Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायराला आणि झेंडे इशाला
काल मायरा आणि झेंडे इशाला अनुक्रमे सासू/नणंद व सासरा स्टाईलनं झापत होते ते आवडलं. केड्याला आणि शर्वरीला फंडे चकाचक करायसाठी काॅर्पोरेटमधे इंटर्नशिप करायला लावायला हवी थोडे दिवस.
अरे झी चॅनेल पूर्णच आर्थिक
अरे झी चॅनेल पूर्णच आर्थिक धोक्यात आहे असे दिसते. काल शेअर्स एकदम प्लंज झाले. प्रमोटर्स नी प्लेज केलेले शेअर्स एकदम विकल्याने २बिलिअन का काय $ चा एकदम तोटा झाला. व चेअर्मन सुभाष चंद्राचे स्टे टमेंट आहे. मी चुकलो वगैरे.
बजेट अगदी कमी अस णारे. काय दिसतेय ते बघून घ्या लोक्स झी आहे तो परेन्त. ११००० कोटी की काय चे कर्ज आहे नेट्वर्क वर व देणेकरी दगादा लावत आहेत. असे काहीतरी रीअलिस्टिक दाखवा तरी . सुभा पण इशा सारखाच आहे काडी इकडची तिकडे न करता ३५०० कोटी. कायम राहतात.
हस्तर सारखा काही मामला आहे का? राजनंदिनीला रोज एकदा खोलीत काय भेटतो हा. मोहरा आणतो कि काय कणिक देउन.
सुभाचा गुस्सा एकदम फालतू. देसी प्रमोटर असतात तसा आहे. क्यालिबर दिसत नाही भोपळ्यात.
भोपळ्यात रच्याकने, शर्वरी
भोपळ्यात
रच्याकने, शर्वरी पाटणकरने जमनालाल बजाजमधून एमबीए केले आहे व नोकरीही केली आहे काही दिवस. तिला काही लिखाण स्वातंत्र्य नसणार. आत्ता मी टेक केअर गुडनाईट बघितला, त्यातही ती लेखन सहाय्यक आहे. पोरगी हुशार आहे पण झीला उपयोग करून घेता येत नाही, नाहीतर सुभाला असा कोण वाया घालवेल.
विस रागावणार नाही तर काय?
विस रागावणार नाही तर काय? हया मुलीला साधा फोन हातात घेऊन जाता येत नाही का?
एका सीन मध्ये निमकर आणि ईशा समोरासमोर होते तरीही ईशाला ते दिसले नाहीत?
काल मायरा आणि झेंडे इशाला अनुक्रमे सासू/नणंद व सासरा स्टाईलनं झापत होते ते आवडलं. >>>>>> अगदी अगदी मायराने ईशाचा उल्लेख ' आजकालच्या मुली' सासू टाईप केला. मग मायरा काय 'कालपरवाची मुलगी' आहे का?
मायरा सगळ्यांसमोर विस ला काही काही बोलते >>>>>>> पण मायराचे सगळे मुद्दे बरोबर होते, पटेल.
विस मायराला म्हणतो की, माझ्यानन्तर हा सगळा बिझनेस ईशा साम्भाळेल. आर यू सिरियस, विस? म्हणे ईबेबी बिझनेस साम्भाळेल. ह्यासाठीच तिच्याशी लग्न केल होत का? म्हणजे प्रेमबिम सगळ झूठ?
इशा नंतर येते, ते ही सर आत येऊ का असं विचारून.!!! अरे बायको आहे ना ती.. डायरेक्ट येऊच शकते ना...! >>>>>>> +++++++११११११११ शेवटच्या क्षणी मात्र फॉर्मेलिटी विसरली. अगदी घर असल्यासारख मिठी मारली त्याला. But Vikrant's consoling Isha looked best
प्रिकॅप महाविनोदी आहे. निमकरान्च्या बॅगला (हुश्श, सापडली ती बॅग बै एकदाची!) बॉम्बची बॅग समजून बन्गल्यात बॉम्ब स्कवॉडला पाचारण केलय. विसला वाटतय की जालिन्दरने ठेवलीये ती बॅग.
पोरगी हुशार आहे पण झीला उपयोग
पोरगी हुशार आहे पण झीला उपयोग करून घेता येत नाही >>> कोणालाच करून घेता येत नाही, मागे कलर्स मराठीवरच्या असावा सुंदर स्वप्नाचा बंगलामध्ये लिहायची, काहीही डायलॉग्ज. मी मालिका नव्हते बघत पण त्यानंतर माझी आवडती मालिका लागायची म्हणून tv दोन तीन मिनिटं आधी लावला जायचा.
