एक धागा किश्श्यांचा

Submitted by अरूण on 17 April, 2009 - 00:48

आपल्या पैकी बरेच जण गप्पा मारताना असंख्य किस्से सांगतात. पण ते बहुदा वाहून जाणार्‍या पानावर असल्यामुळे सगळ्यांनाच याचा आनंद घेता येत नाही. म्हणून हा धागा सुरु करत आहे.

तरी आपण सर्वांनी आपापले किस्से इथे लिहावेत, म्हणजे सगळ्यांना ते वाचता येतील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या किश्श्याचा मान केदारचा. त्याच्या आयडियेच्या कल्पनेतूनच हा धागा निघाला ............ Happy

एकादा बिनडोक अकबर, तानसेनाला म्हणाला की मला तुमच्या गाण्याचा आनंद लुटायचा आहे. त्याने हुकूम केला की जो कोणी तानसेन गाताना ओरडेल, आवाज करेल त्याचे हात कापले जातील. तानसेन गायला बसले, बराच वेळ तानसेन गायले पण कोणी हूं की चूं केले नाही, अचानक एक माणूस जोरात ओरडल्या, क्या बात है!, वाह वैगरे. झाले बादशहाची आज्ञा मोडली म्हणून त्याचे हात कापले जाणार असे त्याला वाटले, पण तानसेन बादशहाकडे गेले व म्हणाले की हा एकटाच खरा रसिक आहे, बाकी सर्व लोकांना गाणे कळत नाही. मी फक्त ह्याचा साठी गाणार. बादशहाने त्याला सोडले म्हणे.
एक दाद देण्यासाठी त्याने आपल्या हातांची पर्वा केली नाही.

दुसरा किस्सा फारेंडाकडून .......... Happy

आम्ही एकदा किशोरच्या गाण्यांबद्दल असलेल्या कार्यक्रमाला गेलो होतो. कोणाचा होता लक्षात नाही पण त्यांनी स्वतः मेहनत घेउन छोट्या पडद्यावर गाणी सादर करत त्याबद्दल माहिती देण्याचा कार्यक्रम सादर केला.
आमच्या थोड्या बाजूला एक मुलगी बसली होती. तिची 'दाद' देण्याची पद्धत म्हणजे जे गाणे चालू होईल ते ती स्वतः मोठ्याने गुणगुणायला लागायची. आमच्या पैकी एकाला ती इंटरेस्टिंग वाटल्याने फक्त त्रासिक चेहर्‍याने तिच्या कडे पाहण्याशिवाय आम्ही काही करत नव्हतो. शेवटी फार झाले तेव्हा तोच मित्र तिच्याकडे बघून प्रचंड रागाने "अहो तुमची डॉल्बी साउंड सिस्टीम बंद करा, आम्हाला ते ऐकू दे" म्हणाला

अ. आ., तुमच्या चाळीसपानी वहीत काही किस्से नाहीत का?

सकाळी पुपुवर टाकलेला किस्सा -
deepurza | 17 एप्रिल, 2009 - 09:13

परळी ला जेंव्हा साहित्य संमेलन झालं तेंव्हा आशा भोसलेंचा कार्यक्रम झाला होता , त्यांनी चांदण्यात फिरताना , केंव्हा तरी पहाटे अशी गाणी म्हटली , लोकांचा रीस्पॉन्स काहीच नव्हता , मग कार्यक्रमाच्या शेवटी शेवटी त्यांनी 'हात नका लावू माझ्या साडीला' सादर केलं अन टीपीकल मराठवाडी वन्स मोर चा जो गोंधळ केला लोकांनी .... बाप रे .... बरेच टोमणे मारले आशाजींनी कार्य्क्रमानंतर मराठवाडी लोकांना असल्या वागण्यामुळे ..

त्याच साहित्य संमेलनातला अजून एक किस्सा म्हणजे , आम्ही पदमजा फेणाणींच्या कार्यक्रमाला गेलो होतो , कार्यक्रम झाल्यावर बाहेर आलो , तर एक सेम त्यांच्यासारख्याच दिसणार्‍या एक बाई होत्या , आमचा गोंधळ अरे फेणाणी बाई बाहेर आल्या आहेत तर त्यांचा ऑटोग्राफ अन त्यांच्यासोबत एक फोटो घ्यावा म्हणून. आणि आम्ही घेतला ही . फोटो प्रिंट काढून आणल्यावर कळले की त्या बाई कुणीतरी वेगळ्याच होत्या तरीच त्यांना ऑटोग्राफ अन फोटोची रीक्वेस्ट केल्यावर जे गोंधळलेले भाव त्यांच्या चेहर्‍यावर होते ...

