तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इशाचा आजचा लूक बघितला का कुणी>> आपल सगळ्याच नावडतच मिठ अळणि अस झालय , आजचा लुक ओके वाटला मला इनफॅक्ट मागच्या एक दोन एपिसोड पासुन इशा व्यवस्थित वाटतिये ड्रेस, हेअर्स अस सगळ जमुन आलय पण अ‍ॅक्टिन्ग च्या नावाने मात्र बोम्ब आहे मोठी ...
इशाचे बाबा आणी बॅगची चौकशी चालु तेव्हा बेबी अगदी मक्ख उभी होती " माझ्यावर कॅमेरा येइल किवा २-४ सन्वाद म्हणायचे तेव्हा बघु" अग बाइ तुमच्यावर कॅमेरा नसला तरी तुम्ही आहात की सिन मधे दिसताय की आम्हाला...
बाकी कितिही माहेरी स्वयपाक शिकवला असला तरी सासरी १-२ कुक असताना कशाला कुकिन्गचा अट्टाहास? तेही परत शिळ्या पोळिचे लाडुच ....देवा! बाकी काही येत नाही का बेबीला? मायरा सरजाम्यान्च्या किचनला सुद्धा मॅनेज करते ??? ते कस काय बुवा? केड्या सोन्या लिहायच होत आनि चुकुन मायरा लिहल .
लिपस्टिकचा सीन खुपच पाणचट!

ईबाळ एकदम होपलेस आहे. एकदा लग्न झाल्यावर सुध्दा मी नवर्‍याच्या गालाला कीस देखील करते हे जाहीररित्या कशाला सांगावं लागतं? Proud अगदी मायराला जळवण्यासाठी असेल तर मग तिच्यासमोरच ते पुसून आणखीन जळवायचं ना!

सॉन्याला ईशा - मायरामधे पेटवून द्यायचे आहे का मायरा म्हणेल तो मेन्यू घरात होतो, घरच्यांना चॉईस नाही ही प्रथा परस्पर, बेबीला वाईटपणा देऊन बंद करायची आहे कोण जाणे! काहीही असो. चांगली खेळी आहे..

घरचं बजेट ठरलेलं असतं आणि मायरा सगळं ठरवत असते, जयदीप सोन्याला मोकळीक नसते पाहिजे ते घेण्याची, असा संदर्भ होता मागे

सुभा ची तर dual personality वाटतेय हल्ली
ईबाळ किती अधर अधर वावरताना दिसते, कशाचंच काही च वाटत नाही

मायरा यांची हरकाम्या गडी वाटतेय आता. आणि ते पोळीचे लाडू बघून कसतरी होतयं आता. किती वेळा तेचते. दुसरे काही पदार्थ करता येत नाही का? किमान आईसाहेबांना विचारून खीर तरी करायची.
आणि ते गालावर पापा देऊन दिवसभर मिरवत बसणे थोर होते.

ईपालकांच्या डोक्यावर घोंगडी वाला सीन लोल होता. मात्र हे लोक घरी आल्यावर झेंडे पहिल्यांदा "मी झेंडे आहे" म्हणून सांगतो तो सीन जेन्युइनली विनोदी होता. असे एकूण टोटल ३-४ सीन्स असतील पूर्ण सिरीज मधे आत्तापर्यंत.

बाकी आपले सुरूच आहे. ईशाच्या जीवाला धोका परतला! आणि ईशाला धोका आहे. घरी संशयास्पद बॅग आहे. तर काय करावे? ईशाला घेउन घरी जावे!

तेथे सर्वांना बॉम्बची रेंज माहीत असल्याने एक दहा बारा फुटांवर उभे आहेत. बाय द वे ती बॅग तर तपकिरी लाल ब्रीफकेस होती ना? त्याची गिफ्ट बॅग कधी झाली? तो स्क्वॉडवालाही बॅग सोडून इकडेतिकडेच स्कॅन करत बसला होता.

