी गप्पा, हालहवाल इ. विचारून झाले. अगदी फोन ठेवायच्या वेळी 'सतीश' म्हणाले, ''तेवढे ताईंना सांगा, माझा फोन होता म्हणून...''
लेकीच्या डोक्यात प्रकाश पडला की हा दुसर्‍या सतीशरावांचा फोन होता म्हणून!! तोवर त्यांनी फोन कट केलेला.

आपली आई आंघोळीवरून परतल्यावर लेकीने घडलेला घोटाळा आईला सांगितला. दोघींचे हसून झाले.
मग लेक ऑफिसला गेली. आईने आवरून झाल्यावर 'सतीशरावां'ना फोन लावला.... आणि घाईघाईत तो चुकून नात्यातील 'सतीश' ला लागला!!! जेव्हा आपण नात्यातील सतीशशी बोलत आहोत हे लक्षात आले तेव्हा घोटाळा किती ''ळ'' करू शकतो ते त्यांच्या लक्षात आले व डोक्याला हात लावून त्या नुसत्या हासत बसल्या बराच वेळ!

एखाद्याचा दिवस किती वाईट्ट जाऊ शकतो याचा प्रत्यय आम्हाला नुकताच आला. विकांताला फिरण्यासाठी कार भाड्याने घेतली. प्रवास सुरू झाला. एका हायवेवर पहिल्यांदा स्पिडींग तिकिट मिळाले (१३० डॉ. फाईन). आपलीच चुक म्हणून गप्प बसलो. मुक्कामाला पोचलो, दुसर्‍या दिवशी भरपूर फिरलो, हॉटेलवर जाताना परत दुसरे स्पिडींग तिकिट (आधीचा अनुभव पाठीशी होताच त्यामुळे वेग अजिबात नव्हता तरी पोलिसाचे म्हणणे ६५ स्पिड लिमिट ला तुम्ही ८० ने चालवली) परत फाईन (या वेळी १३९ डॉ. तो म्हटला तुम्हाला माझं म्हणणं पटत नसेल तर तुम्ही कोर्टात केस करू शकता, पण ती पायरी कोण चढणार?).
दुसर्‍या दिवशी हॉटेल सोडले, परतीच्या रस्त्याला लागलो, वाटेत लक्षात आले नवर्‍याची सोन्याची चेन गायब आहे (हा त्याचाच गलथानपणा) आणि माझी आवडती जिन्स हॉटेलमध्येच राहिलीय (हा माझा वेंपणा निघताना बाथरूम चेक नाही केले).
या सर्वावर कडी माझ्या मुलीने कॅमेर्‍यातले एकूणएक फोटो 'चुकुन' डिलीट केले Sad

एखाद्याचा दिवस किती वाईट्ट जाऊ शकतो याचा प्रत्यय आम्हाला नुकताच आला. विकांताला फिरण्यासाठी कार भाड्याने घेतली. प्रवास सुरू झाला. एका हायवेवर पहिल्यांदा स्पिडींग तिकिट मिळाले (१३० डॉ. फाईन). आपलीच चुक म्हणून गप्प बसलो. मुक्कामाला पोचलो, दुसर्‍या दिवशी भरपूर फिरलो, हॉटेलवर जाताना परत दुसरे स्पिडींग तिकिट (आधीचा अनुभव पाठीशी होताच त्यामुळे वेग अजिबात नव्हता तरी पोलिसाचे म्हणणे ६५ स्पिड लिमिट ला तुम्ही ८० ने चालवली) परत फाईन (या वेळी १३९ डॉ. तो म्हटला तुम्हाला माझं म्हणणं पटत नसेल तर तुम्ही कोर्टात केस करू शकता, पण ती पायरी कोण चढणार?).
दुसर्‍या दिवशी हॉटेल सोडले, परतीच्या रस्त्याला लागलो, वाटेत लक्षात आले नवर्‍याची सोन्याची चेन गायब आहे (हा त्याचाच गलथानपणा) आणि माझी आवडती जिन्स हॉटेलमध्येच राहिलीय (हा माझा वेंपणा निघताना बाथरूम चेक नाही केले).
या सर्वावर कडी म्हणजे माझ्या मुलीने कॅमेर्‍यातले एकूणएक फोटो 'चुकुन' डिलीट केले Sad

निंबुडा, दक्षिणा अजून एक म्हणजे आमच्या तिन्ही पाण्याच्या बाटल्या पण हरवल्या...काहीतरी अमानविय च वाटायला लागलंय Uhoh

मित. भारती आचरेकरांच्या ड्रायव्हिंगला चांगल्या अर्थाने वचकून राहणे योग्य. अगदी लहान वयात त्या ड्रायव्हिंग शिकल्या. (१८ च्याही आधी). ज्यावेळी मेगा हायवे नव्हता त्या काळातही पैज लावून, साडेतीन तासात त्या मुंबईहून पुणे गाठत असत. त्यांच्या मागच्या गाड्या एकमेकांना ठोकरत असत.

