तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते कार मधून सुभाने नाही असाच कोणी भिकारी समजून पार्सल दिलं. तो माणूस म्हणाला पण की लहान पोर खात नाहीये घ्या तुम्ही अशा अर्थाच

असं आहे ! तुम्ही लोक इतक्या काळजीपूर्वक मालिका पाहता ना, त्यामुळेच ह्यांचा ट्यार्पी वाढतो आणि सोबत आचरटपणा करायचा उत्साह पण !>>> Lol Lol
चुकाच मुसळाएवढ्या असतात त्यांच्या.. आपोआप लक्षात येतात

प्रपंच, झोका, आनंदवन सारख्या सिरियल्सचे संस्कार आहेत हिच्यावर खरं तर. पण लेखिका म्हणून ते उतरले नसावेत बहुतेक>> खरंय. 'आई बाबांना कुठली काळजी नको असू दे' असा डायलॉग होता काल...
Facepalm!!

ते कार मधून सुभाने नाही असाच कोणी भिकारी समजून पार्सल दिलं. तो माणूस म्हणाला पण की लहान पोर खात नाहीये घ्या तुम्ही अशा अर्थाच >>>>>> ओहो अस होत तर. धन्स आनन्दी

आता ती बॅग ठेवलीये ते विस आणि इतर घरच्यान्ना दिसणार/ कळणार तरी कस? तोपर्यन्त ती बॅग तिथेच खितपत पडून राहील.>>> ती घरात कोणाला तरी नक्कीच दिसेल .. गेला बाजार केर काढणाऱ्याला तरी दिसेल . पण ती कोणी तिथे ठेवली हे कसं कळणार ? निमकराना हे का कळून द्यायचं नाहीये कि आपण पैसे देतोय लग्नाच्या खर्चाचे ? मग अभिमान कि काय तो कुठनं दिसणारे यांचा.. ? मला काय कळतंच नाहीये कि मालिका वाल्यांचं डोकं अति अचाट विचारांचं आहे ?

आणि काल ह कु झाल्यावर जेऊन जा /नको आम्ही निघतो मुलीकडे पाणीसुद्धा पिऊ नये वगैरे झाल्यावर ते दोघे तिथेच उभे आणि मग आईसाहेबांचा डायलॉग "इशा.. " आणि मग इशा ने पुढे होऊन आई ला मिठी मारली . हे असं इतक्या कृत्रिम पणे ?? आणि त्यासाठी आईसाहेबानी इशा ला पिन मारायला लागते ?तोपर्यंत इशा ठोकळा तिथेच उभा ?? असं कुठे असतं ? Uhoh आणि थोडंसं वास्तववादी नाहीच दाखवायचं असा नियम आहे का ? Angry

पतंगोत्सव पासूनचा बॅकलॉग आहे. बघतेय मधून मधून .
ही सगळी लोक बागेत का पतंग उदवत होती ?? एकतर ईतकी झाडं आजूबाजूला . पतंग अडकत नसतील ???
आईबाबा आणि ईशाचा निरोप समारंभ अगदीच कृत्रिम होता .
जयदीपचं ते माय फ्रेण्ड वहीनी फारच डोक्यात जातयं , पण तो आवडतोय . मला तर तो बॉबी पण आवडतो आता.
सॉन्या मेकप वगैरे न करता किती छान दिसते. त्यादिवशी ईशा वाट चुकून तिच्या खोलीत जाते तेन्व्हा योगा करताना .

ईबाळाला फोन करावा हे काही पटकन सुचत नाही. परवा पण आईसाहेबांनी आठवण केली आणि काल विस ने . ती आईबाबा घरी पोचले नाही म्हणून काळजीत असते तेव्हा. मंद कुठली.
आईबाबा जेवायला नाही म्हटल्यावर काही आग्रह नाही काही नाही. लग्नानंतर आत्ता भेटले ना? मग काही आपुलकी, प्रेम काही दिसतंच नाही हिच्यात.

कॅच अप ऑल्मोस्ट झाले आहे. खरे सांगायचे तर आता ते न होण्याचे एकमेव कारण म्हणजे वरती मेधावि यांनी लिहील्याप्रमाणे सांडपाणी घातलेले आणि भयंकर ताणलेले सीन्स. बघताना बोअर होते. ते निमकर हाउस तसेच डोक्यात जाते. नुसते दोघे रडत आहेत. आणि ते पैसे कॅश मधे बॅगेतून दिले काय सगळे? अकाउण्ट मधे थेट जमा वगैरे नाही? ती ही हरवते वगैरे असले प्रसंग असतील तर बोअरच.

