तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हॉट्सॅप साभार

सनसनाटी बातमी : तुला पाहते मालिकेची पुढील कलाटणी : राज नंदिनी जिवंत असते. सरंजामे महालातील त्या विशिष्ट्य खोलीत एक गुप्त दार असते, त्यातून निघणारे भुयार महालाच्या कंपाऊंड बाहेर निघते. त्यातून बाहेर जात सर तिला भेटतात, कारण राज नंदिनी च्या जीवास व्हिलन कडून धोका असतो, म्हणून ती मृत आहे असे नाटक करावे लागते. इशाचे वडील खरे सी बी आय अधिकारी असतात व तपस त्यांच्याकडे असतो, त्या करता सर व इशाचे वडील तिला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन पुनर्विवाहाचा घाट घालतात. इशा कराटे चॅम्प असते ती सहकार्य करते . सरांचा भाऊ, वाहिनी हेच व्हिलन असतात. शेवट मैरा भेंडे विवाह, व्हिलन ला अटक, निमकराना सी बी आय चिफ पोस्ट मिळते. इशा चा बॉयफ्रेंड मोठ्या पोस्ट वर माइक्रो सॉफ्ट मध्ये असतो. त्यांचे लग्न सर लावून देतात. मग सरंजामे माइक्रो सॉफ्ट एस एम एस ने विकत घेऊन त्यात दोन रुपये घालून आहेर म्हणून तिला देतात. स्वतः बटाटा वाडा गाडी टाकतात. झेंडे व मैरा त्यांना जॉईन होतात. गाडीचे नाव राजनंदिनी वडापाव ! वडा पाव चांदीच्या वाटीतून देणार..................

आईसाहेब दिसल्या की नमस्कार, ईशा दिसली की पापा. थोरांस नमस्कार लहानांस पापा. हाकानाका. >>> Lol

मित - त्या रेसिपीज आणि ती आख्खी पोस्ट धमाल आहे.

मी पुन्हा ३-४ भाग मागे आहे. पण अनेकदा एखादा एपिसोड इतका बोअर असतो की पुढे बघवतच नाही. काही कारण दिसत नसताना स्टेशन वर गाडी अर्धा तास थांबावी तसा पूर्ण एपिसोड नुसता लाजणे, रडणे आणि इकडून तिकडे स्लोमो मधे चालणे यात घालवतात. मी पाहिला तो तसाच होता. ईशाचे बहुधा दिवसभर सरांसाठी जेवायला थांबेन पण त्यांना फोन करणार नाही असे व्रत असावे. तिकडे झेंड्या विक्याला उठसूठ फोन करतोय पण ईशा करत नाही. बरं जेवायला थांबते तर शब्दशः टेबलच्या बाजूला उभे राहायची काय गरज आहे. तोपर्यंत इतर कामे करत आहे वगैरेही नाही. तेवढ्यात ती सॉन्या येउन उगाचच तिरसट/तुसडे डॉयलॉग मारून जाते. तुसडे लोकही इतके दिवसभर तुसडे नसतात. ती भयानक डोक्यात जाते सॉन्या. तुसडेपणाने वागते म्हणून नव्हे, तर तिच्या तुसडेपणाला काही लॉजिकच नाही म्हणून. अर्थात एकूणच लॉजिकचा सुकाळ आहे त्यामुळे त्यात तिचा दोष नाही.

आता मायराच्या स्थळवर्णनात विणकाम भरतकाम वगैरे पूर्वी असे तसे सुतारकाम गवंडीकाम जनरल कॉण्ट्रॅक्टरगिरी, सरांचे कोट्/जॅकेट कोणते असावे यात पोकिंग ही कौशल्ये ही येतील असे दिसते. कारण मी काल थांबलो त्या पॉइण्टला तो तिला ईशाचे केबिन बनवायला सांगत होता. आणि झेंडे मदत करणार. पुढे बहुधा सगळा स्टाफ ईशाचे केबिन बनवताना दिसेल.

विकुनं मायराला इशाला विचारून तिच्या केबिनचं काम करा म्हणून सांगीतलं तेव्हा ती सणकून..."इशाला काय कळतं त्यातलं" असं म्हणाली ते फार फार भिडलंच काळजाला. आजवर एवढा रिअलिस्टीक डायलाॅग झालाच नव्हता ह्या सिरीअलमधे.

सरंजामे हाऊसचा सेट बदलल्यासारखावाटतोय का?
विक्याला विग लावलाय का सद्ध्या?
पूर्वी घराच्या मेन गेटसमोर कार थांबायची. काल सोन्या निमकरांना सामान खाली ठेऊन वरच्या मजल्यावर घरी जा म्हणाली.