८० च्या दशकातली एक कंटाळवणी दुपार
स्थळ: ओक हायस्कूल, कल्याण

मराठीच्या खरे मॅडम (बाई) कुठल्याश्या कवितेच दळण दळीत होत्या आणि आमची अ तुकडीतली हुश्शार मुल आपण त्यात आपण रंगलोय असा अभिनय करत होती.

मी आणि सुनीलने चमकून एकमेकांकडे पाहीले आमच्या सैतानी डोक्यात एकाच वेळी एक कल्पना चमकलेली, उन्हाची एक तिरीप तिस-याबेंचवर बसलेल्या राहुलच्या ढुंगणावर बरोब्बर पडत होती.

अरे!!! तु कसला सॉलिड आहेस. काय गट्स वगैरे. वगैरे पाठीमागे बसलेल्या समीरला चढवायला कितीसा वेळ लागतो. ते येड पण फुशारल आणि आमच म्हणण त्याने ऐकल दप्तरातून एक भिंग काढल.

अचानक

आईsssईss!!!! माद@#@$# भें$%#@
राहुलची किंकाळी ते शांत वातावरण भेदून गेली.

त्याच्या पार्श्वभागातून धूर येत होता. पँटला भोक पडलेल.

मग बिंग फुटल आणि भिंगही

राहुल समीर वर चाल करून गेला. मवाळ खरेबाई करून करून काय करणार होत्या.
त्या दोघांची जोरदार जुंपली. मागून आलेल्या सरानीही दोघाना दम दिला. त्यात समीरला जास्त.

एव्हढा पराक्रम गाजवून कर्ता शरमिंदा होता कुठल्या तोंडाने सांगणार होता सुनील गुणेशने मला उकसवल.

करविते मात्र छद्मी हसत इतरांच्या कानाला लागत होते " आता राहुलला दोन..."

शाळेत असतांना तुमच्याकडे बहीर्गोल भिंग होते

ते फिजिक्सच्या लॅबमधनं चोरले होते. तो किस्सा नं १ आणि हा त्याचा सिक्वल. Happy

या गुगु नावाच्या प्राण्याबरोबर शाळेत लई धमाल केली आहे मी. असाच एक किस्सा...

मी आणि गुगु आजूबाजूला बसत असू १० वी पर्यंत. ९ वी मध्ये असताना आम्ही दोघा तिसर्या बाकावर आणि सगळ्यात पुढच्या बाजूला एक कपाट होतं. कशाकरता होता माहीत नाही कारण ते कायम रिकामाच असायचं. आमच्या पुढच्या बाकावर राजू (नाव बदललं आहे) बसायचा. एक दिवस राजू मधल्या सुट्टीमध्ये आपल्या चाप्पलेबरोबर ताजा ताजा माल घेऊन आला. इथे कुणालाच कळेना की अस्वस्थ करणारा हा वास येतो तरी आहे कुठुन? आम्ही दोघा सगळ्यात जास्त वैतागलो होतो, कारण सगळ्यात जवळ आम्हीच होतो. आम्ही राजू ला म्हटलं -- "काय लागलं आहे चपलेला, दाखव". त्याला येथेच्छ शिव्या दिल्या. आणि नंतर त्याच्याकडून जबरदस्तीने ती चप्पल रिकाम्या कापतात ठेवून दिली. म्हटलं "दार बंद कर, नुसता घमघमाट सुटलाय".

त्यानंतर, जो तो येईल त्याला आम्ही विचार होतो - "काय, भपका हवाय का भपका? हवा असेल तर ते दार उघडा." सगळं वर्ग भपका काय प्रकार आहे हे पाहायला आला आणि नाक मुठीत धरून प्रत्येक जण बिचार्या राजू ला टोमणे हाणत निघून जात होता.

त्यानंतर टीचर आल्या, त्यांनी विचारला... "काय गोंधळ घातला आहे?" म्हटलं "या तुम्ही पण घ्या फुकटचा एक भपका". पुढे बरोब्बर काय झालं ते नीटसं आठवत नाही मला. पण नंतर राजू ला कित्येक वर्ष आम्ही भाप्क्याची आठवण करून भरपूर लाज आणली होती.

गुगु, तुला आठवतं का रे?

न आठवायला काय झाल???