मायराचे "तिला काय कळतंय त्यातलं" अगदी चपखल होते. उद्या खरेच ईशाच्या सल्ल्यावरून मायरा केबिन तयार करत आहे वगैरे सीन दाखवले तर मजा येइल. "मायरामॅम आपण याला एका चाळवजा घराचे स्वरूप देउ. माझे टेबल म्हणजे आमच्या घरातील त्या किचन टेबलासारखे. आलेल्या लोकांना बसायला एक कॉट. मला भेटायला आलेल्या लोकांना अगदी चाळीत आल्यासारखे वाटले पाहिजे. ऑफिस मधले टॉयलेट्स सार्वजनिकच असतात म्हणून ठीक आहे, नाहीतर मी ते ही बदलायला सांगितले असते...." वगैरे आणि त्यावर मायराचे आजकाल ट्रेडमार्क झालेले उसने हास्य व तो "ऑफ कोर्स..." संवाद.

मायरा या कॅरेक्टर बद्दल कधी सहानुभूती वाटेल असे वाटले नव्हते. पण एकूणच विक्या तिला जशी वागणूक देतोय त्यावरून तसे वाटते आजकाल.

बाय द वे ते बदाम शेप्ड साचे सापडतात त्यात इतका काय सस्पेन्स आहे? आणि किचन मधे सर्वात वरच्या ड्रॉवर मधे तर ठेवलेले असतात. मग काय सापडत नाही वगैरे? आणि एकाच आकाराचे तर आहेत. वेगवेगळ्या आकाराचे कोठे होते?

वास्तविक ईशाचे पाककौशल्य पाहता वड्या वेगवेगळ्या आकाराच्या करायला तिला आवर्जून काही करावे लागेल असे वाटत नाही.

मायराचे "तिला काय कळतंय त्यातलं" अगदी चपखल होते. >>> अगदी अगदी . खरच फारच रिअलिस्टीक दायलॉग होता तो .
ती मायरा काहीतरी एवीपी वगैरे होती ना . काय काय काम करायला लावतायेत तिला .
तिला विस ची सेक्रेटरीच ठेवायची ना .

बेबीला आई बाबा ओळखू येत नाहीत ती चाळीत जाते.. चाळीत पटेल बिटेल लोक थातुरमातुर उत्तर देतात गावाला गेले वगैरे.. रुपाली येते ती असाच काही सांगते इथेच गेले असतील येतील वगैरे.. मग इशा म्हणते पटेल म्हणाले गावाला गेले आहेत आई बाबा.. मग रुपाली सिन पूर्ण दाखवला नाही.. बेबी हताश होऊन पायऱ्यांवरून खाली येताना कोणी दुसराच चाळी मधला आपण ना बघितलेला माणूस दिसतो तो सांगतो पैसे नव्हते म्हणून घर विकलं त्यांनी म्हणून ..
इकडे सुभा ऑफिस मध्ये जाऊन मायराला ओरडतो जोरजोरात की ईशाच surprise बनवलं नाहीस .. तिने बनवलेलं असतं आणि ते म्हणजे ईशाच नवं केबिन.. मग ते बघून सुभा थोडा शांत होतो आणि तिथे इशा आणि त्याचा लावलेला फोटो घेऊन conference रूम मध्ये जाऊन लावतो .. जिथे काही लावायचं नाही असं खुपपप आधीच्या भागात तो म्हणाला असतो आणि लगेच इशाला फोन करतो की तू इकडे ये तुला खूप छान वाटलं ई. तेव्हा बेबी त्या चाळीत माणसाशी बोलत असते आणि आई बाबानी घर विकलं कळल्याने रडत असते..
तर आता पुढच्या भागात दाखवलं की ईशा काँफेरेन्स रूम मध्ये आहे रडत आणि सुभा म्हणतो तुला काही किंमत च नाहीये मी एवढं छान तुझ्यासाठी surprise बनवलं आणि तुला त्याच काहीच नाही .. तेव्हा फोटो खाली पडतो आणि फुटतो.. तेव्हा सुभा सायको वाटला

वाटलं खरं तसं..जोरजोरात ओरडत असतो सुभा सगळ्यांसमोर काँफेरेन्स रूम मध्ये .. बेबी पण जमेल तेवढ्या आश्चर्याने बघत असते.. आणी फोटो पडतो आणि तो ऑफिस मधला मुलगा काहितरी दिस इज बॅड अस काहीतरी म्हणतो..
त्याजागी मे बी आधी नंदीनीचा आणि सुभाचा फोटो असावा.