भेटी लागी जीवा मध्ये काय सॉलिड संवाद असतात, कौतुक आहे श्रीपाद देशपांडे यांचं. त्याची add नाही करायची मला पण जे आहे ते आहे.
विस मायराला म्हणतो की,
विस मायराला म्हणतो की, माझ्यानन्तर हा सगळा बिझनेस ईशा साम्भाळेल. आर यू सिरियस, >> तो तरी कुठं सांभाळतोय?
ईशाला बहुधा काही झालं तरी
ईशाला बहुधा काही झालं तरी भोकाड पसरायचं नाही अशी सूचना दिलीय. ऑफिस सीनमध्ये तिने almost भोकाड पसरलं होतं
प्रिकॅप कहर आहे.
सरंजामे मॅन्शनला सीसीटीव्ही कॅमेरे कसे नाहीत?
मोहरा आणतो कि काय कणिक देउन.>
मोहरा आणतो कि काय कणिक देउन.>>

सुबोधची हेअर स्टाईल बदलली परत
सुबोधची हेअर स्टाईल बदलली परत. आता जरा बरा
दिसतोय.
गुंडाळलं की सगळं .. भेटले आई
गुंडाळलं की सगळं .. भेटले आई बाबा .. सगळे तुटक तुटक सीन्स.. आई बाबांच्या डोक्यावर एक पांघरून घातलं .. एका पांघरुणात दोघे कशे येतील .. आणि आणलं पण झेंडेंनी .. फुकटचे 2-3 एपि घालवले यात.. आऊट कम काही नाही..
इशा आणि जयदीप च वहिनी भाऊजीच
इशा आणि जयदीप च वहिनी भाऊजीच नात खूप गोड वाटत..
हुश्श सापडले एकदाचे आई बाबा.
हुश्श सापडले एकदाचे आई बाबा..सुटलो आपण त्या emotional अत्याचारापासून..एवढ सगळं झालं तरी बेबीच्या चेहऱ्यावर काहीच expressions नाहीत पोरगी मख्खच..आणि त्या बॅग ची चौकशी करेपर्यंत सरळ CC TV कॅमेरे चेक करायचे ना.. वीस ने एवडी security लावली आणि cc tv कॅमेरे तर असतीलच ना..
इशा आणि जयदीप च वहिनी भाऊजीच
इशा आणि जयदीप च वहिनी भाऊजीच नात खूप गोड वाटत.. >>> हो तीच पेअर चांगली दिसते.
मला तर वाटले जालिंदरबरोबर समेट ही असलाच काहीतरी पुचाट रीतीने होईल.
बाकी गोड गोड पापा गाला पर्यंत
बाकी गोड गोड पापा गाला पर्यंत आला बर का.. म्हणजे फुलाला फुलं धडकलीच नाहीयेत अजून..
आई बाबांच्या डोक्यावर एक
आई बाबांच्या डोक्यावर एक पांघरून घातलं .. एका पांघरुणात दोघे कशे येतील >> लेखक गल्ली चुकलाय.
आधीच्या लेखकानं हिरो हिरविणीसाठी पांघरूण काढून ठेवलं होतं बहुतेक. रात्रपाळीच्या लेखकानं ते चुकून आईबाबांवर टाकलं.
काल इशाला खूप दिवसांनी भोकाड
काल इशाला खूप दिवसांनी भोकाड पसरताना पाहून बरं वाटलं. इबाबां आणि इआई लगेच का नाही गावाला गेले? का इबाळाने शोधावे म्हणून घुटमळत होते?
बाॅंब स्क्वाडवाला आला तरी सगळे त्याच्या जवळच उभे होते, फुटला असता तर? ती मंदा तर अगदी आता सुतळी बाॅंब फुटणार अशा बेतानेच कानाला हात लावून होती.
एका क्षणी वाटले की बाॅंब स्क्वाडवाला तो जालिंदर असेल.
ज्या तर्हेने इपालकांना चादर अंगावर टाकून पकडलयं माझी लेक म्हणे असे तर आपण आपल्या मांजरींना पकडतो त्यांना दवाखान्यात न्यायला.
विस मायराला अगदी पोलिसांसारखा प्रश्न विचारत होता आणि घरी नोकरांना काही विचारायच्या आधीच ते खाली मान घालून उभे होते.
