एक धागा किश्श्यांचा

Submitted by अरूण on 17 April, 2009 - 00:48

आपल्या पैकी बरेच जण गप्पा मारताना असंख्य किस्से सांगतात. पण ते बहुदा वाहून जाणार्‍या पानावर असल्यामुळे सगळ्यांनाच याचा आनंद घेता येत नाही. म्हणून हा धागा सुरु करत आहे.

तरी आपण सर्वांनी आपापले किस्से इथे लिहावेत, म्हणजे सगळ्यांना ते वाचता येतील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राची Lol

माझ्या एक लांबच्या काकू आहेत, त्यांचे नाव कला, आणि त्यांच्या मुलीचे नाव लता.... मी आजही त्यांच्या नावांचा घोळ घालते.... नशीब, आजवर पकडले गेले नाहीए!! Lol

प्राची, Biggrin

असाच एक घोटाळा मीही केलाय!
एका मित्राच्या मुलीचे नाव सौम्या आहे आणि बायकोचे मानसी. मानसी एक भारदस्त व्यक्तीमत्व आहे. सौम्याही खुप गुटगुटीत बाळ होती तेव्हा. माझी त्यांच्याशी नवीनच ओळख झाली होती आणि मंदारचे (मित्र) कसलेसे ऑपरेशन झाले म्हणुन त्याला भेटायला मी आणि नवरा गेलो होतो. मंदारची भुल उतरत होती त्यामुळे तो थोडा गुंगीत असल्यासारखा होता. आम्ही फक्त पाच मिनीटे तिथे थांबलो आणि त्याला आराम मिळावा म्हणुन निघायला लागलो. निघताना मी त्याला म्हणाले, 'बघ हं मंदार काळजी घे! चुकुन मानसीला उचलु वगैरे नकोस!' त्याची भुल लगेच्च पुर्णपणे उतरली हे सांगायला नकोच! Biggrin

वत्सला Biggrin

घरात आईचे नाव 'चंचल' आणि लेकीचे 'आंचल' लेक वय वर्षं पाच.
>>>>>>>>>>>>प्राची मी पूर्वी हा किस्सा कुठेतरी टायपलाय तरी परत लिहिते कारण सेम आहे.
माझ्या मैत्रिणीच्या मुलांची नावं - पूनम(मुलगी) प्रीतम(मुलगीच) आणि छोटा विक्रम. आणि मैत्रिणीचं नीलम...आहे ना कन्फ्यूजिंग?
एकदा नीलमकडे पार्टी चालू होती. हॉल जरा कमी पडत होता. आणि छोट्या मुलांची नाच गाणी चालली होती आणि काही मुलं बसायला जागा नसल्याने इकडे तिकडे फिरत होती. त्यातच मैत्रिणीची(नीलमची )मुलं पण होती.....(पूनम, प्रीतम, विक्रम) तर आमचा एक मित्र म्हणाला, "नीलम ये इकडे , तू माझ्या मांडीवर बस ."
सगळे अचानक हसायला लागले . तो मात्र बिचारा ओशाळला.

अगदी सेम किस्सा माझ्या भावाकडे! माझ्या भावजईचं नाव अनुराधा, मुली आसावरी, आराधना आणि अनुपमा! त्याचा एक मित्र "अनुराधा तू माझी ना? बघ हं, कॅडबरी मिळेल" असे अनुपमाला सांगत होता

आईगं Rofl

हाच सेम किस्सा माझ्या नवर्‍याच्या मित्राच्या बाबतीत पण. नावे आई श्रुती, मुलगी श्रेया. Happy
अजूनही तो मित्र बोलताना दहादा शहानिशा करुन बोलतो. Wink

