Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी वाचत सुटलो, त्याची गोष्ट'
मी वाचत सुटलो, त्याची गोष्ट' निरंजन घाटेंचं पुस्तक वाचतोय. टवणे सर, तुम्हीही असं काही लिहायला हवंय. सिरियसली सांगतोय.
>>> +१
टवणे सर, तुमचा मेक्सिकोतला अनुभव आवडला. खरेतर युवल नोआ हरारीचे सेपिअन्स, मार्केझ मुराकामी अन पामुक यांना मराठीत आणाच म्हणणार होतो पण गेलाबाजार तुमच्या त्या अनुभवावर एक लेख तरी लिहा आमच्याकरता. चारोळीत संपवू नका.
तुमचा प्रसंग वाचून दिपु चित्रे यांचा उपनिषद वाचणार्या हंगेरियन रंगार्यावर लिहिलेला लेख आठवला (बहुतेक 'तिरकस आणि चौकस' या पुस्तकामधे आहे).
चिहुवा हुवा असे शहर आहे? असे
चिहुवा हुवा असे शहर आहे? असे एक डॉग ब्रीड आहे ना? पन्नाशीचे लोक ग्रेटच असतात. पण इग्नोर होतात.
तिरकस आणि चौकस >>> हे पुस्तक
तिरकस आणि चौकस >>> हे पुस्तक अवधूत परळकरांचं आहे ना?
लले, असं घाबरावयचं नाही. हे
लले, असं घाबरावयचं नाही. हे बघ.
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5669975027035170106?BookN...
अर्थात अवधूत परळकरांचं असेल तर मला माहित नाही.
आमच्या लायब्ररीत प्रत्येक
आमच्या लायब्ररीत प्रत्येक शेल्फच्या टोकाशी एक छोटी ढकलगाडी ठेवलेली असते . खालच्या दोन कप्प्यात त्या शेल्फ मधे परत ठेवायची पुस्तके असतात आणि वरच्या कप्प्यात त्या शेल्फमधली दोन चार निवडक पुस्तके ठेवलेली असतात. ऑनलाइन होल्ड ठेवायच्या जमान्यात कॅटलॉग शोधणे आणि स्टॅक्समधून मानेला रग लागेपर्यंत भटकणे बाद झाले असल्याने सेरेंडिपिटी योग नाहीसे झालेत. त्या शेल्फ वर मात्र कधीकधी अनपेक्षितपणे इंटरेस्टिंग पुस्तक सापडते.
मागच्या वेळेस एक छोटेखानी पुस्तक दिसले ' यू कांट कीप अ गूड वूमन डाउन' - पुस्तकाच्या नावातच एका पॉप्युलर म्हणीवर शब्दखेळ दिसला म्हणून उचलले. लेखिका अॅलिस वॉकर . शॉर्ट स्टोरीज. नाव ओळखीचे वाटते तरी संबंध लागेना. मग पुस्तकाच्या पाठच्या पानावरचा मजकूर वाचल्यावर ट्युब पेटली. कलर पर्पल ( ओप्रा आणि हूपी गोल्डबर्ग यांचा पहिला सिनेमा) ही त्यांची गाजलेली कादंबरी. तो सिनेमा ९० च्या दशकात टीव्हीवर तुकड्या तुकड्यांमधे पाहिला होता.
दक्षिणेतल्या कृष्णवर्णीय लोकांच्या अनुभवांवर आधारित गोष्टी आहेत. बहुतेक गोष्टी स्त्रीपात्रांच्या तोंडून आहेत. वॉकर यांचा फेमिनिस्ट, रेसिझमच्या विरोधात बंडखोरी बाणा सतत जाणवतो. काही गोष्टींचे कथानक मराठी थोडक्यात सांगायचे म्हटले तर माझे मराठी मध्यमवर्गीय कंझर्व्हेटिझम आड येते. ( पॅरेडॉक्सच आहे की काही गोष्टी इंग्रजीत वाचताना इतक्या अंगावर येत नाहीत पण तेच मराठीतून सांगायची वेळ आली की काहीतरी अभद्र, असांसदीय कसं लिहायचं असं वाटतं ) . पण भाषा आक्रस्ताळी नाहीये. हक फिन आणि टॉम सॉयर ची जशी खास डायलेक्ट आहे, तशीच या पुस्तकातल्या पात्रांची देखील डायलेक्ट आहे. इलस्ट्रेटेड वीकली आणि टाइम्स वाचून इंग्रजी ( सेकंड, थर्ड लँग्वेज ) शिकलेल्या माझ्यासारख्यांना अशी वेगळी डायलेक्ट वाचणे, ती ओळखू येणे हे फार मजेशीर वाटेल.