इबाबांनी घर विकले तर किल्ली खरेदीदाराला दिली असेल पण परत त्यांच्याकडून इतक्या लवकर इबाबांना देऊन घर त्यांच्या नावावर केले पण? रुपालीची आई घेणार होती ना ते घर?
इबाळ आता हळू आवाजात बोलायला
इबाळ आता हळू आवाजात बोलायला लागले आहे, जेणेकरून भसाडा आवाज येणार नाही.
मागे विस आणि इबाळाची
मागे विस आणि इबाळाची फोटोफ्रेम खाली पडली... पडणार नाही तर काय? किती ती नीट लावलेली फ्रेम विस हलवून हलवून सारखी करत होता.
हे थोपुवर ढापलेले दिसले
हे थोपुवर ढापलेले दिसले




झी चा कोसळता डोलारा
झी चा कोसळता डोलारा सांभाळण्यासाठी सुभाष चंद्राने इशाला अपॉइंटमेंट केलंय. ईशा आता नवनवीन युक्त्या वापरून zeel ला सावरणार. या बातमीमुळे निवेशकांमध्ये उत्साह संचारला असून उद्या Zeel गॅप अप ओपनिंग देणार आहे.
मी बाकी सगळ अँटलिस्ट इमँजिन
मी बाकी सगळ अँटलिस्ट इमँजिन करु शकते,पण बेबी कराटे चँम्पियन केवळ अशक्य
o babaaaaaa
o babaaaaaa
काल भोंडला स्टाइल मॅनेजमेण्ट
काल भोंडला स्टाइल मॅनेजमेण्ट तर आज जातपंचायत स्टाइल. कंपनी च्या सीईओ ला सर्वांसमोर जाब विचारत आहे मायरा की ईशाला इतक्या लौकर राजनंदिनी हेड केलेत, माझ्या मागून आलेले माझ्या पुढे गेलेत वगैरे वगैरे. त्यात नवीन सीईओला त्याचे लग्न झाल्यावर एक दोन दिवसांत त्याची बायको त्याच्याशी कशी वागत आहे याबद्दल ही काड्या घालत आहे. एक फोन लागला नाही म्हणून हे सगळे. आणि मुळात सगळे घोळ इतके पुचाट आहेत की विक्या जर कार काढून तिकडे गेला तर १० मिनीटांत खुलासा होईल. तू नको जाउ, कोणालातरी पाठव. ड्रायव्हर कडे मोबाईल नाही? एरव्ही फोन ने काम होण्यासारखे असताना सगळा स्टाफ इकडेतिकडे फिरत बसतो, इथे जायची गरज आहे तर केबिन मधे येरझारा घालत बसलेत.
त्यात विक्याने बोलता बोलता सांगून टाकले की ईशावरच्या प्रेमापोटीच हे सगळे केले. म्हणजे तिची पात्रता नसण्याची कबुलीही दिली. पण लगेच त्याच्यानंतर ईशाच हे सांभाळेल हेही लगेच सांगतोय. लॉजिक नावाची वस्तू या सर्वांना थोडी थोडी देण्याची गरज आहे.
तिकडे ईशाचा अफलातून शोध सुरू आहे. सगळे स्लो-मो मधे. बाबांनाच शोधत असताना निर्मनुष्य रस्त्यावर ते बाबा केवळ रस्त्याच्या दुसर्या बाजूने चालत असल्याने हिला दिसत नाहीत. प्रत्येक चौकात फक्त उजव्या किंवा फक्त डाव्या बाजूला शोधायचे या पद्धतीने शोध सुरू असल्याने अनेक चौकात बाबा इकडे, तर ही तिकडे बघत आहे, अशा शोध.
तो बाबाही अफाट. घर विकले तर नोकरी कशाला सोडली? का पॅकेज डील होते त्या घरात राहूनच ती नोकरी करता येइल वगैरे?
ती मायरा सर्वांसमोर इतकी हतबलता दाखवत आहे की तेथील प्रत्येक स्टाफला आपली बॉस काही उपयोगाची नाही असेच वाटेल. आणि आता सीईओ आपल्या बायकोला सर्व स्टाफसमोर झापतोय, की तुला कशाचीच किंमत नाही. ही मॅनेजमेण्ट स्टाइलच काय, ही फॅमिली ड्रामा स्टाइलही नवीन आहे.
