Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वडीलांकडे आई चादर फेकते
वडीलांकडे आई चादर फेकते तेव्हा विक्या व इशा समोरच आहेत त्यांना दिसत नाही? सीरीअल लॉजिक>>अहो असं काय करताय? आई लपली आहे ना झाडामागे.
(नुसती चादर उडत आली तर चालतं त्यांना. )
पुढच्या नोटबंदीच्या आत ती
पुढच्या नोटबंदीच्या आत ती ब्याक सापडली म्हणजे मिळवली
गॉड ऑफ स्मॉल थिन्ग्स पुस्तकात
गॉड ऑफ स्मॉल थिन्ग्स पुस्तकात एक किस्सा आहे. अम्मू च्या भावाची फिरंग बायको तिच्या सासू ला पटत नाही. त्यापेक्षा मुलाने धंदे वाइक स्त्रियांना पॅ ट्रनेज द्यायला हवे असा तिचा मानस अस्तो. तर फिरंग सून येते सासरी तेव्हा सासू रोज तिच्या ड्रेसेसच्या खिश्यात थोडे बहुत पैसे ठेवते. सुनेला बिचारीला ह्याची काहीच कल्पना नसते ती कपडे तसेच धुवायला टाकते. रोज कपडे न्यायला येणार्या धोब्याला मात्र चेक करताना कॅश सापडते आणि त्याचा फायदा होतो. त्यामुळे तो खुष. * हे पुस्त कात आहे मी लिहीलेले नाही. तरी ऑफेंड होउ नये.
लिहायचे कारण ती पैशांची बॅग अशी कुठे तरी ठेवली आहे न सांगता वगैरे तर ती वॉचमन,
मेड कोणाला तरी सापडेल व गायब ही होईल. सरंजामे सेटप मध्ये आठ दहा कोटींनी पण फरक पडत नाही तर ही तर स्मॉल चेंज.
अरूण जिंदगी से उठ गये और किसी को पता भी नही चला क्युंकी दो करोड भी चिल्लर होता है
Episode Director : Sumit
Episode Director : Sumit Komurlekar
हा माझा केळकर काॅलेजचा मित्र आहे, त्याला आपल्या या धाग्याची लिंक पाठवावी म्हणत्ये... कळेल झी वालांना सीरियलची किती पिसं निघतायंत आणि किती बकवास होत चालल्ये मालिका ते !!!
खरच, सिन मधे कट होतात तिकडे तरी बघ म्हणाव, नाही बाकी काहीतरी
आणि ईशाई ने फेकलेली चादर आणि
आणि ईशाई ने फेकलेली चादर आणि निमकरांच्या शेजारी बसलेले लाभार्थी काका या दोघांच्या चादरी सेम टू सेम डिझाईन च्या होत्या ...
इतका योगायोग होऊ शकतो यावर माझा खरंच विश्वास नाही .. कहर चालू आहे मालिकेत
२ वेगवेगळ्या चादरी नाही देऊ शकत निर्माता ? तो नाही देत तर नाही दिग्दर्शकाला किंवा बाकी कोणालाच लक्षात येऊ नये ?? निदान त्यावर एखादा कागद तरी चिकटवायचा .. सोन्याच्या पतंगाचा पुठ्ठा तरी लावायचा ..
जेव्हा सुभा दोघान्चा फोटो एका विशिष्ट ठिकाणी लावतो त्यानंतर फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं (इशा एके ठिकाणी फुलं ठेवते आणि सुभा चिडतो हा कचरा कोणी ठेवला इथे वगैरे ) ती फ्लॅशबॅक मधली जागा आणि आज फोटो लावला ती जागा किती वेगवेगळ्या होत्या / आहेत ..
मला वाटतंय सुभा च्या ऑफिस चं लोकेशन पण बदललंय .. पण मग कशाला नको ते फ्लॅशबॅक दाखवतात पोपट करून घ्यायला
हो ना... ती फ्लॅशबॅक मधली
हो ना... ती फ्लॅशबॅक मधली जागा आणि आज फोटो लावला ती जागा किती वेगवेगळ्या होत्या / आहेत ..++
मलाही हेच वाटलेलं....!!