कॅलिफोर्निया (Laurel) आणी न्यू यॉर्क ( "The Lover") मधल्या गोर्या पात्रांशी बोलताना या सदर्न स्त्रियांना देखील तो फरक जाणवतो .
लिटररी सर्कल मधे या पुस्तकाला मिक्स्ड रीव्ह्यूज मिळाल्याचं वाचलंय.
टण्या नशीब उबर नव्हते.
टण्या
नशीब उबर नव्हते. नाहीतर वाटले असते की त्यांनी काहीतरी डेटा सायन्स अल्गोरिदम वापरून ग्राहकाला आवडेल असे काहीतरी कार मधे ठेवायचे असे लॉजिक लावले की काय?
म्हणजे अमा असल्या तर अत्तरे, ललिता असली तर माओरी चा इतिहास वगैरे
Big brother is taking you for a ride !!!
Big brother is taking you for
Big brother is taking you for a ride !!! >>
फा सही होता हा!
>>> Big brother is taking you
>>> Big brother is taking you for a ride !!!

Big brother is taking you for
Big brother is taking you for a ride !!!
>>>
उबेर कोण चालवेल काय भरोसा नाही आजकाल. टोरोन्टो एअरपोर्टवर उबेर बूक केली तर पठ्ठ्या टेस्ला घेउन आला. आयुष्यात पहिल्यांदा टेस्लात बसलो. पंटर रोबोट्स कसे क्लेरिकल काम कमी करतील, भारताची आयटी मधली पोझिशन कशी धोक्यात आहे वगैरे गप्पा मारत होता. फ्रीलान्सर कन्सल्टंट आहे म्हणाला - थापा मारत होता की खरे माहिती नाही कारण गप्पा फार जोरात हाणत होता. मी विचारलं टेस्ला विकत घेऊन उबेर चालवायाला परवडते का तर काहितरी ४-५ तासच काम करून जगण्याची फिलॉसॉफी सुरु केली - मला वाटले आता गाडी अॅमवे कडे वळते की काय पण त्याच्या आत हॉटेल आले.
मला वाटले आता गाडी अॅमवे कडे
मला वाटले आता गाडी अॅमवे कडे वळते की काय पण त्याच्या आत हॉटेल आले. >>>
हर्पेन
मी पण घाबरले. (अवधूत परळकरांचंही साधारण याच नावाचं पुस्तक आहे वाटतं. मी वाचलेलं नाही; मात्र मागे एकदा एका ऑनलाईन अंकासाठी त्यांची मुलाखत घ्यायची होती; म्हणून थोडाफार गृहपाठ केला होता; त्यात या प्रकारचं नाव नोंदवल्याचं वाटतंय. ती मुलाखत पुढे बारगळली आणि माझा गृहपाठही...
)
फारएण्ड
बेस्ट!
टवणे सर, मेक्सिकोतला प्रसंग
टवणे सर, मेक्सिकोतला प्रसंग एक नंबर !!>>>> +१.
मराठीत सेपियन्स चा अनुवाद
मराठीत सेपियन्स चा अनुवाद "सेपियन्स - मानव जातीचा अनोखा इतिहास ' या नावाने वासंती फडके यांनी केला आहे. डायमंड प्रकाशन.
कामानिमित्त रस्त्यावर होतो
कामानिमित्त रस्त्यावर होतो तेव्हा प्रवासात
Never cry wolf by Farley Mowat , Band of brothers by Stephen Ambrose आणि deep south by Paul Theroux ही 3 पुस्तके वाचली. आणि conradचे हार्ट ऑफ डार्कनेस वाचतोय आत्ता. होईल रात्रीत. पण पाहिक्या 30 40 पानातच मजा आली.
Never cry wolf वाचले तेंव्हा
Never cry wolf वाचले तेंव्हा गूगलने The Pig Who Sang to the Moon by Jeffrey Masson नि Dominion by Matthew Scully ही दोन रेको मिळाली होती. ह्यांच्यात animal वगळता काय समान धागा आहे हे AI जाणे. पण दोन्ही पुस्तके Gail Eisnitz च्या Slaughterhouse लेव्हल ची निघाली.
