मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जानेवारी १८ मधे गॉन विथ दी विंड चा अनुवाद वाचला.(वर्षा गजेंद्रगडकर)
सुरुवातीला वाटले की ११६४ पानांची कादंबरी कशी वाचून होईल? पण वाचत गेले.मध्येच वाटले की का वाचतोय हे ,जी स्कार्लेट पटत नाही.पण भाषेच्या सौंदर्याने खेचली गेले .कादंबरी संपल्यावर समाधान आणि हुरहूर वाटत राहिली.
पहिल्या पानावर चिंगी यांनी छान प्रतिसाद दिला आहे.

सातवीत असताना आईच्या सुचनेनुसार हा मूव्ही पाहिला होता.भाषेमुळे कळले अजिबातच नव्हते,पण क्लार्क गेबल(बटलर) मनात ठसला होता आणि व्हिवियन ली(स्कार्लेट ओहारा) ची पहिली एंट्री दिपवून गेली होती. मजा म्हणजे कादंबरी वाचताना,सिनेमातले बरेच प्रसंग डोळ्यासमोर येत होते.त्यावेळी प्रकर्षाने जाणवले की तिकडचे लोक,मूव्ही तयार करताना केव्हढे परिश्रम घेतात.

मी सद्ध्या लंपन वाचतेय..
खरतर आत्तापर्यंत चार पुस्तक वाचुन कधीचीच संपवली असती पण फार पुरवून पुरवून वाचतेय म्हणुन सद्ध्या शारदासंगीत वर आहे गाडी..
अशक्यसुंदर हलकं फुलकं लिखाण आहे.

सध्या अंबरीश मिश्र याचं 'शुभ्र काही जीवघेणे' आणलंय लायब्ररीतून. सुरुवात नाही केली वाचायला अजून.

लंपन>>>>> कुठ्लं पुस्तक? लेखक? >> प्रकाश नारायण संत - शारदा संगीत, वनवास, पंखा आणि झुंबर

माझी All time favorite पुस्तक Happy

स्निग्धा... अगं सिरीज लिही ना..
१. वनवास
२. शारदासंगीत
३. पंखा
४. झुंबर

सस्मित, आवर्जून वाचावी अशी पुस्तकं आहे ही..

लंपन नाहीये बूकगंगावर. >>>> लंपन या सिरीजचा छोटुकला कथानायक आहे आणि त्याच भावविश्व या चार पुस्तकांमध्ये रेखाटलं आहे.

मी आत्ताच नाही म्हणता म्हणता शारदासंगीत संपवल.. आता वाटतय आणखी जरा वेळ घ्यायला हवा होता.. दोनच पुस्तकं राहिलीए Sad

लंपन या सिरीजचा छोटुकला कथानायक आहे आणि त्याच भावविश्व या चार पुस्तकांमध्ये रेखाटलं आहे.>>> ओके . मागव्ते बूकगंगावरुन.
सिरीज म्हणजे क्रमवार मागवावी का?

सिरीज म्हणजे क्रमवार मागवावी का? >>>> वर क्रम दिलाय ... पण तसा फारसा फरक नाही पडणार अस मला तरी वाटतयं Happy
१. वनवास
२. शारदासंगीत
३. पंखा
४. झुंबर

सिरीज म्हणजे क्रमवार मागवावी का?>> मागवली तर बर पडेल.. कथासंग्रह जरी असला तरी त्यातले बरेचसे दुवे एकमेकांना जोडून आहे.. जसं वनवासच्या आधी शारदासंगीत वाचायला जाल तर शारदासंगीत नेमक काय आहे अन त्याच्या मागची कहानी तुम्हाला धड कळणार नाही तसच..
त्यामुळे सिरीज सिरीयली वाचलेलीच चांगली हे माझ मत आहे..

१. वनवास
२. शारदासंगीत
३. पंखा
४. झुंबर>>
ह्यातले काही उपलब्ध नाहित असं दाखवतय अ‍ॅमेझॉन आणि बुकगंगा, शिवाय इबुक्स तर नाहिच्चेत.
मेहता सोडुन इतर पब्लिशर्स अजुन इबुक्स कडे वळाले नाहित असं जाणवतय..

बुकगंगाच्या दुकानात (म्हणजे लकडी पुलावरले जुने इन्टरनॅशनल बूक स्टोर) प्रत्येक पुस्तकाच्या भरपूर प्रती उपलब्ध आहेत. त्यांना फोन करून विचारा.