सु भाच्या ऑफीस चं लोकेशन पण बदललंय....आणि सरंजामे बंगला पण....
मायराने ईशाच्या केबिन मधे टेबलवर दोन लाल-ऑरेंज हार्ट शेप्ड उशा टाईप काय ठेवलं होतं..कुणी नोटीस केलं का?
कालचा भाग आज पाहिला,सगळ
कालचा भाग आज पाहिला,सगळ लॉजिकला सोडून चालल आहे.
पण काल एक गोष्ट मात्र फार आवडली,ती म्हणजे बाबांनी घर विकल्याच कळल्यावर बेबीने ते जगप्रसिध्द भोकाड पसरले नाही.
प्रिकँपमध्ये तो फोटो का पडतो ते कळल नाही.
मागचे २-३ भाग बघितले नाही.
मागचे २-३ भाग बघितले नाही. पण इथल्या मेसेज वरुन बरेच काही घडुन गेल्याचे दिसतेय.

<<<मायराने ईशाच्या केबिन मधे टेबलवर दोन लाल-ऑरेंज हार्ट शेप्ड उशा टाईप काय ठेवलं होतं..कुणी नोटीस केलं का?<< ऑ!
आता दोघेही झोपणार काय टेबलावर डोकी ठेवुन!
आर्या...
आर्या...
दोन लाल-ऑरेंज हार्ट शेप्ड उशा
दोन लाल-ऑरेंज हार्ट शेप्ड उशा टाईप काय ठेवलं होतं>> कुणास ठाऊक मला त्या गिफ्ट च्या पिशव्या वाटल्या हल्ली ओटीचे तांदूळ आणि हळदीकुंकू च फुल भरून देतात ना पोतडी सारख्या तश्या ...
आणि इशा चं स्लॅम बुक पण होतं टेबलावर असं मला तरी दिसलं ..फुलं चिकटवलेली ती बारकी वही .. ते कसं काय तिने मायरा ला दिलं ? आणि केव्हा ?
काय हे ?! आधी आपण किती ते सुभा चे कातिल लूक्स बघायला उत्सुक असायचो .. बदामाच्या राशी काय आणि काय काय .. आणि आता नुसती पिसं च पिसं

पण ईबाळाला केबिन का हवी ?
पण ईबाळाला केबिन का हवी ? तिने कधी ऑफिसचा विषय काढलेला दिसला नाही.
बजेट किती कमी असावं ? आईसाहेब लग्नानंतर २ दिवस एकाच साडीत.
कोणी तो बेबेच्या फेमस
कोणी तो बेबेच्या फेमस रडण्याचा एपिइसोड लिंक देइल का?
चहायेद्या मध्ये बरीच फजिती करत होते पण मी सिरियल बघत नसल्याने कळत न्हवती. फक्त ते स्स्स्स्सर्र म्हणणे समज्ले.
धन्यव्वद्द
कोणी तो बेबेच्या फेमस
कोणी तो बेबेच्या फेमस रडण्याचा एपिइसोड लिंक देइल का?
चहायेद्या मध्ये बरीच फजिती करत होते पण मी सिरियल बघत नसल्याने कळत न्हवती. फक्त ते स्स्स्स्सर्र म्हणणे समज्ले.
धन्यव्वद्द
ती म्हणजे बाबांनी घर विकल्याच
ती म्हणजे बाबांनी घर विकल्याच कळल्यावर बेबीने ते जगप्रसिध्द भोकाड पसरले नाही.>>>>> मनातलं लिहिलंत!ते भोकांड आणि त्याहीपेक्षा लाजणे! डोक्यात जाते ती लाजली की.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=dN49fZSWHMI
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=R1eklmAt-xY
म्हणजे बाबांनी घर विकल्याच
म्हणजे बाबांनी घर विकल्याच कळल्यावर बेबीने ते जगप्रसिध्द भोकाड पसरले नाही.>> त्या भोकाड पसरण्याने हवा येऊ द्या टीम ला आयते पंचेस मिळालेत.. मस्त उडवली दोन्ही वेळी
अमा पैशांच्या बॅग बद्दलची
अमा पैशांच्या बॅग बद्दलची पोस्ट तंतोतंत पटली. काय नॉन्सेन्स आहे? चाळितले घर विकून किती पैसे आले असतील? खुल्याने बोलायला काय जाते लोकांना?