डेझर्टर निरंजन घाट्यांचे
डेझर्टर निरंजन घाट्यांचे नव्हते, विजय देवधरांचे होते. तोहि अनुवाद होता. >> खूपच भारी पुस्तक होतं ते! विजय देवधरांची सर्व अनुवादित पुस्तकं मस्त होती.
'डेझर्टर' चे मूळ पुस्तक कोणते, माहिती आहे का कोणाला?
Never cry wolf >>>>
Never cry wolf >>>> ह्याच्यावर माबोच्या २०१० च्या दिवाळी अंकात छान लेख होता. तेव्हा वाचायचं ठरवलं होतं पण नंतर विसरून गेलो. आता वाचेन.
फा
फा
'डेझर्टर' चे मूळ पुस्तक कोणते
'डेझर्टर' चे मूळ पुस्तक कोणते, माहिती आहे का कोणाला? >>I Deserted Rommel नाव होते बहुधा, गुंथर बाहमन चे
Never cry wolf >>>>
Never cry wolf >>>> ह्याच्यावर माबोच्या २०१० च्या दिवाळी अंकात छान लेख होता. तेव्हा वाचायचं ठरवलं होतं पण नंतर विसरून गेलो. आता वाचेन.
त्या लेखाचा दुवा मिळेल का? मला आठवत होतं नक्की की माबोवरच या पुस्तकाबद्दल वाचले आहे. अजूनही कुत्री/कोल्हे/लांडगे वगैरेंवरची पुस्तके होती का त्या लेखात?
I deserted Rommel – by Gunther Bahnemann (Author)
https://www.amazon.com/I-deserted-Rommel-Gunther-Bahnemann/dp/B0007IZWFI
डेझर्टर ही सत्यकथा नसून बनावट कथा आहे असेही वाचले आहे मी कुठेतरी. असाच भ्रमनिरास झाला होता स्लावोमिर राइझ्च्च्या लाँग वॉक पुस्तकाबद्दल नंतर वाचनात आलेल्या लेखांमुळे
खूपच भारी पुस्तक होतं ते! >>
खूपच भारी पुस्तक होतं ते! >>> अगदी अगदी.
हल्ली ते 'vishesh' डोमेन
हल्ली ते 'vishesh' डोमेन गंडलेलं असल्याने जुन्या दिवाळी अंकांतले लेख शोधायला लय कुटाणे करावे लागतात आणि तरीही ते सापडतील अशी खात्री नाही.
मला आठवतय त्याप्रमाणे त्या लेखात फक्त त्या पुस्तकाचं परि़क्षण होतं. मला हे ही आठवतय की तू अंकाबद्दलच्या तुझ्या अभिप्रायात ह्या लेखाबद्दल स्पेसिफीकली लिहिलं होतस.
अपडेटः
"लांडगा आला रे आला - simply great!! निव्वळ सुरेख पुस्तक परिचय. परिचयात कथा अनुक्रमणिका पद्धतीने न लिहिता पुस्तकाचा गाभा, शैली, पार्श्वभुमी हे सगळे अतिशय सोप्या व परिणामकारक पद्धतीने लिहिले आहे. १०० मार्क. लगेच ऑर्डर केले Happy (एक शंका: हे पुस्तक 'लांडगा आला रे आला' वा इतर नावाने मराठीत भाषांतरीत झाले आहे का? मी इंग्रजी Never cry wolf हेच ऑर्डर केले.)"
टण्या, हा प्रतिसाद तू 6 December, 2010 ला लिहिला होतास. पुस्तक तेव्हा ऑर्डर करून आत्ता वाचलेस?!
पुस्तक तेव्हा ऑर्डर करून
पुस्तक तेव्हा ऑर्डर करून आत्ता वाचलेस?!
नोवेम्बर २०१० म्हणजे तेव्हा ऑर्डर केलेलं पुस्तक कुठे आहे कोणास ठाउक. तेव्हा वाचले नव्हते हे नक्की. फ्लिप्कार्टच्या जुन्या ऑर्डरीत बघायला पाहिजे आहे का कुठे ते.
>>>
ऍमेझॉन ची audible ही पुस्तके
ऍमेझॉन ची audible ही पुस्तके ऐकण्याची सर्व्हिस भारतात लाँच झाली आहे .