एकदा वॉशिंग्ट्न डीसीवरून हायवेने येत होतो. मधेच नवर्‍याला कॉफी प्यायची लहर आली. इतकी की सर्व्हिस एरिया येईपर्यंतही दम नव्हता. कुठल्यातरी एक्झिटला बाहेर पडू असे बोलणे चालू होते आणि तेव्हाच पुढच्या एक्झिटला त्याने गाडी वळवली, १-२ मिनिटे रस्ता काही कळेना, पुढे एक झिकझॅक गेट होते त्यातून गाडी काढावी असा विचार करून थांबलो आणि क्षणार्धात आमच्या मागे फिरणार्‍या दिव्यांची गाडी येऊन उभी राहिली. ब्रम्हांडच आठवले, पोलिसांची गाडी आपल्यामागे? काय केलं आपण? इथे तर पोलिसांची मला जास्तच भिती वाटते. काही बोलायच्या आधीच हात डोक्यावर नेऊन त्यांच्या गाडीत बसवतील अशी चित्रं डोळ्यासमोर दिसायला लागली. मागे फिरावे तर त्यांची गाडी अगदी चिकटून थांबवली होती आणि पुढे ते वेडेवाकडे गेट एका माणसाने उघडले, पार्किंगची जागा होती तिथे जाऊन थांबा म्हटला मी सांगितल्याशिवाय गाडीतून उतरायचे नाही, तुम्ही फेडरेल रिस्ट्रीक्टेट एरियात घुसला आहात. अरे कर्मा! नेमके याच एरियात कसे आलो? एक्झिट घेताना काही साईन दिसलं नाही की या ठिकाणी तुम्ही जाऊ शकत नाही वगैरे, मग कसं कळणार? गाडी थांबवल्यावर एका बाजूला नॅशनल सिक्युरिटी एजन्सीची व्हॅन फुल्ल लाईट लावून उभी केली, मागे तीच मगाची पोलिस गाडी होतीच समोरही अजून कुठली तरी गाडी आली, पूर्ण कोंडीत सापडलो होतो.

मागच्या गाडीतून उतरून एक ६ फुटी पोलिस आमच्याशी बोलायला आला, पहिल्यांदा सगळ्यांना काचा खाली करायला सांगितल्या, हातातल्या बॅटरीने झोत टाकून कोपरानकोपरा पाहिला. असंख्य प्रश्न विचारले, जीपीएसवरचा मॅप दाखवा म्हटला कुठून आलात, कुठे चाल्लात, मग सगळ्यांना खाली उतरवून (आम्ही ४ मोठे, २ छोटे) एका लाईनीत उभे केले, गाडीचे सगळे दरवाजे सताड उघडून त्यांच्या स्निफर डॉग्स ने वास घेतला. त्या दिवशी अगदी नशिबाने काही कामासाठी ठेवलेले आमचे पासपोर्ट होते, ते दाखवले, की इथे वर्क परमिट वर आहोत, अमुकतमुक. दर ५ मिनिटानी आमची कागदपत्र घेऊन त्याच्या मागच्या गाडीत जात होता आणि १० मिनिटाने परत यायचा. असे अर्धा पाऊण तास चालू होते. मनात देवाचा धावा चालू होता. बाकीच्या दोघांपैकी एकाकडे लायसन्स होते, त्याच्या बायकोकडे आयडेंटिटी दाखवणारे काहीच कागदपत्र नव्हते मग तिला सेप्रेट खाली बोलवून चौकशी झाली. हे सगळे होईपर्यंत एक चपटा पोलिस आमच्यावर सतत नजर ठेवून होता. अखेर अजून १५-२० प्रश्नांच्या फैरी झाडल्यावर, संशयास्पद काही नाही असे दिसल्यावर एकदाची आमची सुटका झाली. त्यांनाच बाहेर जायचा रस्ता विचारून आम्ही आमच्या मार्गाला लागलो. तेव्हापासून कानाला खडा लावला की सर्व्हिस एरिया दिसल्याशिवाय आणि जीपीएस ने सांगितल्याशिवाय कुठलेही एक्झिट घ्यायचे नाही. Happy

नीलम ये इकडे , तू माझ्या मांडीवर बस ."
सगळे अचानक हसायला लागले . तो मात्र बिचारा ओशाळला.>>>

Rofl

मुलं लाजवतात तेव्हा व एक धागा किश्यांचा यातील फंडामेंटल फरक समजला नाही. पण दोन्ही धागे मस्तच!

-'बेफिकीर'!

