अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<... some post which not more than superstition. So is spreading such superstition is main goal of this thread? I think Boklat is doing great job of breaking those..>>>
अरे देवा, बोकलतांचे लिखाण इतक्या उदात्त आणि दैवी विचारांनी प्रेरीत आहे तर...मोदींच्या ११ व्या विष्णू अवतारा आधीचा हा १०.५ वा अवतारच म्हणावा लागेल... Lol Lol

अमानवी अनुभवाचे म्हणाल तर मी खूप लोक्काना पुढील अनुभव आलेला ऐकलाय किंबहुना मी स्वतःच खूप वेळेला अनुभवलाय.
बऱ्याच वेळेला असे होते कि आपण लिहता लिहता किंवा बोलता बोलता अचानक असे वाटते कि सेम असेच अगोदर हि कधीतरी घडले आहे.
पहिला असे वाटायचे कि .. नाही हा मनाचा एक प्रकारचा भ्रम आहे ( सॉरी.. काही विज्ञानवादी मन मानत नाहीत त्यांना फक्त मेंदू असतो)
हि घटना पहिल्यन्दाच घडतेय पण कोणत्यातरी केमिकल लोच्या मुळे आपणाला तसे वाटते आहे..
एक दिवस भावाच्या रूम वर त्याच्या रूममेट्स बरोबर गप्पा मारत बसलो होतो अचानक तीच अनुभूती आली कि.. अरे असेच आपण अगोदर हि
बसलो होतो व हे पूर्वी कधीतरी घडून गेलंय आणि आता समोरची व्यक्ती अमुक अमुक वाक्य बोलेल.. अक्षरश: ते वाक्य माझ्या मनात उमटले
व पुढच्याच क्षणी त्या व्यक्तीने तेच वाक्य जसेच्या तसे म्हंटले.. जर हा केमिकल लोच्या वगैरे असता तर काही क्षणानंतर तो बोलणारे वाक्य जसेच्या तसे
कसे काय माझ्या मनात उमटले ?

बऱ्याच वेळेला असे होते कि आपण लिहता लिहता किंवा बोलता बोलता अचानक असे वाटते कि सेम असेच अगोदर हि कधीतरी घडले आहे.

>>>>> अगदी परवा परवा हा अनुभव आला मित्राच्या घरी गप्पा मारत असताना
कधी कधी अगदी पुढच वाक्य काय असेल किंवा काय होइल याचा अंदाज आलेला असतो

दोन वर्षांपुर्वी ऑफिसमध्ये घडलेली घटना. पावसाळा थांबून महिना उलटला असेल, लंचब्रेकमधे डबा खाउन झाल्यावर मी एक मासिक चाळत बसले होते. बाकी स्टाफ जेवणं झाल्यावर बाहेर गेलेला. थोडक्यात त्या वेळेस मी एकटीच लंच रूम मध्ये होते. मला अचानक एक विशिष्ट वास आला, म्हणजे रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्याला येतो तसा. जर ते पावसात वगैरे भिजलेले असेल तर खूपच खराब वास येतो अगदी तस्साच. मी ऊठून सगळीकडे पाहिले, एसी लावलेला असल्याने दारं खिडक्या बंद होते. मी बाहेरच्या दोन खोल्या तपासल्या, कुणी ओली छत्री वगैरे ठेवलीय का ते बघायला. वास तर येतच होता. आता मला वासाने मळमळायला होऊ लागलं. दुसर्‍या मजल्यावर एवढं सगळं बंद असताना असा वास येणे हे माझ्यासाठी खूप विचित्र होतं. एवढ्यात आमचा ऑफिस बाॅय धावत पळत आत आला व म्हणाला, मॅडम, खाली दोन गल्ल्या सोडून एक पिसाटलेला कुत्रा लोकांना चावत सुटलाय. मी कसा बसा वाचलो. मी सून्न!!!