३० दिवस फ्री असून नंतर महिना १९९ रु , १३४५ रु सहा महिने व २३३२ रु १२ महिने असे प्लॅन्स आहेत.
जरूर ट्राय करून बघा .
https://play.google.com/store/apps/details?id=com.audible.application&hl=en
लाण्डगा आला रे आला हे जगदीश
लाण्डगा आला रे आला हे जगदीश गोडबोले यांची भाषान्तरीत केले होते. अतिशय सुरेख अनुवाद...
ट्रेसपासिंग अॅक्रॉस अमेरिका:
ट्रेसपासिंग अॅक्रॉस अमेरिका: केन इल्गुनास
अमेरिकेतला बहुतांश भुभाग हा खाजगी मालकीचा आहे. विशेषतः मिडवेस्ट, वेस्ट आणि साउथ (थोडक्यात सर्व फ्लाय ओवर स्टेट) राज्यात हे प्रमाण ९०/९५% पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ बहुतांश डोंगर, दर्या, मोकळी मैदाने, झरे, पाणवठे, तळी खाजगी मालकीची आहेत. यात भर म्हणजे खाजगी जमिनीवरून मालकाच्या परवानगी शिवाय तुम्ही प्रवेश करू शकत नाही, हायकिंगला जाऊ शकत नाही. मालकाने जर 'नो ट्रेसपासिंग' असे लिहिले असेल तो तुमच्यावर गोळी झाडू शकतो परवानगी शिवाय घुसल्याबद्दल. युरोपात बहुतांश देशात कॉमन्स वा सार्वजनिक वापराच्या 'सरकार मालकीच्या' जमिनी/डोंगर दर्या आहेतच पण त्याशिवाय खाजगी जमिनींवर सर्वांना मुक्तपणे विहारण्याचा हक्क आहे, अर्थातच मालमत्तेचे नुकसान न करता. थोडक्यात सांगायचे तर अमेरिकेत साधारण मध्यातून उत्तरेकडून दक्षिणेकडे - मोन्टाना, नॉर्थ डाकोटा, मिनेसोटा वगैरे पासून खाली टेक्सासकडे जर कुणी चालत जायचे ठरवले तर तो मनुष्य बहुतेक वेळा खाजगी मालकीच्या जमिनींवरून 'दखलपात्र गुन्हा' करत जाईल.
केन इल्गुनास या २९वर्षाच्या तरुणाने हेच केले. अलास्कात एका तेल उत्पादन कंपनीत भांडी विसळायचे काम करताना त्याच्या डोक्यात एका सहकार्याने हा किडा सोडला. केन इंग्लिशमध्ये बीए, लिबरल स्टडीजमध्ये एमए केलेला तरुण. शिक्षक, पार्क रेंजर अशी विविध कामे करून २ महिने ऑनशोअर - सुसंस्कृत समाजापासून लांब वर्क कँपमध्ये - भांडी/स्वयंपाकघर साफ करण्याच्या कामावर लागला होता. थोडक्यात आयुष्याचा आलेख खाली घसरत होता. त्याचवेळी कीस्टोन एक्सएल या ट्रान्सकॅनडा पाइपलाइनची घोषणा झाली होती जी फोर्ट मॅकेन्ली या अल्बर्टा, कॅनडातल्या एका टुंड्रा प्रदेशातल्या ठिकाणापासून सुरू होऊन १८००किमीवरील नेब्रास्कातील स्टील सिटी या ठिकाणी आधीपासून असलेल्या पाइपलाइनला जोडणार होती. फोर्ट मॅकान्लीमध्ये टार सँड , बिटुमिन जमिनीतून उपसून पाइपने थेट टेक्सासमधील पोर्ट आर्थर या मेक्सिकन गल्फवर असलेल्या शहरातील रिफायनरीमध्ये पोचवले जाणार होते व तिथे शुद्ध होऊन पुढे जगभर. या पाइपलाइन विरोधात पर्यावरणवादी, ज्या गावाखालून्/जमिनींखालून पाइप जाणार होते तिथली लोकं व अमेरिकेतील मूळ निवासी यांचा विरोध सुरू झाला होता. पाइपलाइनच्या समर्थनार्थ प्रो-जॉब्स, रिपब्लिकन, रेडनेक लोकं उभी होती. पाइपलाइनच्या वादाबद्दल अधिक माहिती इथे मिळेलः https://www.bbc.com/news/world-us-canada-30103078
केनने पायी चालत हार्डिस्टी या अल्बर्टामधील ठिकाणापासून पोर्ट आर्थरपर्यंत साधारण पाइपलाइनच्या रेषेवरून कंपासच्या सहाय्याने प्रवास केला. शक्य असेल तिथे तो माळावरून (प्रेअरी), शेतांतून चालत राहिला व अगदीच शक्य नसेल तर रस्त्याकडेने चालला. हे पुस्तक त्याच्या या १९०० मैलाच्या (साधारण ३०००किमी) पायपिटीचा गाथा आहे. नॉन फिक्शन पुस्तकांचा साच्याला स्मरून पुस्तकात अध्येमध्ये भरपूर माहिती येते. ती कधीकधी रटाळ होते, तर कधी रंजक. ग्रेट प्लेन्स ही एक कॅनडातल्या अल्बर्टा, मनिटोबा