आणि बुकगंगाच्या साइटवर फक्त वनवास आउट ऑफ स्टॉक दिसतय. बाकी सगळी आहेत की स्टॉकमध्ये

मार्क टुली आणि सतिश जेकब यांचे अम्रितसर: मिसेस गांधी'ज लास्ट बॅटल हे पुस्तक नुकतेच वाचले.
साधारण ८०साली १० किंवा अधिक वय असलेल्या सर्वांना पंजाबमधील आतंकवाद आठवत असेल. मला वर्तमानपत्र नुकतेच वाचू लागलो तेव्हा दररोज "पंजाबमध्ये अमूक इतके ठार", "पंजाबमध्ये बाँबस्फोट" या बातम्या आठवतात. आणि बघता बघता हा खलिस्तानचा संघर्ष संपला व परिस्थिती पूर्ववत झाली. इतकी की आता पंजाब म्हटले तर क्वचितच कुणाला दहशतवादी आठवतील. लक्षात घ्या की जवळपास स्वातंत्र्यापासून सुरू असलेला डावा (नक्षलवादी) लढा अजून चालू आहे, काश्मिरमधला दहशतवाद २५पेक्षा अधिक वर्षे आता आयुष्याचा भाग आहे. त्यातुलनेत आपल्या लष्कराच्या १०% सैनिक पंजाबी शीख आहेत, ८०च्या दशकात हे प्रमाण अजून जास्त होते. अधिकारी वर्गात विशेष करून ब्रिगेडियर व वरच्या स्थानांवर शीख अधिकारी अजूनच जास्त होते. तर अशा समाजाच्या सर्वात मुख्य देवस्थानावर लष्करी हल्ला होणे ही फार मोठी घटना होती.

हे पुस्तक मुख्यतः ऑपरेशन ब्लुस्टारमागची पार्श्वभुमी, प्रत्यक्ष ऑपरेशन याबद्दल आहे. पुस्तकातील बहुसंख्य घटना अमृतसर व सुवर्णमंदिराच्या परिसरात घडतात. सुरुवात भिम्द्रनवालेचा उदय, त्याला मिळालेली स्थानिक व केंद्र सरकारची फूस, या खेळातली विविध प्यादी - अकाली दल, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, पंजाब स्थानिक काँग्रेस, झैल सिंग, इंदिरा गांधी यांचा त्यात असलेला स्टेक यापासून होते. भिंद्रनवाले, तोहरा, लोंगोवाल, बादल, दरबारा सिंग, झैल सिंग, भजन लाल व इंदिरा गांधी हे प्रमुख कलाकार या भागात येतात.
पुस्तकाचा अर्धा भाग ब्लुस्टार ऑपरेशनच्या आधीचे काही महिने व प्रत्यक्ष ऑपरेशनमध्ये काय घडले, का घडले यावर आहेत. राजकारणी, लष्कर, प्रशासन (आय ए एस व पोलिस) यांच्या कामगिरीचा अपक्षपाती उहापोह आहे. पुस्तक मुळातून वाचणे उत्तम.