अमा पैशांच्या बॅग बद्दलची
अमा पैशांच्या बॅग बद्दलची पोस्ट तंतोतंत पटली. काय नॉन्सेन्स आहे? चाळितले घर विकून किती पैसे आले असतील? खुल्याने बोलायला काय जाते लोकांना? >>> + ११ बोललेच नाहीत तर सरंजाम्यांना काय स्वप्न पडणार आहे की हे पैसे निमकरांनी लग्नाचा अर्धा खर्च म्हणून दिलेत. बरं इतके स्वाभिमानी निमकर त्यांना एकदाही हा विचार मनात आला नाही की, आपण रस्त्यावर आलेल आज ना उद्या आपल्या मुलीला कळल्यावर ती आपल्याला तसच सोडून देणार नाही म्हणजे मग पुन्हा जावयाचे आभार उपकार घेतच रहावं लागेल. तेव्हा स्वाभिमान निमूट गुंडाळून ठेवावा लागेल. असला स्वाभिमान काय कामाचा
कालच्या क्लिप मधे सुभा इशावर ओरडताना दाखवला आहे "मी इतकं करतोय तुझ्यासाठी त्याच तुला काहीच नाही". मला क्षणभर सुभावर रागवावसं वाटल "तु काम करतोयस म्हणून इतके दिवस सिरीयल पहातोय आणि त्यात तुम्ही लोक इतका मुर्खपणा दाखवताय? आम्ही प्रेक्षक इतक प्रेम करतो तुमच्यावर त्याच तुम्हाला काहीच नाही."
"तु काम करतोयस म्हणून इतके
"तु काम करतोयस म्हणून इतके दिवस सिरीयल पहातोय आणि त्यात तुम्ही लोक इतका मुर्खपणा दाखवताय? आम्ही प्रेक्षक इतक प्रेम करतो तुमच्यावर त्याच तुम्हाला काहीच नाही.">>>> +१ सुभाला सांगायला हवं 'तुलाच पहात होते रे'
सध्या सुभा येवढा कन्फ्युज
सध्या सुभा येवढा कन्फ्युज वाटतो ना .. हसु की रडु.. रोमँटिक वागु की खडुस .. काही काही कळेना झालय त्याला.. घरात ऑलरेडी जय्दीप एक वेडा होताच की.. त्यात ईशा आली.. आता विकु पण वेडा..
ती म्हणजे बाबांनी घर विकल्याच
ती म्हणजे बाबांनी घर विकल्याच कळल्यावर बेबीने ते जगप्रसिध्द भोकाड पसरले नाही >>>>>>>>> ++++++++ अगदी अगदी
काल ईशाने विसला 'आपली माणसे जर आपल्यासोबत नसतील तर ते सतत आजूबाजूला असल्याचा भास होतो. तुम्हाला होतो को तसा भास, सर?' विचारल, तेव्हा विस क्षणभर चपापला. म्हणजे त्यालाही लग्नाआधी किव्वा लग्नानन्तरही नन्दूचा भास होत असावा.
दोन लाल-ऑरेंज हार्ट शेप्ड उशा टाईप काय ठेवलं होतं >>>>>>> मायरा म्हणत होती, तो ईशाचा फेवरेट कलर आहे. ऑरेंज असणारच, जेव्हा बघाव तिच्याकडे एक दोन शेडचेच कपडे असतात. लाल, ऑरेंज नाहीतर पिन्क. त्यापेक्षा रुपालीचे कपडे रिअलस्टिक असतात.
ईशाशी निमकराविषयी खोट बोलताना रुपालीचा अभिनय मस्त झाला.
