Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारएण्ड, एक नंबर
फारएण्ड, एक नंबर
फारेंड... किती ते बारीक
फारेंड... किती ते बारीक निरीक्षण!

आणि मायरादेखत काय एकमेकांना मिठी मारतात ऑलवेज......??
आज विक्रांत चा क्लोज अप दाखविणार आहेत....ईशाला विचारतो की फक्त हसूनच का बघतेस. ... (ऑर समथिंग ऑफ दॅट सॉर्ट!)
तेव्हा तो फार सुजलेला दिसतोय.......
फारएण्ड........तुमच्या
फारएण्ड........तुमच्या रसग्रहणाला तोडच नाही.तुम्ही प्रिकँप पाहिलेला दिसत नाही,तो पाहिल्यावर मला त्या भागापेक्षा तुमचे त्या भागाचे रसग्रहण वाचण्याची प्रचंड उत्सुकता आहे.तेव्हा जमल्यास आजचा भाग अवश्य बघावा.
काल की परवा पुण्यात असाव,सुभाचा कसलातरी कार्यक्रम होता,या मालिकेचे प्रोड्युसर म्हणजे सुभाचे मित्र अतुल केतकर हे ही होते.काल सुभा पुन्हा उवाच......मालिकेची खरी स्टोरी आता चालू होणार आहे.खूप अनपेक्षित ट्विस्ट येणार आहेत.मग लोक खूपच प्रश्न विचारायला लागल्यावर चतुर सुभाने माईक अतुल केतकरांच्या हातात दिला.पण त्यांनी सुभाचीच री ओढली.गिरीश मोहितेंबद्दल चकार शब्द नाही.मोहिते म्हणे पुन्हा तुपारे डिरेक्ट करायला उत्सुक आहेत.मग पिक्चरच कारण सांगून मुळात गेलेच का,.असो तर
लोकहो,म्हणजे ही स्टोरी जी आपण बघत आहोत ती खरी स्टोरीच नव्हे,म्हणजे तो फोटो खाली पाडण ,निमकर सागा हे सगळे फावल्या वेळातले टाईमपास असावेत.
तुम्ही ही फालतू मालिका करू नका अस ओरडून सांगावस वाटणारी माझी बहीण ते बोलू शकली नाही कारण ती म्हणाली की सुभा इतका चिकना दिसत होता मालिकेत दिसतो त्यापेक्षा की आमच्या ग्रुपमधल्या आम्ही सुभा फँन्स त्यालाच बघत होतो.उगाच त्याला अस सांगून दु:खी कशाला करायच?म्हणून मनातला प्रश्न नाही विचारला.
काय ग बाई ते सुभा प्रेम आणि त्याची काळजी.
रच्याकने, पिंकी मावशीचे काय
रच्याकने, पिंकी मावशीचे काय वो झाले पुढे?....जाणकारांनी प्रकाश टाकावा जेणेकरून मज पामराला बोध होईल.... आणि पूर्वीचे एपिसोड पाहण्याच्या शिक्षेपासून सुटका होईल
रच्याकने, पिंकी मावशीचे काय
रच्याकने, पिंकी मावशीचे काय वो झाले पुढे?.>>>
विकिशा वेडिंग नंतर तिचे अवतारकार्य समाप्त झाले.
विकिशा वेडिंग नंतर तिचे
विकिशा वेडिंग नंतर तिचे अवतारकार्य समाप्त झाले.> >>>> अतसेच निमकर जोडीचेही अवतारकार्य संपले असते किंवा सोयीस्करपणे सुरु असते तर चालले असते की. उगा कैच्याकै नाट्य. गालावरच्या गुलाबी पापी साठी केलं होतं का एवढं नाट्य?
https://www.facebook.com
https://www.facebook.com/186250454306/posts/10158064823154307/
हा प्रोमो पाहून आज जर मायराने विक्याला किंवा बेबीला काही सुनावल तर मी मायराच्या बाजूने.
बाप रे काय फालतू प्रोमो..
बाप रे काय फालतू प्रोमो..
बेबी का सांगत नाही पुसा गालावरच म्हणून.. देवा ..