या प्रांतांपासून अमेरिकेच्या मध्यातल्या सर्व राज्यातून थेट ओक्लाहोमा, टेक्सासपर्यंत पसरलेली एक विशाल इकोसिस्टम आहे. पुस्तकातली माहिती बरीचशी या ग्रेट प्लेन्ससंदर्भाने - तिचा इतिहास, मनुष्याच्या आगमनानंतर झालेले बदल, आधुनिक (युरोपिअन लोकं आल्यानंतर) काळात झालेला परिणाम इत्यादीबद्दल येते. त्याच बरोबरीने कीस्टोन पाइपलाइन झाली तर तिचा पर्यावरणावर लगेच व दुरगामी परिणाम काय होईल याबद्दलही बर्यापैकी माहिती देण्याचा केन प्रयत्न करतो.
पण पुस्तकाचा गाभा आहे त्याची पायपीट. हा भाग तसा अगदी विरळ वस्तीचा असल्याने एव्हड्या प्रचंड अंतराच्या मानाने त्याला फारच कमी लोक भेटले असे म्हणता येईल. पण त्यामुळे त्याला जो 'एकांत' मिळाला त्यात त्याने केलेले मुक्त चिंतन वाचनीय आहे. सुरुवातीच्या अर्ध्या भागात मला वाटू लागले की याला जर कोणी फारसे भेटत नसेल तर एक दिशा पकडून चालणे याशिवाय वेगळे काय आहे, या प्रवासाने केनच्या 'पर्यावरणवादी' भुमिकेत, ज्ञानात व स्थानिकांच्या परिस्थितीबद्दलच्या आकलनात काय भर पडत आहे. पण साधारण मध्यापासून पुस्तकाने पुन्हा पकड घेतली. केनची भाषा सोपी-सरळ आहे पण अनेक भाष्ये मला थेट भिडली.
उदा:
While I missed the desolateness of those wide-open, half-wild spaces from up north, I found that I'd become less discriminating about nature as I continued south. I needed neither mountains, nor ocean monsters, nor endless prairie to dazzle me. I reminded myself that every field has 4.5 billion years of history in it. Every drop of oil that would flow through this pipeline has been on an epic thousand-mile, million-year journey. There’s a story behind every building, pipeline, and person. That tree line is there because of an ambitious FDR-led Great Plains Shelterbelt program instituted during the Great Depression. That corn row was planted by a futuristic GPS-guided tractor. That pile of dirt was once a screaming heap of space-travelling stardust and now perhaps holds the dung od dinosaurs, the salvers’ blood of Bloody Kansas, and the chemicals of Big Ag. With a little perspective, the mundane can appear miraculous, and something as unimposing as a field of winter wheat becomes a hidden universe, harboring a history with endless layers of complexity, rendering what on the surface seemed simple to the eye into a bottomless mirror of the cosmos. I figured there was enough wonder in a handful of Kansas soil to keep me marveling for a century.
हे काही अत्युच्च दर्जाचे प्रवासवर्णन नाही. या प्रवासात काही फार महान साहसे नाहीत, जगावेगळी अद्भुते नाहीत, जीवावर बेतणारे प्रसंग नाहीत (एक दोन ठिकाणी त्याच्या आसपास गोळीबार झाला हे वगळता). थोडक्यात हे साहसवर्णन नाही, ही एन्ड्युरन्स - मानवी क्षमतेला ताणणार्या शारिरीक परिश्रमांची कथाही नाही. दिवसाला ३०-३५ किमी वेगाने - चालण्याच्या वेगाने - त्याने हा प्रवास केला. पण केनने प्रवास प्रामाणिकपणे आणि निरागसता जपून केला आहे. त्यामुळे त्याचे अनुभव सच्चे आहेत, त्याची स्वगते भिडतात. पुस्तकही छोटेखानी आहे, प्रत्येक दिवसाचा दिनक्रम नाहिये. खरेतर त्याने या मोठ्या ४-५ महिन्याच्या प्रवासातले काहीच दिवसांबद्दल लिहिलेले आहे.