बोललेच नाहीत तर सरंजाम्यांना काय स्वप्न पडणार आहे की हे पैसे निमकरांनी लग्नाचा अर्धा खर्च म्हणून दिलेत >>>>>>>> +++++++१११११११
आणि इशा चं स्लॅम बुक पण होतं टेबलावर असं मला तरी दिसलं >>>>>>> मलाही
काय हे ?! आधी आपण किती ते सुभा चे कातिल लूक्स बघायला उत्सुक असायचो .. बदामाच्या राशी काय आणि काय काय .. >>>>>>> नाही म्हणायला काल विस मायरावर रागावला तेव्हा आवडला.
ईशाची आई खमकी आहे. रात्री आलेल्या चोराला कस हुसकावून लावल तिने. निमकर नुसते बघत राहिले. ती प्रॅक्टिकल सुद्दा आहे. घर विकायचा मूर्खपणा तिलाही पटला नाही. आपण ईशाची मदत घेऊया हेही ती कितीवेळा बजावत होती. पण नाही, निमकरान्चा अतिस्वाभिमान!
प्रिकँपमध्ये तो फोटो का पडतो ते कळल नाही. >>>>>>> तिथे आधी नन्दूचा फोटो असावा. आपल्या जागी सवतीचा फोटो पाहिल्यावर तिला राग आला असावा. म्हणून तिने पाडला असावा. सो, सिरियल सायको- हॉरर होणार आहे तर. विस सायको, नन्दू हॉरर.
इशा एके ठिकाणी फुलं ठेवते आणि सुभा चिडतो हा कचरा कोणी ठेवला इथे वगैरे >>>>>>> फुलं म्हणजे कचरा?
बाय द वे ते बदाम शेप्ड साचे सापडतात त्यात इतका काय सस्पेन्स आहे? आणि किचन मधे सर्वात वरच्या ड्रॉवर मधे तर ठेवलेले असतात. मग काय सापडत नाही वगैरे? >>>>>>> ईशा नन्दूचा पुनर्जन्म आहे हे ठसवण्यासाठी हा सीन घातलाय. ते साचे वरच्या ड्रॉवरमध्ये आहेत हे फक्त नन्दूलाच माहित होत. ईशाला त्याच जागी साचे मिळाल्यावर आईसाहेब, मन्दा शॉक्ड झाल्या.
मालिकेच्या शीर्षकगीतातील या
मालिकेच्या शीर्षकगीतातील या आओळी
हाक देता तुला ,साद जाते मला
वेगळे प्रेम हे,वेगळा सोहळा(इथे सोहळा म्हणजे नेमक काय ते मला कळल नाही,विकीशाच लग्न का)
कोण जाणे जीवनाचा ,खेळ आहे हा नवा
नंदू बेबीच्या मुखातून विक्याला तर म्हणत नसेल
पण जर अस ग्रुहीत धरल तर मग
चेहरा ही तूच माझा,तूच माझा आरसा,ह्याची टोटल लागत नाही.
हे नंदू बेबीला म्हणत असावी का
माझ्या मते खरी स्टोरी या गाण्यातून सांगितली असावी,पण मग ती प्रेक्षकांना सहज कळू नये ,अशी सोय का करावी.
बर आपल्याला अजून उलगडा होत नसेल की बेबी नंदूचा पुनर्जन्म आहे की नाही,पण केड्यालाही कळू नये.
Subha's new initiative for
Subha's new initiative for children..
https://youtu.be/gSbx_rYnu6Q
"हे सगळे बदल केल्यामुळे हे
"हे सगळे बदल केल्यामुळे हे सगळं असं होतं" असं विस म्हणाला ते मात्र खरंय. लूक बदलला की सगळं बरं होईल असं सांगायला हवं त्याला. आत्ताच्या लुकमधे विक्या जास्त म्हातारा दिसतोय.
"विक्रांत" नाही तर नाही पण इशानं त्याला "अहो" म्हणायला काय हरकत आहे? ते "सर्र्र" खूपच नाटकी अन् खोटं वाटतं.