**********************************************
ऐसी चले जब हवा ........ इश्क हुआ ही हुआ !!

ज्या पोस्टवरुन हे किस्सेपुराण सुरु झालं ते Happy ते 'मुंगळा' च पोस्ट गेला वाट्तं वाहून पुपुवरुन ,

**********************************************
ऐसी चले जब हवा ........ इश्क हुआ ही हुआ !!

कुठल्या प्रकारचे किस्से अपेक्षित आहेत इथे? Happy

दीप्या.. ती गाणारी गायिका पण पद्मजा फेणाणीच होती ना Proud

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

केदारला सांगुया न परत पोस्ट करायला...:)
बाकी दीप, फारेंड किस्से एकदम भारी हं... Proud

मागच्या वर्षी कॅनबेराला प्राईम मिनिस्टर्स एलेव्हन बरोबर भारताचा संघ वन डे खेळायला आला होता.
(हरलाच आणि. सोळा वर्षाच्या लहान मुलांशी हरतात?) संध्याकाळी सगळ्या खेळाडूंसाठी इंडियन हायकमिशनरने जेवण ठेवलं होतं. एम्बसीच्या प्रांगणात भारतीय पद्धतीने मंडप घातला होता आणि जेवण मांडलं होतं. खेळाडू लोकांमध्ये मिळून मिसळून फिरत/हातात डिश घेऊन जेवत होते. कोणी जवळ आलं तर गप्पा पण मारत होते. कारण गर्दी फारशी नव्हती. पण सचिन तेंडुलकर एकटा आत हायकमिशनर आणि सिक्युरीटी बरोबर बसला होता. ऑस्ट्रेलियात तो बराच फेमस असल्याने त्याला सगळीकडे लोकं मागे लागून प्रचंड त्रास देतात म्हणून तो जायच्या वेळेलाच बाहेर येणार असे कळले. मला आणि नवर्‍याला सगळ्यांच्या सह्या घ्यायच्या होत्या, पण दोघांनाही क्रिकेटमध्ये जराही इंटरेस्ट नसल्याने आम्ही कधीही प्रत्यक्षात/टीव्हीवर मॅचेस बघितल्या नव्हत्या किंवा खेळाडूंमध्ये त्यापूर्वी इंटरेस्ट दाखवला नव्हता. आम्हाला बरेच खेळाडू माहितच नव्हते, त्यामुळे ओळखणे कठीण झाले होते. त्यातला त्यात हरभजन सिंग लगेच ओळखू आला. त्याची सही घेतली. नंतर धोनी हे नाव बरेच ऐकल्याने त्याची सही घ्यावी असा विचार केला. त्याचे लांब केस आहेत हे माहिती होते. एका झाडापाशी एक लांब केसांचा हाडकुळा मुलगा उभा होता. पळत पळत जाऊन त्याची सही घेतली. तो इशांत शर्मा निघाला! धोनीने त्याच सुमारास केस कापले होते हे आम्हाला माहितच नव्हते (नशीब माझ्या मराठी हिंदीत मी त्याला "धोनीजी, सही दिजीये" असे म्हट्ले नाही ते कित्ती चांगले केले असं नवरा म्हणालाच. माझी एक हिंदी मैत्रिण "हमारे बच्चों के लिये एक साईन दे दिजिये" असं म्हणत होती, तसं तर काही मी म्हणत नव्हते ना? असो.). असेच तीन- चार लोकांकडुन सह्या घेतल्यावर खेळाडू जायला निघाले. "अरे वो देखो सचिन" "लूक अ‍ॅट हिम" असा गलका झाल्यावर बघितलं तर सीक्युरिटीच्या गराड्यात तेंडूलकर जायला निघाला होता. त्याच्या चेहर्‍यावर त्रासिक आणि उर्मट भाव होते आणि सही तर सोडा, तो कोणाशी बोलायला पण तयार नव्हता.

तो थोडा पुढे गेल्यावर मला उगीचच स्फुरण चढलं आणि मी जोराने ओरडले- "तेंडुलकर, मराठी माणसांना सही देणार का?" (कॅनबेरात मराठी जास्त नाहीत, त्यादिवशी आम्ही दोघेच मराठी तिथे होतो.) आश्चर्य! तेंडूलकर लगेच मागे वळला, चालत आमच्याजवळ आला आणि आम्हाला व्यवस्थित, हसून सही दिली. नवर्‍याशी हस्तांदोलन केलं आणि मग परत गेला.
कोण म्हणतं मराठी माणसांना मराठी असण्याचा अभिमान नाही?