माझाही एक किस्सा ...
कॉलेजात असताना एकदा मित्राच्या कामासाठी त्याच्या सोबत उगाच नाशकाला गेलो होतो .. (रिकामा होतो ना !) Proud
परत औरंगाबादला रात्री एक वाजता पोचलो. मी मित्राला म्हंटले की "चल राजा इथेच सिगरेट मारून घेऊ .. अजून कुठे मिळणार नाही."
आता एवढी अपरात्र होती तरी मी स्टेशनच्या गल्लीत अंधारात जाऊन सिगरेट मारत होतो. (मित्राने घाबरट म्हणून हिणवले देखील !)
अशात आमच्या घराच्या समोर राहणारे काका तिथे अवतरले... तेवढ्या कोपर्यातल्या अंधारातही ! आणि त्या वेळी ...
डायरेक्ट प्रश्न ... "काय रे ... तू स्वप्नील ना ?"
माझे धडक उत्तर ... "नाही ! ... आपला काहीतरी गैरसमज झाला असावा ." Proud
माझा एवढा आत्मविश्वास पाहून त्यांना वाटले खरेच त्यांचा गैरसमज झाला असावा. निघून गेले बिचारे . Lol

कॉलेजमध्ये असताना एन्.सी.सी. मध्ये होतो. तेव्हाचा हा किस्सा:

त्या वेळी पुण्यात मॅरेथॉन स्पर्धा चालू होती, आणि पोलीसांना मदत म्हणून सगळ्या कॉलेजच्या एन्.सी.सी. च्या मुलांनापण ट्रॅफिकची 'डुटी' लावली होती. म्हणजे काय, तर मॅरेथॉनच्या रूटवर ज्यावेळी कोणी स्पर्धक धावत येताना दिसेल त्या भागातले ट्रॅफिक तात्पुरते थांबवणे आणि स्पर्धक पुढे गेला की मग पुन्हा ट्रॅफिक सोडणे. माझी डुटी होती वेताळबाबा चौकात (सेनापती बापट रस्त्यावरच्या डॉमिनोज पिझाच्या जवळचा चौक). स्पर्धक युनिवर्सिटी-चतु:श्रुंगी-सेनापती बापट मार्ग-नळ स्टॉप-अलका टॉकीज चौक असे जाणार होते (म्हणजे तसा त्यांचा स्पर्धेचा मार्ग होता). काही स्पर्धक चतु:श्रुंगीच्या रस्तावरुन सेनापती बापट मार्गावरुन वेताळबाबा चौकाच्या दिशेने येताना दिसले. मी विरुध्द दिशेला होतो. सोबतच्या 'मामा' नी मला ट्रॅफिक थांबवायला सांगितले....मी थांबवले. सगळ्यात पुढे एक पांढरी फियाट होती. एक काकू चालवत होत्या.

काचा खाली करुन मला विचारले, हिरवा सिग्नल आहे, तरी का थांबवलंय..

मॅरेथॉनचे स्पर्धक येत आहेत, २ मिनीटात ते जातील तेव्हा सोडतो..

एव्हाना मला काकूंचा चेहेरा ओळखीचा वाटायला लागला होता... बरोब्बर.. त्या भारती आचरेकर होत्या.

(त्रासिक चेहरा करत) मी जरा घाईत आहे..

ह्म्म्म...

अहो पण ते लोक तर त्या बाजूने येतायत, तुम्ही इकडचं ट्रॅफिक थांबवून काय फायदा?

मी थंडगार.. कारण एकदम पॉइंटाचा मुद्दा होता त्यांचा !

माझाही चेहेरा एकदम.. आमाला पावर नाय... असा!