सरकार चालवणारे नेते व त्याखालोखाल प्रशासकीय अधिकारी यांची भुमिका व कार्यक्षमता हीच प्रत्येक संघर्षाच्या उगमाच्या व प्रवासाच्या मुळाशी असते. स्थानिक स्टेकहोल्डर्सचा निर्णयप्रक्रियेत सहभाग असणे हे अत्यंत महत्वाचे आहे. कितीही विद्वान, कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी व राजकारणी असले तरी स्थानिकांचा सहभाग असल्याशिवाय सर्वमान्य तोडगे निघत नाहीत. पी सी अलेक्झांडर, पांडे, राजीव गांधी, अरुण सिंग हा या काळात सेन्ट्रल थिंक टँक होता व सर्व मुख्य निर्णय हे लोक घेत होते. यात स्थानिकांचा सहभाग शून्य होता व ती मोठी चूक झाली. स्थानिकांचा सहभाग समतोल असणेही गरजेचे आहे. भजन लालना अधिक महत्व व अकाली/पंजाब काँग्रेसला कमी महत्व हे देखील संघर्षाला अधिक पेटवत राहिले.
भारतीय लष्कराचे व्यावसायिक रूप व धर्माचे अस्तित्व मान्य करत राखलेली धर्मनिरपेक्षता याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखीत होते. ब्लुस्टारचे ऑपरेशनल कमांडर जनरल ब्रार हे स्वतः शीख होते. अनेक शीख सैनिक यात सहभागी झाले, धारातिर्थी पडले. ज्या काही उठावाच्या घटना बिहार, जम्मू आणि पुण्यात घडल्या त्यात अधिकारी वर्गाने नीट माहिती न पुरवणे व जवानांच्या काळज्यांना योग्य महत्त्व न देणे हे प्रमुख कारण होते.
तसेच एखादा नेता एका ठिकाणी अत्यंत प्रभावी ठरतो तर दुसर्‍या ठिकाणी चुका करतो हे पुन्हा पुन्हा दिसते. बांग्लादेश युद्धात खंबीर व मुत्सद्दी निर्णय घेणार्‍या इंदिरा गांधींची गणिते पंजाबात चुकली. पंजाब समस्येचे प्रभावी निराकरण करणार्‍या राजीव गांधीना श्रीलंकेत पराभव पत्करावा लागतो. बहुतेक एक मोठा/मेजर संघर्ष एखाद्या नेत्याने सोडवला तर त्याने पुढचा संघर्ष आल्यावर बॅटन पुढल्या माणसाला द्यावी. हे असे अतिप्रचंड संघर्ष त्यांना "ड्रेन" करतात की काय कोण जाणे.

राजीव गांधींनी पंतप्रधान झाल्यावर पंजाब समस्येला वेगळ्या पद्धतीने हाताळले व संपवले. पुस्तकात याबद्दल शेवटच्या चॅप्टरमध्ये फार थोडक्यात माहिती आहे कारण नंतरच्या घटना पुस्तकाच्या मुख्य स्कोपमध्ये येत नाहीत. राजीव गांधींच्या या फेजबद्दल फारसे लिहिले/बोलले जात नाही. याबद्दल आता अधिक वाचायचा प्रयत्न करेन.

राजीव गांधींच्या या फेजबद्दल फारसे लिहिले/बोलले जात नाही. याबद्दल आता अधिक वाचायचा प्रयत्न करेन. >> कुठे सापडले ह्यावर पुस्तक तर नक्की कळव रे.

मध्यंतरी जुन्या पुस्तकविक्रेत्यांकडून MOSSAD : The Greatest Missions of the Israeli Secret Services हे पुस्तक घेतलं. लेखक मायकेल बार-झोहार आणि निसिम मिशाल. पुस्तक एकदम ‘स्पाय-थ्रिलर’ प्रकारचं आहे. मला या प्रकारची पुस्तकं आवडतात.

Munich आणि The House on Garibaldi Street या सिनेमांमुळे हे पुस्तक वाचण्याआधी मला मोसादच्या त्या दोन मोहिमा तेवढ्या माहिती होत्या. पुस्तकातलं सर्वात उत्कंठावर्धक आणि थरारक प्रकरण म्हणजे हीच अर्जेंटिनातल्या ब्युनॉस आयर्स शहरातल्या गॅरीबाल्डी स्ट्रीटवरच्या घरातून अडॉल्फ आईकमनला ‘उचलण्या’ची कथा. आईकमनला ताब्यात घेणे हे जितकं महत्त्वाचं होतं, तितकंच त्याला अर्जेंटिनातून बेमालूम बाहेर काढणे गरजेचं होतं. ती मोहिम मोसादनं ज्या प्रकारे आखली आणि पार पाडली त्याला तोड नाही. ही कथा वाचत असताना आईकमनपर्यंत मोसादचे एजन्ट्स पोहोचतात कसे याकडेच आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं. त्यालाच जोडून मोसाद प्रमुखांनी आईकमनला अर्जेंटिनातून बाहेर काढण्याच्या खास पुरवणी योजनेवरही विचार केलेला होता. ती योजना एकदम भारी होती.