आपण इतके हसतो तर सुभा आणि इतर कलाकारांना किती कष्ट पडत असतील हे सीन्स शूट करताना ? उदा. सुभा झेंडेंना म्हणतो - ह्या जालिंदरचं काहीतरी करायला हवं तेव्हा किंवा शोधपथक आलं तेव्हा. चेहर्‍यावर सिरियस भाव ठेवणं किती कठीण जात असेल.

नुसत्या डोळ्यांतून दाखवेल ते सुभ्या. >>>> +++++११११२२२२२२२२२२२२२२

मायरा विस काही तरी गडबड आहे..... property sathi.... mula sathi...... kal sign pan ghetali kasha var .....

kedya ek ek pillu sodato ani gayab hoto..... jalindar la sodal gayab.... may be hech jalinder la sangaych asel .... mayara ani vis baddal... mhanun to sarkha mhanat asel.... maral asel doghani milun nandu la

पण मग सिरीयल च टायटल अस का ठेवल आहे.... वय विसरायला लावणारी प्रेम कहाणी .... सगळे प्रश्न असेच अनुत्तरीत

ईथल्या चर्चांचे संदर्भ कळावे म्हणुन मी सिरीअल बघायला सुरु केले..
काय भारी लिहितात इथे लोकं Happy Happy Happy

काल परत पोळीचे लाडु....ते हिंदी चित्रपटात कसं गोभी के पराठे आणि गाजर का हलवा फेमस केलय तसं आता मराठी सिरीअल मद्धे बहुतेक पोळीचे लाडु फेमस करतील वाटतं Happy
आणि ईतके कुक-बिक घरात असताना ७-८ पोळ्या उरतातच कशा म्हणते मी....ईतके नोकर असते तर लागतील तशा मस्त प्रत्येकाला गरमा गरम पोळ्या करुन घेतल्या असत्या आम्ही...मग उरतीलच कशा Wink
बाकी ईशा काल एका हातात पोळीचे लाडु (ते पण जवळ जवळ ९-१०) आणि दुसर्या हातात मेथीची पेंडी घेउन कुठे चालली होती...म्हणजे सुभा ला नाश्ता देता देता भाजी निवडायचा विचार होता की काय...

घरात कुकर नाही ? Uhoh

हो ना...काल मेथीची ताट्भर भाजी आणि लाडू घेऊन 'त्या' रुमसमोर बाई काय करीत होती कोण जाणे....!!!
आणि सुभाला आता आवडेनासे झाले लाडू?
Happy
केड्याला स्वतःला बहुतेक आवडेनासे झाले असतील!
स्वतःच्या मनाचे प्रतिबिंब लिहीतो ना तो!!!

काल मेथीची ताट्भर भाजी आणि लाडू घेऊन>>> सरांना शुगर आहे ना. मग एक घास लाडुचा आणि एक घास मेथीचा भरवणार असेल.

केड्याने बहुतेक मानबा आणी तुपारेची सरमिसळ केली असावी. Uhoh शन्याने शिळ्या पोळीचे लाडु बनवले आणी इकडे ईईबाळाने ताज्या गरम पोळ्या लाटुन विक्याला पोटभर जेऊ घातले असे काहीतरी त्याच्या डोक्यात असणार, पण त्या दोन्ही स्क्रिप्टची अदलाबदल झाली असणार.

हो ना...काल मेथीची ताट्भर भाजी आणि लाडू घेऊन 'त्या' रुमसमोर बाई काय करीत होती कोण जाणे....!!! >>> नंदूताईशी गप्पा मारता मारता कध्धीच निवडून होईल मेथी असा विचार करून घेऊन जात असेल Lol

इशा काल काय म्हणाली मी आथवीत असताना कुकर लावायला शिकले. हा, हा, हा, मला तर आथवीत असताना पुरणाच्या पोळीचा सगळा स्वयंपाक येत होता.

मेथीची जुडी खोलीत टाकून येणार असेल. बाहेरून आल्या आल्या नवरा (कायद्यात) रोज तिथं जाऊन बसतो म्हणून. बसल्या बसलया निवडून तरी ठेव सांगायचं आसेल.

