खेळ शब्दांचा - ३ - मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह

Submitted by संयोजक on 16 September, 2018 - 23:11

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

केशवसुत.

_ _ र
(युद्धाची सूचना/चढाई)

तसेच पुढचा क्लु देण्यासाठी
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह

हा विषय आहे.

---क्र.
श्री. ना. पेंडसे यांची एक कादंबरी.
(३ गाळलेल्या जागा आहेत)

त्यांच्या अद्याक्षरांनी ते प्रचंड प्रसिद्ध आहेत, काहीही क्लू दिला तर लगेच ओळखाल म्हणून देत नाही.
गुरुनाथ बरोबर आता पुढे ओळखा पाहून.

जी ए कुलकर्णी.
मला त्यांचं पूर्ण नाव माहीत नव्हतं.
ए फॉर आबाजी?

Pages