कॉमेडी नाईट्स वुइथ निमकर्स.. येडछाप.. नक्षत्रांचे देणे आहे ह्या रविवारी, स्नेहल भाटकर. परत एक एक कलाकार घेऊन झीने नक्षत्रांचे देणे कार्यक्रम करावा . ☺️

सरंजामे हाऊसचा सेट बदलल्यासारखावाटतोय का? हो, जेवन टेबल , मेन दरवाजा , जिना सगळच वेगळ आहे

ईशा एकदम ६०/७० च्या दशकातील नायिकांप्रमाणे वागू लागली आहे. नवर्‍याचे पाकीट, रूमाल वगैरे काय काढून ठेवते? आणि विक्याही महान "हे सगळं तू केलंस?" विचारतो. सगळं म्हणजे काय तर त्याचा कोट्/जॅकेट, पेन, रूमाल आणि पाकीट काढून बेडवर ठेवले. प्रचंड मेहनतीचे काम.

"मी लाडू करणार आहे" म्हंटल्यावर मला वाटले बाजूने आईसाहेब सीनमधे टपकतील आणि म्हणतील "लाडू झाले. आता पेढे किंवा बर्फीचं बघा". पण इथे अजून दोन फुले एकमेकांवर आपटल्याचा सीन झालेला नाही.

तो एक नोकर सुभाष घई किंवा बडजात्यांच्या चित्रपटांतून थेट आलेला आहे. इतक्या तरूणपणी सस्पेण्डर्स घालून फिरणारा परदेस मधल्या शाखानंतर हाच.

सगळे लाडू वळत असताना वड्या करण्याकरता जयदीप "my friend vahini, do something creative" म्हणतो. तेव्हा मला वाटले ईशा आता तेच लाडू परत ताटात थापून वड्या करते की काय. कारण आत्तापर्यंत तिला एकातून दुसरे वगैरेच फक्त आयडिया सुचतात.

"सर, त्या वरच्या खोलीत काय आहे?" विचारल्यावर विक्याचा चेहरा "काय सांगू तुला. कथालेखकाने एक तो खोलीचा अगम्य सीन लिहीला आहे. त्यालाच माहीत नाही तेथे काय आहे"

नवर्‍याचे पाकीट, रूमाल वगैरे काय काढून ठेवते? ~~~~
म्हणजे कधी ही पुढचा संवाद आपल्या कानांवर आदळू शकतो -
"सर, आधी पेरुचापापा , मग इशाचा पापा " Wink

फारएंड....... Happy झालं का कॅच अप?
तो नोकर "राझी' तल्या त्या नोकरा सारखा तर नाहीए ना?
जयदीप तसा फार चांगला आहे मनाने....!! माय फ्रेंड वहिनी जेवेना; तर सॉन्याला म्हणे की तू तिच्या आई वडिलांना का नाही था थांबविलंस?
बाकी स्टोरी तर सगळा अंधार आहे!
मंदिरात झोपणे काय, कपडे वाटप काय, अन्नदान काय , भिकारी काय....!!!!!
ऑफुल!!

फारएण्ड.....लवकर एकदा निमकरांच्या स्वाभिमान नाट्यावर याच.फार दूर नाही आहात.मध्ये एक 10 मिनिटासाठी जालिंदर टपकेल आणि मग निमकर मानअपमान नाट सुरू
बाकी वरच रसग्रहण as usualबेस्ट

विचारल्यावर विक्याचा चेहरा "काय सांगू तुला. कथालेखकाने एक तो खोलीचा अगम्य सीन लिहीला आहे. त्यालाच माहीत नाही तेथे काय आहे" Lol

तुसडे लोकही इतके दिवसभर तुसडे नसतात. >>> हो खरंय Lol

"इशाला काय कळतं त्यातलं" असं म्हणाली ते फार फार भिडलंच काळजाला. आजवर एवढा रिअलिस्टीक डायलाॅग झालाच नव्हता ह्या सिरीअलमधे.>>> अगदी. कसलं तिडकीने म्हणाली ती.