ज्या व्यक्तीला बरेच काही सांगायचे आहे, जे सांगून पुढचे १०-१५ मिनीटांचे गोंधळ आपोआप वाचतील अशी व्यक्ती दुसर्या व्यक्तीला बकवास करू देउन पुचाटपणे "सर माझं ऐकून तरी घ्या" करत बसते, हे ७०-९० च्या दशकातील टॅक्टिक आपल्या सिरीयल्स च्या अजून उपयोगी पडत आहे. कार मधे बसल्यावर तिने मिस्ड कॉल्स बघून उलटा फोन का केला नाही वगैरे लॉजिकल प्रश्न यांना पडत नाहीत.
आपल्या पासून दोन फुटावर जर फ्रेम खाली पडली, तर नक्की कोठे पाहायचे याचे अभिनय प्रशिक्षण घेणे ईशाला जरूरी आहे. फ्रेम पडली भिंतीलगत आणि ही पाहात आहे स्वतःच्या पायाशी.
आणि हे सगळे फक्त १०-१२ मिनीटांत. सर्वात कॉमेडी एपिसोड दिसतोय आत्तापर्यंतचा.
हे ऑफिस आहे की नवरा बायकोचे बेडरूम हे एकदा यांनी ठरवावे. म्हणजे कोणते फोटो लावावेत, कोणी कोठे डायरेक्ट जावे वगैरे सर्वांना क्लिअर होईल.
ईशा घरी गेली तर घराला कुलूप होते आणि आई बाबा घरी नव्हते! बाप रे. काय भयंकर गोष्ट आहे! विक्या सुद्धा खुर्चीतून उठून उभा राहिला! अरे जरा थांब. असा काळाच्या पुढे असलेला अभिनय करू नको. अजून तुला ईशाने सांगायची आहे बाकी कहाणी. नुसते कुलूप होते ऐकल्यावर इतका धक्का बसल्याचा अभिनय करायची गरज नाही. ते एक्स्प्रेशन्स नंतर घर विकल्याचे कळल्यावर द्यायचे आहेत. लॉजिक उपलब्ध नाहीच, तर निदान एक्स्प्रेशन्स तरी पुरवून वापर!
लोल / हास्यकल्लोळ / हसुन
लोल / हास्यकल्लोळ / हसुन गडाबडा
रुबरु विथ सुबोध भावे आहे इथे पुढच्या महिन्यात, तेंव्हा हे सुबोध ला वाचायला द्यावे काय?????
फारएन्ड>>> सहीच एकदम
फारएन्ड>>> सहीच एकदम

इथले प्रतिसाद वाचायला फार मजा
इथले प्रतिसाद वाचायला फार मजा येते. ही शिरेल पहातानाही हेच मनात येतं की आता पब्लिक त्याची कशी पिसे काढेल. And you guys never disappoint me.;)
परवाचा एपिसोड महान होता.
फारेंड, षटकारांवर षटकार आहेत
फारेंड, षटकारांवर षटकार आहेत पण सल्ला देऊ का? एवढे आतडी पिळवटून नका हो बघू.
सुभा कसा चिलमधे सिन्स देतो किनी, तसंच बघायचं आपण पण 
आईसाहेब प्रत्येक "श" चा उच्चार "ष" सारखा करतात हे जाणवलं का कुणाला?
ईशा घरी गेली तर घराला कुलूप
ईशा घरी गेली तर घराला कुलूप होते आणि आई बाबा घरी नव्हते! बाप रे. काय भयंकर गोष्ट आहे! विक्या सुद्धा खुर्चीतून उठून उभा राहिला! अरे जरा थांब. असा काळाच्या पुढे असलेला अभिनय करू नको. अजून तुला ईशाने सांगायची आहे बाकी कहाणी. नुसते कुलूप होते ऐकल्यावर इतका धक्का बसल्याचा अभिनय करायची गरज नाही. ते एक्स्प्रेशन्स नंतर घर विकल्याचे कळल्यावर द्यायचे आहेत. लॉजिक उपलब्ध नाहीच, तर निदान एक्स्प्रेशन्स तरी पुरवून वापर!>>>>>>>>> कहर
आईसाहेब प्रत्येक "श" चा
आईसाहेब प्रत्येक "श" चा उच्चार "ष" सारखा करतात हे जाणवलं का कुणाला?
नवीन Submitted by मेधावि on 28 January, 2019 - 09:19>> हो हो ती बाई बोलली की मी प्रत्येक वाक्य तसे म्हणून बघते.
. ही शिरेल पहातानाही हेच मनात
. ही शिरेल पहातानाही हेच मनात येतं की आता पब्लिक त्याची कशी पिसे काढेल. And you guys never disappoint me.;)>>>>
शिरेल वल्यानी farend ला सुपारी दिली आहे TrP वाढवायची
Pages