शाळेत असताना माझा एक मित्र होता. त्याचे काका आफ्रिकेतून परत आले तेव्हा त्यांनी त्याच्यासाठी एक बाहुला आणला होता. तिथे कुणी तरी त्यांना तो असाच दिला होता. साधारण फूटभर उंचीचा, काळाकभिन्न आणि अगदी विचित्र दिसणारा होता. तो थोडे दिवस बाहुल्याबरोबर खेळला आणि नंतर त्याने तो आपल्या बेडरूममध्ये असाच इथेतिथे भिरकावून दिला. मात्र काही दिवसांनी त्याच्या लक्षात एक चमत्कारिक गोष्ट आली. हा बाहुला रात्री त्याने जिथे फेकला असेल त्याऐवजी दुसर्‍याच जागी सापडायचा. कधी जमिनीवर फेकलेला खिडकीवर, तर कधी टेबलावर ठेवलेला जमिनीवर. हा घाबरला आणि त्याने तो टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवून ड्रॉवर नीट बंद करून झोपला. रात्री केव्हातरी त्याला जाग आली आणि तो कुशीवर वळला, आणि भीतीने त्याची बोबडी वळायचीच बाकी होती. तो बाहुला त्याच्या बेडवर होता. त्याने उठून पाहिलं तर ड्रॉवर थोडा उघडला होता. आता मात्र त्याची चांगलीच तंतरली. दुसर्‍याच दिवशी तो बाहुल्याला घेऊन घरामागच्या बागेत गेला. तिथे माळ्याने फुलझाडांसाठी खड्डे खणून ठेवले होते आणि त्याच वेळी गावी काही मयत झाल्यामुळे तो गावाला निघून गेला होता. ह्याने तो बाहुला एका खड्ड्यात पुरला आणि वरून माती लोटून टाकली. पण झालं भलतंच. त्या बाहुल्याने आता तर त्याचा पिच्छाच पुरवला. रोज तो रात्री त्याच्या स्वप्नात येऊन 'मला बाहेर काढ' अशा अर्थाचे काहीतरी हातवारे करायचा आणि कुठल्यातरी विचित्र भाषेत ओरडायचा. तो पुरता हैराण झाला. एकदा असंच स्वप्न पडल्यावर दुसर्‍या दिवशी तो रडत उठला आणि आता त्याने हे सर्व आपल्या आईवडिलांना सांगायचं ठरवलं. मात्र तो बेडरूम बाहेर पडतो तेवढ्यातच बागेतून माळ्याचा आरडाओरडा ऐकू आला. माळी परतला होता आणि बुजवलेला खड्डा पाहून वैतागून त्याने तो पुन्हा खणायला घेतला होता. आरडाओरडा ऐकून मित्रासकट घरचे सगळे बागेत धावले. बघतात तर माळी भेदरून उभा होता आणि त्याच्या हातात एक फूटभर उंचीचा मानवी सांगाडा होता!

बऱ्याच वेळेला असे होते कि आपण लिहता लिहता किंवा बोलता बोलता अचानक असे वाटते कि सेम असेच अगोदर हि कधीतरी घडले आहे.
@रमेश देवल : याला Déjà vu (देजा वु) म्हणतात... बर्याच जणांना हा अनुभव येतो. एका विशिष्ठ वयातच असा अनुभव येतो...जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मला असा अनुभव खुपदा यायचा. पण नंतर नंतर अनुभव येणं कमी झालं.

@ योगी९०० या देजा वू संबंधी जादाची माहिती कुठे मीळेल?.मला अजूनही तसे अनुभव येतात..हा तुम्ही म्हणता तसे पहिल्या पेक्षा तीव्रता निश्चित च कमी आहे..

<<बऱ्याच वेळेला असे होते कि आपण लिहता लिहता किंवा बोलता बोलता अचानक असे वाटते कि सेम असेच अगोदर हि कधीतरी घडले आहे.<<
अगदी अगदी... हे असे माझ्याबाबतीत अनेकदा घडते. सेम हाच प्रसन्ग आधीही घडला आहे, किंवा एखाद्याशी संवाद साधतांना समोरचा जे बोलेल ते आधीही ऐकल्यासारखे/ स्वप्नात पाहिल्यासारखे वाटते. स्वप्नात पुर्वी पाहिलेले एखादे घर / जागा पुन्हा दिसणे. वर्ष सहा महिन्यांनी फोन करणार्या एखाद्या मैत्रीणीची आठवण येउन अचानक तिचा फोन येणे, किंवा कधीही काहीही सम्बन्ध नसलेल्या / संवाद नसलेल्या व्यक्तीची म्हणजे तोन्डदेखली ओळख असलेल्या व्यक्तिची अचानक आठवण येणे आणि नन्तर त्याव२-३ दिवसात त्या व्यक्तीबद्दल काहीतरी भयंकर कळणे... या नेहमीच्या गोष्टी आहेत.
दक्षिणाने सांगितला त्या टाईप एक अनुभव आला होता. धुळ्याहुन पुण्यात शिफ्ट झालो तेव्हा स्पायसर कॉलेजजवळच्या बोटॅनिकल गार्डनमधील क्वार्टर्सला रहात होतो. गावाकडुन चुलत बहिणीची फॅमिली पुणे आणि आसपासची देवस्थाने करण्यास आली होती. मी त्या वेळी रिकामीच असल्याने त्यांना बरोबर घेउन फिरत होते.
२१ मे १९९४ ला असच फिरुन डेक्कन पर्यन्त आलो आणि कॉर्पोरेशनपर्यन्त पायी निघालो. साधारण दीड चा सुमार .. सम्भाजी बागेसमोरुन जाताना उजवा डोळा जोरजोरात फडफडु लागला. इतका की मला वाटायला लागले समोरच्यानाही जाणवत असावे. अर्थात मी 'हे वाईट असते' वै असे काही मानणारे नव्हतेच.
असो, तर दिवसभर काही घड्ले नाही. पण रात्री शेजार्‍यांकडे गावाकडुन फोन आला कि आमचा लाडका मामा अ‍ॅक्सीडेन्टमधे गेला. आणि त्याचा अ‍ॅक्सीडेंट साधारण दुपारी दीडच्याच सुमारास झाला होता.