ईशा आता तेच लाडू परत ताटात थापून वड्या करते की काय. >>>> Lol

आंगो, खरंच आता निमकरांचं जे काही दाखवताहेत ते ऑफुलच आहे.
लग्न झाल्यावर निमकरांना कटापच करायचं होतं ना. कशाला हे दळभद्री नाट्य Angry

आज नाही करणार नोटीस.
निमकर पुन्हा वणवण भटकतील, जालिंदर काकांना ते कळेल.. ते निमकरांना नोकरी देऊन खबरी बनवतील. पण निमकर साधे (पक्षी: बिनडोक) असल्याने ते खबरी आहेत हेच त्यांना कळणार नाही. मग खूप नाट्यमय प्रसंग घडून हे उघडकीला येईल.
किंवा
बेबी सरप्राईज देण्यासाठी चाळीत जाईल. तेव्हा तिला तिथे कळेल. तिला धक्का बसेल. ती आई बाबांना घरी आणेल. मग सरंजामे ग्रुप मध्ये स्वतःची कुवत नसून सुद्धा विक्रांत सर्रांमुळे मोठ्या पदावर नोकरी करेल. आणि चाळीतलं घर विकत घेईल. आणि डायलॉग म
मारेल ' मी कोण्णाच्चीच्च देणी ठेवत नाही'

बेबी आजच चाळीत जाणार आहे .. सो तिला कळेल आई बाबा निघुन गेले आहेत पण कुठे ते कळणार नाही.. वर बाबांनी मोबाइल स्विच ऑफ केला आहे.. मग शोधा शोध होइल.. लेखकाला प्रकरण गुंडाळायच असेल तर लगेच सापडतिल.. नाहितर आहेच टाईमपास

नाही...आजवरचा इतिहास पाहता.....लगेच नाहीत गुंडाळणार.....
असे गेस करता करता मा न बा त आपले ऑलरेडी हात पोळले आहेत...!!! आता आपण ताकही फुंकून प्यायला पाहीजे!
ती चाळीत जाईल... रुपाली इ.. इ कडे टाईमपास करत...आधी घरी लवकर पोहोचणारच नाही......... ८:५५ पर्यंत..... मग फक्त दार उघडंच व आत कुणी नाही असं बघून... "हे काय गं आयडू....मला सरप्राईज द्यायचं ठरविलंत ना....? जा........."....वगैरे नाटकं होऊन..... "बाबा, ...........आई "...असा टाहो फोडेपर्यंत...... उद्याचाही एपिसोड संपेल.
(सरप्राईज - म्हणजे (विक्रांत!) सर यांचे प्राईझ!!) जे तिनेच तिला दिलं आहे!
Angry

पुर्वि कमेन्त वाचायल मजा यायचि अता तिहि नहि.
नुसत सन्ताप सन्ताप होतोय मझा.
किति तो फाल्तुपना.

हा जो कोण केड्या आहे त्याला शोधलं पाहिजे
फारच उच्च प्रतीचा माल आहे दिसतोय त्याच्याकडे
कुठून असे काही सुचू शकते याला
इतकी वैचारिक गरिबी कुठून आली असेल
पाट्या टाकयाचे काम आहे म्हणले तरी पाणी घालतोय असेही नाही
रस्त्यात दिसलेला सगळा कचरा पाण्यात टाकून त्याला उकळी आणून सूप म्हणून पाजयाचे धंदे

तुपारे अकाली संपणार,सुभा मालिका सोडणार,अशा अफवांना काल सुभाने त्याच्या इंन्स्टाग्रामवर कमेंट करुन पूर्णविराम दिला आहे.
सुभा उवाच......ह्या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल आहे आणि करत आहेत(केवळ तुझ्यामुळे रे).मी ही मालिका सोडणार नाही(झी वाल्यांसारखी सोन्याच अंड देणारी कोंबडी सोडायला मी काय निमकर बाबा वाटलो)
मालिका सुध्दा तिची गोष्ट जेव्हा संपेल तेव्हाच निरोप घेईल.
पण सुभाच आधी म्हणाला होता की मालिका मर्यादित भागांची आहे,आता तर २००भाग व्हायला आले असतील,मग मर्यादित भाग मँहणजे नेमके किती?
दुसरी शंका म्हणजे मालिकेची नेमकी स
टोरी ठरली आहे का? कारण अजूनपर्यंत ती शिळ्या पोळीचे किंवा ताज्या पोळीचे लाडू,फोडणीचा भात, गोड पापा,अस काय हो सर, पतंग यामध्येच अडकली आहे.मग नक्की सुरू होणार कधी वेळेवर संपायला.

हे घ्या आंतरजालावरून साभार (कॉपी पेस्ट ) Happy

आपल्याला एवढी नावे पुरे आहेत सध्या शिव्या घालायला Wink Wink
Story : Shekhar Dhavalikar
Screenplay : Abhijeet Guru
Dialogues : Sharvari Patankar
Episode Director : Sumit Komurlekar
Title Track : Vaibhav Joshi
Costumes : Subodh Bhave, Shalmali Tol and Rahul Agasthi>> ३-३ लोक मिळून कपडेपट संभाळतायत म्हणूनच परवा इशा चा तिरंगी ड्रेस बघायला मिळाला असणार .. प्रत्येकाने आपापल्या घरून एक कपडा आणायचा म तो कोणत्या का रंगाचा असेना Uhoh या बेसिक कॉन्सेप्ट वर काम चालतंय असं दिसतंय