>>>>> "तेंडुलकर, मराठी माणसांना सही देणार का?" Lol
आयला, लई खास प्रसन्गावधान नि उत्स्फुर्तता! Happy मस्तच ग भाग्या!
अग तिथे तू "ए तेन्डल्या" म्हणली अस्तीस तरी तो पळत पळत आला अस्ता......!" Proud

>>>> कोण म्हणतं मराठी माणसांना मराठी असण्याचा अभिमान नाही?
मी म्हणतो! महाराष्ट्रात राहून(देखिल) मराठी माणसान्ना मराठी असण्याचा अभिमान नस्तो! तिकडच लाम्ब परदेशातल सान्गू नका!
एनिव, तो व्हीएनसी चा मुद्दा आपण बाजुला ठेवू! Happy

भाग्या सहीचा किस्सा सहीच! असा मराठी बाणा पाहिजे. Happy

मस्तच किस्सा आहे भाग्या :)..छान !!
तेंडुलकर चे पण कौतुक.. :)...

फक्त तो दुसरा बॉलर इशांत सिन्ग नसुन शर्मा आहे.. टायपो झालीय का ?

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

हो रे, टायपोच! केल बघ ठीक.

भाग्या, सहीच हं Happy
________________________
अपने हाथोंकी ल़कीरोंपर इतना विश्वास मत करना,
जिनके हाथ नही होते उनकी भी तकदीर होती है

"तेंडुलकर, मराठी माणसांना सही देणार का?" :d
तो पण जन्मभर हे विसरणार नाही :d

तुम्ही काय करत होतात त्या खेळाडूंसाठीच्या डीनर ला ?

"तेंडुलकर, मराठी माणसांना सही देणार का?" >> Lol जबरी भाग्या. नावातच भाग्य असल्यावर साहेबांची सही मिळणारच.

तुम्ही काय करत होतात त्या खेळाडूंसाठीच्या डीनर ला ?>> Lol डीनर.

काका >> Lol
**********************************************
तुमसे मिलने की तमन्ना है ....

