अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या असल्या साधू आणि खेकड्याच्या गोष्टी इथे लिहिल्या कि चालतं आणि मी माझे थरारक अनुभव लिहायची खोटी कि लगेच बोंबाबोंब सुरु बोकलतने धाग्याची वाट लावली नी बोकलतने धागा बंद पाडला.

Moral of the खेकडा story is
जसा खेकडा पाण्यात वा पाण्याबाहेर राहु शकतो तश्याच बोकलत यांच्या कथा व ईतरांच्या कथा या एका धाग्यावर राहु शकतात
हा साधू का उगाच sun-bath घ्यायला आलेल्या खेकड्याच्या वाटी जात आहे

चार दोन पुस्तकं वाचून आणि गूगल वरून माहिती घेऊन नको ते उद्योग केल्यावर असं होतं काहीतरी ....

https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/man-kills-owl-for-black-m...

https://www.youtube.com/watch?v=L8KBa_Ymvuo

<<<येथे कुणाला 'डाक घालणे' या विधि बाबत माहिती आहे का?>>>

हा विधी मी प्रत्यक्ष पाहिलाय, १० -१५ वर्षांपुर्वी. आता इतकं काहि स्पष्ट आठवत नाही, अंधुकसं आठवतय. आमच्या चाळीत जास्तकरुन मालवणी लोक राहतात. ज्यांच्या घरात हा विधी झाला ते 'कुडाळ'चे आहेत. आता कुंभार का कोण ते माहित नाही. पण त्यांच्या कुटुंब प्रमुखाचा दिर्घ आजारात मॄत्यु झालेला आणि काहि अंशी त्यांच्या मुलीने पळुन जाऊन लग्न केलं हे ही एक कारण होतं.

त्या रात्री त्यांच्याकडे वेगळ्याच टाईपमध्ये भजन सद्रूश्य काहितरी म्हणत होते आणी एक वाद्य ज्याच्या आवाजाने मला आजही भिती वाटते ते वाजवत होते. एकंदर वातावरण फार भितीदायक आणि गुढ होतं. तर थोड्यावेळाने आम्हांला त्या मेलेल्या व्यक्तीचा आवाज यायला लागला आणि तो कोणा, कोणाच्या प्रश्नांना उत्तर देत होता, वर हेही म्हणाला की 'सुरेखा,(पळुन गेलेली मुलगी), तु ह्या ज्या काय केलास, ता माका काय रुचला नाय हा'.... आम्ही शॉक झालो कारण हा आवाज त्या गेलेल्या व्यक्तीच्या मुलाच्या तोंडुन येत होता आणि गंमत म्हण्जे त्या मुलाला मालवणी भाषा येत नसुनही तो अगदी अस्खलित मालवणीत बोलत होता. (त्याचे वडील मालवणीतच बोलायचे.) आणि हे प्रषोत्तरे संपल्यावर त्या मुलाला आधी काय घडलं ते अजिबातच आठवत नव्हतं. .... आयुष्यात पहिल्यांदा हे सगळं पाहिल होतं, माझ्या कल्पनाशक्तीपलिकडचं होतं हे सगळं.

मी अशा अनेक डाकी घातल्या आहेत ज्यामध्ये मी त्या आत्म्याला दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करू न देता त्याच्याच मृत शरीरात प्रवेश करायला लावतो आणि त्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करतो. सविस्तर नंतर लिहीनच.

मी अशा अनेक डाकी घातल्या आहेत ज्यामध्ये मी त्या आत्म्याला दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करू न देता त्याच्याच मृत शरीरात प्रवेश करायला लावतो आणि त्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करतो. सविस्तर नंतर लिहीनच.
Submitted by बोकलत on 17 November, 2018 - 14:39

नको..... आधीच येथे (असंबद्ध) प्रतिसाद देऊन प्रतिसादांची गर्दी केली आहे. आता मृत व्यक्तींना जिवंत करून पृथ्वीतलावर माणसांची गर्दी करू नका. आधीच भारताची लोकसंख्या अ फा ट वाढली आहे. तुम्हाला जे काही प्रयोग करायचे ते चंद्रावर जाऊन करा!!!