ते साचे वरच्या ड्रॉवरमध्ये
ते साचे वरच्या ड्रॉवरमध्ये आहेत हे फक्त नन्दूलाच माहित होत. ईशाला त्याच जागी साचे मिळाल्यावर आईसाहेब, मन्दा शॉक्ड झाल्या. >> तशीच काहीतरी शंका आली. पण अगदी पहिल्या ड्रॉवर मधे, आणि तरीही कोणाला माहीत नाही? यातले कोणीच कधी किचन मधे जात नसावे.
मायराने ईशाच्या केबिन मधे
मायराने ईशाच्या केबिन मधे टेबलवर दोन लाल-ऑरेंज हार्ट शेप्ड उशा टाईप काय ठेवलं होतं..कुणी नोटीस केलं का?>>>>>
राजनंदिनी साड्या आणि त्याच्या ऍक्सेसरीज होत्या त्या!
सायको नाही पण उद्विग्न की काय
सायको नाही पण उद्विग्न की काय दाखवला सुभा आज..
कालचा भाग पाहिला.. सीन्स मधे
कालचा भाग पाहिला.. सीन्स मधे काही च कंटिन्यूटी दिसून येत नाही. मायरा सगळ्यांसमोर विस ला काही काही बोलते. तो त्याच्या केबिन मध्ये निघून जातो. परत त्या दोघांमध्ये असे संवाद होतात की जसे एकदम नॉर्मल..
फोटो पडल्या नंतर विस केबिन मध्ये निघून जातो.. तर त्या च्या मागे इशाने यायला हवं ना..तर मायरा येते विदाऊट परमिशन..! . इशा नंतर येते, ते ही सर आत येऊ का असं विचारून.!!! अरे बायको आहे ना ती.. डायरेक्ट येऊच शकते ना...!
आज ते निमकर कोणीतरी
आज ते निमकर कोणीतरी जबरदस्तीने तेथे बसायला लावल्यासारखे का जाउन बसले इतरांच्या लाइन मधे? महाप्रसाद घेउन जा वगैरे ठीक आहे पण अशी कोण सक्ती करणार आहे. पेरिफेरल व्हिजन नावाचा प्रकार या सिरीयलला पहिल्यापासूनच मान्य नाही. म्हणजे आउटडोअर सीन मधे एकूण १०-१२ लोक असताना, दुसरी एकही स्त्री तेथे नसताना, तुमचे आई-वडिल/सासू सासरे तेथे असतील तर जोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडे डायरेक्ट बघत नाही तोपर्यंत ते तुम्हाला दिसत नाहीत.
आज "मॅनेजमेण्ट बाय भोंडल्याची खिरापत" हा नवीन प्रकार बघायला मिळाला. कंपनी हेड ने एव्हीपीला मी तुला सांगितलेले काम केले का विचारल्यावर उपस्थित सर्व स्टाफने अंदाज लावत त्यांनी केलेली कामे सांगायची. मॅनेजमेण्ट कोर्सेस मधे शिकवायला हवी ही नवी पद्धत.
काल ईशाने पाकीट पेन काढून ठेवणे वगैरे सारखी तुफान मेहनतीची आणि कौशल्याची कामे केली होती, तसे आज मायराने केले. ईशाचे केबिन "केले" म्हणजे नेहमीच्याच केबिन मधे तिच्या ४-५ गोष्टी व ती एक फ्रेम लावली. बाकी केबिन सारखेच केबिन होते. कपाटातील फायली वगैरे.
ती फ्रेमची भानगड पुढच्या एपिसोड मधे कळेल असे दिसते. मुळात दोघांचा इतका मोठो फोटो केबिन मधेच काय इव्हन ऑफिस मधे कशाला लावतील? सीईओ ची बायको तिच्या केबिन मधे स्वतःची इमेज तयार करेल की जिकडेतिकडे विक्याचे फोटो लावून बसेल.
पण घरगुती ड्रामा इतका बोअर झाला होता की ती ऑफिस ची निळी बिल्डिंग पाहून अब आयेगा मजा फीलिंग आले एकदम.
Pages