युकेमध्ये असताना एक मादागास्करचा मित्र होता (मी आतापर्यंत पाहिलेल्या २ मादागास्करी माणसांपैकी एक). त्याचा धाकटा भाऊ फ्रान्समध्ये कॉलेजात शिकत होता (मादागास्करमध्ये फ्रेंच ही एक मुख्य भाषा आहे, हे दोघे भाऊ फ्रेंचमध्येच एकमेकांशी बोलायचे). तर हा भाऊ मित्राकडे सुटीवर आला होता.
एके दिवशी मित्र आणि मी संध्याकाळी 'कोल्ड वन' घ्यायला गेलो होतो. एकाचे बरेच झाले. मग भूक लागली. तेव्हा दोन डोनर कबाब घेऊन आम्ही मित्राच्या घरी गेलो. घर म्हणजे एक semi-detached house जे मित्र आणि दोघांनी भाड्याने घेतले होते. ते दोघे गावाला गेले होते आणि भाऊ एकटाच घरी होता. घर दूर नव्हते, त्यामुळे चालतच जायचे होते. तेव्हा कधी तो सावरकर, मी डोलकर तर कधी तो डोलकर, मी सावरकर असे करत आम्ही घरी पोहोचलो. घराच्या बाहेरच मामाची गाडी. 'ही इथे का बुवा ?' असा आपापसांत विचार करतच आम्ही घरात शिरलो आणि बाबौ ! मामाच सामोरा आला. आम्ही दोघे खाडकन् सावरकर. एक मामी (मामाची पार्टनर), एक भमे केलेली आणि कमे कपड्यांतली बाई आणि भाऊ असे तिघे दिवाणखान्यात बसले होते. चढलेली अक्षरशः एका क्षणात उतरणे याचा अनुभव घेतलेल्यांनाच फक्त हे किती वाईट असते हे कळू शकते.
मामाने आगतस्वागत केले. आमची 'कोण काय' ओळखपरेड झाली. मित्राला मामा म्हणतो, आय वॉज अबाऊट टु कॉल यू. मित्राच्या कपाळावर आतापावेतो घाम स्पष्ट दिसत होता. मग मामाने त्याचे तिथे येण्याचे कारण सांगितले. झाले असे होती की जवांमर्द भावाने घरी कोणी नसल्याची संधी साधून एका कॉलगर्लला बोलावले. तिच ती भमेकमे बाई. आता फोनवर त्यांचा काय सौदा ठरला काहीच कल्पना नाही. इकडे आल्यावर तिने त्याला पहिल्यांदा पैसे मागितले (पहिले पैसा, मगच बैसा वगैरे) आणि तिथे सौद्यावरून त्यांच्यात भांडण झाले. भावाच्या म्हणण्यानुसार तिने आल्यावर पैसे वाढवून मागितले. तर भमेकमे म्हणते, हा कबूल केलेले पैसे देत नाही.
बरे, जर सौदा जमत नाहीये, तर भमेकमे निघून जायलाही तयार नाही. तिचे म्हणणे असे की एकतर तिचा वेळ वाया गेला, तेवढ्या वेळात तिला दुसरे गिर्‍हाईक मिळाले असते आणि दुसरे म्हणजे ती एकदा कुठेही उपस्थित झाली की काही होवो न होवो, तिला पैसे द्यावेच लागतात. तशीच पद्धत असते म्हणे ! तर वाद पेटला. एवढा की शेवटी तिने धमकी दिली की ती पोलिसांना बोलावेल आणि त्यांच्याकडे तक्रार करेल. भावाला वाटले की ती शेंड्या लावतीये, तोही म्हणाला, बोलावच. तर भमेकमेने लावला की खरंच फोन ! (भावाने नंतर आम्हाला सांगितले की तो तिच्या मोबाईलवर स्पीडडायलवर होता ! खखोदेजा). तिने तक्रार केली की या माणसाने माझ्यावर बळजोरी केली (मित्र आणि भाऊ दोघेही मूळच्या मादागास्करी आफ्रिकन वंशाचे हट्टेकट्टे). तर मामालोक आले आणि ते त्या दोघांशी बोलत असतानाच आम्ही तिथे पोहोचलो होतो.
.
वास्तविकतः ही एवढीच घटना हादरवून टाकायला पुरेशी आहे, पण आम्हाला जणू ते पुरेसे नव्हते. मित्राला दरदरून घाम फुटण्यामागचे कारण वेगळेच होते. या माणसाने परसात दोन कुंड्यांमध्ये वीडची (marijuana) रोपे लावली होती. हे आम्हा मित्रांना माहिती होते. Patio door उघडून मामालोकांनी तिकडे एक चक्कर मारली असती किंवा बाहेर जरा निरखून बघितले असते तरी त्यांना लगेच ते दिसले असते आणि मामालोकांनी तशी चक्कर मारणे अगदी सहजशक्य होते. (वीडचा कायदेशीर दर्जा नंतर थोडा बदलला). मित्राने दोन-तीन वेळा माझ्याकडे अत्यंत हतबल अशी नजर टाकल्यावर तो मला काय सांगतोय याचा मला साक्षात्कार झाला आणि मलाही घाम फुटला. बळजोरीचा आरोप... त्यात ड्रग्ज... असल्या प्रकरणात माझी उपस्थिती ! उगवण्याआधीच अस्त पावलेले माझे भविष्य आता मला लख्ख दिसू लागले होते.
पण मित्राने सूत्रे हातात घेतली. 'भमेकमेशी पाच मिनिटे वेगळे बोलू द्यावे' अशी त्याने मामालोकांना विनंती केली. ती त्यांनी उदारमनाने मान्य केली आणि मित्र-भमेकमे बाजूच्याच स्वयंपाकघरात गेले. पाचेक मिनिटांनी ते बाहेर आले आणि भमेकमेने मामालोकांना सांगितले की ती तक्रार मागे घेत आहे, तिचा काहीतरी 'गैरसमज' झाला होता ! आत काय झाले असेल याचा सर्वांनाच अंदाज आला. मामालोकांनी दोन-तीनवेळा विचारून खात्री करून घेतली... त्यांच्यात दोनेक मिनिटे खलबते झाली आणि शेवटी तेही ठिक म्हणाले. मग भमेकमे गेली, तरी जाताजाता मित्राच्या गालावरून हात फिरवून 'बाय हनी' म्हणायला विसरली नाही.
.
मी आणि मित्र विद्यापीठात पदव्युत्तर विद्यार्थी, दोघेही परदेशी, भाऊ तर नुकतेच शाळा संपवलेला (वय वर्षे १९ फक्त)... हे पाहून मामालोकांना आम्ही असून असून किती खोल पाण्यात असू याचा लगेच अंदाज आला असणारच, पण त्यांनाही त्यांचे कर्तव्य पार पाडणे होते. पण भमेकमे गेल्यावर मात्र मामाने मित्राला आणि भावाला 'गोष्टी सांगेन युक्तीच्या चार' केले. काळजी घ्यायला सांगितली आणि तेही निघून गेले.
आम्ही तिघेही अक्षरशः खुर्ची-सोफ्यावर कोसळलो. पुढची पाचेक मिनिटे मी मोकळेपणाने अंगभर थरथरून घेतले... मित्र आणि भाऊसुद्धा तेच करत असावेत. त्यानंतर पुढचा तासभर ते दोघे फ्रेंचमध्ये भांडत बसले होते. (त्यात काही शब्द सतत येत होते, त्यांचा उच्चार लक्षात ठेवून मी दुसर्‍या एका फ्रेंचभाषिकाकडून त्यांचा अर्थ जाणून घेतला होता. मित्र किती पेटला होता याचा अंदाज आला.)
ती रात्र मी तिथेच काढली. दुसर्‍या दिवशी सकाळी मित्राने झाल्या प्रकाराबद्दल माझी माफी मागितली. त्याने सकाळी उठून आधी त्या रोपांची वासलात लावून टाकली होती. मीही 'जाऊ दे, भाऊ लहान आहे, चालायचंच' वगैरे म्हणालो. त्यावर त्याने आणखी एक गंमत सांगितली... आदल्या दिवशीच हा भाऊ मित्राच्या मागे लागला होता की मला बूट्समधून काहीतरी आणायचे आहे, तिथे कसे जायचे मला माहिती नाही, तर बरोबर चल. मित्र म्हणाला, अरे याला बूट्ससारखे दुकान शोधता येत नाही, पण भमेकमे मात्र बरोबर शोधून काढली ! त्यामुळे मित्र आदल्या संध्याकाळी आणिकच उखडला होता.
.
आता तो भाऊ आणि वीड उगवणारा मित्र दोघेही असे कसे ? या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या कौटुंबिक इतिहासात दडली आहेत. मित्राच्या वडलांना मादागास्कर सोडावे लागले होते आणि ते फ्रांसमध्ये राहत होते... नदीम जसा युकेमध्ये राहतो तसेच. An apple doesn't fall far from the tree हे या दोघांकडे पाहून पटायचे. त्याचे कौटुंबिक किस्से लिहायला घेतले तर ती स्वतंत्र लेखमालिका होईल. असो.
.
झूस (=मित्र) आता ब्रिस्टलला असतो. उत्तम नोकरी आहे. भाऊ पदवीधर झालाय आणि तोही पॅरीसमध्ये नोकरी करतो. कधी सठीसहामाशी झूसची मेल येते. ती मेल बघून प्रत्येकवेळी मला माझा थरथराट आठवतो. युकेमधल्या त्या ६-७ वर्षांच्या वास्तव्यात माझे पोलिसांशी अत्यंत नाट्यमय असे तीन वेळा संबंध आले. हा त्यातील एक. हे खरे तर सांख्यिकीच्या दृष्टीने जवळजवळ अशक्य आहे. पण त्यामुळेच मला आता कुठलेही योगायोग अशक्य कोटीतले वाटत नाहीत.