Episode Director : Sumit Komurlekar
हा माझा केळकर काॅलेजचा मित्र आहे, त्याला आपल्या या धाग्याची लिंक पाठवावी म्हणत्ये... कळेल झी वालांना सीरियलची किती पिसं निघतायंत आणि किती बकवास होत चालल्ये मालिका ते !!! Sad

इशाचा तो तिरंगा ड्रेस भयानकच (गंडलेला) होता

सुभा ग्रे झाला तरी त्यांची पनिषमेंट कितीही विचारशक्ती ताणली तरी आजचा गृहपाठ पूर्ण झाला पाहिजे आणि जेवायच्या आधी 3 धडे आणि त्यावरची उत्तरे लिहून ठेव या पलीकडे जात नाही

आणि बॅकग्राऊंड ला love me like you do किंवा
I don't wanna live चे संगीत

50 शेडस असतील हो त्यांच्या आमची 51 वी आहे
केड्या चा पॅटर्न च वेगळाय

ह्या सिरियलचा फक्त एकच आणि एकच सुरुवातीचा भाग पाहिला. आणि नंतर कुठलाच बघवला नाही.
कमेंट्स पण मजेदार नाही. कारण सिरियल इतकी बेकार....

सलाम त्या निर्मात्याला आणि कलाकारांना. सुभा आता नवीन चित्रपट काढेल इतक्या मिळकतीवर...

पण इथे अजून दोन फुले एकमेकांवर आपटल्याचा सीन झालेला नाही》तो सीन पूर्वीच हवा होता. नदीकाठीही घडता घडता राहीलाच. पण आता लग्न झालंय ना? आता लाकडं विझतानाचा सीन अपेक्षित आहे. (आईसाहेब किंवा प्रेक्षकांची नाही:))

बरं, इशाच्या आईला जर का इशाला सगळं कळवून तिची मदतच घ्यायची आहे तर चादर फेकून अरूणला मदत कशाला करायची?(तिनं खरं तर अरूणलाच फेकायला हवंय मुर्खासारखं वागतोय म्हणून) आणि चादर डोक्यावर घेतल्यावर तर तो पटकन ओळखता यायला हवा होता. साडी नेसवताना डोक्यावर पदर घेतला की तो तसाच दिसतो की.

बाय द वे ते बदाम शेप्ड साचे सापडतात त्यात इतका काय सस्पेन्स आहे? आणि किचन मधे सर्वात वरच्या ड्रॉवर मधे तर ठेवलेले असतात. मग काय सापडत नाही वगैरे? >>किचनच नव्हतं म्हणून सापडत नसतील ते. सोन्या तसंही सगळं बाहेरूनच ऑर्डर करायची. विक्या फो.पो,. पो. ला. पाणीपुरी पावभाजी किंवा ऑफीसातला पिझ्झा खायचा.

सोन्याचा पतंग? खलास! आधी विक्याला फोन करून पतंगोत्सव करतोय म्हंटल्यावर विक्याच्या डोक्यात पहिले आले असेल जोपर्यंत तू काही विकत घेत नाहीयेस तोपर्यंत चालू दे. पण याला एका दिवसांत कोणी पतंग बनवून दिला माहीत नाही.

त्यात आलेले पब्लिक इतके ब्रिलियंट की पतंगोत्सवा मधे वहिनीकरता काय सरप्राइज आहे ते कोणालाही गेस करता येत नाही.

नशीब ईशाने त्याला तो पतंग उडवायचा कसा या पेचातून जे सोडवले ते निदान लॉजिकल होते. नाहीतर मला वाटले आता ईशाला त्यातूनही काहीतरी निर्माण करण्याची आयडिया सुचेल, आणि सोन्याचा पतंग असे एक डिपार्टमेण्ट बनवून तिला त्याचेही हेड करणार.

घराच्या परिसरात मागे सिक्युरिटी वाले कशाला उभे आहेत माहीत नाही. लागलेच तर घराच्या कंपाउण्डजवळ नकोत का? तेथे घोळक्यात कोण इजा करणार आहे. बहुधा आहेतच पैसे देउन उभे केलेले कलाकार तर येउद्या सीन मधे अशा हेतूने आणले असतील गर्दी दाखवायला. आणि इतके करूनही जालिंदर भाई येतोच असे दिसते शेवटच्या सीन ला.

पतंग उडवायचा सीन मनोहारी होता. जेन ऑस्टेन च्या नॉव्हेल/चित्रपटामधे तरूण तरूणींचे डान्सेस असतात तसे लोक समोरासमोर उभे राहून उडवत आहेत.