केन इल्गुनासचे वॉल्डन ऑन व्हील्स नावाचे एक त्याने वॅनमधून केलेल्या सफरीचे (रबर-ट्रँप) पुस्तक आहे ते पण एकदा वाचेन. पण आमच्या लाडक्या पॉल थेरॉने थोरोबद्दल मन कलुषित करून ठेवल्याने आता वाल्डेन आणि थोरोची फिलॉसॉफी आली की एक फसवल्याची भावना उगाचच मनात येते. हा माझाच दोष.
<<< मनुष्य बहुतेक वेळा खाजगी
<<< मनुष्य बहुतेक वेळा खाजगी मालकीच्या जमिनींवरून 'दखलपात्र गुन्हा' करत जाईल. >>>
जर हे माहीत आहे, तर हा उद्योग ('दखलपात्र गुन्हा') का करावा? लेखकाने याबद्दल काय म्हटले आहे?
जर हे माहीत आहे, तर हा उद्योग
जर हे माहीत आहे, तर हा उद्योग ('दखलपात्र गुन्हा') का करावा? लेखकाने याबद्दल काय म्हटले आहे?
>>>
ट्रेसपासिंग हा गुन्हा असावा की नाही याबद्दल बरेच वादविवाद आहेत. जेव्हा हे कायदे केले (१८व्या/१९व्या शतकात) तेव्हाची परिस्थिती, त्यामागची पार्श्वभुमी आता बदललेली आहे. उदा. इंग्लंड/युरोपातून आलेल्या सेटलर्स्ना जमिनीच्या मालकीबद्दलची असलेली भावना, तत्कालिन स्थानिक अमेरिकन टोळ्यांशी असलेला झगडा वगैरे आता रेलेव्हन्ट नाही.
तेव्हा अश्या पर्यावरणवादी आदर्श लोकांच्या मते असे ट्रेसपासिंग करणे हा एकप्रकारे सविनय कायदेभंग आहे . त्यासंदर्भात लेखकाने आपले मत पुस्तकत मांडले आहेच.
एवढ्यात 'मोठी तिची सावली'
एवढ्यात 'मोठी तिची सावली' वाचले. मीना खडीकरांनी लताबाईंवर लिहिले आहे. अत्यंत सुमार पुस्तक. पुस्तकातली बरीच माहिती बाईंच्या युट्युबवरच्या इंटरव्ह्यु मधून मिळू शकते. नाविन्य काहीच नाही. छायाचित्रेपण ग्रेट नाहीत.
>>टवणे सर, तुमचा मेक्सिकोतला
>>टवणे सर, तुमचा मेक्सिकोतला अनुभव आवडला. खरेतर युवल नोआ हरारीचे सेपिअन्स, मार्केझ मुराकामी अन पामुक यांना मराठीत आणाच म्हणणार होतो पण गेलाबाजार तुमच्या त्या अनुभवावर एक लेख तरी लिहा आमच्याकरता. चारोळीत संपवू नका.<<
युवल नोआ हरारीचे सेपिअन्स आणि होमो ड्युअस (Homo Deus) ही पुस्तके मागवली आहेत. होमो ड्युअस (Homo Deus)चे मराठी भाषांतर पण नुकतेच उपलब्ध झाल्याचे फेबु वर कळाले.
कुणी स्कीन इन द गेम वाचले आहे का अथवा तालेब यांची अन्य पुस्तके?
आमच्या लायब्ररीत चेक आउट
आमच्या लायब्ररीत चेक आउट काउंटरच्या आसपास नव्या पुस्तकांचं शेल्फ आहे. प्रत्येक पुस्तकाचं मुखपृष्ठ दिसेल अशा बेताने पुस्तके असतात. अर्थात पुस्तके अशी ठेवल्याने जागा बरीच व्यापतात त्यामुळे मोजकीच पुस्तके ठेवता येतात . पण रांगेत उभे राहणार्यांना सहज पुस्तके दिसतात. तिथे उभ्या उभ्या एक दोन परिच्छेद वाचून पुस्तक घेतात काही जण .