    ***
    दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
    पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

    "तेंडुलकर, मराठी माणसांना सही देणार का?" >> > Lol भन्नाट !

      ***
      दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
      पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

      स्लार्टी ! (घाबरलेली बाहुली)
      ************
      ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |

      अगग! काय किस्सा आहे स्लार्ती! बापरे!

      भाग्या, इस्को बोल्ते जिगर! Proud पण काय करत होतात तुम्ही त्या डीनरला सांग ना! Lol

      बापरे स्लार्टी...!!

      अरे बापरे स्लार्ट्या! वाचता वाचता मी देखिल तो थरार अनुभवुन घेतला!
      बाकी योगायोगाच्या बाबतीत काय बोलावे? त्यालाच दुसर्‍या शब्दात नशिब (वा कमनशिब) म्हणतात!

      खतरनाक किस्सा रे स्लार्टी!
      या धाग्यामुळे खरंच असं एक टोळकं जमून तासन तास गप्पा मारतंय (फक्त चहाच्या छोटू ग्लासांची तेवढी कमी आहे) असं वाटतंय.. मजा येतेय. Happy

      स्लार्टी : खतरनाक ............. Happy

      भाग्य : ४० पानी वहीचे किस्से माझ्यापेक्षा इतर गडकरीच सांगतील ........... Lol

      ~~~~~~~~~~~~~~
      काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
      मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे

      स्लार्ट्या, खतरी अनुभव लेका.. इकडचे मामा असते तर तुझी पण लागली असती मस्त.. वाचलास...
      आशु, अनुमोदन.. आता कोणाला चहा हवा असेल तर कोणाला खंड्या.. तेव्हा आपले तसेच वाचू झालं.. Happy
      ________________________
      अपने हाथोंकी ल़कीरोंपर इतना विश्वास मत करना,
      जिनके हाथ नही होते उनकी भी तकदीर होती है

      भाग्या सहीच Happy

      स्लार्टी खतर्नाक रे.. :|
      ----------------------------------------
      फिर वोही रात है.. फिर वोही.. रात है ख्वाब की....

      भाग्य.. मस्तच किस्सा.. स्लार्टि.. तुझा यु. के. मधल्या पोलिसाबरोबरचा किस्सा वाचुन मलाही माझ्या अमेरिकेतल्या पोलिसाबरोबर झालेल्या किस्स्याची आठवण आली..:)