२००१ मध्ये मी पुण्यात आप्पा बळवंत चौकात DSK मध्ये राहात होते. २ बेडरूमच्या फ्लॅट मध्ये आम्ही ५ जणी होतो.त्यात मी आणि माझी एक बालमैत्रिण कायम नवीन कुरापती करण्यात प्रसिद्ध! आम्चे लाईट बिल भरायचे होते मग आम्ही दोघी निघालो. लक्ष्मी रोडवरच कुठेसं ते ऑफिस आहे एवढच माहित होतं . उन्हामुळे मी आनि तिने गॉगल घातला होता .आणि विशेष म्हणजे दोघींनीही लाल भडक रंगाचा स्कार्फ लावला होता. लक्ष्मी रोडवर गेल्यावर आम्ही एका दोघांना पत्ता विचारला तर पुणेरी सभ्यतेचा मान राखून मानेनेच नकार दिला. शेवटी असे करत करत आम्ही एका रिक्षा स्टँड जवळ आलो तिथे विचारावं म्हटलं तर एकही जण आमच्या कडे मान वर करूनही बघेना म्हटलं झालं तरी काय? आजूबाजूचा परिसर थोडा ओळखीचा वाटत होता ...माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला त्याचे झाले होते असे की गणपतीच्या काळात रात्री गणपती बघण्याच्या ओघात आम्ही एकदा वाट चुकलो आणि बुधवार पेठेल जाऊन पोहोचलो होतो ..तिथेच पुन्हा आजही ...मग सगळा उलगडा झाला आणि तेथून जे धूम ठोकली...
यानंतर आम्ही आमच्या घरमालकाम्ना नम्र विनंती केली की यापुढे आम्ही फक्त पैसे देऊ बिल तुम्हीच भरा पण त्या स्वार्थी माणसाने आमच्या प्रत्येकाकडून १०० र. घेऊ केले. मग मात्र आम्ही खवळलो. जागा सोडण्याच्या आदल्या दिवशी घराच्या माळ्यावर असलेली सगळी पितळेची, तांब्याची भांडी घेतली आणि फुलेमंडईच्या इथे भांड्यांच्या दुकानात जाऊन विकली तीही माझ्या मैत्रिणीच्या काकाच्या ग्रेट बजाज स्कूटरवर ग्रेट अश्यासाठी की त्यात १ल्या गियरनंतर गाडी डायरेक्ट ३र्‍या गियरवरच यायची. मग सगळे पैसे घेऊन जे.एम.रोडवर जाऊन भरपेट जेवण केले....आहेना आठवणीतला किस्सा...अजूनही बरेच आहेत आठवेल तसे लिहिन..

हा एक ऐकीव किस्सा आहे. खखोदेजा. पण मला विचारल तर एकदम पॉसिबल! Proud

अमेरीकेत एक देशीनं फ्रीवे वरून जाताना चुकीचं एक्झीट घेतलं. लगेच त्याच्या लक्षातही आलं. फ्रीवे पासून फार आत गेला नव्हता, वेळ रात्रीची होती आणि त्यालाही मुक्कामाला जायची घाई होती म्हणून त्याच्या देशी डोक्यात रिव्हर्सची कल्पना आली. आणि तो घाईघाईनं रिव्हर्स घ्यायला लागला. मागून नेमकी एक कार भरवेगात येत होती. ती याच्या गाडीवर आदळली. दोघे गाडीतून खाली उतरले. नेहमीप्रमाणे केवळ कार्डसची देवाणघेवाण न होता शाब्दिक देवाणघेवाण सुरू झाली. दोष पूर्णपणे देशीचा होता आणि ते मान्य करून तो भरपाई देण्यास तयारही होता. पण तो अमेरीकन जामच भडकला होता. वाहत्या रस्त्यावर रिव्हर्स?? शेवटी त्याने पोलिसांना फोन केला. ते आले. अमेरीकनने त्यांना कहाणी ऐकवली. आणि काय महाराजा? त्यांचा त्या कहाणीवर विश्वासच बसेना. असं कोणी रिव्हर्स घेऊ शकतं हेच त्यांना मान्य होईना. इतकावेळ मान्य करणारा देशी रागरंग पाहून गप्प बसला. पोलिस काही कन्व्हिन्स होईनात आणि मागून येणार्‍या गाडीनेच पुढच्या गाडीला टक्कर मारली असेल असेच त्यांचे मत झाले. तिकिट अमेरीकनला मिळाले. Happy

हो मामी असे मी माझ्या ओळखीतल्या भारतीयाने हायवेवर गाडी रीव्हर्स घेतल्याचे त्याच्याकडूनच ऐकले आहे अर्थात त्याला अपघात झाला नाही हे नशीब. मी त्याला कोपरापासून हात जोडले होते -/\- त्याला स्वतःचा जीव प्यारा नाही त्याला कोण काय करणार. त्याला पोलीसांनी पकडायला हवे होते असे मात्र मला नक्कीच वाटले.

Pages