आईकमन प्रकरणाप्रमाणेच सुप्रसिद्ध इस्त्राएली गुप्तहेर एली कोहेन याच्या सिरियातल्या गुप्त कारवायांवरचं प्रकरणही खिळवून ठेवणारं आहे. ६० च्या दशकात कोहेननं सिरिया सरकारातल्या अगदी आतल्या वर्तुळात स्थान मिळवलेलं होतं. सिरियाच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्याचा प्रमुख सल्लागार होण्यापर्यंत त्याने मजल मारलेली होती. कोहेनच्या त्या कामगिरीचा पुढे मध्य-पूर्वेतल्या राजकारणावर प्रभावी परिणाम झाला. त्याच्या कारवाया उघडकीस आल्यावर त्याला सिरीयात जाहीर फाशी देण्यात आलं होतं. याचेही पुढे बरेच पडसाद उमटले. मोसादच्या विरोधात अनेक आरोप केले गेले. मोसादनं कोहेनला अनेक दुय्यम बाबींसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालायला लावला, त्याच्यावर गुप्त माहिती पुरवण्यासाठी खूप दबाव टाकला गेला, बर्‍याचदा त्याला अशी माहिती मिळवण्यास सांगितलं गेलं ज्याचा मोसादला किंवा इस्त्राएलला लौकिकार्थाने काहीही उपयोग होण्यातला नव्हता; असं बरंच काय काय बोललं गेलं.

पुस्तकात मोसादच्या काही फसलेल्या मोहिमांच्याही कथा आहेत. त्यामुळे एकूणच पुस्तकाला, त्यातल्या खर्‍याखुर्‍या हेरांना आपोआप एक मानवी चेहरा मिळतो. तसंच, पुस्तकाची मांडणी करताना लेखकांनी मोसादच्या गाजलेल्या मोहिमांवर अधिक भर देण्याचं पूर्णपणे टाळलं आहे.

म्युनिक ऑलिंपिकमधल्या इस्त्राएली खेळाडूंच्या हत्याकांडाची परिणती ठरलेलं Operation Wrath of God, सुदानमधल्या इथियोपियन ज्यूंच्या सुटकेसाठीची मोहिम, इराणी अणूशास्त्रज्ञांचा खातमा, अशा अनेक कथा श्वास रोखून वाचल्या जातात. या सगळ्या थरारक मोहिमांच्या गोतावळ्यात जराशी हरवून गेलेली “Oh, That? It’s Krushchev’s Speech...” ही एक कथाही मला अतिशय आवडली. ५० च्या दशकात निकिता क्रुश्चेव्ह यांनी रशियाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांपुढे एक मोठं भाषण दिलं होतं. त्या भाषणात त्यांनी स्टॅलिनवर ताशेरे ओढले होते. या भाषणाचे तपशील पुढेही बराच काळ गुप्त ठेवले गेले होते. मात्र क्रुश्चेव्ह नेमकं काय बोलले हे जाणून घेण्यात पाश्चात्य जगताला अतिशय रस होता. अखेर त्या भाषणाची प्रत हस्तगत करण्यात यश आलं ते मोसादला. या मोहिमेत थंड डोक्याने केलेले खून नव्हते; कुठलीही अपहरणं नव्हती; जीवावरचे प्रसंग नव्हते; तरीही त्या सर्व घडामोडी अत्यंत रोचक होत्या.

काही वर्षांपूर्वी नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर On The Inside नावाचा कार्यक्रम असायचा. एखाद्या मोठ्या फॅक्टरीतलं काम कसं चालतं, मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिवसभरात पडद्यामागे काय काय घडतं, अशा प्रकारच्या गोष्टी त्यात दाखवल्या जायच्या. हे पुस्तक असंच मोसाद मोहिमा आपल्याला आतून दाखवतं.

मोसाद माझ्या यादीत आहे, या वीकेंडला वाचेन.

हूडबाबाकामदेव, अ‍ॅमेझॉन किंडल अनलिमिटेडची मेंबरशिप घ्या. महिन्याला २००रुपये आहे बहुतेक. त्यावर अशी अनेक पुस्तके फुकटात वाचायला मिळतील. मोसाद आहे किंडल अनलिमिटेडच्या यादीत. बरीच मराठी पुस्तके पण आहेत.
मोसाद तुम्हाला कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात पण मिळेल. बरेच गाजलेले आणि बेस्ट सेलर यादीतले पुस्तक आहे.

मस्त पुस्तक परिचय.,
लिस्ट मधे टाकून ठेवते..

सुलू, ते आयडीचं नाव आहे ज्यांनी प्रश्न विचारलाय ..

Pages