परत एकदा विसच्या रागाला बळी
तुम्ही ही फालतू मालिका करू नका अस ओरडून सांगावस वाटणारी माझी बहीण ते बोलू शकली नाही कारण ती म्हणाली की सुभा इतका चिकना दिसत होता मालिकेत दिसतो त्यापेक्षा की आमच्या ग्रुपमधल्या आम्ही सुभा फँन्स त्यालाच बघत होतो.उगाच त्याला अस सांगून दु:खी कशाला करायच?म्हणून मनातला प्रश्न नाही विचारला. >>>>> त्या सुभा साठी च ही मालिका बघ ण्याच धाडस आपण करतो... नाही तर कधी च राम राम असता.
परत एकदा विसच्या रागाला बळी पडायच कारण केड्या ने हे शोधलय...... अस मला वाटत... आता हा आठ्वडा हे बघायच..... मुर्ख केड्याच्या भन्नाट आयडीया
विसने चांगलंच ओरडायल पाहिजे
विसने चांगलंच ओरडायल पाहिजे ह्या मंदाला
थोडक्यात आज फरएन्ड यांनी आज
थोडक्यात आज फरएन्ड यांनी आज फस्ट डे फस्ट शो एपि बघावा ही विनंती
बेबी का सांगत नाही पुसा
बेबी का सांगत नाही पुसा गालावरच म्हणून..>>>
हो ना. आणि ती जे लाजून हासणे दाखवण्याचा प्रयत्न करतेय ते कुत्सित हसणं वाटतंय.
कच्चा लिंबू..... सहमत!
कच्चा लिंबू.....
सहमत!
कसली कुजकट पणे हसतेय.. कश्शी झाली फजिती .......अशी!
ती जे लाजून हासणे दाखवण्याचा
ती जे लाजून हासणे दाखवण्याचा प्रयत्न करतेय ते कुत्सित हसणं वाटतंय.>>> +१ नेहमीच तशी हसते ती. आजिबात लाजुन गोड वैगेरे वाटत नाही ते. कुत्सिक हसणं वाटतं.
फारएन्ड
फारएन्ड
सुबोध भावेचं फॅन पेज फार पूर्वीच like केल्याने नोटिफिकेशनस येतात,. त्यातल्या एका पोस्टवर परवा लिहिलं, इशामुळे सिरीयल बघत नाही, तिचा अभिनय आवडत नाही.
निमकर नवरा बायकोच्या डोक्यावर
निमकर नवरा बायकोच्या डोक्यावर घोंगड टाकून त्यांना पकडणे फारच पांचट होत. ते काय घर सोडून पळून जाऊन लग्न करणार होते की त्यांच अपहरण करुन काही लक्ष्/कोटी मिळणार होते. काहीही दाखवतात
स्निग्धा.....असं 'उचलून'
आणि ते घर वगैरे पण परत नावाने केलं का निमकरांच्या?
आणि ते घर वगैरे पण परत नावाने
आणि ते घर वगैरे पण परत नावाने केलं का निमकरांच्या? >>> ते कळायचयं अजुन
एखाद्याची मजा करायचा हा कुठला
एखाद्याची मजा करायचा हा कुठला प्रकार ना.. नवऱ्याला आपण गालावर किस केलं हे सगळ्या जगाला कशाला कळायला हवं.. स्वतः च्याच लिपस्टिक चे मार्क अशे इतरांना दिसणे केवढं ऑकवॉर्ड आहे.. वर मायरा दाखवत होती विस ला तर ही नको म्हणते ..चुकून मार्क राहिला आणि हळूच दाखवून ते पुसण्याचा सिन निदान बघण्यासारखा झाला असता..
झेन्डेसाहेब म्हणाले ,
झेन्डेसाहेब म्हणाले , आईबाबान्ना २४ तासात शोधून आणले नाही तर नाव लावणार नाही. नशीब आईबाबान्नी वेळीच दर्शन देऊन झेन्डेच ' शेन्डे' होण्यापासून वाचवल.
असं 'उचलून' आणणे हीच तर झेंडेची स्पेशालिटी आहे >>>>>>> हो ना. ईशाची आई म्हणाली सुद्दा, आम्हाला अस उचलून आणायला आम्ही लहान आहोत का? झेन्डेनी 'मी नाही त्यान्नी उचलून आणल' बोलत ईशा आणि विसकडे बोट दाखवल.