असाच एकदा राम कापसे निवडून आले आणि शांताराम घोलप पडले
तो भर वर्गात ओरडलेला "हे!!!! शांताराम कुजला शांताराम कुजला"
आम्ही दोघेही फक्त "काय" म्हणून त्याच्याकडे खुनशीपणे पाहील.
कडकडून जीभ चावली असेल त्याने. पुढे कित्येक वर्ष ऐकव लागल.
त्याच्या वडीलांच नाव शांताराम ...

असच एकदा तो बिरजे का काहीस आडनाव असलेला मुलगा रबरबाट घेऊन आलेला.
आता आपल्या फ्लॅट सँडलची हाय हिल झालेली कळायला हव ना!!
पुसल सगळ बाकाच्या कोप-याला.
झाल पुन्हा आमच सुरू... कसला वास... त्रास होतोय वगैरे
आमच्या बाई पण पिऊनला बोलवा वगैरे घोळ घालत बसल्या.
"पिऊन कशाला तो काढील की त्याने आणलाय" इती सुनील.
तो लगेच दिनवाणा चेहरा करून अवघडल्याची एक्सप्रेशन्स द्यायला लागला.
मी तत्परतेने त्याच्या बॅगेतून एक वही काढून पान फाडून त्याच्या हातात दिली.. " हं व्हा सुरू"
परमेश्वर जाणे कोणाच कुकर्म साफ करत होता.
सगळी शाळा विसरला असेल पण आम्ही नक्कीच लक्षात असू त्याच्या.

इयत्ता सातवी अ
आमचे क्लास टीचर सहस्त्रबुद्धे हे दुरच्या नात्याने माझे मामा होते आणि तस बघायला गेल तर आमचा तीन पिढ्यांचा शेजार
माझी नी सुनीलची जोडी त्यावर्षी फोडलेली.
पण तो धरणी दुभंगुन पोटात घेईल असा प्रसंग आला; नेमका तो माझ्याच शेजारी बसलेला.

झाल अस की आमच्या अश्याच काहीतरी टवाळक्या चाललेल्या आणि सर आले.
थेट माझ्या कडेच मला उभ केल तेही बेंचवर बर एक पाय काटकोनात ठेवायचा. हे अत्याचार कमी वाटावेत अस वाक्य आल.
त्याना इथली सगळी वागणूक घरी कळवने अशी धमकी द्यायची होती.
सर म्हणाले "गुणेsssश!!! तुला माहीतेय आपले जुने संबंध आहेत...."

इथेच घात झाला.
सुनीलने अलगद वळून मागे पाहील.
मागे कळ्ळ कळ्ळ अशा माना डोलावल्या गेल्या. हे अंडरस्टँडींग आमच्या वर्गात फार चांगल होत.

त्यानंतर जो तो विचारी.
"शी!!!! आम्ही हे काय ऐकतोय..."
"अरेरे तु बरा वाटायचास आम्हाला..."
"हे अस कस झाल"
दहावी पर्यंत हे चाललेल.

आणि आज इतक्या वर्षानी USहून आलेल्या सुनीलने मला विचारल "गुण्या!!!! सहस्त्रबुद्धे सर..."

आज एक ओळखीचे डॉक्टर बर्‍याच दिवसांनी भेटले होते. त्यांनी सांगितलेला, नुकताच घडलेला हा किस्सा.
हे डॉक्टर होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे अनेकदा परिस्थितीने अगदी गरीब लोकही उपचाराला येतात. डॉक्टर नाममात्र शुल्कात त्यांना औषध देतात. अशाच एक पेशंट बाई त्यांच्याकडे गेले वर्षभर कोणत्या ना कोणत्या तक्रारी घेऊन यायच्या / येत असतात. तक्रारी तशा किरकोळ असत. डॉक्टरांच्या औषधाने त्यांना चांगला गुणही येत असे. पण दर वेळेला त्या डॉक्टरांशी आल्यावर बोलताना पहिली सुरुवात करत, ''डॉक्टर, माझी परिस्थिती नाहीए हो तुमची फी द्यायची, मला परवडत नाही... मी गरीब आहे.... वगैरे वगैरे.'' डॉक्टर त्यांना म्हणायचे, ''अहो, मी मागतोय का तुमच्याकडे पैसे? तुम्ही एवढे हे औषध घेऊन जा, बरे वाटले की मला सांगा, बास! '' असे म्हणून ते त्यांना साबुदाण्यासारख्या ज्या गोड गोळ्या असतात (ग्लोब्यूल्स) त्यांवर होमिओचे मदर टिंक्चर (द्रावरूपी औषध) घालून द्यायचे. बाईंना गुण यायचा. मग दुसरी कोणती तक्रार उद्भवली की त्या पुन्हा यायच्या, पुन्हा तेच सांगणार!!