शर्वरी पाटणकर म्हणजे ती actress ना? आई ga तरीही असे डायलॉग.. आणि काल तो माणूस देवळातून असा घाबरून पळून का गेला.. ईशा आईला घाबरून की अजून काही

शर्वरी पाटणकर म्हणजे ती actress ना? >>> हो. प्रपंच, झोका, आनंदवन सारख्या सिरियल्सचे संस्कार आहेत हिच्यावर खरं तर. पण लेखिका म्हणून ते उतरले नसावेत बहुतेक Lol

स्वातंत्र्य मिळत नसावं बहुतेक तितकं.

Title Track : Vaibhav Joshi >>> ह्यांनी गाणं छान लिहिलंय मात्र.

प्रियदर्शिनी देशपांडे, श्रीपाद देशपांडे ह्या लोकांनी सिरियलमध्ये लिहिलेले डायलॉग्ज मला खूप आवडलेले आहेत. अर्थात ते दुसऱ्या सिरियल्समध्ये लिहितात.

Costumes : Subodh Bhave, Shalmali Tol and Rahul Agasthi >>>>>> मी Costumes मध्ये प्राची अशोक शिन्दे अस नाव वाचल ती अशोक शिन्देची मुलगी आहे का?

सुभा स्वतःचे Costumes स्वतः निवडत असेल तर त्याला म्हणाव कालचा निळा शर्ट छान होता. आज सफेद शर्ट मध्येही (जेवताना घातलेला) तो छान दिसला. बाकी देवळात जाताना घातलेला कोट आदल्या दिवशीचा होता.

ईशा रात्री तिरन्गी ड्रेस न बदलता झोपली. Sad

देवळाच सुद्दा इन्टेरिअर बदललय का? Uhoh

आता ती बॅग ठेवलीये ते विस आणि इतर घरच्यान्ना दिसणार/ कळणार तरी कस? तोपर्यन्त ती बॅग तिथेच खितपत पडून राहील.

जयदीप तसा फार चांगला आहे मनाने....!! माय फ्रेंड वहिनी जेवेना; तर सॉन्याला म्हणे की तू तिच्या आई वडिलांना का नाही था थांबविलंस? >>>>>> ++++++++११११११११ आणि हजरजबाबी सुद्दा आहे. सॉन्याने पतन्ग खेळणे डाउनमार्केट बोलल्यावर जयदीपने तिला सडेतोड उत्तर दिल.

पण सुभाच आधी म्हणाला होता की मालिका मर्यादित भागांची आहे,आता तर २००भाग व्हायला आले असतील,मग मर्यादित भाग मँहणजे नेमके किती? >>>>>> शशान्क केतकर सुद्दा असच म्हणाला होता की होमिसुयाघ सहा महिन्यात सम्पेल. दोन वर्षानन्तर प्रेक्षकान्ची सुटका झाली.

एकीकडे निमकर ईशाला यात्रेला जातो म्हणाले. त्यान्च्या हातातील कपडयान्ची बॅग ईशा आणि विसला दिसली नाही का? हे दोघे असे कसे गृहीत धरु शकतात की निमकर इथून घरी जाणार आहेत ते?

ईशाचे आई बाबा हयाआधीही देवळात ईशाबरोबर आले होते. मग आता त्यान्ना देवळातल कोणीच कस ओळखत नाही?

निमकरला जेवण देण्यासाठी कार कोणी पाठवली? जालिन्दरने की विसने? विसला आधीपासूनच निमकर रस्त्यावर आलेत हे माहित होत का?

स्वातंत्र्य मिळत नसावं बहुतेक तितकं >>>>>>> म्हणूनच रोहिणी निनावे मानबा सोडून गेल्या.

Title Track : Vaibhav Joshi >>> ह्यांनी गाणं छान लिहिलंय मात्र. >>>>>>> +++++++ २२२२२२२२

continuity पण गंडली होती का काल?
जेवणाच्या टेबलवर सुभा पांढऱ्या झब्ब्यात आणि बेबी त्या तिरंगी ड्रेसमध्ये होती.
नंतर बेडरूम प्रसंगात तिची हळदी कुंकवाची साडी आणि सुभाचा निळा शर्ट होता

continuity पण गंडली होती का काल? >>>>>>>
हे असं आहे ! तुम्ही लोक इतक्या काळजीपूर्वक मालिका पाहता ना, त्यामुळेच ह्यांचा ट्यार्पी वाढतो आणि सोबत आचरटपणा करायचा उत्साह पण !
Wink Light 1

Pages