अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<तुम्ही सगळे वेळोवेळी पाठीशी खंबीरपणे उभे राहून पाठीवर शाबासकीची थाप मारलीत तसेच पाठीवर हात ठेवून लढ म्हणालात यासाठी शब्द अपुरे पडतील. >>>

अगदी शेवटच्या फळीतल्या शिवसैनिकाने केलेल्या जाहीर आभारप्रदर्शनपर भाषणातील मजकूर वाटला...ते बिचारे तिथे रात्र रात्र जागून बॅनर लावतात आणि 'मावळे' असल्याची 'थाप' घेतात आणि ईथे तुम्ही रकानेच्या रकाने टाईप करुन, 'लिहा हो बोकलत+1' ची एकोळी 'थाप' घेता...एकूणात फायद्याच्या 'शितां कडे' पाहून पाठीवर कोरडी 'थाप' देण्यासाठी जमलेल्या 'भुतावळी' ची च चलती सगळीकडे...

मला वाटत बोकलत सदा सुखी आहेत..
काही लोकांच्या कौतुकाने त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढले आहे व त्यांच्या लिखाणाचा उद्देश या धाग्यावर येऊन येथील
लोकांना खिजवणे हा आहे.. त्यांना विरोध करून काही उपयोग नाही हे आपण सर्वांनी पहिलेच आहे.. घडा उलटा आहे पण आपण का आपले
पाणी वाया घालवत आहे?
त्यांच्या एका लिखाणावर आपले १० लिखाण त्यांच्या विरोधात करून त्यांना प्रोत्साहन देतो.. जस्ट इग्नोर इट

शब्दांचा मार शहाण्यांसाठी असतो मुर्ख बेअक्कलांसाठी नाही, हेच खरे.>>>>तेच मी पण बोलतोय, कंपनीच्या मशीनमध्ये हजेरी लावण्यासाठी कुठलं पण बोट ठेवलं तर मायबोलीवर टाईप करून करून तुझ्या हातावरच्या रेषा झिजल्यात असा मेसेज येतो. कंपनीने खास माझ्यासाठी चेहरा दाखवून हजेरी लावायची मशीन आणले. माझ्या पोस्टी वाचू नका म्हणून सिग्नेचर पण टाकली सुरवातीला, पण वाचक वाचतातच.तुम्ही म्हणताय तेच खरं, शब्दांचा मार शहाण्यांसाठी असतो मुर्ख बेअक्कलांसाठी नाही Lol

<<<<कंपनीच्या मशीनमध्ये हजेरी लावण्यासाठी कुठलं पण बोट ठेवलं तर मायबोलीवर टाईप करून करून तुझ्या हातावरच्या रेषा झिजल्यात असा मेसेज येतो>>>
हा हा हा हा...मशीन ने सुद्धा विचार केला असेल, हात दाखवून 'अवलक्षण' आत येणार.. Lol Lol

बोकलत तुम्ही इथेच लिहिले पाहिजे , नाहीतर मी तुम्हाला बदडून काढीन.... दुसरीकडे लिहिल्यास. शब्दांनी .. >>>:हाहा: Lol Lol

बोकलत अमानवीयवर येणाऱ्या बाकी कथा/ घटना प्रसंगावर माझा जेवढा विश्वास आहे, तेवढाच किंवा कणभर जास्तच विश्वास तुमच्या किश्शावर आहे. Wink लिहा तुम्ही. वर सुद्धा पाहिलत ना किती जण वाट पाहताहेत तुमच्या लिखाणाची. आणि हे सगळे 'चले जावं बोकलत' चळवळीचे कार्यकर्ते आहेत ना ते पण तुमचं लिखाण वाचतात हे त्यांच्या पोस्टसवरून प्रुव्ह झालं आहे Proud

>> बोकलत अमानवीयवर येणाऱ्या बाकी कथा/ घटना प्रसंगावर माझा जेवढा विश्वास आहे, तेवढाच किंवा कणभर जास्तच विश्वास तुमच्या किश्शावर आहे.

हे मी याआधी २-३ वेळा लिहिलंय.
ज्यांचा विश्वास नाही बसत ते बाकीच्यांचा कथा वाचायचा आनंद क हिरावुन घेताहेत?

वर सुद्धा पाहिलत ना किती जण वाट पाहताहेत तुमच्या लिखाणाची. आणि हे सगळे 'चले जावं बोकलत' चळवळीचे कार्यकर्ते आहेत ना ते पण तुमचं लिखाण वाचतात हे त्यांच्या पोस्टसवरून प्रुव्ह झालं आहे >>hyalach vikruti mhanatat.
Mala amuk dharmache lok avadat nahit , kapa tyanna. Ani tamuk goshtivar vishwas nahi, so dhagyachi vaaT lava. Kahich farak nahi pravruttit.
Happy

Ani kharach nahi vachat tyanchya falatu posts, pan tyanchya posts , mag tumachya posts. Tandul nivadanyache ani khade bajula karanyache kashta hotatach na!