फारएण्ड
ईशाच्या आईबाबान्ना जर गावीच जायच होत तर लग्नानन्तरही गेले असते की कायमचे. त्यासाठी हा एवढा ड्रामा कशाला करायचा?
बाप आणि मुलगी दोन्ही मुलखाचे वेन्धळे. ईशाच्या हातात फोन नसतो, वडिलान्चा फोन हरवतो. जालिन्दरने उचलला असेल का टपरीवर चहा पित असताना?
जालिन्दर ईशाच्या आईबाबान्ना ओळखत नसावा.
लग्नाचा खर्च असा कोणी मीडियाला सान्गतो का?
बेबी का सांगत नाही पुसा गालावरच म्हणून..>>>
हो ना. आणि ती जे लाजून हासणे दाखवण्याचा प्रयत्न करतेय ते कुत्सित हसणं वाटतंय. >>>>>>> ते तिने मायराला जळवण्यासाठी तसच राहू दिल असेल त्याच्या गालावर. प्रोमोमध्ये ईशा शनाया वाटते तर मायरा 'गरीब बिच्चारी राधिका'.
एखाद्याची मजा करायचा हा कुठला प्रकार ना.. नवऱ्याला आपण गालावर किस केलं हे सगळ्या जगाला कशाला कळायला हवं.. स्वतः च्याच लिपस्टिक चे मार्क अशे इतरांना दिसणे केवढं ऑकवॉर्ड आहे.. वर मायरा दाखवत होती विस ला तर ही नको म्हणते ..चुकून मार्क राहिला आणि हळूच दाखवून ते पुसण्याचा सिन निदान बघण्यासारखा झाला असता.. >>>>>>>> ++++++१११११११११
सुभा इतका चिकना दिसत होता मालिकेत दिसतो त्यापेक्षा की आमच्या ग्रुपमधल्या आम्ही सुभा फँन्स त्यालाच बघत होतो >>>>>>>>> गेल्या रविवारी झी युवावर 'झी युवा सन्मान सोहळा' चे सुभा सूत्रसन्चालन करत होता, तिकडे 'सॉल्ट अॅन्ड पेपर' लुकमध्ये होता. नेमका त्याच वेळी कलर्स मराठीवर 'ठाकरे' चित्रपटाचा ईवेन्ट होता तिकडेही सुभाच अॅन्करिन्ग करत होता, त्यात मात्र तो आताच्या लुकमध्ये आहे. हॅन्डसम दिसत होता.
आजच्या क्रीम सूट- गुलाबी शर्टमध्येही छान दिसतोय.
ईशाची हेअरस्टाईल बदलली वाटत.
आज विक्रांत चा क्लोज अप दाखविणार आहेत....ईशाला विचारतो की फक्त हसूनच का बघतेस. ... (ऑर समथिंग ऑफ दॅट सॉर्ट!) >>>>>>> मिसेस सरन्जामे, तुम्हाला नुसतच बोलूनच दाखवता येत का काही कराल? अस काहीतरी म्हणाला विस.
न समजलेली अजून एक गोष्ट
न समजलेली अजून एक गोष्ट म्हणजे अरुण निमकरने मायराला लग्नाचा खर्च का विचारला? तो काय पाच कोटी देऊ शकणार होता का? तसंही त्यांना जमेल तेवढेच पैसे ते देऊ शकणार होते मग एवढी माहीती काढून काय बरं साधलं?
बावळट आहेत दोघे. गालावरच्या पाप्याने उलट गैरसमज होतील लोकांचे.
बाय द वे, ईशाच्या जीवाला
बाय द वे, ईशाच्या जीवाला असलेला धोका पुन्हा गेले २-३ भाग कन्व्हिनियंटली गायब आहे. आरामात कोठेही फिरत आहे.
इशाचा आजचा लूक बघितला का कुणी
इशाचा आजचा लूक बघितला का कुणी?
नारायण धारप यांच्या काळी जोगतीण या कथेतली काळी जोगतीण अशीच दिसत असेल, असं मनापासून वाटतंय
बेबीच आजच वागन तर खूपच
बेबीच आजच वागन तर खूपच बलिशपणा वाटलं.. थोडपण professional नाही..ही कुठली पद्धत झाली मजा घेण्याची..आणि घरात कुठला पदार्थ बनेल हे मायरा का ठरवते काहीच्या काहीच थोडपण पटण्यासारख नाहीये..