@ किल्ली, डावा डोळा लवतोय ना? बरोबर आहे, नोव्हेंबर संपत आला म्हणजे हिंजवडी-चाकण-पिं.चि भागात आता अप्रेझल्स चे वारे वाहु लागले आहेत... शुभशकुन हो हा... किमान १५-२०% रेझ मिळेल हो !!!!!!! Wink

डावा डोळा जरा जास्तच फड्फडत आहे.. ह्याचा काय अर्थ असु शकेल>>> बालूशाही सविस्तरच्या भरघोस यशांनंतर बालूशाही पार्ट२ साठी खुणावत असेल Happy

हल्ली माझा डावा डोळा जरा जास्तच फड्फडत आहे.. ह्याचा काय अर्थ असु शकेल>>>>ग्यादरींग असते त्यामध्ये तुम्ही लवकरच माजो लवताय डावा डोळा या गाण्यावर स्टेज परफॉर्मन्स द्याल . तुमचा डावा डोळा नैसर्गिकरित्या फडफडत असल्याने परीक्षक खुश होऊन तुम्हाला विजेते घोषित करतील.

मला निगेटीव्ह गोष्टी होणार आहेत हे आधीच समजतं. हे अमानवीय आहे का माहित नाही? पण बर्‍याच नकारात्मक गोष्टींचा अंदाज आधीच येतो. म्हणजे मनात अगदी कोणीतरी येऊन सांगतं बर्‍याच दिवसात अमुक अमुक घडलं नाही नै... की अगदी त्याच दिवशी किंवा त्या आठवड्यात हमखास ती गोष्ट होते. जसं आमचं नवरा बायकोचं मोठं भांडण, मुलांचं आजारी पडणं, अपघात, कोणाचा तरी मृत्यू.
मेडिटेशन, ध्यान सगळं करुन झालं. ते विचार यायचे ते येतातच.

पॉझिटिव्ह गोष्टीही समजायला हव्यात. चला सुरवात करू या.
अंजली_१२ बऱ्याच दिवसांत घरात नविन गाडी आली नाही नै!

<<बऱ्याच वेळेला असे होते कि आपण लिहता लिहता किंवा बोलता बोलता अचानक असे वाटते कि सेम असेच अगोदर हि कधीतरी घडले आहे.<<
हो बऱ्याच वेळा होते अजून ही...पूर्वी जास्त जाणवायचे....आता कधीतरीच होते पण जाणीव होते अशी

<<निळावंती बद्दल ज्या आख्याकिका ऐकल्या आहेत त्याबद्दल काही माहिती आहे का<<
या ग्रन्थाबद्दल मागे विषय झालाय.

@उनाडटप्पू@:-
तुम्ही पाहिलाय का ?
मी मुद्दामच हे विचारात आहे कारण मला पण अमुक यांच्या कडे आहे असे कळायचे पण तिथे गेल्यावर ती व्यक्ती
म्हणायची नाही माझ्याकडे.. जसे माझे काका एक नावाजलेले ज्योतिषी त्यामुळे त्यांच्याकडे हा ग्रंथ आहे हे बाहेरील लोक्कानी मला शपथेवर सांगितले (हसण्याचे चिन्ह कसे टाकायचे?)
किंव्हा लीलावती व निळावंती यात बरेच जण गफलत करतात.
किंव्हा काहीजण माझ्याकडे आहे म्हणतात पण आपण जास्तच शहानिशा करू लागलो तर अमुक कोटी रुपये किंमत आहे किंव्हा सरळ मला त्रास होत होता
म्हणून पाण्यात सोडला असेही म्हणतात.

उत्तम कांबळेंचा एक लेख आहे यावर ...
निळावंती प्रथम भाग
लेखक -- बाळासाहेब सरनोबत
नवरंग प्रकाशन कोल्हापूर

मी कोल्हापूर ला जाऊन सरनोबत ना भेटून आलो आहे खूप वर्ष्या पूर्वी
पेपर मधील बातमी वाचून गेलो होतो
त्यात तसे काही नाही असे त्यांचे म्हणणे आहे

हो..मूळ निळावंती ग्रंथ एकत्र असा कोणाकडे असेल अशी शक्यता फार कमी आहे ... मी ज्योतिष आणि तंत्रशास्त्रावरच्या जुन्या हस्तलिखितांचा शोध घेत होतो तेव्हा मला एकाकडे एक १९०० च्या आधी कधीतरी छापलेला एक खंडप्राय ग्रंथ मिळाला .. तो औरंगाबादच्या कोणी इसमाने लिहिला आहे .. त्याचे बरेच खंड असून त्या व्यक्तीकडे चार खंड आहेत .. त्यातल्या एका खंडामध्ये मूळ निळावंतीची काही प्रकरणे आहेत असे ते म्हणाले होते .. त्यांच्या कुटुंबाकडे पिढीजात चालत आलेली बरीच ग्रंथसंपदा आहे .. नाथ संप्रदायाशी निगडित असल्याने त्यांनी काही ग्रंथ जे स्कॅन केले होते ते मला भेट म्हणून दिलेत .. खाली त्या खंडाची अनुक्रमणिका आणि निळावंतीची दोन पाने जोडलेली पहा 1.png .. 2.png3.png4.png

Pages