      अमेरिकेत येउन केवळ ६ महिने झाले होते. पहिल्या ३ महिन्यात माझ्या सगळ्यात मोठ्या भावाकडुन गाडी चालवायला शिकलो व लगेचच भावाने त्याची भली मोठी कॅडिलॅक जी फक्त ५ वर्षॅ जुनी होती.. मला देउन टाकली... म्हणाला नविन ड्रायव्हिंग शिकले आहेस म्हणुन मोठ्या गाडीत सुरक्षित राहशील्.युनिव्हर्सिटीत येता जाताना ती मी वापरायचो. पहिले ३ महिने गावाबाहेर लाँग डिस्टंस ला कधीच ड्राइव्ह करुन गेलो नाही . पण ३ महिन्यानंतर जरा भिती चेपली म्हणुन म्हटले चला आता जरा लाँग डिस्टंस ला हाय वे वरुन जायला काही हरकत नाही म्हणुन २ तास लांब राहणार्‍या माझ्या दुसर्‍या मोठ्या भावाच्या गावाला जायचे ठरवले. तिथे त्याच्या वाढदिवसा निमित्त आमचे बरेच मित्र मैत्रिणि गोळा होणार होते. पहिले ६ महिने मी सर्वात मोठ्या भावाच्या घरीच राहायचो. तो त्या दिवशी ऑन कॉल असल्यामुळे या दुसर्‍या भावाच्या वाढदिवसाला येउ शकत नव्हता.म्हणुन मी एकटाच ड्राइव्ह करुन जाणार होतो.

      पण नेमके त्या दिवशी सकाळपासुनच पावसाने असे थैमान मांडले होते की विचारता सोय नाही. मोठा भाउ म्हणाला सुद्धा की अश्या पावसात पहिल्यांदाच एवढे लांब हाय वे वरुन एकटा ड्राइव्ह करुन जाउ नकोस.. पण मी म्हटले की नाही.. मी हळुहळु गाडी बरोबर चालविन. काही घाबरु नकोस..

      दुपारी ४ वाजता मी मोठ्या हुरुपाने निघालो. त्या धो धो पावसात भावाच्या घराच्या सब-डिव्हिजन मधुन मेन रस्त्यावर लेफ्ट टर्न घ्यायला स्टॉप साइनजवळ येउन थांबलो... लेफ्ट टर्न घेताना प्रथम डाविकडे पाहीले व तिकडुन गाड्या येत नाहीत ना याची खात्री करुन घेतली... तिकडुन गाड्या येत होत्या पण बर्‍याच दुरवर होत्या... मग मी उजवीकडे बघीतले व तिकडुन एकच गाडी येत होती.. तीही बर्‍यापैकी लांब दिसत होती.. ती गाडी जवळ यायच्या आधी म्हटले आपण पटकन लेफ्ट टर्न घेउन टाकु.. म्हणुन मी पटकन अ‍ॅक्सिलरेटरवर पाय दाबला व लेफ्ट टर्नसाठी गरकन गाडी वळवली.. पण घाइने लेफ्ट टर्न घेताना अ‍ॅक्सिलरेटरवर जरा जास्तच जोरात पाय दाबला गेला व गाडीने बर्‍यापै़की वेगातच टर्न घेतला.. गाडीचा तो वेग व धो धो कोसळणार्‍या पावसाने ओला झालेला रस्ता.. व माझा ड्रायव्हिंगमधला नवशिकेपणा.. या त्रिवेणि डेडली काँबिनेशनमुळे जे व्हायचे तेच झाले... माझा गाडीवरचा ताबाच गेला व माझी गाडी अ‍ॅक्युट लेफ्ट टर्न घेउन एकदम ऑनकमिंग ट्राफिकच्या लेनमधे आली... आणि ऑनकमिंग ट्राफिक बघुन माझी बोबडीच वळली व एकदम मी स्टिअरिंग व्हिल उजवीकडे केले.. पण ते खुपच उजवीकडे केले गेल्यामुळे आता माझी गाडी रस्त्याच्या डाव्या बाजुकडुन एकदम उजवीकडे.. फुटपाथच्या दिशेने वेगात गेली.. ते पाहुन मी आणखिनच भांबावुन गेलो व परत स्टिअरिंग व्हिल डाविकडे फिरवले... हे सगळे एवढ्या वेगात घडले की मला भानच राहीले नाही की जरा ब्रेकचा वापर करावा.. मी वेड्यासारखा आपला नुसता त्याच वेगात अ‍ॅक्सिलरेटरवर पाय दाबुन ठेवुन.. फक्त स्टिअरिंग व्हिलनेच गाडी डाविकडे.. उजवीकडे असे करत कंट्रोल करायचा निष्फळ प्रयत्न करत होतो..