मी अशा अनेक डाकी घातल्या आहेत ज्यामध्ये मी त्या आत्म्याला दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करू न देता त्याच्याच मृत शरीरात प्रवेश करायला लावतो आणि त्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करतो.>>>>
फॅन बेस वाढवण्यासाठीचं तद्द्न मार्केटिंग गिमीक बरं का हे...मोदींना मी - मी करण्यात कॉंपिटीशन देतायं वाटतं.. Lol Lol

Its clear that bokalat is lying for his own cheap entertainment.
Its clear that all human societies have believed that amanaviya exist for a long period of time and large section of society still believes it. The ones who believe will not give up their belief because of bokalat's attempts.
Then i dont see any point why people are supporting bokalat. We understand that u dont believe this just the way Trump doesn't believe global warming. We dont want to change you.
Please leave us alone and let us enjoy these stories, which we believe may be true. Or may be we njoy it like we enjoy Harry Potter.
Stories like Bokalat's are not core motive of this BB.
, how u would have felt if someone repeatedly did it on harry potter bb just with the intentions to spoil?
This is very cheap. But i understand some people are cheap!
Hope they feel some shame and grow up some day!
You are in our prayers!

पण जिथे स्वतः अ‍ॅडमीनच लक्ष घालत नाहीयेत, तिथे आमच्यासारखा वाचक वर्ग तरी काय करणार? बोकलतना नवीन धागा उघडुन देऊनही ते हट्टाने इथेच लिहीतात. ते मनोरंजक लिहीत असले तरी त्याचा उपयोग काय? तसे असेल तर पाककृतीच्या धाग्यावर सुद्धा त्यांनी जरुर या गोष्टी लिहाव्यात . पाककृतीच काय अख्ख्या माबोवर त्यांनी लिहीले तरी हरकत नाही.

कोणी मानो अथवा न मानो, जरी प्रत्यक्ष डोळ्याने भूत , प्रेत पिशाच्च दिसत नाही तरी वातावरणात या अतृप्त लहरी मी स्वतः अनूभवलेल्या आहेत. भूत जगात आहे, यावर मी विश्वास ठेवत नसले तरी आपले मन प्रसन्न असुनही घरात काय घडु शकते हे मी अनूभवले आहे. त्यामुळे ज्यांचा यावर विश्वास नाही त्यांनी खरच इथे येऊन वाद घालु नये. ही विनंती समजा हवे तर !!

मागच्या पानावर टेलीपथी बद्दल लिहिलं आहे, मला नुकताच अनुभव आला आहे असा. १२ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१८ मी फिरायला भूतान ला गेले होते. १४ सप्टेंबर ला आम्ही थिंफु ला होतो, सकाळी उठून व्यवस्थित नाश्ता करून साईट सिईंग ला बाहेर पडलो. एका पुरातन वस्तु जतन करून ठेवलेल्या वाडा सदृश जागेत गेलो तिथे मी आत जाई जाईतो २-३ वेळा मटकन खाली बसले, नंतर माझ्या छातितून आणि पाठितून भयन्कर कळा यायला लागल्या, त्या जागेतून मी बाहेर येउन बाहेरच्या कट्ट्यावर बसून खूप रडले... अपचन/ गॅस असं काहि झालं असेल असं वाटलं म्हणून सोबतच्या लोकांना होटेल मध्ये सोडायला सांगितले. रूमवर आल्यावर इनो प्यायले पण फरक पडला नाही, मग झोपले. काही काळाने बाकिचे परत आले तेव्हा मला सणसणून ताप भरला होता. उठून बहिणिला फोन करून कळवले मला बरे वाटत नाही, पण हे काहितरी विचित्र आहे आणि मला कळत नाही नक्की काय ते असे ही सांगितले. तिने सोबतच्या मैत्रिणीला मला फोन कर असा निरोप द्यायला सांगितला. माझी बहिण आणि माझी सोबतची मैत्रिण रात्री फोन वर बोलल्या. मला काहिहि कळवले नाही.
मी १९ ला परतले तेव्हा कळले की माझा चुलत भाऊ सिरियस होता (हार्ट अटॅक आला होता त्याला) मी लगेच भूतान ला गेलेले जिच्यासोबत तिला फोन केला तर ती म्हणाली मला १४ लाच कळले होते, कारण माझी बहिण आणि ती बोलल्या होत्या, फक्त मला कळू दिले नाही. भावाला अटॅक आला ती आणि मला त्रास झाला ती वेळ एकच होती. आणि हि गोष्ट मला मैत्रिणीने लक्षात आणून दिली. Sad