असे करता करता वर्ष झाले. परवा त्या बाई डॉक्टरांकडे आल्या. म्हणाल्या, ''डॉक्टर, गेलं वर्षभर तुम्ही मला किती औषध दिलंत हो! हे घ्या माझ्याकडून फूल ना फुलाची पाकळी. तुमच्याकडचे बरेच साबुदाणे संपवले ना मी!'' असे म्हणत त्यांनी पिशवीतून आपल्या वाण्याकडे जो साबुदाणा मिळतो त्या साबुदाण्याचा पावशेराचा पुडा काढून डॉक्टरांच्या हाती ठेवला व म्हणाल्या, ''बघा, तुमच्याकडून जेवढे साबुदाणे नेले त्यापेक्षा थोडे जास्तच परत आणलेत!!''

डॉक्टर अवाक् होऊन बघतच राहिले!! Rofl

त्याच डॉक्टरांनी सांगितलेला दुसरा किस्सा :

त्यांच्याकडे एका शाळेत शिपाई म्हणून काम करणार्‍या एक बाई औषध घ्यायला यायच्या. त्यांनी एकदा डॉक्टरांना फोनवर कोणाशीतरी इंग्रजीमधून बोलताना ऐकले. मग त्यांनी डॉक्टरांना हळूच विचारले, "डॉक्टर, तुमाला इंग्रजी येतं?'' डॉक्टरांना त्या असं का विचारत आहेत ते कळेचना. ते ''हो'' म्हणाले.
''म्हंजे, इंग्रजी बोलता बी येतं आनि लिवता बी येतं?''
''हो'' डॉक्टरांचा गोंधळलेला होकार.
''मग माज्या मुलीला शिकवा ना इंग्रजी. आहो, ती नववी नापास हाये, कारन तिला ते तुमचं इंग्रजी जमत नाय. जर ती पास झाली तर माज्यानंतर साळंतच चिकटवून घेता येईल तिला.''
''अहो बाई, पण मी डॉक्टर आहे, शिक्षक नाही. तुम्ही तिला कोणा मास्तरांकडे इंग्रजी शिकायला का नाही पाठवत?''
''त्येच तर, आता तुमी गावलात की! आता तुमीच शिकवा माज्या पोरीला इंग्रजी!''
''अहो बाई, पण...''
''त्ये मला काय सांगू नका डाक्टर, तुमी मला बरं केलंत, आता माज्या पोरीला बी शिकवा...''

त्या बाई ऐकून घ्यायलाच तयार नव्हत्या. शेवटी डॉक्टरांनी हार मानली आणि म्हणाले, ''या एकदा घेऊन तुमच्या मुलीला.... काय वय असेल तिचं? पंधरा - सोळा...?''
त्या बाई उत्तरल्या, ''नाय आमची लक्षुमी जरा मोठी हाय!''
''बरं, बरं, तिला तिची वही, इंग्रजीचं पुस्तक वगैरे घेऊन यायला सांगा.''

काही दिवसांनी म्हटल्याप्रमाणे त्या बाई आल्या. त्यांच्या मागोमाग त्यांची मुलगीही आली. धिप्पाड देह. दोन वेण्या. चेहर्‍यावरची माशीही उडू नये असे सर्वसाधारण भाव. वय साधारण बत्तीस ते पस्तीस! डॉक्टरांना एकंदरित परिस्थितीचा अंदाज आला. त्यांनी आवंढा गिळत त्या मुलीला सवाल केला,

''हं, तुला इंग्रजी येतं का?''
''होय, लिहिता येतं, वाचता पन येतं'' त्या ललनेने लाजत मुरकत उत्तर दिलं.
''बरं, मग तुझ्या पुस्तकातील पहिल्या पानावरचा तो उतारा वाच बरं मोठ्यानं!''
ह्यावर त्या मुलीने पहिल्या उतार्‍यातील जेमतेम दोन ओळी अतिशय कष्टाने र ट फ करत, अडखळत, चुकीचे उच्चार करत वाचायचा प्रयत्न केला.
डॉक्टर तिचे उच्चार सुधारून तिला वाचायला सांगत, पण ती पुन्हा पुन्हा चुकीचे उच्चार करत असे. असा खेळ वीस-पंचवीस मिनिटे चालला. डॉक्टर घामाघूम.