      आणि काय! जे व्हायचे तेच झाले... रस्त्याच्या दोन्ही बाजुकडचा ट्राफिक.. माझे ते बावळट ड्रायव्हिंग बघुन.. थांबले होते.. पण माझीच गाडी रस्त्याच्या उजवीकडे असलेल्या एका घराच्या मेलबॉक्सला उडवुन थोडी पुढे..जाउन इलेक्ट्रिकच्या लाकडी खांबाला जाउन दाणकन आदळली... तो आदळण्याचा आवाज ऐकुन मी अजुनच भांबावुन गेलो व गाडी थांबवायचे सोडुन तशीच पुढे दामटवली... पण ५० फुटपण पुढे गेलो नसेल तर मला काहीतरी जळल्याचा वास आला.. तेव्हा मात्र माझी पाचावर धारण बसली.. म्हटले.. झाल.. गाडीच्या इंजिनने बहुतेक पेट घेतला.. आता मात्र गाडी इथेच थांबवुन गाडीतुन बाहेर उडी मारली पाहीजे... व लगेच मी गाडी थांबवली व गाडी तिकडेच सोडुन भावाच्या घराच्या दिशेने उलटा पोबारा केला. हे सगळे रामायण भावाच्या घरापासुन २००-३०० फुटावरच झाले..

      धापा टाकत भावाच्या घराची बेल वाजवली.. भावाने दरवाजा उघडला.. मला एवढ्या लवकर परत आलेले पाहुन व माझ्या चेहर्‍यावरच्या भितीला बघुन भाउही घाबरला.. व त्याने विचारले काय रे... काय झाले? त्याला धापा टाकत टाकत सांगीतले की गाडीचा अ‍ॅक्सिडंट झाला... भावाने पटकन विचारले.. तुला कुठे लागले बिगले नाही ना? मी नाही म्हटल्यावर त्याने दुसरा प्रश्न केला.. दुसर्‍या कोणाला लागले वगैरे नाही ना?.. मी म्हटले की नाही... पण तु मला दिलेल्या गाडीला मात्र आग लागली असावी. त्याने लगेच शुज घातले व आम्ही त्याच्या घराकडुन जिथे गाडी होती तिकडे चालायला लागलो.. मी गाडी सोडल्यापासुन.. भावाकडे येउन... त्याला झाल्या प्रकाराबद्दल सांगीतले.. त्यात मोजुन फक्त ५-७ मिनिटेच झाली असतील.. पण तेवढ्या कमी वेळात पोलिसांना या घटनेचा सुगावा कसा लागला व ते माझ्या भावाच्या घराच्या दिशेने कसे आले याचा उलगडा मला आजतागयत झालेला नाही...

      वाँव वाँव वाँव.. असे सायरन वाजवत पोलिसाची १ गाडी भावाच्या घरासमोर येउन उभी ठाकली.. त्यातुन १ आडदांड पुलिस ऑफिसर बाहेर आला.. व आम्हा दोघा भावांसमोर येउन उभा राहीला व आम्हाला त्याने विचारले.. ती कॅडिलॅक कोण चालवत होते? माझ्या भावाने सांगीतले की माझा हा लहान भाउ चालवत होता.. त्या पोलिसाने मला लगेच त्याच्या गाडीत जाउन बसायला सांगीतले.... माझा भाउ त्याला काही सांगायचा प्रयत्न करत होता पण त्याने फटकळपणे माझ्या भावाला सांगीतले की त्याला फक्त माझ्याशीच बोलायचे होते...

      मी मान खाली घालुन... एखादा बोकड कसाइखान्यात ज्या उत्साहाने जाइल त्या उत्साहात.. त्या पोलिसाच्या गाडीत जाउन बसलो.. अमेरिकेत तर सोडाच.. पण भारतातल्या पोलिसाबरोबर्ही कधी संबंध न आलेल्या माझ्यासाठी.. पोलिसाबरोबर बोलायचा व इंटरअ‍ॅक्शनचा हा आयुष्यातला पहिलाच प्रसंग होता.. त्यात मला माहीत होते की या अपघातात चुक माझीच होती... मला हेही ठाउक होते की माझ्या गाडीने दाणकन काहीतरी उडवले होते... नक्की काय उडवले होते ते मला त्या क्षणी माहीत नव्हते.. व माझी गाडी भर रस्त्यात.. बहुतेक जळत पडली होती.. माझ्या मनात भितीने तारे चमकत होते... अमेरिकेत कायदे कानुन कटाक्षाने पाळतात हे ऐकुन माहीत होते...पण प्रत्यक्षात पोलीस-कोर्ट्-कचेरिचा कधीच संबंध न आल्याने.. या माझ्या ड्रायव्हिंग चुकीसाठी बहुतेक आपल्याला जेलमधे नेण्यासाठीच हा पुलीस ऑफिसर आलेला आहे अशी माझी ठाम समजुत झाली होती...