यडपट ध्यान आहे ईशा..
आणि सुभा ईशाचा कॉमन सिन .. हा तिला जवळ ओढतोय .. "थांब कुठे निघालीस ये इकडे' म्हणून आणि ती " इथे कुठे सगळे आहेत ई." अरे लग्न झालंय ना तुमचं ? बेडरूम आहे ना ? मग लग्नाआधी चुपके चुपके भेटल्यासारखं का वागतात?

काय पांचटपणा तो लिपस्टिकच्या सीनमधे. Angry
गंमत कराय्ची ही कुठली पद्धत झाली? बालिशपणा नुसता. बेबी तिच्या वयानुसार वागतेय. (हं, गाडीत त्याच्याशी बोलताना फक्त जरा सहनीय झाली ती. .. थोडी मॅच्युअर्ड वाटली)
अरे त्याचे स्टेटस काय, सरंजामे इन्डस्ट्रीजचा मालक तो आणि त्याची ऑफीसात अशी फजिती करायची!
वर त्याला सगळीकडे मिरवुन ही मंदा घरी आल्यावर' झाला तेवढा तमाशा पुरे झाला' असे समजुन लिपस्टीक पुसते काय! नशिब! कॉरपोरेट मिन्टिन्गमधे मिरवले नाही अस.
काहीएक रोमॅन्टीक वै वाटले नाही यात. लेखक बदला बॉ सिरीयलचा.

अन बेबीचे ते लाजणे खरच डोक्यात जायला लागलय आता

काल मेथीची ताट्भर भाजी आणि लाडू घेऊन>>> सरांना शुगर आहे ना. मग एक घास लाडुचा आणि एक घास मेथीचा भरवणार असेल. >> अफाट हसले मी याला
सगळ्या पोस्ट मस्तच, फक्त तिला काळी जोगतीण म्हटलेले नाही आवडले

ला सगळीकडे मिरवुन ही मंदा घरी आल्यावर' झाला तेवढा तमाशा पुरे झाला' असे समजुन लिपस्टीक पुसते >>> ईईई
म्हणजे दिवसभरात एकदाही आरश्यात बघितले नाही का त्याने... तरीच ईतका घाणेरडा , आंघोळ न केलेला दिसतो तो पारोसा टाईप.

ते पोळीचे लाडू आवडणे मुलगी पटवायला होतं फक्त हे बेबीला कळू नये ? का मधल्या काळात नंदूने तंबी दिली - शिळपाकं खायचं नाही म्हणून

सुभाचा डबलरोल नाही ना.म्हणजे त्या बंद खोलीत उगाच डांबवून वगैरे ठेवल आहे का खर्या विस ला.....उगाच एक शंका.
की ड्युएल पर्सनँलिटी आहे.

विस चाळीतल्या घराबाबत निमकरान्शी खोट बोलला. झेन्डेने त्या नवीन भाडेकरुच्या कपाळावर रिवॉल्वर ठेवली असेल.

कारमध्ये तरी तिचा अभिनय सहनीय होता. पापा दिल्यावर ईशापेक्षा विसच जास्त लाजत होता, 'हे काय ईशा? ईश्श, आम्ही नै जा! समोर ड्रायव्हर बसलाय हयाच भान सुद्दा नाहिये तिला.

सपनाची बढती झाली वाटत, एकदम सुटाबुटात होती ती.

अगदी मायराला जळवण्यासाठी असेल तर मग तिच्यासमोरच ते पुसून आणखीन जळवायचं ना! >>>>>>>>+++++++१११११११

हो ना...काल मेथीची ताट्भर भाजी आणि लाडू घेऊन 'त्या' रुमसमोर बाई काय करीत होती कोण जाणे.. >>>>>>>>> मला पण हाच प्रश्न पडला.