@नानबा मराठीत लिहिल्याबद्दल शतशः आभार, ती मागच्या पानावरची पोस्ट पण मराठीत लिहा ना, काय समजलं नाय काय लिहिलंय ते.

Dhaga virangula category madhye ahe te shabdsha sarthki lagle ase aaj mhanawe lagel

बोकलत
क्रुपया तुमच्या कार्यावर आणि कर्तुत्वावर अविश्वास दाखवणार्‍या भोळ्याभाबड्या टीकाकारांना क्षमा करा. तुमच्याबद्दल ही अजाण बालके जे काही लिहित आहेत त्याबाबत त्यांना मोठया मनाने पदरात घ्या. त्यांच्या करणीची शिक्षा आमच्या सारख्या रंजल्या गंजल्यांना देऊ नका.. आम्हाला आपले म्हणा. आपली कृपादृष्टी आमच्यावर कायम असल्याचा पुरावा म्हणून आपल्या एखाद्या महान कार्याचा वृतांत आपल्या रसाळ वाणीने वर्णन करुन आम्हाला उपकृत करावे ही प्रार्थना.

@ बोकलत तुम्च्या सारख्या लोकान्ला येव्हडे शिम्पल हिन्ग्लिश नाय समजत !! नाय म्या काय म्हन्तु कि जरा हड्लिची मदत घेउची का नाय? त्याचा काय हा कि तुमाला भुता वश हाय म्हन्ता , आनि तुमास्नि ते घाबरता म्हनता म्हनुन येक आपला किडा वलवल्ला . . . .

दक्षिणा, जवळजवळ असाच अनुभव मला २०१० साली आला.ऑफीसमधून येताना आज काहीतरी विचित्र बातमी ऐकायला मिळणार असं सतत वाटत होतं.स्टेशनला उतरून पास काढायला जात असताना वाटत होतं की कशाला मी पास काढतेय? फुकट जाणार आहे.तरीही पास काढला.घरी आल्यावर आईचा फोन आला की ते (आईवडील) चिंचवडला गेले आहेत.वडलांना अंडर ऑब्जरवेशन ठेवलंय.दुसर्‍या दिवशी मी तिथे गेले.६-७ दिवसांनी वडील गेले.

हल्लीच मैत्रिणीचा भाऊ वारला,त्यावेळी पण कसंतरी वाटत होते. नीट सांगता येत नाही,पण काजळी दाटून आल्यासारखे आणि अंग मोडून आल्यासरखे वाटत होते.तिची आई २ दिवसांपूर्वी वारली होती.मला माहित नव्हते.२-३तासाने मैत्रिणीचा फोन आला की आई अमुक दिवशी वारली आहे. तेव्हा तिला भेटायला गेले असता,आम्हा सर्वांदेखत तिचा भाऊ वारला.
आता याबाबत हा एक योगायोग असेल असं वाटतं.

दक्षिणा Sad फार वाईट वाटले तू लिहीलेले वाचल्यावर. यालाच प्रिमोनिशन म्हणत असावेत.
देवकी, खरच काय मनस्थीतीतुन तू आणी दक्षिणा गेला असाल त्या वेळी. Sad

उद्या फोन करतो.>>
उद्या नाही मी पुण्याला जातोय आज. पुढील आठवड्यात ठरवूयात!

माझी सर्वांना एक विनंती आहे. मी अ‍ॅडमिन असले या धाग्याची तरिही मी इथे कोणाचाही प्रवेश नियंत्रित करू शकत नाही. त्यामुळे या धाग्यावर प्रेम करणार्‍यांनी अवांतर पोस्ट्स ओलांडून आपले आपले किस्से लिहावेत, आणि वाचून प्रतिक्रिया द्यावीत. बोकलत यांच्या नादाला लागून त्यांना जितका भाव द्याल तितके ते त्या धाग्यावरची जागा व्यापतील. आणि धाग्याचा मूळ उद्देश लोप पावेल.

सगळ्या वाचकांचे परत एकदा शतशः आभार. तुम्हाला सगळ्यांना चांगल्या थरारक भयकथा वाचायला मिळाव्यात यासाठी मी जीव तोडून लिहीत राहीन.अतिशय भयानक अशा झपाटलेल्या जागी रात्री एकटा जाऊन तिथल्या भूतां खेतांची चांगलीच जिरवीन आणि तो अनुभव इथे सुवर्ण अक्षरात लिहीत राहीन. भले त्यासाठी माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी चालेल, आता मागे फिरणे नाही.