मागच्यावेळेस काउच सर्फिंग इन इराण नावाचे पुस्तक दिसले. आर्मचेअर ट्रॅवेल्स हा वाक्प्रचार ऐकला होता. तसेच काहीतरी असावे असे वाटून पुस्तक उचलले.
स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शनच्या बळावर चालणारे काउच सर्फिंग म्हणजे एअर बी अॅण्ड बी चे फुकट भावंड म्हणायला हरकत नाही. जगभरात काही मिलियन लोक हे काउच सर्फिंग करतात. प्रवाशी मंडळींनी स्मार्टफोनवर अॅप डाउनलोड करून वेगवेगळ्या शहरात एक किंवा अधिक दिवसांकरता कोणी काउच देता का काउच अशी विचारणा करायची . होस्ट फॅमिली त्यांच्या घरात झोपण्यापुरती जागा आणि बाथरूम वापरायला देतात - विनामूल्य.
Der Spiegel या जर्मन साप्ताहिकाचा ट्रॅव्हेल संपादक स्टीव्हन ऑर्थ याने इराणमधे दोन महिने वेगवेगळ्या होस्ट लोकांबरोबर दोन महिने काढले. मोठी शहरे, समुद्र किनार्याची ठिकाणे, न्यूक्लीयर प्लँटच्या आसपासचे भाग, सीमेजवळचे भाग अशा सर्व ठिकाणी फिरला.
एका जर्मन जर्नलिस्टच्या नजरेतून दिसलेला इराण असे स्वरूप आहे.
स्मार्टफोन वापरणारे, इंग्रजी / जर्मन जाणणारे इराणी लोक त्याचे होस्ट आहेत. सरकारी कंझरव्हेटिव्ह धोरण, इंटरनेटमुळे होणारी जगाची ओळख, स्वत:च्या जुन्या संस्कृतीचा अभिमान , बाहेरच्या जगाबद्द्ल कुतूहल या बद्दल ही होस्ट मंडळी आणि त्यांचे मित्र मैत्रिणी स्टीव्हनशी खुलेपणाने बोलतात. ऑफिसात, रस्त्यावर, घरांमधून खोमेनी आणि खामेनीचे फोटो सतत दिसत असतात. राजकीय/ धार्मिक प्रोपोगंडा चिकार आहे पण स्टीव्हनचेकाही होस्टस घरी बीअर बनवतात. देशोदेशीचं संगीत ऐकतात. यू ट्युबवर डांस व्हिडीयो, सॅटरिकिल व्हिडिओस अपलोड करतात. देशोदेशीच्या काउचसर्फर्सना आपल्या घरात ठेवून घेतात. त्यांना आपल्या कुटुंबासोबत फिरवतात.
एका ठिकाणी त्याचं पोट बिघडतं तर एक होस्ट ट्राण्सलेशन अॅपच्या मदतीने डायरिया ? थ्रो अप ? असे प्रश्न विचारुन त्याला नेमकं काय होतंय ते समजून घेउन त्याला औषधपाणी देतात .
अमेरिकन मीडियामधे इराणचे बरेचसे एकांगी चित्रण असते. या पुस्तकाने ते चित्रण थोडे फार बॅलंस होते. पण स्पीगेल सारख्या नावाजलेल्या वृत्तपत्राच्या संपादकाने लिहिलेले पुस्तक म्हणून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होत नाहीत. स्टीव्हन ट्रॅव्हेल रायटर म्हणूनच जास्त समोर येतो.
भाषांतर सहज आहे - मूळ जर्मनमधली वाक्यरचना जशिच्या तशी इंग्रजीत ट्रान्सफर केलेली नाही.
काउचसर्फिंग या प्रवास प्रकाराची ओळख झाली हा बोनस. पुढे मागे मुलांनी ' मी उन्हाळी सुट्टीत काउचसर्फिंग करणार ' वगैरे म्हटलेच तर ' काउचवर बसून दिवसभर टी व्हीझ बघायचा तर त्याला काउच सर्फिंग असे अॅडव्हेंचरस नाव कशाला ?' असे तरी म्हणणार नाही .
Couchsurfing in Iran: Revealing a Hidden World - Stephan Orth
Pages