२१ सप्टेंबर ला शुक्रवार होता. त्या दिवशी मी वर्क फ्रॉम होम घेतले होते. दिवस बरा गेला पण संध्याकाळी साडेसात आठ नंतर मन काळं काळं व्हायला लागलं विचारांनी, मध्यरात्रीपर्यंत अधिक गडद होत गेलं, २-३ मैत्रिणींना फोन करून सांगितलं की माझ्या सोबत रहायला या, पण दुर्दैवाने कोणिहि उपलब्ध नव्हतं. भावाच्या विचारांनी खूप अस्वस्थ झाले होते. रात्री १२ वाजता थोडं जेवले आणि २ पर्यंत जागीच होते, अखेर झोपले थकून आणि पहाटे साडेतीन ला फोन आला की तो गेला... Sad

नानबा मला म्हाइत हाय तुम्ही मला शाबासकी दिली असशीव असाच झ्याक लिवत ऱ्हा म्हनून कौतुकानी पाठ थोपटली असशीव पन मराठीत लिवा ना, काय समाजला नाय काय बोलताव त्या, आम्ही पडलाव मराठी शालेची पोरा. A फॉर सफरचंद आणि z फॉर झेब्रा याच्या पलीकडं आमची गाडी कधी गेलीच नाय. तुमच्या सगळ्यांचा प्रेम बघून माझ्या डोल्याच्या कडा पानावतात, एवढा पन नका जीव लावू रं मला पोरानो.

<<<<ज्यांच्या घरात हा विधी झाला ते 'कुडाळ'चे आहेत. आता कुंभार का कोण ते माहित नाही. >>>
हा विधी ज्यांच्याकडून करून घेतला जातो ते कुंभार असतात, जशी पुजा ब्राम्हणांकडून करवतात. जे करतात ते कोणत्याही जातीचे असू शकतात.

बोकलत,इतका पराकोटीचा निर्लज्जपणा कुठ पाहिला नव्हता. +11111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111

लिहा हो बोकलत+1>> पण इथे मुळीच नाही.
ज्यांना अति पुळका येतोय त्यांनी घरी घेऊन जा बोकलत लाअनुभव ऐकायला

माझ्या कथा आवर्जून वाचणारे आणि अजून लिहीत जा म्हणून प्रेरित करणाऱ्या सगळ्या वाचकांचे मनापासून धन्यवाद, तुम्ही सगळे वेळोवेळी पाठीशी खंबीरपणे उभे राहून पाठीवर शाबासकीची थाप मारलीत तसेच पाठीवर हात ठेवून लढ म्हणालात यासाठी शब्द अपुरे पडतील. तुम्ही सगळे ओंजळीत भरभरून टाकताय पण माझी ओंजळच इतकी लहान आहे की काय घेऊ आणि काय नको असं झालंय. तुमच्या सगळ्यांच एव्हडं प्रेम मिळालं जीवन सार्थ झालं. समाधी घ्यायचा विचार करत होतो पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम मला वारंवार मला त्यापासून रोखतं. लवकरच पुढची कथा टाकणार आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या.

बोकलत तुम्ही इथेच लिहिले पाहिजे , नाहीतर मी तुम्हाला बदडून काढीन.... दुसरीकडे लिहिल्यास. शब्दांनी ..

Pages