उद्या नाही मी पुण्याला जातोय आज>>>>>>या धाग्याचे जेवढे वाचक आहेत ते जर कुठल्या अनोळखी नायतर लांबच्या प्रवासाला जात असतील तर इथे लिहीत जा कुठे जाणार ते. म्हणजे त्या परिसरात जर कुठली दुष्ट शक्ती असेल तर मी तुम्हाला पूर्वसूचना देत जाईल. आता हेच बघा पुण्याचा हिंजेवाडी हा भाग अमानवीय शक्तींसाठी कुप्रसिद्ध आहे. इथल्या बऱ्याचशा कंपन्यात रात्रपाळी बंद असते, रात्र झाली कि भूतच कंपनीतल्या मशिनी सुरु करतात आणि मालकाला मालामाल करतात. तसेच जर का तुम्ही सोमवारी संध्याकाळी इथल्या ट्राफिक मध्ये अडकलात तर कर्माने मेलाच म्हणून समजा. एकवेळ घनदाट अरण्यात चकवा लागलेला माणूस सुखरूप घरी पोहचेल पण हिंजवडीच्या ट्राफिक मध्ये अडकलेल्या माणसाचा काय भरोसा नाय.

पुण्याचा हिंजेवाडी हा भाग अमानवीय शक्तींसाठी कुप्रसिद्ध आहे. >>>
बोकलतराव, त्या हिंजवडीच्या (हिंजेवाडी नाही) बाधीत जागेतील एका पिंपळाच्या झाडावरील मी देखिल एक भूत होतो तेंव्हा चिंता नको! Wink

काय फालतूगिरी लावलीय... किस्से लिहा की.. बसवला टेम्पोत! बोकलत तुम्ही पण लिहा आणि किस्सेच लिहा.. इतरांनी पण उगा त्यांचा विरोध करून फुकट प्रतिसाद वाढवू नका!

सोबत एक किस्सा:
हॉस्टेलला राहत होतो, पहिल्या वर्षी साधी रूम आणि दुसऱ्या वर्षापासून गॅलरीवाली. गॅलरीच्या रूमचा माझा दुसरा दिवस. एकटाच राहत होतो... आजूबाजूच्या रूमची पोरं आलेली नव्हती आणि माझी मित्रमंडळी दुसऱ्या लायनीतल्या रूममध्ये. माझ्या गॅलरीतून समोर मोकळं मैदान आणि पलीकडे हायवे. झालं काय की रात्री २.३० ते तीन च्या दरम्यान गॅलरीकडून दाडदाड आवाज यायला लागला... जसं कुणीतरी धावत असावं.. जाग येऊन मी घाबरलो थोडा.. बरं चोर म्हणावेत तर हॉस्टेलमध्ये कशाला येतील? मी उठून लाईट लावला आणि गॅलरीत उघडणाऱ्या खिडकीतून बाहेर पाहू लागलो काही दिसतंय का.. खिडकी नेमकी एका बाजूचं दिसणारी.. जिकडे उजेड फक्त तीच बाजू दिसते म्हणून गॅलरीत काय चाललंय ते मला दिसेना.. मग एका मुलीचा हसायचा आवाज आला माझ्याच गॅलरीतून. माझा एक स्वभाव आहे, ज्या गोष्टीची भीती वाटते तिला सामोरं जायचं. माझ्या हातात छत्री होती. जसा तो हसायचा आवाज आला तसा मी खूप घाबरलो आणि पटकन दार उघडलं..

गॅलरीतून उड्या मारत एक मुलगा आणि एक मुलगी रूम्स क्रॉस करत होते. आमच्या लायनीतल्या शेवटच्या रूम च्या खिडकीतून आत शिरून ते वर चढले होते. (दोघे हॉस्टेलचेच, पण मुलींचे हॉस्टेल म्हणजे कॅम्पसच्या दुसऱ्या टोकाला मध्ये किमान दीड किमी अंतर..) पैकी त्या मुलाची रूम माझ्या रूम पासून 7वी होती. पण मला एक कळेना, की एवढ्या रिस्क मध्ये ती मुलगी हसली तरी कशी??? मग लक्षात आलं, जिकडे उजेड त्याच बाजूचं खिडकीतून दिसतं आणि मी लाईट लावून नैसर्गिक अवस्थेत उभा होतो. Wink (हो, विचित्र सवय असली तरी हॉस्टेलला असताना मी नैसर्गिक अवस्थेत झोपायचो, रच्याकने, ते आरोग्यासाठी चांगलं पण असतं)

>> बोकलत यांच्या नादाला लागून त्यांना जितका भाव द्याल तितके ते त्या धाग्यावरची जागा व्यापतील. आणि धाग्याचा मूळ उद्देश लोप पावेल.
That was disappointing Dakshina. Restraint you showed so far was admirable to maintain free speech. I did not see you commenting on some post which not more than superstition. So is spreading such superstition is main goal of this thread? I think Boklat is doing great job of breaking those. No one made fun of your experience. Because that fits in on this thread.

@ दक्षिणा आणि देवकी... तुम्हां दोघींना पण ज्या मनस्थिती मधून जावे लागले त्या बद्दल वाईट वाटले. Sad

इतके वायफळ प्रतिसाद येवून ही या धाग्याने अजून २००० री कशी गाठली नाही...मला तर वाटलेले भयानक किस्से यायला चालू होण्या पूर्वीच धागा बंद पडतोय की काय...लवकर येवू देत किस्से

Pages