      त्यामुळे तो पुलिस ऑफिसर जेव्हा गाडीत बसुन मला बेसिक प्रश्न विचारु लागला तेव्हा मला एकाच विचाराने पछाडलेले होते.... की या पुलिस ऑफिसरला कसे पटवुन द्यायचे की या अपघातात माझी कशी काहीच चुक नव्हती व सगळा कसा धो धो पडणार्‍या पावसाचा दोष होता... त्यामुळे त्याने विचारलेल्या प्रश्नाना दुर्लक्षुन मी आपले माझेच घोडे पुढे दामटवत होतो... की ऑफिसर.. हाउ इट वॉज नॉट माय फॉल्ट... रेन वॉज फॉलिग सो हार्ड.. माय व्हिजिबिलिटी वॉज हँपर्ड... आय वॉज नॉट ड्रायव्हिंग फास्ट अ‍ॅट ऑल!.. वगैरे वगैरे... मला वाटत होते की या बाबाने आपल्याला जेलमधे न टाकण्यासाठी माझा इनोसंस प्लिड करण्यासाठी.. त्याची गाडी... हाच माझ्या बचावाचा एकमेव रंगमंच आहे. त्यामुळे त्याच्या प्रश्नांना बगल देउन मी आपली हिच वरिल ४-५ वाक्ये परत परत त्याच्यासमोर घोकत होतो... त्याला असल्या बचावाच्या बेकार बकबकीची सवय नसावी हे माझ्या खिजगणतीतही नव्हते.. मी आपला आपण जेलमधे जाउ नये या एकमेव उद्देशाने हिरीरीने माझा बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो..

      शेवटी पाच मिनिटे माझे असे पाल्हाळ ऐकुन व त्याने विचारलेल्या प्रश्नांची मी उत्तरे देत नाही हे बघुन मात्र मग तो पुलिस ऑफिसर जाम वैतागला... व माझ्या अंगावर खेकसला.... सर! इफ यु डोंट अँसर माय क्वश्चन्स.. अँड इफ यु डोंट स्टॉप ब्लेमिंग द होल वर्ल्ड फॉर धिस अ‍ॅक्सिडंट... आय विल गिव्ह यु टिकीट फॉर दॅट! अँड डोंट वेस्ट युअर टाइम डिफेंडिंग हिअर.. यु डु दॅट इन फ्रंट ऑफ अ जज्!ओ.के?

      मग १०-१५ मिनिटे अपघातस्थळाची मोज मापणी झाल्यावर.. माझी ब्रेथ अ‍ॅनालायझर्ची टेस्ट झाल्यावर त्या ऑफिसरने मला २ विस विस डॉलरची तिकिटे दिली व गाडीतुन बाहेर पडायला सांगीतले.(तिकिट म्हणजे दंड!). १ तिकिट सिन ऑफ द अ‍ॅक्सिडंट सोडुन गेल्याबद्दल व दुसरे ड्रायव्हिंग टु फास्ट फॉर द एक्झिस्टिंग ड्रायव्हिंग कंडिशन बद्दल!

      गाडीत (दरदरुन!) फुटलेल्या घामाला पुसत.. जेलमधे न जाता.. फक्त ४० डॉलर्सवर निभावले.. त्यासाठी देवाचे आभार मानत... मी जणु काही जेलमधुनच सुटका झाली .. अश्या आनंदात त्या पोलिसाच्या गाडीतुन काढता पाय घेतला....:)

      (आणि माझी गाडी? मेलबॉक्सवर आदळुन व इलेक्ट्रिक पोलवर आदळुन गाडीची संपुर्ण उजवी बाजु चपट झाली होती व इलेक्ट्रिक पोलवर आदळल्यामुळे उजव्या बाजुचा गाडीचा पत्रा उजव्या टायर्सवर घासुन तो जळका वास निर्माण करत होता. ती गाडी टोटल करावी लागली Sad )

      जुन्या हितगूजवर 'मराठी लोकांचे हिंदी' असा एक धागा होता. त्यावर टाकलेला किस्सा इकडे डकवतो Proud

      हा आमच्या ओळखीतल्या कोणीतरी सांगितलेला किस्सा(खरा खोटा माहीत नाही)

      ते गृहस्थ असेच एकदा दक्षीण मुंबईत 'कुण्या एका ठीकाणी' पानाच्या गादीजवळ उभे होते. ते गृहस्थ तेंव्हा मुंबईत नविनच होते. त्याचवेळी तिथे एक वारांगना आली आणि त्यांच्यात पुढील प्रमाणे संवाद घडला

      " बैठना है?"
      "..."
      " बोलो ना जल्दी बैठना है? "
      "..."
      " क्या भाव खाते हो. बैठना है?"
      " ये देखो. मुझे खडा रहना अच्छा लगता है. तूमको बैठना है तो जाके बैठो मेरा दिमाग मत चाटो"

      वारांगना " हे कुण्या गावच पाखरू' असा भाव चेहेर्‍यावर दाखवून निघून गेली बापडी

      पानवाला आणि इतर जण हसून हसून दमले.

      ------------------------
      देवा तुझे किती सुंदर आकाश
      सुंदर प्रकाश सूर्य देतो

      Pages