काल परत पोळीचे लाडु >>>>>> हो ना. विससुद्दा कन्टाळला तेच तेच लाडू खाऊन, म्हणून त्याने रिजेक्ट केले लाडू

कितीही विश्वासू नोकर असला तरीही तो असा परवानगीशिवाय मालकिणीच्या खोलीत कसा काय घुसू शकतो? आणि खोलीचा दरवाजाही बन्द करतो?
मायरासारखी घराबाहेरची व्यक्त्ती घरात काय शिजायला हव हे ठरवते, मग आईसाहेबान्चा काय उपयोग?

सॉन्याला ईशा - मायरामधे पेटवून द्यायचे आहे का >>>>>>> हो. नाही म्हणता म्हणता सिरियलमध्ये किचन पॉलिटिक्स सुरु झाल.

सॉन्या डोळयान्ना लावलेल काकडी स्लाईस खात होती. यक्स!

नुसत्या डोळ्यांतून दाखवेल ते सुभ्या. >>>>>>> ++++++++१११११११११

आणि सुभा ईशाचा कॉमन सिन .. हा तिला जवळ ओढतोय .. "थांब कुठे निघालीस ये इकडे' >>>>>>>> मला वाटल, हयाला ऑफिसमध्ये झालेली फजिती आधीच कळली होती की क्काय. Wink

मायरा विस काही तरी गडबड आहे >>>>>>> हम्म. त्याच्या तोन्डी ईशापेक्षा मायराचीच स्तुती जास्त असते. आता तर अशी शन्का येऊ लागलीये, त्या खोलीत मायरा तर येत नसेल ना त्याला गुपचुप भेटायला?

कुणी खाल्ले नसतील पो लाडू. मग गायीला पो लाडु आणि मेथी खायला घालुन पुण्य मिळवायला जात असेल. सरांना शुगर आहे ना. मग एक घास लाडुचा आणि एक घास मेथीचा भरवणार असेल. >>>>>>>>> Rofl

ख-या विसच्या जागी माफिया डुप्लिकेटला विसला प्लांट केले असेल कदाचित. मायरा व झेंडे घर कंट्रोल करत असतील आतून. खोट्या विस ने नंदूचा खून केला असेल आणि गुप्त खोलीत खरा विस बंदिवान असेल. खोट्या विसला इशा आणि पोळीचा लाडू सुद्धा आवडत असेल Happy खर्या विसला मायरा आवडत असेल आणि पोळीचा लाडू आवडत नसेल....इशा देणं चुकतं करायला नंदुचा पुनर्जन्म घेऊन आली असेल किंवा इशा नंदूची मुलगी असेल जी तिनं काहीतरी कारणामुळे अष्टमीला निमकरांना देऊन टाकली असेल. खोट्या विसचं लग्न इशाशी झालं असेल....

आज दुपारी साम वर बेबी आणि सुभाचा इंटर्व्ह्यू होता.त्यात दोघांना त्या बंद खोलीबद्दल विचारल ,बेबी तशी हुशार आहे,म्हणाली की ते विक्रांत सरांनाच माहित.मला वाटल होत की सुभा तिच्यापेक्षा हुशार निघेल आणि म्हणेल की ते केड्याला आणि कथाकाराला माहित.पण नाही आजकाल सुभा जाम भाव खाऊन घेतोम्हणाला की फँन्समध्ये खूप स्पेक्यूलेशन्स आहेत की नंदू जिवंत असेल,कोमात असेल,तिच्या आठवणी असतील वगैरे....रोज मला असे मेल्स येत असतात.पण एक दिवस विक्रांतच ईशाला बंद खोलीच दार उघडून दाखवेल
नशीब यावेळी तरी खरी स्टोरी आता चालू होईल असे नाही म्हणाला.
सुभाला बहुतेक केड्यावर जाम विश्वास आहे,त्याला म्हण मानबा एकच दिवस बघ.म्हणजे आपोआप इंटर्व्ह्यू देण बंद करशील.

पण एक दिवस विक्रांतच ईशाला बंद खोलीच दार उघडून दाखवेल >>>>>>> म्हणजे महाएपिसोडच की? पण निदान त्यावेळी तरी विस ईशाशी खरे बोलेला ना? Uhoh

Pages