ईबाळाने लग्नानंतर केस बरे
ईबाळाने लग्नानंतर केस बरे ठेवायला सुरवात केलीये. तो तेलकट चप्पट लुक गेलाय ते बरं दिसतंय.
विक्या आणि मायराचं अफेअर आहे
विक्या आणि मायराचं अफेअर आहे असं वाटतंय आता. त्याची पार्टनर इन क्राईम आणि गर्लफ्रेंड.
नंदूला विक्याच्या अफेअरबद्दल कळल्यामुळे तिचा काटा काढला.
प्रॉपर्टी नावावर असण्यासाठी काहीतरी clause असेल.
हो आज साइन पण घेतलीये ईशाची..
हो आज साइन पण घेतलीये ईशाची..
प्रॉपर प्लॉट असता तर सुभा ला एकदम ट्विस्ट ने निगेटिव्ह बघायला आवडलं असतं.. आता एकदम गोड गोड वागून इमोशनल सीन्स दिल्यानंतर एकदम निगेटिव्ह बघणे बोअर होईल.. ते पण आधीच्या एपि वरून आपल्याला काही प्रश्न पडले तरी उत्तर थोडीच मिळणार..
सुभा आज चांगला दिसतं होता .. बाकी सगळं अ आणि अ च होतं
सुभाने ईआई बाबांना किती फालतू पद्धतीने गुंडाळलं .. काही पण.. आणि ईआई बाबा तर के जी मधल्या मुलांसारखे माना डोलवत होते.. हो का? असं का? म्हणून .. लेखकाला ह्याच सिरीयल चे एपि रोज 4 वेळा बघायची शिक्षा दिली पाहिजे..
आणि पोळीच्या लाडूच काही तरी करा बाबा आता.. किती वेळा तेच तेच..
लेखकाला आणि दिग्दर्शकाला हीच
लेखकाला आणि दिग्दर्शकाला हीच सिरीयल दिवसांतून ४ वेळा दाखवावी नाही ते वेडे झाले तर झी चे नाव बदला
हो आज साइन पण घेतलीये ईशाची..
हो आज साइन पण घेतलीये ईशाची..>>>>>> आजच्या एपिसोड म धुन अजुन वेगळे स्टोरी बनवायला चान्स मिळाला.. आपल्याला.
प्रॉपर प्लॉट असता तर सुभा ला एकदम ट्विस्ट ने निगेटिव्ह बघायला आवडलं असतं.. आता एकदम गोड गोड वागून इमोशनल सीन्स दिल्यानंतर एकदम निगेटिव्ह बघणे बोअर होईल.. ते पण आधीच्या एपि वरून आपल्याला काही प्रश्न पडले तरी उत्तर थोडीच मिळणार.. >>>>> केड्या कडुन ती अपेक्षा नाहीच करु शकत उत्तराची तो अजुन चार प्रश्न ठेवेल....
आता एकदम गोड गोड वागून इमोशनल सीन्स दिल्यानंतर एकदम निगेटिव्ह >>>>> बरोबर
अचानक इशा सह्याजीराव कशी काय
अचानक इशा सह्याजीराव कशी काय झाली? त्यासाठी लागणारी अक्कल जाउदे पण लीगल प्रोसेस वगैरे आहे की नाही काही? लग्नाची पत्रीका जोडली असेल का सोबत?
घरात कुठला पदार्थ बनेल हे मायरा का ठरवते काहीच्या काहीच थोडपण पटण्यासारख नाहीये..>>हो ना. आणि घरात भात बनत नाही म्हणून कुकर नाही कारण सगळे जण डायेट करतात. कायतरीच. सोन्या जय सोडले तर कोणी डायट करत नाही. आणि सोन्या पण फास्ट फूड मागवत असते सारखी. आई आणि विक्या तर लठ्ठ आहेत. आणि नोकर मंडळी घरून डबा आणून खात नसणार. आईसाहेबांची दासी पण वजनदारच आहे. का ही ही फेकतात.
Pages