सोन्याचा पतंग? खलास! आधी विक्याला फोन करून पतंगोत्सव करतोय म्हंटल्यावर विक्याच्या डोक्यात पहिले आले असेल जोपर्यंत तू काही विकत घेत नाहीयेस तोपर्यंत चालू दे.>>इथला पतंगोत्सव रुपकात्मक आहे. खरा पतंग तर केड्यानंउडवलाय.

पतंग उडवायचा सीन मनोहारी होता. जेन ऑस्टेन च्या नॉव्हेल/चित्रपटामधे तरूण तरूणींचे डान्सेस असतात तसे लोक समोरासमोर उभे राहून उडवत आहेत >>>> त्यातही झेंडेंचा पतंग , मायरा पकडून आहे.

सोन्याचा पतंग असे एक डिपार्टमेण्ट बनवून तिला त्याचेही हेड करणार.
>>> Biggrin

सध्या ईशाला असलेला हंगामी धोका कमी पातळीवर दिसतोय. सरंजामे पतंगोत्सवात रॅण्डम लोकही घुसू शकत आहेत. ते ही हूडीज घालून.

आणि त्याने बुरखा तर घातलेला नाही ना? सरंजामे कुटुंबापैकी इतर कोणीच त्याला ओळखत नाही? तो पार्टनर होता ना? पूर्वी विक्याच्या मागे लागलेला तो त्याचा दुसरा पंटरही उघडपणे आलेला आहे.

विक्रांत सर! म्हणून ईशा क्लिअरली घाबरून ओरडल्यावर फक्त विक्रांत सर धावले. बाकी लोकांना काही फिकीर नाही. सिक्युरिटी वाल्यांनाही. हे त्यांच्य घराचे आवार नक्की किती मोठे आहे? जनरल पब्लिक अ‍ॅक्सेसही दिसतोय रिक्षा वगैरे आणण्याइतका.

घाबरून चक्कर आलेल्या व्यक्तीला एक इंजेक्शन आणि रोज तीन गोळ्या? आणि ते द्यायला दोन डॉक्टर आणि तीन नर्स! "यांना आरामाची गरज आहे" म्हंटल्यावर विक्या विचार करतोय हिला उद्यापासून ऑफिसमधे यायला सांगू. तेथे डेस्कवर डुलक्या मारेल. नाहीतर इथे ही आणि जयदीप मिळून नवीन कोणतातरी उत्सव काढतील.

"मी इतक्या सहजासहजी तुझ्या हाताला लागणार नाही विक्रम"! इति जालिंदर. याला कोणीतरी सांगा की नक्की कोण कोणाच्या मागावर आहे.

LOL. आदमी एक और गोलियां 3.
सोन्याचा पतंग उडवायचा कसा म्हटल्यावर इशा सरसाऊन आली तेव्हा मला वाटलं होतं की तिच्या outof box thinking नुसार परत एक कागदी बोळा जोरदार फेकून मारेल आणी कॅरमच्या सोंगट्या उडवतात तसं उडवेल.

फार एंड तुम्ही चला हवा येउद्या नक्की बघा. त्यात फारच टर उड वलेली आहे तुपारेची.

तो सोन्याचा पतंग धातूचा होता? मला तर पूर्वी रॅपि/न्ग पेपर येत त्याचा वाटला.

वडीलांकडे आई चादर फेकते तेव्हा विक्या व इशा समोरच आहेत त्यांना दिसत नाही? सीरीअल लॉजिक.

इशाच्या ऑफिस केबिन मध्ये वेगळे डिज्याइन असे काय केले आहे? दोन फोटो लावले फक्त.

घर विकले व आतले सामान पण विकले का? फक्त दोन बॅगा? वन रूम तो आरामसे मिलजाती भायंदर साइड्में. इशाचे स्वप्न जर
नोकरी करून आईबाबांना सुखी ठेवायचे हे आहे तर ती ते विसरून गेली आहे का? बेसिक लक्ष पण देत नाही. तुमच्या कडे पैसे आहेत का
कसे जगत आहात हे पण विचारत नाही.

आईबाबांना कर्जतच्या घरात दोन रूम नक्की मिळतील. मी थिंक्स.

महा प्रसाद म्हणून जेवण दिलेच नाही. बाबा उपाशी राहायला मोकळे.

निमकरांनी नोकरी पण सोडली का? >>

असं दिसतंय......! Uhoh
निर्मात्याच्या बजेट कंस्ट्रेंट्स मुळे पात्रं कमी करावी लागणार आहेत असं दिसतंय...शिवाय कथेच्या एकूण सादरीकरणातही आई बाबांची पात्रं केड्याला झेपेनाशी झाली असावीत. सो...त्यांना काट मारली ...!! पण हे अधिक लॉजिकली व पटेल असे करता आले असते....!!

Pages