''बरं, मग तुला ए बी सी येतं का?'' डॉक्टरांचा केविलवाणा प्रश्न.
''ए बी सी ना.... येत्तं की... सगळं येतं मला....'' मुलीने जोरात मान डोलावली.
''बरं, मला सांग मग, अल्फाबेट म्हणजे काय?''
मुलीचा चेहरा प्रश्नांकित. जरा वेळाने ती बराच विचार करून उत्तरली, ''त्ये अल्फा नावाचं बेट आसतंया.''

डॉक्टर एव्हाना गारच गार पडले होते. त्यांनी तिला वीस शब्दांना खुणा करून ते अर्थासकट वहीत प्रत्येक पानावर एक शब्द दहा वेळा असे लिहून आणायला सांगितले.
त्यानंतर ती मुलगी अद्याप 'ट्यूशन'ला उगवलेली नाही! Lol

ज्या काळी शिकवण्यांचे ट्युशन क्लासेस झालेले नव्हते. जेव्हा कल्याणातले वाडे जिवंत होते नी त्यातल्याच कुठल्याही भक्कम भिंतींच्या पल्याड सतरंजी वर बसून मुले सुखेनैव शिकत असत. अशाच एका शिकवणीला मी जात होतो. कार्येकर सर तेव्हा प्रसिद्ध होते. ही दहावीतली गोष्ट.

संजय नावाचा एक मुलगा सतरंज्या घालत. त्याला मदत करायचा आव आणत होता त्याच्याच शेजारी सगळ्यात पुढे बसून लास्ट बेंचवरली वागणूक असलेला तरीही अगदी बापुडवाण्या निरागस चेह-याने मी नाही त्यातला असा वावरणारा एक स्टुडंट म्हणजे अर्थात मी.

बर सहस्त्रबुद्धे मॅडम कडे इंग्रजी मराठी च दळण दळून झाल की मुल कार्येकरांकडे सायन्स गणिताचा किस पाडायला येत. त्याकाळच हे फार नावाजलेल कॉम्बिनेशन होत.

तर असा दमलेला संजय वाकला आणि मी ओरडलो
"संssज्या!!!! तुझा ब्रेसियर दिसतोय..."

प्रतिक्षिप्त क्रिया...
त्याने पटकन शर्ट सावरला
आणि आपण काय केल हे त्याल कळल.

आजुबाजुची सगळी मुल मुली खदाखदा हसली.
माझ्याकडे डोळे वटारून बघणा-या कार्येकरसरानाही हसू आवरल नाही.

मुल हसली तर काही नाही पण मुलीही
खजिल झालेल्या संजयच मन म्हणत होत बदला!!!! बदला!!!!
त्यात त्याच्या बाजुच्यानेही सोडू नकोस त्याला म्हणत आग घातली.

आणि काही दिवसानी त्याला संधी मिळालीच

तेव्हा शर्टाची वरची बटण उघडी असण हे अजागळ पणाच लक्षण होत. मी अजागळ कमी नव्हतो.

सगळे बघताय ना अशा बेताने बावळट संजय बोलला
"तुझा ना!!!! तुझा ना!! ब्रेसियर दिसतोय!!!"

मी शांतपणे उरलेली बटणं काढली
"नीट बघ हं ह्याला म्हणतात बनियन आणि तू घालतोस तो..."

हा आधी बहुतेक ग.गो वर सांगितला होता मी.

एकदा वसंतराव देशपांडेंचा कार्यक्रम एका हॉलमध्ये चालू होता. हॉल थोडा जुन्या पद्धतीचा होता ज्यात वरच्या बाजूला लाकडी बांधकाम होतं (तुळई, मग तुळईवर मध्यभागी अजून एक उभा खांब, त्या खांबाच्या बाजूने परत दोन खांब पत्र्याला आधार देणारे असं) आणि काही दुरुस्ती चालू होती.
खाली एका प्रसिद्ध शास्त्रीय गायकाचं गाणं चालू आहे हे काही त्या सुताराच्या गावीही नव्हतं. तो आपलं काम जोमानं करत होता आणि त्या लाकूड घासण्याच्या आवाजामुळे खाली गाण्यात व्यत्यय येत होता. बराच वेळ श्रोत्यांपैकी काहींनी शुक् शूक वगैरे केलं पण काहीही उपयोग झाला नाही.
थोड्या वेळाने या सुतार महाशयांच्या लक्षात आलं की खालून येत होता तो गाण्याचा आवाज शांत झालाय.
बघतो तर काय? वसंतरावांसह सगळा हॉल त्रासिक चेहर्‍याने त्या सुताराकडे पाहात होता.
तर त्या सुताराने काय उत्तर द्यावे?
' तुमचं चालू दे बुवा! मला काहीही त्रास होत नाहिये तुमच्या गाण्याचा' Proud

Pages